संस्कृत भाषेची उजळणी

Submitted by निंबुडा on 15 January, 2013 - 05:24

इथेच एका बीबी वर 'जिह्वा' ह्या आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे सप्तमी चे एक वचन लिहायचे होते. तेव्हा 'माला' शब्द मनातल्या मनात चालवून पाहिला आणि लक्षात आले की अधले मधले विसमरणात गेले आहे. मग गंमत म्हणून 'देव' आणि 'वन' शब्द चालवून पाहिले. बरीचशी रुपे आठवली. मग चाळाच लागला. आत्मनेपदी, परस्मैपदी, उभयपदी; इ, वहे, महे इ. असे सर्व एका मागोमाग आठवायला लागले. शाळेत संस्कृत (तिसरी भाषा म्हणून) शिकतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या सर्वांना उजळणी देण्यासाठी हा बीबी. तुम्हाला जे आठवतेय ते तुम्ही ही लिहा. Happy

संस्कृत वर्ग चालू असतानाच्या आठवणीही लिहूया! Happy

+++++++++++++++++
इथे काही जणांनी आधी संस्कृत सुभाषितांची संग्रहमालिका लिहिली आहे. इथे लिंक्स देत आहे.
संस्कृतमधील सुभाषिते मराठीत

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास माहिती मिळत्ये Happy
संस्कृत सुभाषिते व त्याचे अर्थ असे संकलन झाले तर बोम्बलत गुगलवरुन इन्ग्रजीमधील वाक्ये "थॉट्स ऑफ द डे" म्हणून बघावी लागणार नाहीत. Happy

मृगापासून सिंह पळतो असा चमत्कारीक अर्थ होतो त्या उत्तराचा... आधीचा एक श्लोक तुम्ही वाचला असेल, तर ताक इंद्राला दुर्लभ आहे हा ही चमत्कारीकच शेवट आहे...

डूआयडींसाठी ADMINला संदेश खास 'संस्कृतात',

लालयेत पंचदिनी
दशदीनी ताडयेत
प्राप्ततेषु षोडशदीनं
डुआयडी मित्र वदाचरेत Proud Proud

हर्षल,

'ताक इंद्राला दुर्लभ' फारसे चमत्कारिक वाटले नाही कारण, इन्द्राला अमृत सुलभ पणे मिळेल स्वर्गामधे पण ताक कसे मिळेल असा अर्थ असावा असे वाटते.
पण 'मृगापासून सिंह पळतो ' असाच निरर्थक अर्थ आहे हे वाचून मजा वाटली...

आता अगदीच चिरफाड करायची झाली, तर इंद्र नारदाला सांगून ताक मागवू शकत नाही का? Proud
किंवा "ढॅण्ण्ण्ण्ण" असा आवाज होत, ताकाने भरलेलं मडकं त्याच्या हातात येऊ शकत नाही का? Proud
ती समस्यापूर्ती आहे, तिन्ही प्रश्न ज्या क्रमाने आले आहेत, त्यांची व्याकरणदृष्ट्या बरोबर उत्तरं शेवटच्या ओळीत येतात... आणि विचित्र तरीही अर्थपूर्ण सुभाषित होते... मला तरी एवढंच सांगता येईल, पिंडे पिंडे मतिर्भिन्ना तसला प्रकार Lol

'यस्मात् भीति: तस्य पञ्चमी' असा नियम असल्याने मृगात् सिंह: असे होते.
चोरात् भयं= चोरांपासून भय
राज्ञः भयं= राजापासून भय इ. उदाहरणे देता येतील.

धनमस्तीति वाणिज्यं भूमिरस्तीति कर्षणम्
सेवा न किञ्चिदस्तीति, भि़क्षा नैव च नैव च |
(ज्याच्याकडे धन आहे त्याने व्यापार करावा, जमीन आहे त्याने शेती करावी, यापैकी काहीच नाही त्याने सेवा करावी, पण भीक कधीही मागू नये)

या सुभाषिताचं मला सुचलेलं रूपांतरण-
अहमस्मीत्यहंकार: कोऽहमस्मीति मूढता
नाहमस्मीति वैराग्यं सोऽहमस्मीति मुक्तता |

लोकहो,

एक सुभाषित आठवलं.

तैलात् रक्षेत् जलात् रक्षेत् रक्षेत् शिथिलबन्धनात् ।
मूर्खहस्ते न दातव्यं एवं वदति पुस्तकम् ॥

अर्थ : तेलापासून सांभाळा, पाण्यापासून सांभाळा, खिळखिळ्या बांधणीपासून रक्षण करा. मूर्खांच्या हाती लागू नका देऊ, असं पुस्तक सांगतं.

यातल्या सगळ्या संध्या केल्या की लांबलचक मालगाडी तयार होते. म्हणूनच माझं ते लाडकं सुभाषित आहे. Happy

तैलाद्रक्षेज्जलाद्रक्षेद्रक्षेच्छिथिलबन्धनान्मूर्खहस्ते न दातव्यमेवं वदति पुस्तकम् ॥

आ.न.,
-गा.पै.

ऋणं कृत्वा घृतं पिबेत चा श्लोक आठवतो का कुणाला? त्याचा अर्थ असा होता, की जे काही आहे ते इथेच आहे. मेल्यानंतर स्वर्ग-नर्क काही नसते असा.

ऋणं कृत्वा घृतं पिबेत् , यावत् जिवेत सुखम् जिवेत |
भस्मीभूतस्य देहं च, पुनरागमनाय कुतः ||

(काही चूक असेल तर दुरूस्ती सुचविणे)

@ हर्षलः यावज्जीवेत सुखम जीवेत, ऋणं कृत्वा घृतं पिबेत । भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥

लंपन, हर्षल,तो श्लोक
यावज्जीवं सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः || असा आहे.

>>इदम् आसनम् अलंक्रियताम् <<
व्यावहारीक अर्थ ' बूड टेका' हाच आहे. पण तीच विनंती अलंकारिक भाषेत ' हे आसन आपण
[ त्यावर बसून ] अलंकृत करावे' अशी मांडली आहे. असा आदब संस्कृतप्रमाणेच उर्दु भाषेत प्रकर्षाने दिसतो. संस्कृत्मिश्रित मराठीत तो येतो. पण तुलनेने मराठीत याचा अभावच आहे असे मला वाटते.

त्याचं एक (मूळ) व्हर्जन असं आहे (म्हणे)
यावज्जीवेत् सुखम् जीवेत्
नास्ति मृत्यू अगोचर:
भस्मीभूतस्य देहस्य
पुनरागमनम् कुतः
(जेवढं/जे जगाल ते सुखाने जगा कारण मृत्यूचं अस्तित्व माहित आहे. एकदा भस्मीभूत झालेल्या देहाचं पुनरागमन कुठे आहे?)

हा श्लोक चार्वाकपरंपरेशी जोडलेला आहे असं मानलं जातं

@महेश | 16 January, 2013 - 12:43
पण सुभाषितांसाठी आधीच एक धागा आहे असे वाटते.
<<
श्री कर्णिक यांनी महत्वाच्या सुभाषितांचे सुंदर मराठी रूपांतर करून माबोवर दिलेले मला आठवतात. शोध मधून सापडतीलही.
शिवाय दामोदरसुत यांनी महत्वाच्या सुभाषितांचे अर्थ देऊन त्याचे व्यवहारात येणारे पडताळेही एका आठ लेखांच्या मालिकेत दिले होते.शोध मधून तेही सापडतील.

श्री कर्णिक यांनी महत्वाच्या सुभाषितांचे सुंदर मराठी रूपांतर करून माबोवर दिलेले मला आठवतात. शोध मधून सापडतीलही.
शिवाय दामोदरसुत यांनी महत्वाच्या सुभाषितांचे अर्थ देऊन त्याचे व्यवहारात येणारे पडताळेही एका आठ लेखांच्या मालिकेत दिले होते.शोध मधून तेही सापडतील
>>>

मी-भास्कर , तुम्ही सर्व प्रतिसाद वाचलेले दिसत नाहीत. मी ह्या दोन्ही लेखमालिकांचा उल्लेख म्घाशीच केलाय हेडर मध्ये.

@वरदा
आपण दिलेला श्लोकच मूळ श्लोक असावा. कारण चार्वाकासारखा विचारवंत 'कर्ज काढून चैन करा' असा उपदेश करेल असे वाटत नाही.

@निंबुडा | 16 January, 2013 - 15:26नवीन
मी-भास्कर , तुम्ही सर्व प्रतिसाद वाचलेले दिसत नाहीत. मी ह्या दोन्ही लेखमालिकांचा उल्लेख म्घाशीच केलाय हेडर मध्ये.
<<
क्षमस्व. माझ्या वाचनातून सुटले हे खरे.
आणि धन्यवाद. ही माझी चूक नजरेला आणून दिल्याबद्दल आणि हव्या त्या लिन्क्स हाताशीच उपलब्ध करून दिलयाबद्दल.

@ चैतन्य धन्यवाद..मला ते यावज्जीवेत असे पाठ केल्याचे आठवत आहे Happy असेल पण यावज्जीवम.. तू खात्री करूनच टाकले असशील. धन्यवाद.

@चैतन्य दीक्षित | 16 January, 2013 - 13:15
धनमस्तीति वाणिज्यं भूमिरस्तीति कर्षणम्
सेवा न किञ्चिदस्तीति, भि़क्षा नैव च नैव च |
(ज्याच्याकडे धन आहे त्याने व्यापार करावा, जमीन आहे त्याने शेती करावी, यापैकी काहीच नाही त्याने सेवा करावी, पण भीक कधीही मागू नये)

या सुभाषिताचं मला सुचलेलं रूपांतरण-
अहमस्मीत्यहंकार: कोऽहमस्मीति मूढता
नाहमस्मीति वैराग्यं सोऽहमस्मीति मुक्तता |
<<
खूप आवडले.

शनै: पन्था शनै: कन्था शनै: पर्वतमस्तके |
शनैर्विद्या, शनैर्वित्तम्, पंचै ते शनै: शनै: ||

हळू हळू मार्गक्रमण करावे, हळू हळू घोंगडी/गोधडी विणावी, हळू हळू पर्वतारोहण करावे,
हळू हळू विद्या मिळवावी, हळू हळू वित्त (पैसा) मिळवावे, या पाच गोष्टी हळू हळू कराव्यात.

तैलाद्रक्षेज्जलाद्रक्षेद्रक्षेच्छिथिलबन्धनान्मूर्खहस्ते न दातव्यमेवं वदति पुस्तकम् ॥
<<
लै द्राक्षे खाऊन लज्जा आल्यासार्ख हसू आलं Wink

Pages