संस्कृत भाषेची उजळणी

Submitted by निंबुडा on 15 January, 2013 - 05:24

इथेच एका बीबी वर 'जिह्वा' ह्या आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे सप्तमी चे एक वचन लिहायचे होते. तेव्हा 'माला' शब्द मनातल्या मनात चालवून पाहिला आणि लक्षात आले की अधले मधले विसमरणात गेले आहे. मग गंमत म्हणून 'देव' आणि 'वन' शब्द चालवून पाहिले. बरीचशी रुपे आठवली. मग चाळाच लागला. आत्मनेपदी, परस्मैपदी, उभयपदी; इ, वहे, महे इ. असे सर्व एका मागोमाग आठवायला लागले. शाळेत संस्कृत (तिसरी भाषा म्हणून) शिकतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या सर्वांना उजळणी देण्यासाठी हा बीबी. तुम्हाला जे आठवतेय ते तुम्ही ही लिहा. Happy

संस्कृत वर्ग चालू असतानाच्या आठवणीही लिहूया! Happy

+++++++++++++++++
इथे काही जणांनी आधी संस्कृत सुभाषितांची संग्रहमालिका लिहिली आहे. इथे लिंक्स देत आहे.
संस्कृतमधील सुभाषिते मराठीत

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवरच 'भ'ची बाराखडी आणि रफार, विसर्ग घेऊन बनलेल्या संस्कृत वचनाचा अर्थ कोणीतरी विचारला होता. तो धागा मिळत नाही आहे.

रामाभिषेके जलमाहरन्त्या
हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्या: |
सोपानमार्गेण करोति शब्दम्
ठंठं ठठंठं ठठठं ठठंठः ||

Happy

कोष वगैरे नाही गं.... जी पाठ आहेत अजून ती लिहितोय... पाच-सहा वर्षं झाली संस्कृतचे क्लासेस घ्यायचो त्याला Happy

पण रूपं, धातू, कभूधावि, सगळं पाठ आहे अजून (असं वाट्टंय) Happy
संस्कृत खरोखर सुंदर भाषा आहे...

रामाभिषेके जलमाहरन्त्या
हस्ताच्चुतो हेमघटो युवत्या: |
सोपानमार्गेण करोति शब्दम्
ठंठं ठठंठं ठठठं ठठंठः ||
>>>
आया, ह्या सुभाषितात काय संपादित केलं आहेस??

हस्ताच्चुतो हा शब्द का? ते हस्ताच्युतो हवंय का?
(पदच्युत हा शब्द च ला य असाच लिहितो ना आपण? इथे पण हस्ताच्युत हवंय का?)

निंबुडा हे मी
भोजस्य भार्या जलमाहरन्ति
कराच्युते चंदनं हेमपात्रं
सोपानमार्गे प्रकटोति शब्दं
ठा ठं ठंठंठं ठंठंठं ठ ठंठः

असं काहीसं पाठ केलंय.

घटम् भिंद्यात् पटम् छिंद्यात् कुर्यात् रासभरोहणम्
येनकेनप्रकारेण प्रसिद्धो पुरुषो भवेत्

एक सार्वकालिक रिलेव्हन्ट श्लोक Proud

आम्हाला पोखरणकर सर होते संस्कृत शिकवायला. अगदी धोतर सदरा टोपी वेषात यायचे. उत्तम शिकवायचे. त्यांच्या उच्चारातूनच श, ष ते कळायचे.
संस्कृत नाटके त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. आमचेही नाटक बसवले होते. संस्कृत कथाकथन, गीतेचा अध्यायपठण असे कायकाय उपक्रम राबवित असत.
त्यांच्यामुळे मला १० वीत आणिबारावीतही संस्कृतात भरप्पूर मार्क्स पडले होते.

.

निंबुडा,

माझ्या माहितीप्रमाणे 'आरोग्यं धनसंपदा' आणि 'आरोग्यम् धनसंपदा' दोन्ही बरोबर लिहिलेत. पहिला संधि आहे. त्याचा उच्चार 'आरोग्यन्धनसंपदा' असा काहीसा होतो. दुसरा विग्रह असून त्यात दोन पदे आहेत. म्हणून त्याचा उच्चार 'आरोग्यम् धनसंपदा' असाच होतो.

चूभूदेघे! Happy

आ.न.,
-गा.पै.

आया, ह्या सुभाषितात काय संपादित केलं आहेस??
>> सोपानमार्गे हवं होतं. ते दुरूस्त केलं.

हस्तात् + च्युतः (हातातून खाली पडला) असा संधी आहे तो. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे, हस्ताच्च्युतः असा हवाय. तो बदल करतोय आता.

वा वा....
मस्त वाटलं हा धागा पाहून. मी मध्यंतरी नीतिशतकाचे श्लोक देणं चालू केलं होतं, ते पुन्हा सुरू करायची प्रेरणा झाली ह्या धाग्यामुळे.
श्लोकांची अशीच आठवण करून देत रहा....
मृगात् सिंहः पलायते ही समस्यापूर्ती ठाऊक असेल बर्‍याच लोकांना. तरी देतो इथे-

कस्तूरि जायते कस्मात्? को हन्ति करिणां शतम्?
भीरु: कुर्वीत किं युद्धे? मृगात् सिंहः पलायते |
('तक्रं शक्रस्य दुर्लभं' च्या लॉजिकने वाचलात की समजेलच)

आनंदयात्री,

हस्तात् + च्युतः चा समास केला तर हस्तच्युत: होईल काय? होत असेल तर मूळ शब्द काय आहे?

आ.न.,
-गा.पै.

wow ! एका दिवसात १०७ प्रतिसाद ! इतक्या लोकांना अजूनही संस्कृत मध्ये इंटरेस्ट आहे हे बघून (वाचून) छान वाटले.
मला काहीच कळत नाही संस्कृत मधल.

गा. पै,
हस्तच्युत हा सामासिक शब्द आहे ज्याचा विग्रह हस्तात् + च्युतः असा होतो.
मूळ शब्द काय आहे हा प्रश्न तितकासा बरोबर नाही असे वाटते.
काव्यात कोणता शब्द योजायचा हे त्या काव्याच्या वृत्तावर आणि मुख्यत्वे कवीवर अवलंबून असते.
हस्ताच्च्युतः किंवा हस्तच्युतः हे दोन्ही शब्द त्या श्लोकाच्या हिशोबात वृत्तात बसणारे असल्याने कोणताही वापरला तरी चालणार आहे.

मला वाटते कि शक्रस्य नाही शुक्रस्य आहे. जयंत शुक्र मुनींचा मुलगा आहे.
बरोबर वाटतय का?

भोजनान्तेच किम् पेयम्?
जयन्तः कस्य वै सुतः?
कथम् विष्णुपदम् प्रोक्तम्?
तक्रम्, शक्रस्य, दुर्लभम्|

मी हा ६-७ वीत असतांना पाठ केला होता. काही चुकलं असेल तर सुधारा.

शैले शैले न मणिक्यं, मौक्तिकं न गजे गजे
साधवो नही सर्वत्र, चन्दनं न वने वने

निंबुडा,

>> इथेच एका बीबी वर 'जिव्हा' ह्या आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे ...

हा शब्द जिव्हा आहे की जिह्वा?

आ.न.,
-गा.पै.

मला संधी सोडवा हा प्रकार खुप आवडत असे.
१० वी च्या परिक्षेत एक प्रश्न होता, त्याचे उत्तर चुकले होते.
मार्क कमी झाल्याचे वाईट नव्हते वाटले,
पण जास्त वाईट वाटले जेव्हा गुर्जर बाईंना हे कळाले तेव्हा त्या म्हणाल्या होत्या,
की मला अशी खात्री होती की बाकी कोणाला नाही जमले तरी तुला नक्की जमेल
यामुळे तो शब्द चांगलाच लक्षात राहिला आहे
तो शब्द होता "दोलास्विवोपविशन्ति"
सोडवा पाहू याचा संधी !

निंबे.. महिन्याअखेर परिक्षा देखील असणार आहे का? Wink

मला दहावी नंतर पुन्हा नव्याने संस्कृत शिकावे लागेल असे दिसतय. पण आवडेलही असे दिसतयं. ह्या धाग्यावर मी वाचक म्हणुन असीनच. Happy

>>>हा शब्द जिव्हा आहे की जिह्वा?

जिह्वा बरोबर आहे कारण 'ह' हा महाप्राणोच्चार (कारण ह्याचा उच्चार हृदया पासून होतो) आहे त्यामुळे पहिल्यांदा ह लिहिला जातो आणि मग त्याला शब्द जोडला जातो असं काही तरी आठवतयं.
Happy

महेश,

दोलास्विवोपविशन्ति = दोलासु इव उपविशन्ति ............ चूभूदेघे.

पण, दोला म्हणजे लंबक ना? मग 'लंबकासारखा बसला' असा अर्थ होतो का वरील शब्दाचा?

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद मॅक्स! Happy

तसं असेल तर चिन्ह हे चिह्न होईल. जान्हवी जाह्नवी होईल. म्हणजे ह्मणजे होईल. प्रल्हाद प्रह्लाद होईल.

बरोबर ना?

आ.न.,
-गा.पै.

मी सुध्दा आठवी ते दहावी संस्क्रुत घेतले होते. टिमवि च्या मी चतुर्थी पर्यंत परीक्षा दिल्या होत्या. चतुर्थी परीक्षेला मी महाराष्ट्रात दुसरी आले होते.

Pages