संस्कृत भाषेची उजळणी

Submitted by निंबुडा on 15 January, 2013 - 05:24

इथेच एका बीबी वर 'जिह्वा' ह्या आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे सप्तमी चे एक वचन लिहायचे होते. तेव्हा 'माला' शब्द मनातल्या मनात चालवून पाहिला आणि लक्षात आले की अधले मधले विसमरणात गेले आहे. मग गंमत म्हणून 'देव' आणि 'वन' शब्द चालवून पाहिले. बरीचशी रुपे आठवली. मग चाळाच लागला. आत्मनेपदी, परस्मैपदी, उभयपदी; इ, वहे, महे इ. असे सर्व एका मागोमाग आठवायला लागले. शाळेत संस्कृत (तिसरी भाषा म्हणून) शिकतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या सर्वांना उजळणी देण्यासाठी हा बीबी. तुम्हाला जे आठवतेय ते तुम्ही ही लिहा. Happy

संस्कृत वर्ग चालू असतानाच्या आठवणीही लिहूया! Happy

+++++++++++++++++
इथे काही जणांनी आधी संस्कृत सुभाषितांची संग्रहमालिका लिहिली आहे. इथे लिंक्स देत आहे.
संस्कृतमधील सुभाषिते मराठीत

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही माझ्या अंदाजे आषाढातल्या पहिल्या दिवशी संस्कृत दिन असावा. कारण मेघदूताची सुरूवात "आषाढस्य प्रथम दिवसे" अशी आहे म्हणुन.
@चैतन्य : कृपया कळवावे, तुम्हाला नक्की माहिती असणार. Happy

एक गमतीदार गोष्टं. लोक काहीही संस्कृत मंत्र म्हणून ऐकतात अशा अर्थाने संस्कृतच्या सरांनी सांगितलेली -
एक पंडित पूजेमधे मंत्र म्हणत असतो. त्याचा मुलगा समोरच्या शेतात ऊस/ कणसे चोरत असतो.
पंडित - बाळंभटा बाळंभटा शेंडी दिसते खाली बसा
बाळंभट खुणेनेच किती तोडू विचारतो
पंडित - दश तुला दश मला दश घरच्या ब्राम्हणीला
पंच पंच पिल्लुकांना शेंडुबेंडू रेडुकांना

@सोनू. | 17 January, 2013 - 16:27
वीस उपसर्ग कोणते याबद्दल एक सुभाषित होते. म्हणायला मजा वाटायची molecular table सारखी -
प्रपरापसमन्ववदुर्निर्भिर् वधिसूदतिनिःप्रतिपर्यपयः उप्आंगिति विंशतिरेष सखे उपसर्गगणः कथितम् कविना
<<

यातील वीस उपसर्ग सुटे सुटे करून माझ्यासारख्याच्या सोईसाठी कृपया लिहाल का? मी अंदाजे काढले पण त्याबद्दल खात्री वाटत नाही.

काव्यशास्त्रविनोद हा सुद्धा असाच सुभाषितांचा एक गमतीशीर प्रकार आहे. त्यातलेच एक सुभाषितः

सन्ध्यारागवती स्वभावकुटिला गंगा द्विजिह्वः फणी
वक्रांगैर्मलिनः शशी, कपिमुखो नंदीच मूर्खो वृषः ।
इत्थंदुर्जन संकटे पतिगृहे वस्तव्यमेतत्कथं
गौरीत्थं नृकपालपाणिकमला चिन्तान्विता पातु वः ॥

अर्थः संध्याकाळच्या बदलत्या रंगांप्रमाणे जीचा (चंचल) स्वभाव आहे अशी गंगा, दोन जीभांचा नाग, वाकडेपणामुळे निस्तेज झालेला चंद्र, वानरासारखे तोंड असलेला मूर्ख नंदी असे सारेजण ज्या घरामधे आहेत तिथे वास्त्व्य कसे करू ह्या विचारात असलेली, जीने कमळासारख्या हातात माणसाची कवटी धारण केली आहे अशी पार्वती तुमचे सदैव रक्षण करो.

मी ही ८ वी ते १० वी फुल संस्कृत शिकलो (१०० मार्क)

त्यात १५ मार्काची प्रश्न विभक्ती प्रत्येय चालवा असे असत मी काधीही ते सोडवले नाहीत मला अजिबात म्हण़जे अजिबात लक्षात येत नसे हा प्रकार

मुळात विभक्ती म्हणजे काय असते का असते हेच कळत नसे
बाकी ८५ मार्काच्या पपेपरात मी ७५ -८० मार्क हमखास मिळवत असे
मला १० वीत असताना एका फुल हिंदी विषय असलेल्या मित्राने क्रियापदाची रूपे सांगीतली <<चलना चलाना चलवाना त्यावरून विभक्ती म्हणजे तसेच काही असते इतकेच आपोआप उमजले

असो चालुद्या तुमचे
धागा फार आवडला
अभिनंदन निंबुडा !!!

वैवकु, आपल्याला शाळेत संस्कृत फार चुकीच्या पद्धतीने शिकवलंय. त्यात मार्क्स मिळवणे इतके सोपे ठेवलेय की पब्लिक घोकंपट्टि करून आरामात ९० तरी मिळवू शकतो.
अगदी हेच पालीच्या बाबतीतही. लातूर पॅटर्नमध्ये कित्येकानी पाली घेऊन १०० गुण मिळवलेत पण त्यांनाही पालीत ' हो' म्हणता येणार नाही. Happy

@निंबुडा

दामोदरसुत यांनी लिहिलेल्या 'वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते' या लेखमालिकेचे एकूण आठ भाग होते.
आपण दिलेल्या लिंकमध्ये त्यातील पाच भागांच्या लिंक्स आहेत.
ज्यांना सर्व भाग वाचायची इच्छा असेल त्यांच्यासाठी सर्व आठ भागांच्या लिंक्स खाली देत आहे.
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[१] http://www.maayboli.com/node/32396
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[२] http://www.maayboli.com/node/32495
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[३] http://www.maayboli.com/node/32548
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[४] http://www.maayboli.com/node/32602
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[५] http://www.maayboli.com/node/32686
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[६] http://www.maayboli.com/node/32754
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[७] http://www.maayboli.com/node/32766
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[८] http://www.maayboli.com/node/33075

काल माझ्या मुलांच्या शाळेत गेलो होतो गॅदरिंगसाठी,
बालवाडीतल्या मुला मुलींचे नाच बसवले होते वेगवेगळ्या गाण्यांवर,
त्यामधे एक अभिनव प्रयोग म्हणजे
"झुक झुक झुक आगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी"
या गाण्याचे संस्कृत रूपांतर करून बाईंनी म्हणले अगदी आहे त्याच चालीत,
आणि छोट्या मुलांनी त्यावर नाच सुद्धा केला छान !
त्यातले काही शब्द लक्षात राहिलेत, धुम्रशलाका, मातुलग्रामे गच्छेम, इ. Happy

मामाच्या गावाला जाऊया.. म्हणजे भविष्यातच आहे की.. मामाच्या गावाला जातो आहे... असं असतं तर गच्छामि बरोबर होईल..

तुम्ही ऐकलेलं बरोबर आहे महेश, ते गच्छेम असंच आहे, कारण हे विधान आहे, की (आपण) मामाच्या गावाला जाऊया. त्यामुळे विध्यर्थी प्रथमपुरुषी बहुवचन असायला हवे. (मी माझ्या लहानपणी चूक ऐकलंय, त्याबद्दल क्षमा.)

हिम्सकूल : भविष्यकाळासाठी संस्कृतात काही वेगळी रूपे नाहीत, कारण भविष्याबद्दल बोलतांना नेहमी विधानार्थी वाक्य करतो आपण. त्यामुळे विध्यर्थी धातूरूप वापरले जाते. खालील तक्ता पहा. परस्मैपदी धातू असल्याने ही रूपे आहेत.

gama dhaatoo.jpg

माझं काही चुकलं असेल, तर जाणकारांनी चूक सुधारावी.

लोकहो, मी लहानपणी ऐकलं होतं क कोणतरी एक विद्वानी (पुण्याचा?) क्रिकेटचे धावते समालोचन संस्कृतमधून करीत असे. कोणाला माहितीये?
आ.न.,
-गा.पै.

@गामा_पैलवान | 21 January, 2013 - 17:17नवीन
लोकहो, मी लहानपणी ऐकलं होतं क कोणतरी एक विद्वानी (पुण्याचा?) क्रिकेटचे धावते समालोचन संस्कृतमधून करीत असे. कोणाला माहितीये?
<<

नक्की माहित नाही.
पण फार फार वर्षांपूर्वी वसंतराव गाडगीळ या भाषेत सर्वांना सहज समजू शकेल अशी जाहीर भाषणे या भाषेबद्दलच्या चुकीच्या समजुती घालविण्याकरिता करीत असत. असे एक भाषण मी सोलापूरात फार पुर्वी ऐकले आहे आणी खरेच सहज कळत होते.
त्यामुळे क्रिकेटचे धावते समालोचन संस्कृतमधून करणारे ते असू शकतील..

मी-भास्कर, धन्यवाद! Happy खरंतर संस्कृत भाषा नेहमीच्या वापरात आणली पाहिजे. संस्कृतमध्ये रोजचे व्यवहार पार पडणे तितकेसे कठीण नाही.
आ.न.,
-गा.पै.

गापै, कदाचित ते पुण्याचे "जोग" असू शकतील. त्यान्च्याबद्दलच्या नाना कथा/किस्से आहेत
नेहरू स्टेडियममधे म्याच बघायला तिकीट त्याचा विरोध म्हणून बिल्डिन्गवर मचाण बान्धून त्यात बसून म्याच बघणे व त्याची कॉमेन्ट्री लाऊडस्पिकरने बाहेरच्यान्ना ऐकवणे, शनिवारवाड्यावर एकट्यानेच जाऊन भाषण ठोकणे इत्यादि अनेक.

संस्कृतभारती नावाची संस्था गेली अनेक वर्षे संस्कृत-सम्भाषणवर्ग घेते आहे.
दर वर्षी, पुण्यात अनेक ठिकाणी असे वर्ग आयोजित केले जातात.
संस्कृत बोलण्याची अतीव इच्छा हीच ह्या वर्गाची एकमेव पात्रता-अट असते.

असेच एक आठवले

धनानि भुमौ पशवश्च गोष्टे |
भार्या गृहद्वारे, जन स्मशाने ||
देहश्चितायाम् परलोक मार्गे |
कर्मानुगो गच्छति जीव एकः ||

मृत्युनंतर काय काय होईल त्याचे वर्णन आहे.
धन जमिनीत राहील (पुर्वी पुरून ठेवत त्यामुळे), पशू गोठ्यातच राहतील,
पत्नी घराच्या दारापर्यंत येईल, लोक स्मशानापर्यंतच येतील, देह चितेपर्यंतच असेल,
पण जीव हा कर्माप्रमाणे परलोक मार्गाला जाईल.

हा संपूर्ण श्लोक आणि त्याची पार्श्वभूमी कोणास माहीत आहे का? असल्यास कृपया द्यावी.

कालोही अयं विपुलाचि पृथ्वी
केनापि जायेत समान धर्मा
तिसरी ओळ माहीत नाही
तान प्रति न एषः यत्नः

ये नाम केचिदिह प्रथयन्त्यवज्ञां
जानन्तु ते किमपि तान् प्रति नैष यत्नः |
उत्पत्स्यते हि मम कोsपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ||

भवभूतीचं 'उत्तररामचरितम्' नाटक विद्वानांकडून उपहासलं गेलं तेव्हा त्याने उद्वेगाने असं म्हटलं अशी आख्यायिका आहे.

संधी जमतील तशा फोडल्या आहेत.

ये नाम केचिद् इह प्रथयन्ति अवज्ञां
जानन्तु ते किम् अपि तान् प्रति न एष यत्नः
उत्पत्स्यते हि मम को अपि समानधर्मा
कालो हि अयं निरवधि: विपुला च पृथ्वी

आणि हा जमेल तसा अन्वय. तज्ज्ञांनी चुका सांगाव्यात.

ये नाम केचिद् इह अवज्ञां प्रथयन्ति ते किम् अपि जानन्तु तान् प्रति एष यत्नः न | मम को अपि समानधर्मा उत्पत्स्यते, अयं कालो निरवधि: पृथ्वी च विपुला |

मस्तच धागा आणि चर्चा !! Happy
यातली कित्येक सुभाषिते शाळेत शिकलेली विस्मरणात गेली होती ती आठवली. माझा अतिशय आवडता विषय होता.
इथे भर घालणार्‍या सगळ्यांचे आभार. :).. वाचणार आहे नेहेमी इथे.

अबोली,
अन्वय बरोबर आहे.
जे इथे माझ्या काव्याची अवज्ञा करताहेत त्यांनी माझ्या काव्याबद्दल काहीही विचार केला तरी मला त्याची फिकीर नाही. कारण माझा हा लेखनप्रपंच त्यांच्यासाठी नाहीच. कुणी तरी माझ्याच सारखा जन्माला येईल (अशी मला खात्री आहे) कारण हा काल अनंत आहे आणि पृथ्वी खूप मोठी आहे.

Pages