संस्कृत भाषेची उजळणी

Submitted by निंबुडा on 15 January, 2013 - 05:24

इथेच एका बीबी वर 'जिह्वा' ह्या आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे सप्तमी चे एक वचन लिहायचे होते. तेव्हा 'माला' शब्द मनातल्या मनात चालवून पाहिला आणि लक्षात आले की अधले मधले विसमरणात गेले आहे. मग गंमत म्हणून 'देव' आणि 'वन' शब्द चालवून पाहिले. बरीचशी रुपे आठवली. मग चाळाच लागला. आत्मनेपदी, परस्मैपदी, उभयपदी; इ, वहे, महे इ. असे सर्व एका मागोमाग आठवायला लागले. शाळेत संस्कृत (तिसरी भाषा म्हणून) शिकतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या सर्वांना उजळणी देण्यासाठी हा बीबी. तुम्हाला जे आठवतेय ते तुम्ही ही लिहा. Happy

संस्कृत वर्ग चालू असतानाच्या आठवणीही लिहूया! Happy

+++++++++++++++++
इथे काही जणांनी आधी संस्कृत सुभाषितांची संग्रहमालिका लिहिली आहे. इथे लिंक्स देत आहे.
संस्कृतमधील सुभाषिते मराठीत

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ पिशि अबोली आणि चैतन्य दिक्षित
भवभूतीचं 'उत्तररामचरितम्' नाटक विद्वानांकडून उपहासलं गेलं तेव्हा त्याने उद्वेगाने असं म्हटलं अशी आख्यायिका आहे.
<< ही पार्श्वभूमी मला हवी होती.
प्रतिसादाबद्दल दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद.

इथे लिहिण्यापूर्वी मी माझे औरन्गाबाद येथील मित्र प्रा. मुकुंद देउस्कर यांना विचारले होते. माबोवर लिहिले नि त्यांचा मेल आला. त्यांनी दिलेला श्लोक आणि अर्थ असा:-
ये नाम केचिदिह न: प्रथयन्त्यवज्ञाम्‌
जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्न:
उत्पत्स्यते मम कोsपि समानधर्मा
कालोह्ययं निरवधि: विपुला च पृथ्वी
-- भवभूती

विग्रह करून (संधी सोडवून)

ये नाम केचिद्‌ इह न: प्रथयन्ति अवज्ञाम्‌
जानन्तु ते किमपि तान्‌ प्रति न एष: यत्न:
उत्पत्स्यते मम क: अपि समानधर्मा
काल: हि अयम्‌ निरवधि: विपुला च पृथ्वी
---- भवभूती
अर्थ:
(विग्रह करून लिहिलेल्या ओळीनुसार)
जे कोणी खरोखर आमची(न:) अपकीर्ती (अवज्ञा) येथे (इह) पसरवतात (प्रथयन्ति)
त्यांनी हे समजून असावे की हा यत्न (साहित्य) त्यांचेसाठी मुळीच नाही.
माझा कोणी तरी समानधर्मा [कुठे तरी] निर्माण हो‍ईलच [कारण]
हा काल अनन्त आहे आणि पृथ्वी विस्तीर्ण आहे.

अरे हो..तो 'नः' आठवलाच नाही लिहिताना..
या श्लोकाची आठवण काढल्यामुळे बर्‍याच वर्षांनी अन्वय लावण्याची खटपट केली..त्याबद्दल खरं तर तुम्हालाच धन्यवाद.. Happy

@चैतन्य- प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. Happy

@पिशी अबोली | 4 February, 2013 - 13:36
ही लिन्क बघा.. बर्‍याच वेबसाईट्स सापडतील यावर..@>>

बापरे किति मोठा लिंक्सचा खजिना हा!
तो दाखवल्याबद्दल धन्यवाद!

सर्वात सोप्पे सुभाषीत

पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलं अन्नं सुभाषितम्
मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते

- पृथ्वीवर तीन रत्ने आहेत, पाणी, अन्नं व सुभाषिते. मूर्ख माणसे मात्र दगडाच्या तुकड्याला रत्न म्हणतात.

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती
करमूले तु गोविंदम् प्रभाते करदर्शनम्

आई सकाळंच पाठीत धपाटा घालून का उठवते हे यावरून समजलं होतं. पण लोक ख्खाडकन कानाखाली गणपती कसा काढतात ते नाय कळलं .. चार बोटं उठली असतील तर लक्ष्मी काढली म्हणायला हवं ना !!!

कुणी सान्गू शकेल का? माझे प्रश्न असे की (माझे संस्कृत नव्हते ( )

>>> लिम्ब्या तू काय ऑक्स्फोर्डात होता काय. ?

बाजीराव मस्तानी वर चर्चा चालू आहे तर ई टिवी वर अंगद म्हैसकरने बाजीरव साकारलेली सीरीयल आठवली.
तिचे शीर्षक गीत असे आहे

'शूरस्य वन्दे, वीरस्य वन्दे, जय हो'

इथे 'शूरस्य' हे रूप चुकीचे वाटते. मराठी मध्ये 'इथे जमलेल्या रसिकांचे वंदन करून आपण कारयक्रमाची सुरूवात करूया' असे चूकीचे मराठे बोलले जाते. त्याच प्रकारे 'शूरांचे/ वीरांचे वंदन' म्हणून 'शूरस्य वन्दे, वीरस्य वन्दे..' असे षष्ठीचे रूप वापरले की काय.

द्वितीया रूप हवे ना.?
शूरान वन्दे.... असे?

मस्त धागा आहे कि पहिल्यांदाच बघण्यात आला. हे माझ्याकडून एक सुभाषित, जे तितके प्रसिद्ध नाहीये आणि एकदा ऐकले कि तुम्ही विसरूच शकत नाही. Happy

यायायायायायायायायायायायायायायाया |
यायायायायायायायायायायायायायायाया ||

आता याची फोड(अन्वय) बघा - यायाय, आय, आयाय, अयाय, अयाय, अयाय, अयाय, अयाया, यायाय, आयायाय, आयाया, या, या, या, या, या, या, या, या (यातले काही या - हे या धातुचे रुप आहेत ज्याचा एक अर्थ असतो जाणे. द्वितीय गण परस्मैपद. तर काही या यद् सर्वनामाचे स्त्रीलिंगी प्रथमा एकवचनी रुप आहे. यायाय म्हणजे प्रवास)

भावार्थ (अगदी शब्दशः नाही आहे) : ज्या देवाची (पावलांची) शोभा वाढवतात, ज्या सर्व चांगल्या गोष्टी मिळवण्यात सहाय्य करतात, ज्या देवापर्यंत पोचण्याची इच्छा निर्माण करतात आणि अशा सर्व जागी घेऊन जातात (प्रवास घडवतात) जिथे देवाची भेट घडू शकते - अशा या पादुका देवासाठी (विष्णु) आहेत.

आणि हा एक खास रामायणातून - हा श्लोक दाखवतो कि पूर्वीपासून भाईगिरीची पद्धत सारखीच आहे
वाली सुग्रीवाला म्हणतोय (धमकावतोय)

एष मुष्टिर्महान्बद्धो गाढः सुनियताङ्गुलि: |
मया वेग विमुक्तस्ते प्राणानादाय यास्यति ||

अर्थ - ही माझी घट्ट(सुनियत) वळलेली मूठ पाहिलीस कशी मोठी (महान) आहे. ही तेव्हाच उघडते जेव्हा माझ्या वेगाने ती तुझे प्राण घेते (त्यामुळे तू निघ आता :खोखो:)

हायला, ढाई किलोका हाथ चं ओरिजिनल व्हर्जन. Happy शाळेत असताना महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृतच्या परीक्षांचं पुस्तक असायचं त्यात असे मजेशीर श्लोक दिलेले असायचे त्याची आठवण झाली एकदम.

म्हणताना फोड कसली करताय, मग मजा जाईल ना Wink गीतेच्या अध्यायाच्या चालीत चार चारच्या ग्रुपने म्हणा. एकूण ३२ या आहेत.

हा अजून एक आठवला Happy

कः खगौघाङचिच्छौजा झाञ्ज्ञोऽटौठीडडण्ढणः |
तथोदधीन् पफर्बाभीर्मयोऽरिल्वाशिषां सहः ||

अर्थ : कोण (कः) आहे असा ज्याला पक्ष्यांचा थवा (खगौघ) आवडतो, जो शुद्ध बुद्धिचा आहे (झाञ्ज्ञः), जो इतरांची शक्ति चोरण्यात प्रवीण आहे, जो शत्रूंचा नाश करण्यात अग्रणी आहे, (आपल्या स्थानी) अचल/अढळ, अभय (भय नसलेला), ज्याने समुद्र (पाण्याने) भरला, असा तो (दितिपुत्र, दैत्यांचा राजा) मय शत्रूंचा नाश करणार्‍या आशीर्वादांनी (अरिल्व आशिषां सहः) युक्त आहे.

वैशिष्ट्य असे कि सर्व व्यंजने क्रमाने आली आहेत

पायस, मस्त! असंच एक भची बाराखडी असलेलंही काही आहे ना? त्यात हत्ती होता एवढंच आठवतंय.

पायस दोन्ही श्लोक जबरी आहेत..

निंबुडा.. बेसिकली शूरांचे वंदन हे ऐकतानाच चुकीचे नाही का वाटत..तसेच रसिकांचे वंदन पण चुकीचे वाटते..

रसिकांना वंदन हा प्रत्यय योग्य आहे..

आणि जमलेल्या रसिकांचे स्वागत करुन फार तर ठिक आहे..पण वंदन सूट होत नाही..

हा घ्या भ च्या बाराखडीचा श्लोक (गैरसमज करून घेऊ नये :डोमा:)

भूरिभिर्भारिभिर्भीराभूभारैरभिरेभिरे |
भेरीरेभिभिरभ्राभैरभीरुभिरिभैरिभा: ||

अर्थ (सगळी फोड देत नाही, हा अन्वय करायला सोप्पा आहे तसाही) : त्या निर्भय हत्तीने, जो पृथ्वीसाठी त्याच्या वजनामुळे ओझ्यासारखा आहे, ज्याचा आवाज एका नगार्‍यासारखा आहे आणि जो एका काळ्या ढगासारखा दिसतो, शत्रुच्या हत्तीवर हल्ला चढवला.

यात अभीरु -> निर्भय हे विसरायचे नाही अन्वय करताना.

रच्याकने या सगळ्या श्लोकांना वर्णचरित्र असे म्हणतात कारण त्यात वर्णांचा काही विशेष पद्धतीने वापर केलेला असतो (फक्त या, सर्व व्यंजने क्रमाने, फक्त भ इ.)

४ वेळा या वर फोड करायची होय !
धन्यवाद पायस
जबरी भाषा आहे संस्कृत

साती, पण पाठ करायला यायाया पेक्षा जरा कठिण आहे. Proud

निंबुडा.. बेसिकली शूरांचे वंदन हे ऐकतानाच चुकीचे नाही का वाटत..तसेच रसिकांचे वंदन पण चुकीचे वाटते.. ,
>>>>

मी ही तेच तर म्हटलंय की, हिम्या.
की मराठीत हल्ली बर्‍याच ठिकाणी असे चूकीचे वापरले जाते. म्हणूनच त्या शीर्षक गीतातही शब्दशः भाषांतर करून षष्ठी चे रूप वापरले असावे जे की मला खटकतेय.

पण तिथे षष्ठी चा प्रत्यय येतच नाही.. मूळ मराठी शब्दच चुकीचा आहे त्यामुळे भाषांतर अजूनच चुकीचे झाले असावे...

Pages