अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवेएठि नेहमीप्रमाणेच दणक्यात झालं. खाणं, पिणं, मजा कशातही जराही कमतरता नव्हती. बाईंची आणि जीएस-आरतीच्या बाहुल्या अतिशय गुणी आणि गोड आहेत.

पोचले का सगळे घरी? Happy

आम्ही गेल्यावर काय काय केलंत त्याचे स्क्रीनशाॅट्स घेतलेत ना? Proud

ह्या गटगचा खास हायलाइट म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांनी मिळून गायलेलं 'मिले सूर मेरा तुम्हारा..'. एबाबा आणि बाईंना पाठांतराबद्दल खास शाब्बासकी Happy

छान झाल गटग.

सिंडरेला - मस्त हा.ला.
डु यु नो 'गटग' Happy

परदेसाईंच 'ड्राईव्हींग अंडर ईनफ्लूएन्स' आवडल Lol

श्री, भारू म्हणजे काय ते एक्सप्लेन कर! Proud
सिंडरेला... हाला मस्त! पण त्यामुळे सविस्तर वृ बद्दल उत्सुकता ताणली गेली आहे. बादवे काही नवीन भक्तीगीतं सापडली की नाही? Happy

कोण कोणास म्हणाले:
"तू येत नाहीस पार्ल्यात ?'
"येते वेळ होइल तसं. तू ?"
"मी पण वेळ होइल तसं येते. तुझा आयडी काय आहे?"
"मोगँबो"
"पण तो आयडी तर..."
"हो, सध्या मी बाबाच्या आयडीने लॉगिन करते"

Lol
उत्तर इथेच की कसं?
क्रॅनबेरी सॉस, कारल्याची चटणी, आवळ्याचं लोणचं वगैरे स्पेशल खाऊकरता संबंधितांचे अनेकानेक आभार.

होय आवळ्याचं लोणचं, कारल्याची चटणी आणिक्रॅनबरीचा मेथांबा (?) हे ऑस्सम !!
'ड्राईव्हींग अंडर ईनफ्लूएन्स' Lol

बरं ,स्प्रिंग गटग ची एक नव्हे तर दोन-तीन होस्टांकडून आमंत्रणं येणार असा अंदाज आहे.
आपण तर बॉ त्याच्या प्रतीक्षेत आतापासून!

मजा आली. इतकं खाललय की अजून भुक लागलेली नाही काल पासून. Happy

वॉल स्ट्रिट वरचे प्रख्यात ट्रेडर श्री विजय कुलकर्णी ह्यांच्याशी छान संवाद झाला. गटग मध्ये "उंधियो" ची होत असलेली प्रचंड उलाढाल बघून ते लवकरच न्यु यॉर्क स्टॉक एक्सचेंज वर "उंधियो" चे ट्रेडिंग सुरु व्हावे ह्या करता त्यांच्या कंपनीतल्या वरिष्टांशी चर्चा करणार आहेत असं त्यांनी नमूद केलं.

फारच त्रोटक वृतांत..
श्या, आमच्या वेळी असं नव्हतं हां.... Proud
सिने मे जलन... बर्प...

चटणी कार्ल्याची की केरळ्याची? केरळ्याची असेल तर पत्ता द्या, प्रिपेड (रिकामा) खोका पाठवतो.

परत घरी जाताना गाडीत त्याच प्रख्यात ट्रेडर कुलकर्णींनी त्यांच्या कंपनीत तयार केलेल्या उंधियो साठीच्या latest quantitative trading strategies बद्दल थोडे सांगितले. त्यातले बरचसे माझ्या डोक्यावरून गेले पण काहीतरी जबरदस्त स्फोटक मोगॅम्बोकारक प्रकार वाटला ...

परतताना तासाभराच्या ट्रेन च्या प्रवासात त्यांनी "उंधियो futures मध्ये पैसे कमविण्यासाठी सोनियानीती" असा खास हितगुजकरांसाठी लेख पण लिहिला आहे. २-४ दिवसात तो इथे प्रसिद्ध करतीलच.

विकु - त्या लेखाची उत्सुकतेने वाट बघतो आहे Happy

केरळा ? कारळे म्हणातात त्याला. पण बिल्वाने कार्ल्याची चटणी आणली होती. Happy उपास इकडे कुठे!

आवळ्याचं लोणचं भारी. क्रॅनबेरी सॉस डबल भारी. झक्की फार विनोदी आहेत.

(नक्की कोण कोणास फु दा देतं कळेना झालंय)

च्च!

गटगला नेहेमिप्रमाणेच धमाल आली.

तीन वाजले आणी अबे अस्वथपणे चहा चहा असे पुटपुटत येराझारा घालू लागले. हॉल असल्याने चहाची व्यवस्था नव्हती. कुणीतरी कॉफी आणली. ती पिताना एखाद्या वाघाला आज मटना ऐवजी साबूदाणा खीर आहे असे सांगितल्यावर त्या वाघाचा चेहरा कसा होईल तसा अबेंचा झाला.

वैद्यबुवांनी नव्या प्रकारचा व्यायाम करून बॉडी बनवलेली असल्याने त्यांनी अरबाझ खान, सुनील शेट्टी वगैरे लोक घालतात तसला टी शर्ट ऐन थंडीत घातला होता आणी साधा माहिम हलव्याचा तुकडा उचलतानाही दंडातील बेंडकुळ्या फुगवत होते !

सोनियाजी आणी राहुलजी यांचे फोटो असलेले लॉकेट लहान बाळांना भेट देण्यासाठी आणले होते पण गडबडीत राहून गेले.

बाकी लहानथोर मंडळींचे उभ्या उभ्या विनोद, गाणी वगैरे धमाल होतीच.

Pages