ववि२०१२-वृत्तांत

Submitted by ववि_संयोजक on 23 July, 2012 - 02:48

मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.

विषय: 

विवेकदादा... भन्नाट वृत्तांत Wink

<<मंजिरी आत्या म्हणण्यासारखी दिसत नाही तेंव्हा ती आत्या का याचा खुलासा मला नंतर करण्यात यावा ही विनंती.>>

मंजिरी आत्या म्हणल्याबद्दल रियाचा निषेध ! माबोवर तिला 'मंजात्या' म्हणण्याचा प्रघात आहे, एवढे माहीत असु नये पोरी तुला ? Proud

<<<नवनवोन्मेषशालीनी रिया>>> 24.gif24.gif24.gif24.gif

आणि मल्लिनाथ असे बलाढ्य नेते उभे असल्याने पलीकडे तिसरे जग आहे असा आम्हाला संशय येत होता.>>>

हे वाक्य वाचुनच हहपुवा झाली. मल्ल्याची १८ इंची छाती २८ इंची तरी नक्कीच झाली असेल.

धमाल Happy

नमस्कार मंडळी, मी पहिल्यांदाच वविचा वृतांत लिहायचा प्रयत्न करत आहे सांभाळुन घ्या

ठिक सकाळी ५ वाजता माझा बोंबल्या (म्हणजे माझी तिसरी बायको) बोंबलायला लागला, त्याचा गळा आवळला आणि ऊठलो पहिली बायको अपेक्षे प्रमाणे लवकर उठुन माझ्या तयारीची तयारी रागारागाने करत होती याचं कारण असं की मी दुसर्‍या आणि तिसर्‍या बायकोला घेऊन जाणार होतो म्हणुन हा राग. (पण लटका)
सकाळी ५.४५ वाजता सगळी तयारी करुन पहिलीचा निरोप आणि तीसरी ला बरोबर घेऊन निघालो, ते एक बरं की मी दुसर्‍या बायकोला शनिवारीच ठाण्यात ठेवुन आलो होतो, सकाळी सकाळी गोंधळ नको म्हणुन.... तर अशी झाली वविची पहाट.

सुची:
पहिली : आमच्या सौ.
दुसरी : ढोलकी
तिसरी: माझा बोंबल्या (म्हणजे मोबाईल)

तर काय म्हणत होती मी?.... हा सकाळी ५.४५ ला निघालो, ऑटो मधुन विन्याला फोन केला तेव्हा कळलं की बोरीवली वरुन ६.०० वाजता निघुन ६.२० वाजाता मला जोगेश्वरीला उचलणारी वविची बस तिच्या नियोजित वेळेत धावत होती हे ऐकुन अंगात आणखी चैतन्य सळसळलं आणि त्या भरात एक चैतन्य कांडी शिलगावली.

बस ठिक ६.२५ ला हजर झाली. पहिली नजर भिडली ती विनय भिडेशी आणि बस मध्ये चढताच नजर भिड्ली ती उल्हास भिडेंशी, दोन पावलं पुढे जातो तोच सौ. मधुरा भिडे, उजवी कडे मान वळवतो तर लहान भिडे अश्या भिड्यांच्या शिडया पार करत करत बसच्या मध्यावर पोहोचलो तर साक्षात देव समोर बसलेले म्हणजे प्रमोद देव काका. त्यांनी माझ्या दुसर्या बायको बद्दल आस्थेने विचारपुस केली तेव्हा ती मुलंडहुन येणार असल्याचे त्यांना सांगताच त्यांनी समाधान व्यक्त केले.

एव्हाना बस पवई पार करुन मुलुंड च्या दिशेने धावत होती. मध्येच एक अडथळा आला तो म्हणजे राखीचा, तिच्या पिक अप साठी बस थांबवावी लागली. अशी मजल दरमजल करीत ७.१५ वाजता बस मुलुंडला पोहोचली.

मुलुंड्ला सगळे माबोकर अगदी वेळेत हजर होते आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी निंबुडाची गाडी नियोजित वेळेपेक्षा ४५ मिनिटे उशीराने धावत होती. ती आल्यावर तिला या झाल्या प्रकाराचा खुलासा विचारल्यावर तिने उत्तर दिले " आम्ही आमच्या मोडक या आडनावाचा आदर करुन प्रत्येक गोष्ट मोडतो आणि यात वेळ आणि नियम ही आलेच " कशी बशी तीला बशीत कोंबुन आणि ' गणपती बाप्पा मोरया ' च्या गजरात वविची बस युकेज् कडे निघाली,
मुलुंडहुन बस निघाल्यावर कोणत्या रस्त्याने आणि किती वेगाने बस धावत होतीयाकडे माझे जराही लक्ष नव्हते एवढा बसमध्ये कल्ला चालला होता आणि बसमधील कल्ल्याची माहीती ज्यांनी तो कल्ला अनुभवला पाहीला ते देतीलच त्या बद्दल काही लिहीत नाही. तर अशी महा धम्माल करत आम्ही नियोजित स्थळी कधी पोहोचलो ते कळलेच नाही...... पण तिथे पोहोचल्यावर पुण्याची बस आलेली आहे हे ऐकल्यावर बसच्या खिडकीतुन आकाशाकडे पाहुन सुर्य पुर्वेकडेच उगवला असल्याचे खात्री करुन घेतली Proud
रिसॉर्टच्या गेट मधुन आत प्रवेश करताच पहिला नजरेस पडला तो मल्ल्या पठ्ठ्याने घावत येऊन हस्तांदोलन (रियाच्या भाषेत हस्तांलोदन) केले आणि मिठी मारली पण मी सावध पवित्रा घेतला कारण मल्ल्याने विचार केला नसला तरी मला त्याच्या बरगडयांचा विचार करावाच लागणार होता. Light 1 मल्ली मिठी सोडवतो न सोडवतो तोच साजिराचं साजिरं गोजिरं रुप नजरेस पडलं. त्याच्याशी भरत मिलापचा सीन उरकतो न उरकतो तोच हिम्या समोर उभा (काही तरी खातच होता) त्याच्या कडुन वळतो ना वळतो तोच समोर साक्षात मायबोलीचे निर्माते / शिल्पकार उभे, साधी राहणी उच्च विचार याचा प्रत्यय त्यांच्याकडे पाहताच आला. असे एक एक करत सर्वांची भेट झाली.
मग सगळे वळलो अल्पोपहाराकडे, अल्पोपहारात बटाटेवडे, ईडली सांभार, पोहे, चहा /कॉफी असा फक्क्ड बेत जमवला होता त्याबद्दल संयोजकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच, लग्गोलग अल्पोपहार उरकुन सगळ्यांनी पाण्यात उतरण्यासाठे चेंजेस करुन पाण्यात उड्या घातल्या आणि मग २ तास पाण्यात सगळ्यांनी मिळुन नुसता धिंगाणा घातला, सुरुवात झाली ती लहान स्विमिंग पुल मधे व्हॉलीबॉल खेळण्यापासुन, बच्चे कंपनी पण आघाडीवर होतीच, थोड्यावेळाने आनंद मास्तरांनी शिटी वाजवली आणि कवायतीचा तास सुरु झाला असल्याचे सर्वांना सांगुन रेन डांस च्या ठिकाणी पिटाळले, सगळी मुलं उड्या मारत तिकडे पळाली मग केळकर मास्तरांनी १० मिनिटं त्याच्या स्पेशल कवायती दाखवल्या आणि सगळ्यां कडुन करवुन घेतल्या आणि मग सुरु झालं रेन डांस आणि आम्ही अंगात येण्या पासुन ते अटक मटक चवळी पर्यंतचे सगळे नाच करुन घेतले, इतक्यात रेन डांसच्या जागी येऊनही अजुन शांत असलेले अजय गल्लेवाले अक्षरश: पेटले आणि पुढे येऊन त्यांनीही त्यांच्या अंगात असलेल्या एक उत्तम नर्तकाचे दर्शन आम्हाला घडवले, पण गाण्यांचा मारा पुरेसा सहन न झाल्याने सगळे मग मोठ्या स्विमिंग पुल कडे वळले आणि ....... बोल बजरंग बली की जय...... आणि गो...विंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा.......... अश्या गजरांत मायबोलीचे गोविंदा पाण्यातच थर रचु लागले, खालचा थर अर्थातच वजनदार म्हणजे मायबोलीत ज्यांचे वजन आहे अश्यांचा होता आणि त्यांच्या खांद्यावर मी , आनंद चव्हाण मल्ली होतो पण थर काही लागेना, मध्येच एक वेळ मल्ली सर्वात वरच्या थरापर्यंत पोहोचला आणि तेवढ्यातच जोराचा वारा आला त्याबरोबर मल्ली कोसळला Proud 'हवेत उडला पाण्यात पडला' अशी त्याची अवस्था झाली. मध्येच आनंद केळकरने आमच्या समोर " तुम्ही खाली उभे रहा मी तुमच्या खांद्यावर उभा राहतो" असा प्रस्थाव मांडला पण आम्हाला खांदेकरांची गरज पडेल या भितीने आम्ही तो प्रस्ताव एकमताने फेटाळला Proud आणि मग सगळ्यांनी हवेचा अंदाज घेत पुन्हा मल्ली ला मनोर्‍यावर चढवले यावेळी बाकी मल्ली बर्यापैकी यशस्वी झाला त्याने झेंडा फडकविला याबरोबरच मोठ्या स्विमिंग पुल मधील खेळही संपला.
एवढं सगळं होई पर्यंत दुपारचा १.३० वाजला होता आणि पोटात कावळ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं, सगळे चेंज करुन परत जेवणाच्या हॉल मध्ये जमले. जेवणासाठी लागलेल्या लांबच लांब रांगेतही एक प्रकारची शिस्त आणि समन्वय दिसत होता, अजय स्वत: रांगेत उभे होते आणि त्यांच्या संपर्कात येणार्‍यांची आस्थेने विचारपुस करताना दिसत होते. जेवणात गुलाबजाम, जिरा राईस, डाल तडका, व्हेज मिक्स भाजी, रोटी , पापड, चटणी, लोणचे, सॅलड, लिंबु, मिठ असा बेत होता
जेवुन तृप्त होतो न होतो तोच सांस्कृतिक समितीने सर्वांना पकडले आणि आम्हा सर्वांना चार टिम मध्ये विभागले मी 'वर्षा' या टिम मध्ये होतो आणि हिच टिम सुरुवातीपासुन आघाडीवरही होती आणि विजयी सुध्दा झाली एकुण चार खेळ घेतले गेले आणि ते ही बर्‍यापैकी गाजले. या सर्व खेळांचे आयोजन मधुरा, शामली, निंबुडा,आनंद केळकर अशा दिग्गजांनी यशस्वीरित्या पार पाडले त्या बद्दल या सर्वांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. त्यानंतर होतं एक सरप्राईज पॅकेज ज्याची कल्पना फारशी कोणालच नव्हती आणि ते म्हणजे 'संगीत वस्त्रहरण़' या नाटकाच एक भाग थोड्याच वेळात वविकरांना पहायला मिळणार होता.
एवढ्यात सर्व कलाकार प्रेक्षकांसमोर हजर झाले आणि सुरु झालं ..संगीत वस्त्रहरण ...संगीत वस्त्रहरण .....संगीत वस्त्रहरण
मास्तर- घारुअण्णा
गोप्या / विदूर / धृतराष्ट्र - आनंदमैत्री
अर्जुन / शकुनी - वैभव आयरे १२३४५
दुर्योधन - बागुलबुवा
दु;शासन - विनय भिडे
धर्मराज / भीम - _नील_
आणि पांडूतात्यांच्या अजरामर भुमिकेत - आनंदसुजू

अश्या या कलाकारांनी २० मिनिटे प्रेक्षकांची हसता हसता पुरेवाट केली
प्रयोग संपला आणि संध्याकाळच्या अल्पोपहाराची घोषणा झाली त्यात कांदा भजी आणि चहा असा बेत होता
थोड्या वेळातच जाणवु लागलं की आता आपण निघणार...... कारण प्रत्येक जण आपापल्या बॅगांची आवरा आवर करु लागला. संयोजकांनाही हा बदल जाणवु लागला आणि त्यामुळे त्यांनी लगेच आभार प्रदर्शनाच कार्यक्रम सुरु केला सर्व प्रथम मायबोले चे निर्माते अजय गल्लेवाले हे वेळात वेळ काढुन या वविला उपथित राहील्या बद्द्ल त्यांचे आभार व्यक्त केले. काही त्रुटी राहील्या असल्यास त्यास माफी करणे आणि मायबोली ववि २०१२ ची आठवण म्हणुन दिवा Proud भेट देण्यात आला आणि समस्त मायबोलीकरांचा एक गृप फोटो घेऊन ' मायबोली ववि २०१२ ची सांगता करण्यात आली..........
हा क्षण अगदी गहिवरुन जाण्याचा होता, जो तो कावरा बावरा झाला होता. दिवसभर एकत्र राहुन केलेल्या मजेचा आनंद मानावा की आता आपण निघणार याचं दु:ख करावं तेच कळत नव्ह्तं...... पण निघणं गरजेच होतं.... तरीही सगळेजण एक दुसर्‍याला सांगत होते " चला गाडीत" पण स्वतः मात्र तिथेच घुटमळत होत, प्रत्येकाची ............... रोना चाहुं , रोना पाऊं ,दिल कितना मजबुर है. हिच अवस्था झाली होती. पण नंतर सगळे जड अंतःकरणाने आपापल्या गाडीत जाऊन बसले, पुण्याची बस पुण्यासाठी रवाना झाली. त्यांना निरोप देऊन मुंबईची बस देखील मुंबईकडे मार्गस्थ झाली.............
परतीच्या प्रवासात देखील बस मध्ये धांगडधिंग्या सोबत गझल, लावण्या चालुच होत्या, मध्ये पनवेलच्या आसपास थोडं चहापान करुन गाडीने मुलुंड गाठले. मुलुंडला ९० टक्के बस रिकामी झाली आणि मग सुरु झाला मुलुंड ते जोगेश्वरी एक भयाण आणि वैतागवाणा प्रवास जो दरवविला आमच्या वाट्याला येतो.... तो म्हणजे खिडकीला डोकं टेकुन बाहेर बघत बसायचं आणि आठवायचे आजच्या दिवशीचे सोनेरी क्षण ............. (स्क्रिन धुसर होत चालली आहे तेव्हा आता लिहायचं थांबवतो)

वैभव आयरे १२३४५

वाचतेय! Happy
रीया, छान लिहिलंयंस! अजून थोडं सविस्तर लिहायचंस ना!

आशूडी, अ‍ॅज युज्वल बेस्ट Happy

अभिषेक चा निषेध! Sad क्रमश: लिहिल्याबद्दल!

मायबोलीशी बंध जुळून २ वर्षे झाली. माबोची सदस्य झाल्यापासून एकंदर तीन ववि झाले. तीनींना हजेरी लावली. पहिली २ वर्षे नुसती हजेरी लावण्यापुरता सहभाग होता. ह्या वर्षी संयोजनात भाग घेतला. सांस च्या खेळांच्या संयोजनाचे काम केले. खूप छान अनुभव होता. Happy

"तोलून मापून बोला" ह्या खेळाची जबाबदारी मी उचलली होती. खेळातले उतारे इथे देतेय! Happy

आता कुठल्या टीम ला कुठला उतारा आला होता ते त्या त्या टीम मेंबर्स नी इथे सांगा! Happy उतार्‍यातले जे शब्द बोल्ड (ठळक) केले आहेत ते करेक्ट सांगितले तरच गुण मिळणार होते.

"मनसोक्त मनोव्यापाराच्या सातशेसदुसष्ठ लक्षणांची कारणमीमांसा" ह्या व्याख्यानासाठी शांभवी शिरस्त्राणकर मोठ्या दीमाखात निघाल्या होत्या. त्यांना अचानक आठवले की नाकात घालायच्या चमकीचा एक खडा हरवल्यामुळे दोनच दिवसांपूर्वी त्यांनी रडून थयथयाट केला होता. तेव्हा पायातले पैंजण छनक छनक छुम छुम असे वाजून जो नाद झाला त्यामुळे आजुबाजुच्या रहिवाशांनी निषेध व्यक्त करून त्यांच्या घरावर मोर्चा आणला. त्यामुळे त्यांच्या पतीने संतापून त्यांच्या पैठणीवरचा जरतारीचा मोर बरोब्बर त्याच्या आकारानुसार कापून स्वतःच्या शर्टाच्या पाठीकडच्या बाजूस शिवून घेतला. तेव्हा आता प्रश्न असा आहे की व्याख्यानाला जाताना कुठले कपडे घालायचे, त्यामुळे बराच विचार करून मस्तक शिणल्यानंतर त्या अशा निर्णयाप्रत आल्या की आपण बरे नि आपले घर बरे!

+++++++++++++++++++++++++++++

वाकडमाने नावाचे हलवाई असू शकतात हा जावईशोध लागल्यानंतर ठणठणपाळ लांबमाने यांना वळणदार जिलेबी खाण्याची इच्छा झालीच. एकदाच्या त्यांनी पायांत वहाणा सरकवल्या नि नेसत्या वस्त्रानिशी दिमाखदार ढांगा टाकत ते घराबाहेर पडले. वाटेत दिसेल त्या इसमाकडे तिरपी मान करून तुच्छ कटाक्ष टाकत आपल्याच धुंदीत मार्गक्रमण करीत ते नाकासमोरची दिशा धरून चालत राहिले. अदमासे साडे अठ्ठ्याहत्तर ग्रॅम जिलेबी खाऊन क्षुधाशांती झाल्यावरच त्यांच्या चित्तास समाधान झाले. तरीही हलवायाच्या घरावर तुळशीपत्र न सापडल्याने त्यांना आलेला राग त्यांनी दुकानाच्या गल्ल्यावर बसलेल्या दगडू धोंडे यास बोलून दाखवला आणि पुढच्या वेळी असा गुन्हा खपवून घेतला जाणार नाही अशी सक्त ताकीदही दिली.

(हा उतारा प्रमोद काकांनी वाचले इतकं नक्की आठवतंय! कारण तिरपी शब्दाच्या वेळी त्यांनी त्यांची मान तिरपी करून अ‍ॅक्शन करून दाखवली होती! Wink )

+++++++++++++++++++++++++++++

मुंबईसारख्या दमट हवामान असलेल्या शहरामधे थंड हवा दमटपणाच्या आत शोषली जाते व त्यामुळे निर्माण होणार्या पोकळी मधे उष्मा भरून राहतो. ह्या एकंदर प्रक्रियेमुळे वातकुक्कुट नियंत्रणप्रणाली च्या कार्यक्षमतेत अवास्तव घट होते व वेधशाळेचे अंदाज चुकतात. बाष्पगदगदीत ढगांचे गार वार्‍याशी मीलन होऊन पाऊस पडतो हे गृहितक काळ्या रंगावरील पांढर्या रेषेइतके ढळढळीत स्वच्छ व स्पष्ट असल्याचे वेधशाळेला मान्य आहे. त्यामुळे ढगांना पर्वतमाथ्यापर्यंत प्रवास करायला लावण्यापेक्षा वेधशाळेच्या गच्चीतच शीतहवाउत्सर्जक बसवून घेण्याचा ठराव मांडला जात असून कनवाळू सरकारने त्यास आर्थिक व भावनिक मदत करावी असे गार्‍हाणे मांडण्यासाठी श्रीयुत आप्पा भिंगार्डे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोर्चा काढण्यात येणार आहे.

(इथे खेळात सहभागी झालेल्या शेवटच्या टीम मेंबरने आप्पा भिंगार्डे चा आप्पा बेलवणकर केला आणि सर्व जमावामधे एकच खसखस पिकली! Rofl वविला हजर नसलेल्यांना आता आप्पा भिंगार्डे आणि आप्पा बेलवणकर ह्या संज्ञांचा उगम आता कळला असेलच!)

+++++++++++++++++++++++++++++

अंतराळात झेपावलेल्या भ्रमणयानांच्या अतिवेगामुळे प्रचंड प्रमाणात उष्णतेचे उत्सर्जन होऊन हवेतील धुलिकण ज्वालाग्राही होण्याचा धोका उत्पन्न होऊ घातला आहे. असे गंधकयुक्त कण वातावरणात अस्तित्वात असलेल्या कीटकांनी भक्षण केले तर त्यांच्यापेक्षा कमी बुद्धी असलेल्या प्रजाती जन्मास येतात. निसर्गावरील हे आक्रमण थोपवून धरण्याचा एकमेव मार्ग हाच की सर्व भ्रमणयानांच्या उड्डाणांच्या अति-वेगावर निर्बंध घालणे! त्यासाठी प्रत्येक यानाचे शेपूट असे बनवायचे की झेप घेण्यापूर्वी जमिनीशी संलग्न असताना त्याचे तापमान शून्य डीग्री सेल्सियस असेल. त्यामुळे यानाने कितीही वेगाने झेप घेतली तरी त्याचे तापमान ठराविक पटीतच वाढेल व अति उष्णतेमुळे निर्माण होणारा धोका टळून निसर्गाचे संतुलन योग्य तर्हेने राखले जाईल.

(इथे उतारा वाचणार्‍या मनिषाने मस्त कामगिरी केली. तिच्यानंतर उतार्‍यातला बराचसा भाग लक्षात ठेवून पुढच्या मेंबरला पास ऑन करणार्‍या आशूडीलाही हॅट्स ऑफ!)

वैभव...
खरोखर खूप छान लिहिलंस... पाण्यातली सगळी 'दंगा-मस्ती' पुनः एकदा डोळ्या समोर उभी राहिली...
Keep it up...
Happy

चिल्लर पार्टीमधील भिडू वर्सेस भिडे आठवले... Proud

छान लिहिलाय वृत्तांत आयरे १..२..३..४..५... एकेक जण पुन्हा पुन्हा क्रमाक्रमाने चित्र उभे करतोय.. Happy

निंबे मी म्हणणारच होते की उतारे टाक
Rofl
त्या उतारे वाचनाच्या क्लिप्स काढल्यात का कोणी??
मी नविन वृत्तांत वाचले नाहियेत
वाचते हळू हळू

निंबुडा, का उगाच परत अत्याचार करत आहेस... Sad

दारू प्याल्याच्या दुसर्‍या दिवशी चढलेले डोके उतरवायला बर्‍याचदा दारूचाच उतारा देतात...
तसे त्या दिवशी उठलेले डोके हलके व्हायला आज पुन्हा हे उतारे दिलेस का?? Proud

सांसच्या खेळांचा एक सविस्तर वृ. जमलाय लिहिण्याचा मानस आहे! खेळांदरम्यान कुणी फोटु काढले असतील तर मला संपर्कातून मेल करा प्लीज.

निंबुडा...
बरं केलंस 'उतारे' प्रसिद्धीला दिलेस ते... कारण यातला फक्त शेवटचा उतारा तेव्हढा बहुतेकांना व्यवस्थीत ऐकायला आलेला होता... उतारे वाचतानाच बाकीच्यांचं त-त-प-प सुरु झालेलं होतं, त्यामुळेच शेवटचा भिडू अंदाजाने किल्ला लढवत होता... अर्थात या सगळ्याचं श्रेय तुला(च) आहे... Happy
हे सगळे उतारे तू स्वतःच लिहीलेले होतेस ना?... Happy

@विवेक
मालवणी माका जवळ चि आसत रे मित्रा (खयसर ता ईचारु नकस). माका बोलुक आवडता रे पण पुन्यात कोन गावना नाय बोलुक. Lol

वैभ्या... मस्त रे..
चौथ्या बायको बद्दल अभिनंदन!

बिच्चारा मोदक.... घरी त्याचं काय होत असेल... >> वरण :d

निंबुडा... सां.का. चे फोटो उद्या पाठवतो.

हे सगळे उतारे तू स्वतःच लिहीलेले होतेस ना?... >>> व्हय, महाराजा! >>

निंबूडा हे तुम्ही लिहिलेत? मला हे आधी वाचल्याचे स्मरत आहेत. कोणतेतरी उदाहरण म्हणून एका सरांनी तो पहिला उतारा वाचून दाखविला होता. इनफॅक्ट हा उतारा वाचताना मी आणि मनिषाने ही चर्चाही केली होती की कोणी हा उतारा लिहिला?

असो
जर आपणच (पूर्वीही) तो उतारा लिहिलेला असेल व तो प्रसिद्ध झाला असेल तर मात्र माझ्या ह्या वरील पोस्ट मुळे दुखावले गेलात तर आपली क्षमा मागतो. पण मला वाचल्याचे नक्की आठवते.

"विठोबा दंतमंजन" चे घोषवाक्य घालणार्याला पण सलाम .:)
याच जर कुणी बरोबर उत्तर दिल अस्त तर मी सरळ त्याचे पाय धरले असते

हा ववि एकदम छान झाला! गेल्या दोन वविच्या खेळांमध्ये सपाटून हार झाली होती. पण ह्या ववि मध्ये अगदी दिमाखात जिंकलो...:)

'वर्षा' टिम जिंदाबाद!!!

इन्द्रा, चौथी बायको कोण त्याची? >> आता 'वविताई' म्हटलं तर वैभवला राग येईल ना...

नील तू धचमा करण्यात उस्ताद आहेस. :p

(इथे खेळात सहभागी झालेल्या शेवटच्या टीम मेंबरने आप्पा भिंगार्डे चा आप्पा बेलवणकर केला आणि सर्व जमावामधे एकच खसखस पिकली! वविला हजर नसलेल्यांना आता आप्पा भिंगार्डे आणि आप्पा बेलवणकर ह्या संज्ञांचा उगम आता कळला असेलच!) >> निंबुडा... तो बेलवणकर आधी राऊतने ( राखीचा पतीने) केला होता मग वर्षाने... पण शेवटला बागुलबुवाने परत त्यांचा भिंगार्डे केल्या वर जो तणाव निर्माण झाला होता त्यावर खूपच खसखस पिकली.

निंबूडा हे तुम्ही लिहिलेत? >> केदार तू जरी माफ केलेस तरी आम्ही निषेध नोंदवणारच Wink

<< त्या उतारे वाचनाच्या क्लिप्स काढल्यात का कोणी?? >>
सांस चा सर्व कार्यक्रम (उतार्‍यांसह) माझ्याकडे आहे... Happy Proud

पुढचेही वृत्तांत मस्तच.

देसायांनु, मी कुलकर्णी नाही हो ! पण फार्फार दिवसांपुर्वी एकदाच भेटूनही तुम्ही मला ओळखलंत याचंच कौतुक Happy

केक मलाही नाही दिसला. कसा दिसणार म्हणा ! चहाची लांब लाईन आणि एकीकडे आशुतोषचं "निघा, निघा" यामुळे मी तिकडून येणार्‍या अम्याच्या हातात दोन चहाचे कप दिसल्यावर "एक माझ्यासाठीच ना रे?" म्हटल्यावर बिचार्‍याने तो मला देऊन टाकला. मनीच्या ताटलीतल्या उरलेल्या भज्यांच्या २-३ शेंड्याही खाल्ल्या. त्यामुळे चहाच्या टेबलावर अजून काही होतं हे माहितच नाही. असो, आम्ही प्रवासात घरुन करुन आणलेलं भाजणीचं थालिपीठ खाल्लं.

सॉरी रे ! अरे तरी मी बर्‍याच जणांना टाटा बिर्ला करुन गेले. तू चहा भज्यांच्या लाईनीत होतास का? "निघा, निघा" मध्ये काही सुचतच नव्हतं Proud (आशुतोष Light 1 ) आम्ही अगदी वेळेत म्हणजे पावणे सातला आपापल्या घरी पोहोचलो.

Pages