सर्वच कथालेखक आणि लेखिकांना चर्चा करण्यासाठी व्यासपीठ. इथे कथा/कादंबरी या लेखन प्रकारावरची तांत्रिक अथवा सर्जनशील चर्चा आणि संवाद साधू शकता. रायटर्स ब्लॉक असल्यास इथे मदत घेऊ शकता, कथेसाठी पार्श्वभूमी बनवण्यासाठी आपण इथे एकमेकांची मदत करू शकतो.
कृपया, इथे चर्चा करत असताना संसदीय भाषेमधे चर्चा करा. तसेच, कुठल्याही होतकरू अथवा नविन कथालेखकांची इथे टिंगल करू नका. (कथांमधील चुका दाखवणे अथवा हलकीफुलकी मस्करी अवश्य चालू द्यात पण मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येणे टाळा.
इथे आपले मुद्दे मांडण्याआधी आजवर झालेली चर्चा एकदा वाचून अवश्य घ्या म्हणजे पुन्हा तेच मुद्दे रीपीट होणार नाहीत.
हा धागा सध्या ग्रूपपुरताच मर्यादित ठेवला आहे.
हा अडमने चालू केलेला कथाकथी धागा. मायबोलीवरच्या उत्तम कथा त्याने इथे संकलित करून ठेवलेल्या आहेत. दिवाळी अंकांमधील कथा पटकन सापडत नाहीत कित्येकदा, तेव्हा या धाग्याचा उपयोग होऊ शकेल.
चांगला बीबी नंदिनी. लले चला
चांगला बीबी नंदिनी.
लले चला आता तुला जाहिर रित्या त्रास देऊ शकते तर

अर्धवट पडून असलेलं, सतराशे वेळा बदललं गेलेलं असं एक कथानक पडून आहेच माझ्याकडे
मी सध्या तरी नी सारखी जवळच्या एक दोघांना दाखवते आधी.
इथल्या चर्चेचा नक्कीच उपयोग होईल
थोडक्यात, तू जे करते आहेस
थोडक्यात, तू जे करते आहेस तेच. <<<
एक्झॅक्टली गं पण तो नियम वगैरे बनवायला नको. लिहिणार्याला कुणाचा सल्ला, उपदेश, टिप्पणी महत्वाची वाटावी हा चॉइस सुरूवातीला तरी लिहिणार्याचाच असावा.
हवी असेल तर मदत करायला आपण कधीही तयार आहोतच.
कथा महत्वाची तपशीलांपेक्षा आणि योग्य तपशीलांच्याशिवाय कथा सर्वांशाने उभी राहणे अवघड असते हे दोन्ही मुद्दे एकमेकांचे विरोधी मुद्दे नसून परस्परपूरक आहेत.
एक्झॅक्टली गं पण तो नियम
एक्झॅक्टली गं पण तो नियम वगैरे बनवायला नको.>>नियम नाहीच आहे. नियम करावा असे माझे मतदेखील नाही.
कथा महत्वाची तपशीलांपेक्षा आणि योग्य तपशीलांच्याशिवाय कथा सर्वांशाने उभी राहणे अवघड असते हे दोन्ही मुद्दे एकमेकांचे विरोधी मुद्दे नसून परस्परपूरक आहेत.
>> वेल सेड.
कथा गुलमोहोरावर देण्याआधी
कथा गुलमोहोरावर देण्याआधी इथल्यापैकी कुणालाही, खाजगी संपर्कातून पाठवून तपासायला द्यावी.>>>
असे बरेच जण करतात
ललि म्हणतेय ते 'संदर्भ तपासणे' तीच स्वत: संबंधितांकडून नेहमीच करून घेते.
एकदा लिहील्यावर संपादनात अजूनच जीव जातो.>>> खरंय! रैनाच्या लिखाणाचं संपादन करताना खरंच जीव जातो
रैना, रागवू नकोस पण मला स्वतःला नेहमी असं वाटतं की तू पुष्कळ वाचतेस, उत्तम ते वाचतेस, उत्तमरीत्या वाचतेस तर लिहिताना तुझ्या हातून 'स्पेलिंग मिस्टेक' कमी व्हाव्यात. इंग्रजी लिखाण करताना स्पेलिंगबाबत आपण आग्रही असतो तसेच मराठी लिखाणाबाबत व्हायला हवे.
लिहिताना तुझ्या हातून
लिहिताना तुझ्या हातून 'स्पेलिंग मिस्टेक' कमी व्हाव्यात. इंग्रजी लिखाण करताना स्पेलिंगबाबत आपण आग्रही असतो तसेच मराठी लिखाणाबाबत व्हायला हवे>>> येस्स, आणि हे माझ्याही बाबतीत लागू आहे ह्याची मला कल्पना आहे. ते सुधारण्याच्या दृष्टीने मी त्यावर मेहनत घेत आहे.
नीरजा, कथा तपासून घेणे
नीरजा, कथा तपासून घेणे बंधनकारक नाहीच.
पण जर कुणाला तशी इच्छा असली, पण कुणाला दाखवावी हे कळत नसलं, तर इथल्या लिस्टमधल्या कुणालातरी ती वाचायला देणे शक्य होईल.
(अर्थात, ज्याला वाचायला दिली आहे, ती व्यक्ती त्वरित त्यावर अभिप्राय / मत / सुधारणा (असल्यास) सांगू शकेलच असं नाहीच. कारण तिथे वेळेचा मुद्दा उपस्थित होतो. तिथे दोन्ही पार्ट्यांकडून पेशन्स अपेक्षित असेल.)
लिहिताना तुझ्या हातून
लिहिताना तुझ्या हातून 'स्पेलिंग मिस्टेक' कमी व्हाव्यात. इंग्रजी लिखाण करताना स्पेलिंगबाबत आपण आग्रही असतो तसेच मराठी लिखाणाबाबत व्हायला हवे>> हे मलातर प्रचंडरीत्या लागू.
पण माझं एक होतं, लिहिताना शुद्धलेखन बदलत राहिलं तर फ्लो राहत नाही. त्यापेक्षा लिहून झाल्यावर मग एकदा प्रूफ रीडींग करणे परवडते. 
इथे बरीच नावे चर्चेला आलेली बघून बरे वाटले. (यातल्या कुणीकुणी हल्ली का ही ही लिहिलेले नाही त्यांनी हात वर उचला पटापट)
अर्थातच ऐच्छिक असतंच
अर्थातच ऐच्छिक असतंच की.
’मायबोलीवर प्रसिद्ध करण्यापूर्वी’ असंही नको. म्हणजे माझ्यासाठी तरी नसतं.
कधी कधी मी इथेच लिहित जाते. त्या त्या टप्प्यावर येणार्या प्रतिक्रियाही महत्वाच्या ठरतात.
मायबोली सारख्या फोरमवर टाकलेली कथा हे अंतिम प्रॉडक्ट असू शकत नाही (उपक्रमांच्यात प्रसिद्ध झालेले लिखाण हे यात समाविष्ट नाही). तो पहिला ड्राफ्टच म्हणता येईल. किंवा मूळ मांडणी.
ज्या ज्या कथा मी इथे लिहिल्या त्या सगळ्यांवर इतर कुठे देताना परत संस्करण केलं होतं. त्याच्यासाठी आलेल्या प्रतिसादांचा, परत परत स्वतःच वाचण्याचा उपयोग झाला.
ड्राफ्टिंग-रीड्राफ्टींग ला पर्याय नाही.
यातल्या कुणीकुणी हल्ली का ही
यातल्या कुणीकुणी हल्ली का ही ही लिहिलेले नाही त्यांनी हात वर उचला पटापट <<<
माझा हात वर.
ललि, मंजू, पूनम, नंदिनी, मेधा, स्वाती यांचेही हात वर असायला हवेत
मेरा सबसे उंचा हाथ
मेरा सबसे उंचा हाथ
नी, ललीने इथे लिहिलं नसलं तरी
नी, ललीने इथे लिहिलं नसलं तरी बाहेर बरच काही आलय तिचं आत्ता आत्ताच
ललिची माहेरातली कथा वाचली.
ललिची माहेरातली कथा वाचली. तिच्याशी सविस्तर बोलायाचे आहे. खदी बेठूया?
ललि, मंजू, पूनम, नंदिनी,
ललि, मंजू, पूनम, नंदिनी, मेधा, स्वाती यांचेही हात वर असायला हवेत >>> हम मोरपिसे लिख रहा हू.
नीधप,मेधा, स्वाती, मंजू, पूनम, साजिरा, रैना. ललिचे दिवाळी अंकात आहे की गं.
आशूडी राह्यली यादीत. हो ललिचे
आशूडी राह्यली यादीत.
हो ललिचे आहे. पण इथे नाहीये.
यावर्षी एकही दि अं नीट वाचला नाहीये अजून आता आज टिळक मंदिरची लायब्ररी सुरू करणारे.
हम मोरपिसे लिख रहा हू
हम मोरपिसे लिख रहा हू <<<
त्रेतायुगापासून लिहितीयेस...
मला कथा आवडली पण शीर्षक
मला कथा आवडली पण शीर्षक अजिबात आवडलं नाही.
मंजू.. मी पण.. मी पण.. आलं तर
मंजू.. मी पण.. मी पण.. आलं तर चालेल का ?>> धागा मी उघडला हा परवानगी मंजूची घेणार.
पराग, सविस्तर अभिप्राय इथे लिहिलात तरी चालेल. हा धागा चर्चा आणि संवादसाठीच आहे.
ललिची कथाश्रीमधली कथा वाचली. असलं काही समजण्याच्या पलि़कडची मी असल्याने मला ते कुनी समजावून सांगेल का?
लहान असताना ऐकलेल्या गोष्टी
लहान असताना ऐकलेल्या गोष्टी हल्ली अजिबातच आठवत नाहीत. मुलांना रात्री सांगण्यासाठी नव्या नव्या गोष्टी रचाव्या लागताहेत. इथे क्रमशः कादंबरी लिहावं तसं. त्यात संपादन चालत नाही
झक मारली आणि ही कथा लिहिली,
झक मारली आणि ही कथा लिहिली, असे लेखकाला आता वाटायला लागले असेल.>>>>>
आणि,
झक मारली आणि हे प्रतिसाद दिले, असे प्रतिसाद देणारयाला !
काय नन्दिनीताई ?!
प्रतिसाद स्वतः मागे घेतला
प्रतिसाद स्वतः मागे घेतला आहे.
दिनेशदा, तुमच्या वर
दिनेशदा, तुमच्या वर उल्लेखलेल्या सर्व मुद्द्यांबद्दल मला वाटतं सर्वांनीच सहमती दर्शवलेली आहे. अशा गडबडी पुन्हा होऊ नयेत म्हणून या बीबीच्या माध्यमातून अनेक उपाय सुचवले जात आहेत- त्या उपायांची चाचपणी अजून चालूच आहे. यंदाच्या संपादक मंडळापर्यंत आणि लेखकापर्यंत आपले म्हणणे पोचवून झालेले आहे. मग आता काय करावे अशी अपेक्षा आहे? मी गेल्या चार पाच प्रतिसादामधून "जाऊद्या" हे वारंवार सांगत आहे. तरी तुम्ही तोच एक कथेचा मुद्दा घेऊन लिहत आहात.
ते बघा आलच ! जित्याची खोड आहे
ते बघा आलच ! जित्याची खोड आहे ती नन्दिनीताई !! मी म्हणाले ना "त्रुटी" !
दिनेश, तुम्ही बहुतेक
दिनेश, तुम्ही बहुतेक सगळ्यांनी आम्ही हरलो तुम्ही जिंकलात म्हणल्याशिवाय मुद्दा सोडणार नाही असे दिसते.
तंत्राच्या चुका, या मी
तंत्राच्या चुका, या मी दिलेल्या उदाहरणाइतक्याच त्रासदायी असतात. >> तुम्हाला एक तर माझा मुद्दा कळत नाहीये किंवा कळलाय पण वळून घ्यायची इच्छा होत नाहिये
तुमचे वाक्य बरोबर आहे पण कोणाला ज्याला ते तंत्र कळतेय त्यांनाच ते लागू होतेय. बाकीचे फक्त कथेमधील घटना वाचून पुढे सरकतात. बहुतांशी कथांबाबत हेच होत असते. आणी बहुतांशी साहित्य हे ऐतिहासिक मापदंड म्हणून जतन केले जात नाही तेंव्हा कसला आग्रह कुठे नि किती धरायचा ह्याचे तारतम्य बाळगायला हरकत नसावी.
प्रतिसाद स्वतः मागे घेतला
प्रतिसाद स्वतः मागे घेतला आहे.
दिनेश मी वर म्हटल्याप्रमाणे
दिनेश मी वर म्हटल्याप्रमाणे माझा मुद्दा तुमच्या आवडत्या कथेबद्दल नसून कुठल्याही कथेबद्दल (इथे कथा सामान्य नाम म्हणून वाचावे ही विनंती) आहे.
तुम्ही शास्त्रीय शुद्धाशुद्धतेचा मुद्दा मांडलाय तो अतिशय योग्य आहे ह्यात शंका नाही पण तो शास्त्री दस्तैवजांच्या संदर्भात अधिक अचूक ठरतो. उदाहरणच द्यायचे तर तुम्ही जो बालगंधर्वांच्या सिनेमाबद्दल म्हटले आहे ते घेतले तर तो सिनेमा त्या वेळच्या वस्त्रप्रवरणे ह्या साठी संदर्भ म्हणून वापरला जाईल असे तुम्हाला का वाटतेय ? असे संदर्भ एखाद्या interpretation वर बघून घेतले जातील असे मानने त्या संशोधकासाठी हेटाळणीकारक वाटत नाही. ज्याला अभ्या करायहा असेल तो व्यवस्थित अभ्यास करताना एकापेक्षा अधिक संदर्भ गोळा करणार नाही का ? तो सिनेमा हा त्या वेळच्या वस्त्र प्रावरणापेक्षा बालगंधर्व ह्या कलाकाराची ओळख व्हावी ह्यासाठी बनवलेला नव्ह्ता का ? त्या त्रुटि झाकता आल्या असत्या तर उत्तमच झाले होते पण त्यासाठी त्या कलाक्रुतीच्या मूळ हेतूवर दुर्लक्ष होईल इतपत ताणणे मला तरी योग्य वाटत नाही. इथे परत हेही लक्षात घेउ कि त्यात दाखवलेले कपडे अगदीच टोकाचे - म्हणजे बालगंधर्व जीन्स मधे वगैरे आहेत असे केलेले नव्हते.) तेंव्हा ह्या थोड्याशा वैगुण्याकडे हा शास्त्रीय दस्त ऐवज नाहिये हे बघून दुर्लक्ष केलेले योग्य ठरणार नाही का ?
बिनधास्त उर्फ साजिरी,
बिनधास्त उर्फ साजिरी, मनापासून शुभेच्छा ! असेच लिहित रहा हो. पण त्याआधी थोडासा प्रामाणिकपणा अंगी बाणवा.
नंदिनीताई काय माझ्यातर्फे उत्तर देणार आहे का ?
प्रतिसाद स्वतः मागे घेतला
प्रतिसाद स्वतः मागे घेतला आहे.
आणि आहे तशी ज्यांना कथा आवडली
आणि आहे तशी ज्यांना कथा आवडली होती, त्यांचा मताचा मी कुठे विरोध केलाय ? उलट मी तिथे प्रतिसादच दिलेला नाही. तिथे दिला असता, तर सगळे हेच बोलला असतात >>> इथे येऊन दुसरे काय करत आहात? हा धागा मी कुठल्या एका स्पेसिफिक कथेच्या चुका काढण्यासाठी बनवला नाही. या धाग्यावरच्या तुम्हाला प्रत्येक प्रतिसादामधे मी "आता जाऊ द्या" म्हणून सांगत आहे.
आता शेवटची विनंती.
कृपया त्या एका कथेची चर्चा इथे पुरे. इथे लिहिणार्या-वाचणार्यांना अजून दुसर्या कशावर तरी चर्चा करू दे. धन्यवाद.
हा घ्या पुरावा !
हा घ्या पुरावा !
Pages