सर्वच कथालेखक आणि लेखिकांना चर्चा करण्यासाठी व्यासपीठ. इथे कथा/कादंबरी या लेखन प्रकारावरची तांत्रिक अथवा सर्जनशील चर्चा आणि संवाद साधू शकता. रायटर्स ब्लॉक असल्यास इथे मदत घेऊ शकता, कथेसाठी पार्श्वभूमी बनवण्यासाठी आपण इथे एकमेकांची मदत करू शकतो.
कृपया, इथे चर्चा करत असताना संसदीय भाषेमधे चर्चा करा. तसेच, कुठल्याही होतकरू अथवा नविन कथालेखकांची इथे टिंगल करू नका. (कथांमधील चुका दाखवणे अथवा हलकीफुलकी मस्करी अवश्य चालू द्यात पण मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येणे टाळा.
इथे आपले मुद्दे मांडण्याआधी आजवर झालेली चर्चा एकदा वाचून अवश्य घ्या म्हणजे पुन्हा तेच मुद्दे रीपीट होणार नाहीत.
हा धागा सध्या ग्रूपपुरताच मर्यादित ठेवला आहे.
हा अडमने चालू केलेला कथाकथी धागा. मायबोलीवरच्या उत्तम कथा त्याने इथे संकलित करून ठेवलेल्या आहेत. दिवाळी अंकांमधील कथा पटकन सापडत नाहीत कित्येकदा, तेव्हा या धाग्याचा उपयोग होऊ शकेल.
कथा संपल्यावर पुढे काय हे
कथा संपल्यावर पुढे काय हे लेखकाला माहित असणं गरजेचं. >>>
माझं मत याहून जरासं निराळं आहे.
कथा संपल्यावर 'इदं न मम' या भावनेनं लेखकानं त्यापासून दूर जायला हवं. 'पुढे काय?' हे वाचकावर सोडायला हवं. तरच ती कथा संपूनही न संपता वाचकाच्या मनात रेंगाळत राहते.
माझ्यासारख्या नवीन लेखकाना
माझ्यासारख्या नवीन लेखकाना खूपच मार्गदर्शक आहे
इथे मी काही बोलणं म्हणजे लहान तोँडी मोठा घास <<
आम्ही सगळेही इथे नवीनच आहोत. म्हणूनच आपापले अनुभव लिहूया असं चाललंय. तस्मात तू तुझा अनुभव जरूर लिही. सगळ्यांना उपयोग होईल.
त्यामुळे स्पेशलाईज्ड विषयावरची कथा लिहीताना बेसिक गोष्टी लक्षात घ्यावात अस माझ मत आहे << १००%. रिसर्चला पर्याय नाही.
एखाद्या क्षेत्रातल्या अनुभवी व्यक्तीकडून आलेला फिडबॅक आणि पुनर्लेखन यासंदर्भात ललीला +१००
मुळातच आपण एखाद्या स्पेसिफिक विषयातली कथा लिहित असू तर तो विषय किंवा ते क्षेत्र जाणून घेणे महत्वाचे ठरते. आपल्या डोक्यात आलेला कथेचा विषय/ मुद्दा/ घटनाक्रम हे त्या सर्व क्षेत्राच्या अनुषंगाने शक्य आहे की नाही हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.
उदा. एम ए ला असताना आमच्या एका क्लासमेटने स्वतःच्या एक्झाम प्रॉडक्शनसाठी टेस्ट ट्यूब बेबी या विषयावर एकाकिंका लिहिली होती. टेस्ट ट्यूब बेबी या तंत्राची त्याला सुतराम माहिती नव्हती. दत्तक बाळ जसे जन्मल्यानंतर काही महिन्यांनी घरी आणले जाते तसेच हे ही बाळ प्रयोगशाळेतून घरी आणले जाते असे त्याने ठरवले आणि ते बाळ १४-१५ वर्षाचे झाल्यावर त्याला बाहेरचे कुणीतरी तू तर टे ट्यू बे आहेस म्हणून हिणवते आणि ते बाळ आईवडिलांशी येऊन भांडते. त्यांना फसवणूक केल्याचा आणि बेजबाबदार असल्याचा बोल लावते वगैरे भरपूर मसाला घातला होता. त्या वाचनानंतर त्याला विचारण्यात आले की बाबा रे तू काही डॉक्टर्सशी बोलला आहेस का या सगळ्या तंत्राविषयी? हे कसं घडतं? कश्या प्रकारे टे ट्यू बे चा जन्म होतो याच्याबद्दल माहिती घेतलीस का? वगैरे. तर त्या इसमाने 'मला त्या बेबीला काय वाटेल' एवढंच महत्वाचं वाटलं त्यामुळे मी अश्या बिनकामाच्या तपशीलांच्यात पडलो नाही असा युक्तिवाद केला. तिथे आमचे शिक्षकही बंद पडले...
तर असो..
मग या लख्ख अनुभूतीत कलात्मकतेचा वाटा किती? << असं नाही सांगता येणार.
थँक्स नीधप मला ललिता यांचा
थँक्स नीधप
मला ललिता यांचा मुद्दा पटला
कथेच पुर्नलेखन हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे
कधी कधी आपल्या डोक्यात नसलेले मुद्दे यानिमित्ताने माहित होतात
पूर्णत नसल तरी थोडेफार चेँजेस काही अँडिशन करता येतात
अर्थात शेवटचा अधिकार लेखकाचा
नीधप तू जे ऊदा दिल आहे तेच मला म्हणायच होतं
वाचते आहे. छान धागा
वाचते आहे. छान धागा
माझ्या त्या उदाहरणात कथेचा
माझ्या त्या उदाहरणात कथेचा पायाच चुकीच्या गृहितकांवर होता. अश्या वेळेला लेखक म्हणून मी माझा अधिकार वापरावा की लिहिलेलं फेकून देऊन, अभ्यास करून नव्याने लिहावं?
माझं मत ’लिहिलेलं फेकून देऊन, अभ्यास करून नव्याने लिहावं” याला.
येस मलाही तेच म्हणायच आहे
येस मलाही तेच म्हणायच आहे नी
तू दिलेल ऊदा स्पेशलाइज्ड क्षेत्राबाबत आहे
अशा बाबतित चुकीच्या गृहितकावर आधारलेली कथा लिखाण पूर्णत नव्याने लिहावी याला अनुमोदन
मी लेखकाचा अधिकार अस म्हटलय ते काही विशिष्ट मुद्याबाबतित
जस की एखाद पात्र कस वागेल कथेची कल्पना त्याचे संवाद
मला हा मुद्दा व्यवस्थित मांडता येत नाहीये
कदाचित तूच मांडू शकशील
माझं मत ’लिहिलेलं फेकून देऊन,
माझं मत ’लिहिलेलं फेकून देऊन, अभ्यास करून नव्याने लिहावं” याला. >>> येस्स! माझं पण.
रस्ता कथेबद्दल -
(लिहून झालेल्या एखाद्या कथेबद्दल मी असं प्रथमच लिहिते आहे. कितपत सांगता येईल बघते ...)
आमच्या उत्तरांचल टूरच्या वेळची गोष्ट. नैनितालहून खाजगी वाहनाने आम्ही कॉर्बेट पार्कला निघालो होतो. त्या हाय-वेवर एका ठिकाणी फ्लाय-ओव्हरचं काम नुकतंच सुरू झालेलं होतं. त्या जागेच्या अलिकडे डावीकडच्या एका कच्च्या रस्त्यावर सर्व वाहतूक वळवण्यात आली होती. आमच्या पुढे एक अवाढव्य ट्रक होता.
तो रस्ता अगदी कच्चा, धुळीनं भरलेला होता. एकावेळी एकच वाहन जाऊ शकेल इतक्याच रुंदीचा होता. मला गाडी लागते, म्हणून वार्यासाठी काचा खाली केलेल्या होत्या. पुढच्या ट्रकमुळे मणभर धूळ उडत होती. त्यामुळे काही क्षणांतच आम्ही तिघंही वैतागून गेलो. काही अंतरानंतर रस्त्याच्या दोन्ही कडेला मातीचा गिलावा केलेली छोटी घरं दिसायला लागली. तुरळक वस्ती होती, जोडीला अठराविश्व दारिद्र्य कळून येत होतं. ‘आता हे असं कितीवेळ जायचं आहे, कोण जाणे’ असा विचार करून लांबड्या चेहर्यानं मी बसले होते. पुढच्या ट्रकच्यापुढे काहीतरी खड्डा वगैरे आल्यामुळे ट्रक थांबला. आमची गाडीही थांबली, ती नेमक्या एका घराच्या पुढ्यात. तिथे एक बाई दीड-दोन वर्षांच्या किरट्या पोराला कडेवर घेऊन उभी होती. गाडी थांबताच आत अंगणात खेळत असलेली एक पाच-सहा वर्षांची मुलगी पळत बाहेर आली आणि त्या बाईशेजारी उभी राहून आमच्याकडे पहायला लागली. तिच्या नजरेत कमालीचं कुतूहल होतं. ट्रक हलला, आमची गाडी हलली. तिथून निघता-निघता अगदी सहज मी त्या बाईकडे पाहिलं, तर तिची आणि माझी नजरानजर झाली, अर्ध्या-एका क्षणापुरती.
हा सर्व घटनाक्रम अगदी काही सेकंदांचाच.
माझ्या मनात विचार आला - कोण कुठली ठाण्यात राहणारी एक बाई आणि उत्तरांचलच्या एका अनाम वस्तीत राहणारी एक बाई. फ्लाय-ओव्हरचं काम नसतं, तर या दोघी एकमेकींच्या समोर कधीही आल्या नसत्या. दोघींची नशीबं निराळी, पण तरी एक साम्य - बाईपणाचं. पण काय करायचं या साम्याचं? या क्षणीक योगायोगाचा काही अन्वयार्थ असेल का? काय असेल? या विचारानं, मी खरं सांगते, तिथे थरारून गेले.
कडेवरचं ते पोर रडायला वगैरे लागलं असेल, म्हणूनच ती कदाचित त्याला घेऊन बाहेर येऊन उभी राहिली असेल. छोट्या मुलीच्या दृष्टीनं तिथून जाणारी वाहनं घरासमोर थांबली, तर ती मोठी नवलाईची बाब.
वस्तीतून जाणारी वाहनं हा त्यांच्या आयुष्यातला, तात्पुरता का होईना, पण त्यांना हवासा वाटणारा बदल असेल का? शहरीकरणाशी आलेल्या इतपत संपर्काने त्यांच्या दैनंदिन जीवनात काही फरक पडेल का? काय पडेल? तो चांगला असेल, की वाईट? तेवढ्या काही सेकंदांत त्या छोट्या मुलीनं आपली कोणकोणती कुतूहलं शमवली असतील. तिच्याच वयाची तिची एखादी मैत्रीण असेल, तर ती तिला या प्रसंगाबद्दल काही सांगेल का? कसं सांगेल?
फ्लाय-ओव्हरचं काम संपेल तेव्हा काय? तोपर्यंत त्या पोराला गाड्या पाहण्याची सवय लागून जाईल. तेव्हा ते रडायला लागल्यावर त्याची आई त्याला कुठली गाडी दाखवणार? त्याचं रडं थांबवायला नवा विरंगुळा कसा शोधणार?
या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न म्हणजे ‘रस्ता’ ही कथा.
वा पोस्ट आवडली ललिता हे
वा पोस्ट आवडली ललिता
हे वाचून मलाही माझ्या मृदगंध कथेची प्रोसेस लिहाविशी वाटली
जाई. , नक्की लिही २००९ साली
जाई. , नक्की लिही
२००९ साली 'रस्ता' ही कथा मी लिहिली. ३-४ महिन्यापूर्वी सहज उघडून माझी मीच वाचत होते. तर त्यात मला अनेक रिकाम्या जागा दिसायला लागल्या. त्या दृष्टीनं काही मी वाचायला बसले नव्हते, खरंतर. पहिल्या २-३ ठिकाणी इग्नोअर केलं. पण मग अधिकाधिक सूक्ष्म जागा दिसायला लागल्या. मग सरळ बसून त्या भरायलाच सुरूवात केली. थोडक्यात, दिलेल्या लिंकपेक्षा जरासा बदललेला ड्राफ्ट आता माझ्याकडे आहे.
हा माझ्या दृष्टीने कथालेखनाचा एक प्रकारचा सराव आहे आणि ती प्रक्रिया मला आवडते.
ललिता रात्री नक्की लिहीते तू
ललिता रात्री नक्की लिहीते
तू लिहीलेला कथालेखनाचा सराव हा शब्दप्रयोग आवडला
यातूनच परफेक्शन येत
सुंदर लिहीलं आहेत नीरजा आणि
सुंदर लिहीलं आहेत नीरजा आणि ललिता. ह्या दोन्ही कथा माझ्या आवडत्या आहेत. थँक्स
जाई, लिही. मस्त लले. तू
जाई, लिही.
मस्त लले.
तू लिहिलेस तो तुला मिळालेला ट्रिगर. पण मग प्रत्यक्ष लिखाणाला सुरूवात केलीस त्यानंतर शेवटापर्यंत कशी आलीस?
नक्की लिहीते नी
नक्की लिहीते नी
कोणी 'मौज' दिवाळी अंक २०१२
कोणी 'मौज' दिवाळी अंक २०१२ वाचलाय का? त्यात एक अर्चना अकलुजकरांची उत्कृष्ठ कथा आहे. एका लेखिकेचा प्रवास रेखाटला आहे. इतकी सुंदर शैली, अचूक लांबी, एकही अधिक-उणा शब्द नाही.. अतिशय आवडली ती कथा. कोणी वाचली असेल तर सांगा, चर्चा करू
पूनम, मी वाचली आहे ती
पूनम, मी वाचली आहे ती कथा
लले. मस्त लिहिले आहेस. पूनम, तू क्लिकबद्दल लिही ना.. किंवा तुझ्या आवडत्या कथेविषयी लिही.
माझ्या मृदगंध ह्या
माझ्या मृदगंध ह्या यावर्षीच्या मायबोली दिवाळी अंकात लिहीलेल्या कथेविषयी लिहीते
पावसाचे दिवस होते
मला माहीत नाही पण का कोण जाणे पाऊस एक प्रकारचा आश्वासकपणा देतो मला
त्या दिवशी असंच कपडे वाळत घालून बाल्कनीत बसले होते
पाऊस येतोय की राहतोय अस वातावरण
हातात अविनाश धर्माधिकारी सरांच पुस्तक
सरांविषयी एक विद्यार्थिनी म्हणूनच नव्हे एक व्यक्ती म्हणून आदर
सरांच लेखन सरांसारखच आश्वस्त करणार
मन थोड ऊदास होत तेव्हा
पण सरांच पुस्तक वाचल आणि बर वाटल थोडं
धीर वाटला तेव्हा
नेमका तेव्हाच पाऊस आला
वाळत घातलेले कपडे काढावे लागले असूनही त्याचा त्रास झाला नाही
मन शांत झाल एकदम
त्यावेळी मनात काय आल ते नक्की सांगता येत नाही
पण अजित सामंत ही तेव्हा व्यक्तीरेखा जन्माला आली
भारतीय समाज मनात पावसाच स्थान अढळ आहे
शेतीदृष्ट्याच नव्हे तर सामाजिक राजकीय सांस्कृतिक दृष्ट्याही पाऊस भारतात महत्वाचा आहे
एक प्रकारचा आश्वस्तपणा आहे पाऊस म्हणजे
सरांच माझ्या आयुष्यातल स्थानही असच
केवळ यूपीएसी साठीच नव्हे तर तात्विक मानसिक सामाजिक वैयक्तीक दृष्ट्याही आश्वस्त करणार आहे
या दोन्ही गोष्टीच्या सांगडपणातून ती कथा जन्माला आली
आता व्यासपीठ मिळालंच आहे तर
आता व्यासपीठ मिळालंच आहे तर बोलूनच टाकते. प्रतिसाद मोठा आहे, तयार रहा
मला कशा कथा वाचायला आवडतात?- शब्द हे फार प्रभावी आहेत. त्यांचा योग्य वापर करणारे लेखक मला भावतात. अशा कथा ज्यातलं कॅरॅक्टर, प्रसंग, भाषा, विषय मला जस्टिफाईड वाटतो, त्या वाचायला मजा येते. अशा कथा जमलेल्या असल्या, की त्यांच्यात एक ठामपणा आपोआप येतो आणि वाचकाला फ्लो बरोबर घेऊन जातो. कथा वाचताना आपण त्यात गुंतून जातो. कथा संपताना आपणही त्या शेवटाबरोबर राहतो अशा कथा मला मनापासून आवडतात. हा प्रवास एका टेकडी चढण्यासारखा आहे. हळूहळू वर माथ्याकडे आपण जातो आणि माथा गाठल्यावर तितक्याच सहजतेने खालीही येतो. वाटेत खड्डे किंवा खळगे आले की मात्र लक्ष ढळतं. कथेमध्ये लॉजिकमधली गडबड, अचानक वेगळाच अनावश्यक ट्रॅक, अर्धवट सोडलेले धागे असं काही लक्ष विचलित करण्यासारखं आलं की माझा रसभंग होतो. मग कथा पूर्ण झाल्यानंतर मला ती समजून घ्यावी लागते. त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागतो. आणि असं करताना बरेचदा अजूनच त्रुटी दिसायला लागतात. त्यामुळे, सलग बरोबर घेऊन जाणारी कथा मला आवडते. विषय कोणताही चालतो.
हे झालं इतरांनी लिहीलं आहे त्याबद्दल
आता माझ्या कथेबद्दल. माझ्यासाठी काहीही लिहीण्याआधी एक 'ट्रिगर' आवश्यक असतो. तो अनेकदा केवळ एखादी ओळ असते. पण ती ओळ एकदम चमकून जाते आणि त्याचबरोबर अनेकदा कथा आणि तिचा ढाचा समोर दिसतो. मग पात्र, त्यांचं डिटेलिंग, त्यांचे प्रसंग हे आपोआप भरलं जातं. जिथे मीच लॉजिकली अडकते, तिथे मी पुढे जात नाही. 'हे कसं काय?' ह्याचं उत्तर मलाच सापडलं नाही, तर लिहीलेलं सगळं डिलिट करते.
http://www.maayboli.com/node/12562 इथे असलेली 'तुझ्या नसानसात मी' ही माझी कथा. ह्या कथेचा ट्रिगर
कबूल कर अता तरी तुझ्या नसानसांत मी
फितूर श्वास सांगतो उभा जगात बातमी
हा शेर होता. अत्यंत सुंदर शेर. त्यातलं 'तुझ्या नसानसांत मी' लिटरली आणि फिगरेटिव्हली मला एकदम भिडलं आणि ही कथा जन्माला आली. एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, जीवापाड प्रेम करतो, इतकं प्रेम जे शब्दात मावणारं नाही, असं प्रेम जे पूर्ण जगणंच व्यापून टाकणारं आहे- कसं असेल असं प्रेम? हा तो ट्रिगर होता. शक्यतो मी दीर्घकथा लिहीत नाही. पण ही कथा विस्ताराने लिहावीशी वाटली, कारण हिला एक डेफिनेट आरंभ, एक पीक आणि एक उतार होता. त्या सर्व अवस्थांमध्ये मला सावकाशीने जायचं होतं. ही कथा लिहून झाल्यावर मला प्रचंड मानसिक थकवा आला होता. हे माझ्या दृष्टीने चांगलं आहे
आता एकूणातच माझं कथालेखन- मला माझ्या मर्यादांची पुरेपूर जाणीव आहे. चमकदार कल्पना, शब्दांचे खेळ, व्यासंगी दाखले, गूढ असं मी काहीही लिहू शकत नाही. मी अगदी साधी आहे, त्यामुळे माझ्या कथाही अगदी साध्या आहेत. माझ्या काही कथा ह्या अत्यंत भाबड्या, ठीकठाक, लिहील्या नसत्या तरी चालल्या असत्या- अशा झाल्या आहेत हेही माहित आहे. पण तरीही त्या जशा आहेत, तशा माझ्या आहेत
दुसर्यांनी लिहीलेलं वाचून, शिकून, बघून, चर्चा करून माझ्या कुवतीनुसार माझ्या विषयात, प्रकटीकरणात बदल करायचा प्रयत्न करते. हा प्रवास चालूच राहील.
वॉव मस्त पोस्टी आहेत ललिता
वॉव मस्त पोस्टी आहेत ललिता आणि पूनमच्या !!
रस्ता आणि तुझ्या नसात.. दोन्ही आवडत्या कथा आहेत खूप..
पूनम.. तुझ्या नसात.. मासिकात छापून आल्यानंतर आपण त्या बद्दल बोललो होतो.. तो मुद्दा इथे मांडावा का?
छान लिहिलंयस पूनम. शेवटच्या
छान लिहिलंयस पूनम.
शेवटच्या परिच्छेदाला 'सेम हिअर!
'हे कसं काय?' ह्याचं उत्तर मलाच सापडलं नाही, तर लिहीलेलं सगळं डिलिट करते. <<
मला वाटतं डिलिट करू नये.
असं जेव्हा होतं तेव्हा मी अनेकदा सगळ्या लिखाणाचे तुकडे करते (शब्दशः नव्हे) आणि सगळ्याचा क्रम बदलून बघते, सगळी मांडणी, स्ट्रक्चर मोडून तोडून टाकून परत पहिल्या पायरीशी जाऊन नव्याने एकेक मुद्दा हातात घेऊन पारखत जाते.
म्हणजे हा प्रयत्न असतो. जमतेच असे नाही.
पूनम, चांगली पोस्ट.
पूनम, चांगली पोस्ट.
माझ्यासाठी काहीही लिहीण्याआधी एक 'ट्रिगर' आवश्यक असतो. तो अनेकदा केवळ एखादी ओळ असते. पण ती ओळ एकदम चमकून जाते आणि त्याचबरोबर अनेकदा कथा आणि तिचा ढाचा समोर दिसतो. मग पात्र, त्यांचं डिटेलिंग, त्यांचे प्रसंग हे आपोआप भरलं जातं. जिथे मीच लॉजिकली अडकते, तिथे मी पुढे जात नाही. 'हे कसं काय?' ह्याचं उत्तर मलाच सापडलं नाही, तर लिहीलेलं सगळं डिलिट करते. >>> इंटरेस्टिंग. मी डीलीट करण्याऐवजी त्या कथेला मुरवत ठेवते. थोडे दिवस मुरल्यावर कदाचित पुढचा रस्ता दिसतो. नाही दिसला तर तीच पात्रं दुसर्या कथेमधे जाऊन बसू शकतात. किंवा मग पूर्ण कथाच बदलून जाते.
पूनमच्या कथांमधे मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे तिची पात्रं मला भावतात. साधीसरळ आणि नेहमीच्या आयुष्यातली असतात. अशी लोकं आजूबाजूला सतत कुठेतरी असतात आणि त्यांचंच चित्रीकरण पूनमच्या कथांमधे असतं.
धन्स पराग, नी, नंदिनी
धन्स पराग, नी, नंदिनी
मांडूया की पराग.
तर तो विषय असा- की ईलेक्ट्रॉनिक माध्यम- कसे की संकेतस्थळं, ब्लॉग आणि छापील माध्यम- यातही मासिकं आणि पुस्तकं- ह्या प्रत्येक माध्यमासाठी लिहायची पद्धत वेगळी असावी का? इले. माध्यमामध्ये आपण सलग परिच्छेद लिहीतो, मासिकात तेच परिच्छेद तीन कॉलमध्ये तोडले जातात (रुंदीचा विचार करता). मग असं केल्याने त्याचा प्रभाव कमी होतो का? मग नक्की कोणत्या माध्यमासाठी लिहायचे आहे ह्याचा विचार आधी करून मग लिहावे का?
कधी विचार नाही केला या
कधी विचार नाही केला या मुद्द्याचा पण पहिल्या फटक्यात तरी उत्तर नाही येतंय.
विचार करून बघावा लागेल.
किती सुंदर लिहिलं आहेस पूनम.
किती सुंदर लिहिलं आहेस पूनम. 'तुझ्या नसानसात.....' ब्लॉगवर वाचली होती आणि तुला दीर्घ ईमेल लिहिला होता हे आठवून गेलं
मी अगदी साधी आहे, त्यामुळे माझ्या कथाही अगदी साध्या आहेत. माझ्या काही कथा ह्या अत्यंत भाबड्या, ठीकठाक, लिहील्या नसत्या तरी चालल्या असत्या- अशा झाल्या आहेत हेही माहित आहे. पण तरीही त्या जशा आहेत, तशा माझ्या आहेत दुसर्यांनी लिहीलेलं वाचून, शिकून, बघून, चर्चा करून माझ्या कुवतीनुसार माझ्या विषयात, प्रकटीकरणात बदल करायचा प्रयत्न करते. हा प्रवास चालूच राहील.>>> हे फार म्हणजे फारच आवडलं. विद्या विनयेन शोभते
तुझ्या कथा तुला साध्या, भाबड्या वाटतात, पण त्या तश्या नसतात. आपल्याच आजूबाजूला घडणार्या घटना खूप छान पद्धतीने चपखल शब्दात तू लिहितेस त्यामुळे त्या चटकन आपल्याश्या वाटतात, अपील होतात. तुझ्या कथांतून तू काही संदेश देण्याचा आव आणत नाहीस हे मला खूप आवडते, तो संदेश तुझ्या व्यक्त झालेल्या विचारांतून आपोआप वाचकांपर्यंत पोचतो.
मग असं केल्याने त्याचा प्रभाव
मग असं केल्याने त्याचा प्रभाव कमी होतो का? मग नक्की कोणत्या माध्यमासाठी लिहायचे आहे ह्याचा विचार आधी करून मग लिहावे का?>>परागच्या या प्रश्नासाठी परागला प्रणाम.
मास कॉममधे हा प्रश्न होता आम्हाला. म्हणजे असाच नव्हे तर वाचताना वाचकाच्या मनावर परिणाममधे "माध्यम" आणी "प्रेझेंटेशन" मधे हे दोन पाईंट्स होते.
मग नक्की कोणत्या माध्यमासाठी
मग नक्की कोणत्या माध्यमासाठी लिहायचे आहे ह्याचा विचार आधी करून मग लिहावे का?>>
फार प्रामाणिकपणे लिहायचं झालं तर लिहिणं म्हणजे आपल्याच विचारांचं मंथन असते त्यामुळे माध्यमाचा विचार न करता लिहावे या मताची मी आहे.
इले. माध्यमात आपल्या लिखाणाविषयी वाचकांच्या प्रतिक्रिया थेट आणि लगेच आपल्यापर्यत पोचतात पण छापील माध्यमात प्रतिक्रिया पोचेपर्यत काही काळ जातोच, तोवर लिखाणाची धार बोथट झालेली असू शकते का?
लले, नी +१. तू प्रत्यक्ष कथा
लले, नी +१. तू प्रत्यक्ष कथा लिहायला घेतल्यावर तुझे प्रतिक्षिप्त विचार आणि ते कथारुपात मांडण्याविषयीचे विचार यात फारकत नाही का झाली?
वाचते आहे. छान पोस्टस.
वाचते आहे. छान पोस्टस.
इले. माध्यमात आपल्या
इले. माध्यमात आपल्या लिखाणाविषयी वाचकांच्या प्रतिक्रिया थेट आणि लगेच आपल्यापर्यत पोचतात पण छापील माध्यमात प्रतिक्रिया पोचेपर्यत काही काळ जातोच, तोवर लिखाणाची धार बोथट झालेली असू शकते का? <<
हो जबरदस्त.
माबोवरच लिहायला लागल्यामुळे इन्स्टंट प्रतिक्रियांची इतकी सवय झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर मासिकात कथा छापून आल्यावर म्हणजे वाचकांच्या प्रतिक्रिया अनेकदा पोचतच नाहीत आप्ल्यापर्यंत हे जाम ठुसठुसतं!
माबोवरच लिहायला लागल्यामुळे
माबोवरच लिहायला लागल्यामुळे इन्स्टंट प्रतिक्रियांची इतकी सवय झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर मासिकात कथा छापून आल्यावर म्हणजे वाचकांच्या प्रतिक्रिया अनेकदा पोचतच नाहीत आप्ल्यापर्यंत हे जाम ठुसठुसतं!<< याला अनुमोदन.
शिवाय माबो अथवा ब्लॉगवर हवं तेव्हा एडिट देखील करता येतं. थोडक्यात ही ऑनलाईन माध्यमं वन टू मेनी नसून वन टू वन् असतात, त्यामुळे वाचक आणि लेखक यामधे एक नातं तयार होत असतं. पारंपारिक माध्यमांमधे हे नातं एकतर्फी असतं. ऑनलाईन माध्यमांमधे हे संभाषण दुतर्फी असतं.
कालपासूनच्या राहिलेल्या
कालपासूनच्या राहिलेल्या पोस्टी आत्ता वाचून काढल्या.
नीरजा, मंजू, तुमच्या प्रश्नांना उत्तरं देते, जरा वेळ काढून...
मला माझ्या मर्यादांची पुरेपूर जाणीव आहे. चमकदार कल्पना, शब्दांचे खेळ, व्यासंगी दाखले, गूढ असं मी काहीही लिहू शकत नाही.
(तो शेर मस्त आहे.)
>>> पूनम, सेम हिअर...
Pages