ववि२०१२-वृत्तांत

Submitted by ववि_संयोजक on 23 July, 2012 - 02:48

मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.

विषय: 

ववि ची धमाल पाहुन यावर्षी कुतुहल म्हणुन आलेला नविन मायबोलीकर प्रशांत ने पुढच्या वविच्या सांस विभागामध्ये काम करण्याची ईच्छा प्रदर्शीत केली आहे. त्याच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होइल

आनंद, नविन आलेल्या मायबोलिकरांपैकी प्रकाश जोशींनी ही पुढील वर्षाची बूकींग आत्ताच करून टाकली आहे..

ए अभिषेक, हा काय रे तुझा वात्रटपणा ! वृत्तांत, वृत्तांतामध्ये सस्पेन्स आणि दोन्ही चक्क क्रमशः ? Angry
(मी नेहमी ही लाल स्मायली टाकण्याचे शक्यतो टाळते.) ते काही नाही, आजच्या आज लगेच पुढचा वृत्तांत पुर्ण टाक..........

मास्तरांनु, मालवणीत्सुन काय मस्त वृत्तांत लिवलास ! वा वा ! Happy

त्याच दिवशी आपल्यातल्याच कौतूक शिरोडकर, धूंद्-रवी आणी कवठीचाफा ह्येंचां 'झी-मराठी' वर जाहीर कौतूक होवचा होतां... खरां सांगा, लक्षात ठ्येवन कोणी-कोणी त्यादिवशीचो 'डब्बा-गूल' बघितलात ???... >>> मी बघितलंय........'हे बघा आमचे मायबोलीकर' असा घरातल्यांका सांगी व्होतंय, तोपर्यंत ते पडद्यावरुन गायबव झाले. Sad

यावेळीचा ववि... एकदम झक्कास झाला.... खुप खुप मजा आली आणि केली देखील...
सगळ्या संयोजकांचे विशेष धन्यवाद.. Happy

गाडीत केलेली धम्माल याला तर तोड नव्हतीच. वविला जाताना आणि येताना मजेमध्ये कसूभर पण कमी नव्हती. लावण्या , आरत्या, जुनी गाणी, भजन... सगळ सगळ... लावणीच्या वेळी मात्र यो-रॉक्सची खुप आठवण आली.

तुमचा अभिषेक ... तु वृत्तांत कधी पुर्ण करणार आहेस, की ईथेही बायकोला विचारणार आहेस..
तुझ्या वृत्तांतावरून तु तर ईतका एक्साईट वाटत होतास, पण प्रत्यक्षात वविला मात्र खुपच अलिप्त राहत होतास... बायकोने दम तर नाहि दिलेला ना...

आपले वेबमास्टर ' अजय गल्लेवाल ' यांच्याबद्द्ल काय बोलणार.. एकदम मस्त व्यक्तीमत्व.. पहिल्यांदाच भेटले पण बोलताना अजिबात जाणवत नव्हते, सगळ्यांची आवर्जून चौकशी करत होते, सगळ्यांमध्ये मिसळले होते.

खेळांमध्ये तर हसून हसून वाट लागलेली... जास्त मजा आली ती तर उतारा वाचण्याच्या खेळात...
यात मात्र आशुडीचे खुप कौतुक वाटले, अतिशय कल्पकतेने उतारा लक्षात ठेवून पुढे पास ऑन केला Happy कार्यक्रमात दरवेळी वेगळीच मजा असते, नेहमी काहितरी वेगळ. खेळाचा शेवट तर एकदम भारी, नाटक तर ए-वन...

माझा मुलगा तर वविवरून आल्यापासून सारखाच हि.. हाहा... च करत आहे. म्हणजे त्याची पण वविची झिंग उतरली नाहि तर... तिथून निघायलाच कबूल नाही . का तर म्हणे मला राहायच आहे ईथे... Happy

Happy

@ श्यामली,
मी वविलादेखील क्रमशःच आलो होतो.. कधी मी तुमच्यात असायचो.. तर कधी नसायचो.. !!

@ वनराई,
वात्रटपणा कसला त्यात... Angry ....... काल झोप आली ना काल लवकर.. Proud

@जुई,
मी शांतच आहे ग्ग.. Sad
तसेही मी कोणाला इथे सांगितले होते की मी मस्तीखोर मुलगा आहे म्हणून..

जुई, समस्त बच्चे कंपनीनी खुपच धम्माल केली काल...

ओम तर पाण्यातून बाहेर यायला तयारच नव्ह्ता, आधीच सर्दी आणि खोकला होता, काल ताप आला..
साहेबांनी लगेच घोषणा करून टाकली, उद्या मी अंघोळ करणार नाही आणि शाळेतही जाणार नाही Happy

समस्त बच्चे कंपनीनी खुपच धम्माल केली काल...
>>>>>>>>>

+७८६

ते बघून मी सुद्धा आमचेही केव्हा पर्यंत, कोणत्या वविला येईल याचे प्लानिंग करू लागलो.. Blush

ते बघून मी सुद्धा आमचेही केव्हा पर्यंत, कोणत्या वविला येईल याचे प्लानिंग करू लागलो.>>ओहो, तुझ्य अलिप्त असण्याचे हे कारण होते होय Wink

ते बघून मी सुद्धा आमचेही केव्हा पर्यंत, कोणत्या वविला येईल याचे प्लानिंग करू लागलो.>>ओहो, तुझ्य अलिप्त असण्याचे हे कारण होते होय >>>>>>>>>>>>>>

पण बायको तर जोरात दंगा घालत होती की त्याची Proud

हो ना... नील, मुलांनी तर धम्माल केली. मी काल श्रीशैलला सहज विचारल की हि..हाहा कोण करत होत रे... तर म्हणतो कसा ते काका... ओमचे बाबा, आणि ते चश्मेवाले काका.. Lol

नी आणी शामली...
परेश मोकाशी इल्लो.. खय आसां खय तो? हल्ली दिसांक नाय माबोवर...>>>...
देसाई मास्तर तो प्रसाद मोकाशी ... >>>...

बघितलात मां?, ह्यां असां होताहा... Proud
पण ह्यो मात्र 'पोश्ट्-ववि-ईफेक्ट' ह्येची खात्री बाळगा... Happy
आसो...

परेश मोकाशी देखिल 'मायाबोली'कर आसा?... खरांच की काय?...

:हाहा:...

मी पण महान. लिहायचं होतं प्रसाद मोकाशी आणि सवयीने परेश लिहून मोकळी आत्ता तुम्ही म्हणालात तेव्हा लक्षात आलं Happy

ठीक आहे मग पुढच्या ववित दंगा घालतो... आणि बघते काय होते ते... मुलगी झाली तर वर्षा आणि मुलगा झाला तर विहार.. Proud

देसायानु एक्दम झ्य्याक आसा तुमचो वावि व्रु. माल्वनि तड्को एक्द्म्म भारि अस्तलो. वाचुन असा वाटान कि विर्तुअल का म्हनान ते मि या पन ईलय तुम्चो वाविक.

<<ही नाव घेण्याची जागा नव्हे तेव्हा कुणी आपले नाव घेतले नाही म्हणून फुगून बसू नये.>>:D Lol Lol

छान वाटले वाचून
सर्व अनोळखी तरीही ओळखीचे, आपल्या मायबोलीवरचे हो
पुढच्या वर्षी ववी ला नक्कीच येणार

@ रुस्तम...
देसायानु एक्दम झ्य्याक आसा तुमचो वावि व्रु. ... >>> ... खरां सांगतंय, मी लिहिलेल्या वृत्तांताक 'आवाडलो' ह्यो प्रतिसाद बघुन बरां वाटलां. पण खरो आनंद झालो तो, तुम्ही मालवणीत प्रतिसाद देण्याचो प्रयत्न केलेलो बघून... चला, मायबोलीवरच्या माझ्या मित्र-मैत्रीणींच्या यादीत एका 'पैलवान' मित्राची भर पडली... Proud ...

@सामी...
तुझी सुद्धा दखल घेतलंय हां... तुका सुद्धा या यादीत सामील करुन घेतलंय... Happy

Pages