राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>राधा: रंजुताई तुम्ही ह्या रुढी मागचे "शास्त्रीय" कारण अगदी छान सांगितलत

अरे देवा! हे वाक्य 'दुपारच्या गप्पा' टाईप्स आकाशवाणीच्या 'खास बायकांसाठी' म्हणून असलेल्या कार्यक्रमातल्या निवेदिकेच्या तोंडी शोभलं असतं.

स्वप्ना Lol
फक्त एक बदल:
हसत खेळत इंग्रजी शिका- प्रो. आय. माय. यशवंत ढगे
बुध. दि. 18 सप्टेंबर :
गर्भारपण : एक चक्कर. नववधूने कामे टाळण्याच्या हमखास युक्त्या - गार्गी धर्माधिकारी
सांगता: वासरात लंगडी गाय शहाणी - प्रवचनकार केदारनाथ

आज गार्गीला तिच्या बहिणीने विचारलं की केदारने केस का काढले तर ती म्हणाली की केदारने तिला सांगितलं की त्याच्या डोक्यात उवा झाल्या म्हणून केस कापले. Uhoh उद्या डोकं दुखतं म्हणून हा डोकं कापणार का? आता 'ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या' ह्या न्यायाने गार्गीच्या पावलावर पाऊल ठेवून 'माझ्या डोक्यावर परिणाम झाला त्याला जबाबदार माझ्या डोक्यातल्या उवा आहेत' किंवा 'माझ्या डोक्यात उवा झाल्या ह्याला राधा जबाबदार आहे' असं म्हटलं नाही म्हणजे मिळवलं. Happy

स्वप्ना, आशुडी....;)
सोनालिस्ट.....केदारचं काम करणार्याने हा धागा वाचला असेल.....म्हणून उडवला असेल विग......
बाकी आवाज चांगला आहे त्याचा...थोडा वाडकरांच्या (सुरेश) आवाजाशी सार्धम्य असणारा आहे....

केदारचे काम करणारा 'अमोल बावडेकर' हा वाडकरांचा शिष्य आहे. म्हणुन त्याचा आवाज पण त्याच वळणाचा आहे.
बाकी इथे लिहिणार्‍या आणि ती सिरियल नित्य नियमाने बघणार्‍या लोकांना माझा साष्टांग नमस्कार.

तो अमोल बावडेकर आहे होय. धन्यवाद झारा. त्याचा चेहेरा मध्येच यतीन कार्येकरसारखा दिसतो, म्हटल हा विग लावुन आला की काय.

आज गार्गीला तिच्या बहिणीने विचारलं की केदारने केस का काढले तर ती म्हणाली की केदारने तिला सांगितलं की त्याच्या डोक्यात उवा झाल्या म्हणून केस कापले>>>>>> ईईईईईई काहिहि काय
उद्या डोकं दुखतं म्हणून हा डोकं कापणार का?>>>> स्वतःच नाही दुसर्‍यांच डोक कापणार कारण याच्या डोकेदुखीला इतर लोकच जबाबदार असतात ना........

अमोल बावडेकरला मूळचा विमानतळच आहे. सिरियलीत त्याने तो झाकला होता इतके महिने. का झाकला होता आणि आता अच्छादन का काढले आहे ते मात्र माहित नाही Proud

गार्गीने काहीतरी सांगायचं म्हणून बहिणीला ते उत्तर दिलं होतं बहुतेक. खरं कारण कोणालाच माहित नाही असं दिसतंय. मला तर वाटतं केदारचा विग उंदरांनी पळवला असावा. आता दादा धर्माधिकारींनी आपला विग सांभाळावा हे उत्तम. नाहीतर विग हरवायची साथ यायची. Happy

गार्गीचे बाबा भाग्यलक्ष्मीमध्ये पण होते. मला त्यांना पाहिलं की यशवंत दत्तची आठवण होते.

गार्गीचे बाबा भाग्यलक्ष्मीमध्ये पण होते. मल त्यांना पाहिलं की यशवंत दत्तची आठवण होते.>>>> हो तसेच दिसतात.

खरं की काय मुग्धा?? मग ह्या सिरियलीतल्या वेड्यांना कसं सहन करतात देव जाणे! रच्याकने, Jabong च्या जाहिरातीत ती खुर्चीला बांधलेली बया राधा आहे वाटतं.

आदिति...हे....हे... अनुमोदन...... पण यामुळे आता सीमाला ऑफिशियल लायसन्सच मिळालं आरडाओरडा करायला.....कधीही....कुठेही.....कुणावरही....आपला (प्रेक्षक पामरांचा) काही प्रॉब्लेम सुटला नाही, उलट सीमाच्या आक्रस्ताळेपणाने डोकं फुटायची वेळ येते अशी तक्रारच मुळापासून उखडून टाकली गेली आहे.... तोंड दाबून बुक्क्यांचा मार नुसता.......उपचारासाठी साऊथाअफ्रिकेला द्या पाठवून तिला म्हणजे शांतता होईल....मार्तंडबुवांच्या गर्लफ्रेन्डलाही बरं नाहीच आहे....दोघींचीही काळजी घेतील ते..... Wink
पुढेमागे तिने ( म्हंजे गर्लफ्रेन्ड ऑफ मार्तंडने ) कॅन्सरमुळे परलोकाची वाट वगैरे (आता आमच्या माहितीप्रमाणे सिनेमासीरियल्स मध्ये लोकांना कॅन्सर यासाठीच होतो) धरली तर सीमा असेलच तिकडे.....आणि समजा असं नाही झालं तर येईल सीमाबाई थोड्या महिन्यांनी परत....दुसर्यांच्या संसारात लुडबुड करायला.... नाहीतरी सीमा इथे नसेल तर एकच तोटा आहे......गार्गी विल मिस आऊट ऑन सम इम्पॉर्टन्ट सासुरवास अनुभव इन हर लाईफ.

राधा बावरी म्हणजे गरिबांचं Grey's Anatomy आणि राधा म्हणजे गरिबांची मेरिडिथ असा माझा समज दिवसेंदिवस दृढ होत चाललाय. आधी केदारचा मानसिक आजार, मग सौरभचा पॅरॅलिसिस का काय ते. आता सीमाचं हे असं. थोडक्यात काय तर प्रेक्षकांना वैद्यकिय ज्ञान देता आलं तर द्यावं असा विचार मालिकावाले करताहेत बहुतेक. बाकी पात्रांसाठी हे काही आजारः

दादा - डोक्याला अति त्रास झाल्याने brain aneurysm
घारुअण्णा - पायजम्यात पाय अडकून बाथरुममध्ये पडल्याने Subdural hematoma
रंजू - मुलाच्या जन्मानंतर Postpartum depression
गार्गी - प्रिमॅच्युअर डेलिव्हरी
यश - डायबिटीस
सीमाचे बाबा - हार्ट अ‍ॅटॅक
मार्तंड - एड्स

सीमावहिनींचं 'मी आई होऊ शकणार नाही' हे वाक्य ऐकून गार्गी बाळंतपणात मरते आणि सीमावहिनी तिच्या मुलाला सांभाळते असा प्लॉट आहे की काय अशी शंका आली.

अरे देवा हे सिरियलवाले कशालाही महत्त्व देतात. सीमा वैनीचा मेनॉपॉज हा काय चर्चा करण्याचा विषय आहे का? मला गेल्या दोन दिवसात तिच्याबद्दलच्या रंजु आणि इतर मंडळींच्या काळजीचा स्पीडोमीटर बघुन अस वाटल की या बाईंनी काढल वाट्ट वरच तिकीट. खोदा पहाड निकला चुहा असच झालं.

Pages