संस्कृत भाषेची उजळणी

Submitted by निंबुडा on 15 January, 2013 - 05:24

इथेच एका बीबी वर 'जिह्वा' ह्या आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे सप्तमी चे एक वचन लिहायचे होते. तेव्हा 'माला' शब्द मनातल्या मनात चालवून पाहिला आणि लक्षात आले की अधले मधले विसमरणात गेले आहे. मग गंमत म्हणून 'देव' आणि 'वन' शब्द चालवून पाहिले. बरीचशी रुपे आठवली. मग चाळाच लागला. आत्मनेपदी, परस्मैपदी, उभयपदी; इ, वहे, महे इ. असे सर्व एका मागोमाग आठवायला लागले. शाळेत संस्कृत (तिसरी भाषा म्हणून) शिकतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या सर्वांना उजळणी देण्यासाठी हा बीबी. तुम्हाला जे आठवतेय ते तुम्ही ही लिहा. Happy

संस्कृत वर्ग चालू असतानाच्या आठवणीही लिहूया! Happy

+++++++++++++++++
इथे काही जणांनी आधी संस्कृत सुभाषितांची संग्रहमालिका लिहिली आहे. इथे लिंक्स देत आहे.
संस्कृतमधील सुभाषिते मराठीत

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्शल , कोष्टकाबद्दल ( हल्लीच्या मराठीत 'टेबल' बद्दल Proud )धन्यवाद
>>>> संस्कृत शब्द-धातु रुपावलि: नावाचे पुस्तक मिळायचे <<<<
मी नुकतेच विकत घेतलय, पण काहीच समजत नाहीये Sad कृपया मदत करा!

रामो राजमणि... या रामरक्षेतल्या श्लोकात राम या शब्दाची प्रथमा ते संबोधन एकवचनी रूपं क्रमाने आलेली आहेत

रामो राजमणि: सदा विजयते
रामं रमेशं भजे
रामेण-अभिहता(रामेणाभिहता) निशाचर चमू
रामाय तस्मै नमः
रामात् नास्ति परायणं परतरं
रामस्य दासोस्म्यहम्
रामे चित्तलयं सदा भवतु मे
भो राम मामुद्धर

एकवचन, द्विवचन, बहुवचन ही त्या शब्दाची मी, आम्ही, आपण किंवा तू, तुम्ही, तुम्हीसारे, किंवा ते, ते दोघे, ते सर्व अशी चालवण्याची रूपे आणि प्रथमा ते संबोधन हे शब्दांना योग्यप्रकारे चालवण्यासाठी म्हणजे, तुम्हाला, तुमच्यासाठी, तुमचे, तुम्हांस, तुम्हा सर्वांना अशी शेवटी जी स, ला, ते, स, ला,ना ते, त, इ, आ, तईआ अशी जी अक्षरे लागतात ज्यामुळे वाक्य अर्थपूर्ण होते.

लिंबूटिंबू देवः देवौ देवा: ही देव या शब्दाची अनुक्रमे प्रथमेची एकवचनी, द्विवचनी व बहुवचनी रूपे. संस्कृत भाषेत एकवचन, अनेकवचन याबरोबरच द्विवचनी रूपही आहे.
विभक्तीचे अर्थ मराठीतही तेच आहेत.प्रथमा : कर्ता, द्वितीया : कर्म, तृतीया : करण , चतुर्थी : संप्रदान पंचमी : अपादान षष्टी संबंध सप्तमी : अधिकरण, आष्टमी =संबोधन

देवः देवौ देवा: असे तिन वेळेस का?
>> एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. मराठीमधे द्विवचन नाही.

प्रथमा, द्वितीया इत्यादि हे विभक्ती प्रत्यय आहेत. मराठीमधे देखील असे विभक्तीप्रत्यय असतात. अधिक माहितीसाठी: संकल्प आणि चिनूक्स.

संस्कृत भाषा म्हणजे फक्त शब्दांची रूपे नव्हे. तो भाषा शिकण्याचा एक भाग झाला. पण मुळात संस्कृत भाषा की समृद्ध आणि रसाळ भाषा आहे. पाचवीपासून आम्हाला ते टीएमव्हीच्या परीक्षांसाठी संस्कृतचा अभ्यास केला होता. तेव्हा संस्कृतदिनाला शाळेत भाषणं वगैरे व्हायचीच पण आम्हाला एका वक्तृत्व स्पर्धेला कोल्हापुरात पण पाठवलं होतं शाळेने. नंतर बारावीनंतर अभ्यासातून संस्कृत सुटलं तरी त्याचा फायदा आजवर होतोय.

आम्हाला संस्कृतला गीते सर म्हणून शिकवायला होते. अगदी साधेपणाने आणि सुंदररीत्या शिकवीत असत. त्यांनी शब्द चालवून घेण्यापेक्षा जास्त मेहनत सुभाषित पाठांतर आणि उच्चारांवर घेतली. आमच्याच शाळेतले अजून एक शिक्षक वहाळकर सर यांच्यासोबत संस्कृतमंदाकिनीचे बारा भाग आकाशवाणीवर केले होते. तेव्हादेखील, सर्वात जास्त महत्त्व हे उच्चारांवर होते. नंतरच्या आकाशवाणीच्या कामामधे त्याचा फायदा खूप झाला.

संस्कृत येत असल्याचा अजून एक फायदा म्हणजे बहुतेक भारतीय भाषा समजू शकतात. कित्येक शब्द ओळखीचे निघतात.

माझा आवडीचा विषय!!
मस्त मज्जा यायची सुभाषिताचा अर्थ लावताना.. आमच्या बाई मस्त शिकवायच्या
बाह्य परीक्षाही दिल्या होत्या टिळकच्या पण आता विसरलयं Sad

बाह्य परीक्षाही दिल्या होत्या टिळकच्या पण आता विसरलयं >>
येस्स येस्स. मी ही Happy

वरदा, ते 'रामो राजमणि...' बद्दल माहीत नव्हते. धन्यवाद! Happy

तक्रम् शक्रस्य दुर्लभम् >>
हे ही शिकलो होतो. आता पारच विस्मरणात गेलंय. तुम्हाला आठवत असेल तर सांगा, भरत Happy

इथे ऑफिस मध्ये कधी मधी संस्कृतची हुक्की आली की 'अये सखी, अहं भोजनालयं गच्छामि| किं त्वम् आगच्छसि?' असे काहीतरी बरळले जाते. Proud

काही सुभाषिते आठवत आहेतः

काक: कृष्ण: पिकः कृष्ण: को भेदो पिककाकयो:
वसंतसमये प्राप्ते काक: काकः पिक: पिकः|

(अर्थः कावळाही काळाच आणि कोकिळही काळाच. मग ह्या दोघांत फरक तरी काय? (पण) वसंत ऋतू येताच कावळा तो कावळाच आणि कोकीळ तो कोकिळच!)

--------------

हंसः शुक्लः बकः शुक्लः को भेदो बकहंसयो:
नीरक्षीरविवेकेतु हंसो हंसो बको बकः|
(अर्थः हंसही शुभ्र आणि बगळाही शुभ्रच. मग ह्या दोघांत फरक तरी काय? (पण) दूध आणि पाणी वेगवेगळे करण्याची वेळ येताच हंस तो हंसच आणि बगळा तो बगळाच! [असे म्हणतात की हंसाला दूधात पाणी घालून दिले तरी तो त्यातले पाणी वगळून फक्त दूधच पिऊ शकतो. त्यावरूनच नीरेक्षीरविवेकबुद्धी ही संज्ञा! ])

--------------

आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्य शृंखला
यया बद्धा प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठंति पंड्गुवत्|
(अर्थः आशा नावाची मनुष्याची (मनुष्यासाठी असलेली) अशी एक आश्चर्यकारक साखळी आहे की जिने माणूस बांधला जातो तो वेगाने धावतो पण जो तिच्यापासून मुक्त असतो [आशाहीन मनुष्य] तो मात्र पांगळा असल्याप्रमाणे एका जागी राहतो.)

पाठ्यक्रमातील आणि पाठ्यक्रमाबाहेरील जी काही सुभाषिते ८वी ते १० वी मध्ये शिकविली गेली त्या सर्वांचा मी माझ्या हस्ताक्षरात एका मोठ्या दोनशे पानी वहीत संग्रह केला होता. माझ्या दहावी नंतर शाळेत ओळखीच्या बर्‍याच विद्यार्थ्यांकडे तो हस्तांतरीत होत गेला. काळाच्या ओघात कुणाकडे गेला ते नंतर कळलेच नाही. Sad सुरुवातीला ट्रॅक ठेवला मी. मग वाटले मला जरा जास्तच मोह होतोय का? मग मोह आवरला. जिथे कुठे आहे त्याचा उपयोग होवो बास्स! Happy

संस्कृत शिकलो नाही पण वडिलांना येते. शिकायची आहे, दुवे असतील तर कळवा. व्हिडिओ अधिक चांगले. म्हणजे मराठीतुन असेल तर ...

सापडले http://www.youtube.com/watch?v=rUOYkgnttIY

रामो राजमणि... या रामरक्षेतल्या श्लोकात राम या शब्दाची प्रथमा ते संबोधन एकवचनी रूपं क्रमाने आलेली आहेत>> हा श्लोक नववीच्या संस्कृत सुभाषितांमधे होता आम्हाला. ओळखीचे सुभाषित असल्याने वर्गात म्हणायला लागलं की सर्व अगदी जोरात म्हणायचे. कधीकधी पूर्ण रामरक्षाच म्हणून व्हायची. सर पण अगदी कौतुकाने ऐकायचे. Happy दुसरा असाच ओळखीचा श्लोक याकुंदेंदुतुषारहारधवला... ही आमच्या शाळेची प्रार्थना होती.

अरे, देवा. महेश ना अजूनही जमत नाही का म चा पाय मोडायला.

इंग्रजी m हे अक्षर असलेली कळ दाबा. मग . ची कळ दाबा आनि मग इंग्रजी h ची कळ दाबा. सोप्पं आहे की!

म्

वरील सर्वान्नाच धन्यवाद Happy आता थोड थोड कळू लागलय असे वाटते.

>>>> विभक्तीचे अर्थ मराठीतही तेच आहेत.प्रथमा : कर्ता, द्वितीया : कर्म, तृतीया : करण , चतुर्थी : संप्रदान पंचमी : अपादान षष्टी संबंध सप्तमी : अधिकरण, आष्टमी =संबोधन <<<<
हेच मराठीतुन वाक्यात उपयोग करुन सान्गता येईल का? कारण देव - प्रथमा - कर्ता हे कळते, पण - देव - द्वितिया - कर्म म्हणजे नेमके काय?
'अरे देवा माझ्या कर्मा" इतकाच संबंध मला माहिते Proud
मला काय हवे आहे सान्गतो. मी इन्ग्रजीकरता गुगल ट्रान्सलेट हिन्दीमधे वापरुन, I will pay, I shall pay, I would pay, I should pay, I would have been paid, I shoud have been paid इत्यादी वाक्य रचना करुन इन्ग्रजी समजुन घेतोय. संस्कृत समजुन घ्यायला मात्र मराठीतुन अर्थवाही वाक्य मिळाले तर तत्काळ समजु शकेल.
पुढेमागे जरा जास्त कळू लागलेच, तर निरनिराळ्या स्तोत्रान्चे मराठीत अर्थाकरता स्वैर भाषांतर करण्याचे प्रयोजन आहे.
खरेतर, हा संदर्भ धेऊन
1.subject
2.object
3.with
4.for
5.from
6.of
7.in
8.direct address
वर दिलेली, ही वाक्ये

रामो राजमणि: सदा विजयते = तो/हा राम
रामं रमेशं भजे = ????
रामेण-अभिहता(रामेणाभिहता) निशाचर चमू = रामासहित???
रामाय तस्मै नमः = रामाला (रामा तुला) नमस्कार
रामात् नास्ति परायणं परितरं = रामाकडुन्/रामाशिवाय ???
रामस्य दासोस्म्यहम् = रामाचे
रामे चित्तलयं सदा भवतु मे = रामामधे????
भो राम मामुद्धरम् = हे रामा
असे असे अर्थ होतात का?

यावरुनही एकवचन पुल्लिन्ग नामाबद्दल कळायला हरकत नसावि. पण घोड तिथेच अडतय, अर्थ समजत नाहीये Sad [आजवरचे आयुष्य वाया / फुकट घालवल्याची जाणीव तीव्र होते आहे]

मस्त बीबी निंबे.. मी आठवी ते दहावी संस्कृत घेतलं होतं तिसरी भाषा नि अतिशय आवडता विषय म्हणून. संस्कृतसाठी एका मैत्रिणीच्या आजोबांकडे शिकवणी लावली होती. शाळेतल्या बाईंनी शिकवलेलं फारसं कधी समजलं नाही पण ह्या आजोबांनी शिकवलेलं बर्‍यापैकी पक्कं झालं (होतं तेव्हा :P). नंतर संस्कृत विषय घेऊन बीए, एमे वगैरे करायचं होतं पण ११वी, १२वी ला संस्कृत नाही ह्या कारणाने ठाणा-मुंबईतल्या कॉलेजांनी प्रवेश नाकारला. Sad आता बरचसं विस्मरणात गेलयं. अजूनही जमल्यास संस्कृत पुढे शिकायची इच्छा आहे. Happy

संस्कृत मधील धातू (क्रीयापदाचे मूळ रूप ) हे दहा गणांमधे विभागले गेले आहे. गणाप्रमाणे धातुच्या मूळ रूपात बदल होउन पुढे आत्मनेपदी अथवा परस्मैपदी प्रत्यय लावले जातात.

उदा. वद् - प्रथम गण परस्मैपदी- प्रथम पुरुष, एकवचनी रूप - वदामि -
मुच् - चतुर्थ गण ( नक्की का ?) परस्मैपदी- प्रथम पुरुष, एकवचनी रूप - मुञ्चामि *
कथ - दशम गण परस्मैपदी- प्रथम पुरुष, एकवचनी रूप - कथयामि -
असे काही काही आठवते आहे.. पुन्हा पुस्तके उघडली पाहिजेत.

*( ते )-| हे अक्षर कसे लिहायचे? उत्तराबद्दल धन्यवाद)

या कुंदेन्दु..ही आमच्याही शाळेची प्रार्थना.

भोजनान्तेच किम् पेयम्?
जयन्तः कस्य वै सुतः?
कथम् विष्णुपदम् प्रोक्तम्?
तक्रम्, शक्रस्य, दुर्लभम्|

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना
या ब्रह्माच्युतशंकरप्रभुतिभिर्दैवैसदावन्दिता
सा माम् पा तु सरस्वती भगवती नि:शेष जाड्या पहा|

मला हि भाषा कधी शिकायला मिळाली नाही म्हणुन मला नेहमी या भाषे बद्दल कुहतुल [कोणता शब्द लिहु ]वाटते
इथे छान ओळख होतिये
तरी माझ्या कडिल [वडीलांन कडुन] आलेली lines
१अहम ब्रम्हासी = असे असेल कदाचित =>[मी ब्रम्ह आहे
२मार्जारहा तमआखुम खादती => मांजर उदंरा ला खाते
३औषध मज नल लागे =नल दमयंती मधील दमयंती चा विरह सहन न झाल्याने नल हे माझे औषध आहे असे म्हणने

आम्हाला शाळेत भवभूतीच्या(बहुतेक) नाटकातला उतारा होता. त्यातले एक वाक्य अजूनही आठवते.
इदम् आसनम् अलंक्रियताम् (म्हणजे इथे बूड टेका Lol )
औषध नलगे चा संस्कृतशी काही संबंध नाही.

औषध नलगे मजला हे श्लेष अलंकाराचे उदाहरण.
१) मला कोणतेही औषध लागू पडणार नाही.
२) नळराजा हेच माझे औषध

उष्ट्राणांच गृहे लग्नम्,
गर्दभ: मंत्रपाठकः.
परस्परं प्रशंसंति,
अहो रूपम्, अहो ध्वनी...

मर्कटस्य सुरापानम्,
तत्र वृश्चिकदंशनम्,
तन्मध्ये भूतसंचारम्,
किं बृमो वैकृतं तदा...

पिबन्ति नद्या: स्वयमेव नांभः,
स्वयं न खादन्ति फलानि वृक्षा:,
नादन्ति सस्यं खलु वारिवाहा,
परोपकाराय सतां विभुतयः... ही काही आता आठवतायेत... बाकीची येतीलच Happy

Pages