कथालेखन - चर्चा आणि संवाद.

Submitted by नंदिनी on 27 November, 2012 - 04:36

सर्वच कथालेखक आणि लेखिकांना चर्चा करण्यासाठी व्यासपीठ. इथे कथा/कादंबरी या लेखन प्रकारावरची तांत्रिक अथवा सर्जनशील चर्चा आणि संवाद साधू शकता. रायटर्स ब्लॉक असल्यास इथे मदत घेऊ शकता, कथेसाठी पार्श्वभूमी बनवण्यासाठी आपण इथे एकमेकांची मदत करू शकतो.

कृपया, इथे चर्चा करत असताना संसदीय भाषेमधे चर्चा करा. तसेच, कुठल्याही होतकरू अथवा नविन कथालेखकांची इथे टिंगल करू नका. (कथांमधील चुका दाखवणे अथवा हलकीफुलकी मस्करी अवश्य चालू द्यात पण मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येणे टाळा.

इथे आपले मुद्दे मांडण्याआधी आजवर झालेली चर्चा एकदा वाचून अवश्य घ्या म्हणजे पुन्हा तेच मुद्दे रीपीट होणार नाहीत.

हा धागा सध्या ग्रूपपुरताच मर्यादित ठेवला आहे.

हा अडमने चालू केलेला कथाकथी धागा. मायबोलीवरच्या उत्तम कथा त्याने इथे संकलित करून ठेवलेल्या आहेत. दिवाळी अंकांमधील कथा पटकन सापडत नाहीत कित्येकदा, तेव्हा या धाग्याचा उपयोग होऊ शकेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रिगर >>>

हो, उत्तरांचलमधला तो प्रसंग म्हणजे ट्रिगर म्हणता येईल.
तत्क्षणी लगेच यावर कथा लिहावी असं काही डोक्यात नव्हतं. दरम्यान, अगदी लहानपणी (म्हणजे मी २रीत किंवा फारफार तर ३रीत असतानाचा) मनावर कोरला गेलेला एक प्रसंग त्या ट्रिगरशी relevent आहे असं वाटायला लागलं...

तेव्हा आम्ही कोल्हापूरजवळ गारगोटीला रहायचो. बाबांच्या ऑफिसच्या क्वार्टर्स होत्या. मेनगेटच्या बाहेर रस्त्याच्या कडेला केरकचरा टाकण्याची जागा होती. एकदा सकाळी आईनं मला तिथे कचरा टाकून येण्याचं काम सोपवलं. मी गेले, हातातला केराचा डबा तिथे उपडा केला आणि वळले. केरात त्याचदिवशी सकाळी टाकलेलं नव्या टूथपेस्टचं लाल रंगाचं रिकामं खोकं होतं. मी केर टाकत असताना रस्त्यातून एक अगदी खेडवळ आजोबा आपल्या छोट्या नातवाला घेऊन चालले होते. मी केर टाकलेला पाहताच झपाट्यानं त्यांनी रस्ता ओलांडला आणि केराजवळ जाऊन ते छोटं खोकं तेवढं त्यांनी उचललं. मी जराशी थबकले, तर मला त्यांनी परवानगी घेण्याच्या सुरात विचारलं - "हे घेऊ का?" मी प्रतिक्षिप्त कियेनं मान डोलावली. लगेच त्यांनी ते खोकं कडेवरच्या त्यांच्या छोट्या नातवाच्या हातात दिलं. ते छोटं मूल इतकं काही खूष झालं, की विचारता सोय नाही. त्यानं ते हातात घेऊन हलवलं, एका हातानं दुसर्‍या हातावर आपटलं, आजोबांच्या तळहातावर, डोक्यावरच्या टोपीवर आपटलं. आणि दोघं अगदी आनंदी चेहर्‍यानं निघून गेले. निघताना आजोबांनी किंचित मान मागे वळवून, माझ्याकडे पाहून "येऊ का..." अशा अर्थाची मान डोलावली.

माझ्या डोक्यात दोन गोष्टींनी कायमचं घर केलं -
- आपल्यासाठी केर-कचरा किंवा टाकाऊ असणारी एखादी वस्तू दुसर्‍या कुणासाठीतरी उपयोगाचं किंवा वेळ घालवायचं साधन ठरू शकते.
- आणि ती कचर्‍यात टाकून दिलेली वस्तू उचलण्यापूर्वी त्याला आपली परवानगी विचाराविशी वाटते.

ही एक फार मोठी तफावत, समाजाच्या दोन स्तरांमधली, शहरी आणि ग्रामीण जीवनातली, तेव्हाही होती, अजूनही आहे - तेव्हा अर्थात यातलं काहीच मला जाणवणं शक्य नव्हतं. पण तो प्रसंग कायमचा लक्षात राहिला; अचानक relevent वाटायला लागला.
मग विचार केला, की त्या खोक्याप्रमाणे आता लहान मुलांना आकर्षित करेल अशी कुठली गोष्ट असेल? त्यावर, शहरी पर्यटकांनी बेदरकारपणे टाकून दिलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या डोळ्यांसमोर नाचायला लागल्या.

मग, फ्लाय-ओव्हरच्या कामामुळे वळवला गेलेला ट्रॅफिक, त्यामुळे त्या वस्तीचा शहरीकरणाशी वाढलेला संबंध, त्याचे बरे कमी, वाईट अधिक, असे परिणाम - अशी विचारांना दिशा मिळाली.
खेड्यातला शिक्षणाचा अभाव, त्यापायी नको त्या गोष्टींचं वाढीव आकर्षण - यावर विचार सुरू झाला. बालशिक्षणाच्या बाबतीत खेड्यात मुलींना मिळणारी दुय्यम वागणूक ही तर सतत सलणारी बाब.
माझ्या मावससासूबाई सातारजवळ एका खेड्यात राहतात. तिथे आमचं नियमित येणं-जाणं असतं. तिथलं वातावरण, बदलत्या काळाबद्दलची त्यांची निरिक्षणं, त्यावरून आमच्या होणार्‍या गप्पा - हे सगळं एकत्र झालं.

जिथे मीच लॉजिकली अडकते, तिथे मी पुढे जात नाही. 'हे कसं काय?' ह्याचं उत्तर मलाच सापडलं नाही, तर लिहीलेलं सगळं डिलिट करते.

>>> पूनम, एक अनाहूत सल्ला Wink - लिहिलेलं कधीही डिलीट करत जाऊ नकोस. (काही वाक्यं असतील तरचं नाही म्हणत मी, पण पानभर किंवा त्याहून जास्त मजकूर असला तर...) भविष्यात तो मजकूर कधी, कुठे, कसा कामी येईल हे सांगता येत नाही. एक नवीन फाईल ओपन करून ती कथा नव्यानं लिहायला सुरूवात कर, हवं तर, पण आधीचा मजकूर तसाच ठेवत जा.

पराग, लिहिताना विविध माध्यमांसाठीचा विचार करण्याचा तुझा मुद्दा आवडला.

मला व्यक्तिश: मासिकांमधली ती ३-कॉलमी रचना विशेष आवडत नाही. पण, लिहिताना त्यासाठी निराळा काही विचार करता येईल असंही वाटत नाही.
काही मासिकांमधे २ कॉलम्सची रचना दिसते (अंतर्नाद, अनुभव, ललित) - ती बरीच बरी वाटते वाचायला.
त्या ३-कॉलमी रचनेमागे काही विशिष्ट कारण असावं का?

ललिता,
मला याबद्दल फारसे ज्ञान नसले तरी ती तीन कॉलम / दोन कॉलम रचना वाचनाच्या सुलभतेसाठी असते.
नजर पानभर डावीकडुन उजवीकडे वळवुन वाचण्यापेक्षा ते तीन / दोन कॉलम मधे वाचणे सहज होते असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. पण वृत्तपत्रात हे ठीक वाटते. कथा वगैरेसाठी फारसे चांगले वाटत नाही ( मला )

तु लिहीलेले अनुभव आवडले.

इतरांचेही वाचते आहे. Happy

फक्त दोन, तीन कॉलम हा एक मुद्दा झाला. झालं असं होतं की पूनमची ती कथा मायबोलीवर मला खूप आवडली होती. त्यामुळे माहेरमध्ये आल्यावर मी अगदी लगेच ती वाचली आणि तेव्हा ती एकदम फ्लॅट, सपक वाटली आणि "काही काय ! किती फिल्मी" अशी प्रतिक्रिया आली. तर त्या अनुषंगाने ऑनलाईन माध्यम किंवा छापिल माध्यम ह्याच्या दृष्टीने कथा लेखनात काही फरक पडतो का/ करावा का?
अर्थात हा अनुभव ललित/ नॉन फिक्शन किंवा विनोदी लेखनाला आला नाही.

पराग. दुसर्‍यांदा तीच कथा वाचत असताना पुढे काय होणार याचा अंदाज आलेला असल्याने देखील तुला सपक किंवा फिल्मी वाटलेली असू शकते. माध्यमाशिवाय तुला ऑलरेडी गोष्ट माहित असणे हा फॅक्टर तू लक्षात घेतला नाहीस का?

मला याबद्दल फारसे ज्ञान नसले तरी ती तीन कॉलम / दोन कॉलम रचना वाचनाच्या सुलभतेसाठी असते.
>> हो शिवाय बाबा आदमच्य काळामधे कंपोझिंगला पण सोपे पडायचे म्हणे.

तुला ऑलरेडी गोष्ट माहित असणे हा फॅक्टर >>> +१

कंपोझिंग >>> बाबा आदमच्या काळात सोपं जायचं, हे मान्य, पण आता बदलायला काहीच हरकत नसावी खरंतर. सावलीनं लिहिलंय, तसं, वर्तमानपत्रांत ते ठीक वाटतं, पण मासिकांमधे नको वाटतं.

कॉलम असण्याचा फायदा म्हणजे कमी जागेत जास्त शब्द मावतात. मजकुराला पानं कमी लागतात.

ललिता,
आदित्यची पुस्तकं बघ. भौतिकशास्त्राचं पुस्तक दोन कॉलमांत आहे. रसायनशास्त्राचं एका कॉलमात. मजकूर रसायनशास्त्रात थोडा जास्त असला तरी रसायनशास्त्राची दोन पुस्तकं करावी लागली, भौतिकशास्त्राचं एकच आहे.

नंदिनी, ललिता पण मग हे विनोदी लेखनाला जास्त व्हायला हवं ना.. कारण त्यातले पंचेस आधी माहित असतात. सिंडीचा गुळपोळीवाला लेखही माहेरमध्ये होता. पण त्याबाबतीत तसं नाही झालं.. म्हणून स्पेसिफीकली कथेबाबत प्रश्न.

कॉलम असण्याचा फायदा म्हणजे कमी जागेत जास्त शब्द मावतात. मजकुराला पानं कमी लागतात>> हे मला आठवतच नव्हतं. कंपोझिंगला सोपं इतकंच आठवत होत.. धन्यवाद चिनूक्स.

पराग, Happy

आता साजिरा त्यांच्या कुठल्या कथेबद्दल लिहिणार आहेत?

Sadhya baher aahe, vel miLtaach nakki lihin, nandini Happy

Apaplya kathanbaddal lihilele aawadle.

Ata anek june kathalekhak aathvat aahet. Tyanni lihilele aawdel.
Shivay, anek navin lekhak changle lihitat. Tyanchyakadunahi aikayla aawdel. laxaat na aalelya goshti aani drushtikon, shivay kahi na kahi navin shikayla milel asa (swarthi) hetu.

पूनम, फसली आहे असे म्हणणे नाहीये. वाचताना लाईकचा ग्राफ कॉन्स्टंट राहिला नाही असं म्हणतोय पराग. हो ना?

साजिरा वेळ मिळाला की लिहा. Happy

बस्कू, चर्चेमधे सामिल हो. Happy

या धाग्याचा हा विषय नाहीये, तरीही टॅम्प्लिज घेऊन (;)) इथे लिहून ठेवते.

नीरजा आणि nikhilmkhaire, मला एक उत्सुकता म्हणून पटकथेचा एखादा नमुना वाचायला हवा आहे.
(नाटकांची पुस्तकं लहानपणी वाचलेली आहेत. त्यामुळे 'लिहिलेलं' नाटक कसं असतं, ते साधारण माहित आहे. तसंच, लिहिलेली पटकथा पाहण्याची खूप उत्सुकता आहे.)

टॅम्प्लिज संपली. Proud

ललिता, इंग्रजी चित्रपटांचे स्क्रीनप्लेज असतात ऑनलाइन उपलब्ध.
'स्क्रीनप्ले' असंच गूगल कर. कैक सापडतील.
मराठी चित्रपटांचेच हवे असतील तर कल्पना नाही.

अरेच्च्या, स्वाती तुझी पोस्ट आज पाहिली. थॅन्क्स... Happy

मी आत्ता इथे लिहायला आले होते ते हे -

जानेवारी महिन्यापासून 'अनुभव'च्या अंकात गणेश मतकरी यांची 'बिनशेवटाच्या गोष्टी' या नावाने कथामालिका सुरू झाली आहे. जाने-फेब्रुच्या कथा या एकाच दीर्घ कथेचे दोन भाग म्हणता येतील अशा होत्या. पण तरीही स्वतंत्र वाचता येऊ शकतील अशा...
मला आतापर्यंतच्या तीनही कथा आवडल्या आहेत. खूप.
निवेदनाची पध्दत, वातावरणनिर्मिती, व्यक्तीचित्रण सगळं फार छान आहे. मेट्रोजमधे राहणार्‍या, कॉर्पोरेट पात्रांच्या कथा आहेत. म्हटलं तर ही पात्रं एकजात सगळी हाय-सोसायटीवाली आहेत, पण त्यांचे प्रॉब्लेम्स, दैनंदिन समस्या, त्यांचं विश्व यांचं चित्रण मस्त आहे. कुठलाही आव आणलेला नाही, आर्थिक तफावत दाखवून देण्याचं उद्दीष्ट नाही, समाजसुधारणावादी गळे काढलेले नाहीत, श्रीमंत कसे माजलेले, गरीब कसे पिचलेले असली कुठलीही तुलना नाही.
अंक मिळवून अवश्य वाचा या कथा.
गणेश मतकरींचं आजवर सिनेमासंदर्भातलं लेखन बरंच वाचलेलं आहे. पण ते कथालेखनही करतात हे मला माहिती नव्हतं.

"Ultimately literature is nothing but carpentry. Both are very hard work. Writing something is almost as hard as making a table. With both you are working with reality, a material just as hard as wood. Both are full of tricks and techniques. Basically very little magic and a lot of hard work involved." - Marquez

नंदिनी, माझ्याकडे दर महिन्याला अंक येतो. मी तुझ्यासाठी ठेवून देईन.

लले, तुझं पुस्तक वाचतेय, पण दरवेळी असं होतंय की चार पानं वाचून झाली की पुढे वाचावंसं वाटत नाही. तरीही नेटाने वाचत राहते, पण त्यात गुंतता मात्र येत नाहीये. का असे होत असावे?

मंजू, मूळ इंग्लिश पुस्तक वाचताना माझंही असंच झालं होतं.
त्यात पात्रं खूप आहेत. त्यामुळे सुरूवातीची त्यांच्या इंट्रोडक्शनची प्रकरणं संपेपर्यंत त्यात गुंतायला होतच नाही. ४थ्या किंवा खरंतर ५व्या प्रकरणापासून खरी मजा यायला सुरूवात होते. पण आधीची प्रकरणं नुसती चाळून पुढं गेलेलंही चालणार नाही. कारण पुढे लिंक लागणार नाही.

शप्पथ मंजूडी!! मीही कालच आणलंय स्पाय Happy पंधराएक पानं झाली आहेत वाचून. मला इन्टरेस्टिंग वाटतंय. पण अक्षर खूप लहान आहे. वाचायला किमान पंधरा दिवस लागणार मला Sad ललि, नंतर सविस्तर फीडबॅक देणारेय ईमेलीवर.

मूळ इंग्लिश पुस्तक वाचताना माझंही असंच झालं होतं.
>>
हाईला!! तरीही तू नेटाने अनुवाद केलास... ग्रेटेस!

पात्रं खूप आहेत म्हणण्यापेक्षा ते वर्णन माझ्या डोळ्यांसमोर उभं राहत नाहीये. भाषा फार तांत्रिक वाटतेय की काय कोण जाणे.. असो! मी ते पुस्तक पूर्ण करणार आहेच.
(किमान पुढचे दोन महिने ते पुस्तक माझ्याकडे असेल असे धरून चाल Wink )

पूनम, इथेच लिही, पुस्तकओळखमधे. अजून कोणीच अभिप्राय लिहिला नाहीये ललीच्या पुस्तकाबद्दल.

Pages