ववि२०१२-वृत्तांत

Submitted by ववि_संयोजक on 23 July, 2012 - 02:48

मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.

विषय: 

बागुलबुवा छान वृत्तांत...

प्रत्येकाचे वृत्तांत ज्याच्या त्याच्या नजरेतून टीपलेले असल्याने जे आपल्या नजरेने मिसले ते ही समजतेय.. Happy

बाब्या,मस्त वृत्तांत रे... Happy

तुम्ही विशेष तालीम न करता सादर केलेल्या `वस्त्रहरणाला' मात्र खरोखर सलाम.

आंद्या मला आदल्या दिवशी स्क्रिप्ट वगैरे पाठवतोय की काय अशी मला भिती वाटत होती.. पण आंद्याला माझी आणि पर्यायाने त्याच्या नाटकाचीही काळजी असल्याने तसे काही त्याने केले नाही Proud

हवे आहेत, हवे आहेत, हवे आहेत.

सूर तालासारख्या मामूली गोष्टींची पर्वा न करता गाणारे , ताज्या दमाचे व मोकळ्या गळ्याचे गायक व गायिका हवे आहेत.

वार्ध्यक्याकडे झुकल्यामुळे नेहमीच्या यशस्वी कल्लाकारांचे आवाज पुरे पडत नसल्याने पुढल्या प्रत्येक वविकरता नितांत गरज आहे. लिहा वा लिहू नका पण पुढल्या वविला भेटाच्च.

आन्द्या महान आहे. मेकप करतानाही तो शेवटच्या क्षणापर्यंत पाठांतर करत होता. त्यामुळे त्याचा व पर्यायाने नाटकाचाही बाजीप्रभू देशपांडे होतो की काय अशी भिती वाटत होती मला.

पुढच्या वेळी आपणच लिहू या का ? नाहितरी या वेळीही आपणच लिहिलं होतं (मूळ नाटकाचच स्क्रीप्ट लिहिलं होतं ते सोडा)

बाबु, मस्तच लिहिलं आहेस!
<< बहुधा घारुच्या कातडीची बनवलेली असावी >> Rofl

पण नाटुकलं झक्कासच होतं... तुम्हा सर्वाना सलाम!!!

स्प्रिंग वाल्या वैब्याची एंट्री तर लैच भारी.... Proud तो खरा खुरा शकुनी सुध्दा विचार करत असेल, खरंच का मी इतका हलत होतो Proud

एकंदरीत ते वस्त्रहरण म्हणजे ह ह पु वा... Rofl

मी अ‍ॅडमीनना विनंती करतो की त्यांनी :वस्त्रहरण: ची स्मायली तयार करावी जी ह ह ग लो पेक्षा जास्त हसत लोळेल.

अरे लोक्स... गृप फोटो टाकताना काळजी घ्या.........................
कारण..............
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

आतल्या गोटातली बातमी आहे की रीया फोटोंना राख्या बांधुन रक्षाबंधन साजरा करणारे.

(मी तर फोटोतही हात मागे घेउन उभा होतो. Wink )

२८० आकडा पाहून मला वाटलं अर्धे तरी वृत्तांत असतील.... Proud

न आलेल्या आणि या धाग्यावरही उशीर्रा आलेल्या आय डींची सोय म्हणून ज्या ज्या पानांवर वृत्तांत आहेत त्यांचे उल्लेख या धाग्याच्या वरच्या पानावर करता येईल का? जसं रियाचा वृत्तांत पान अमुक असं काही....
म्हणजे एका दमात आधी काय काय धमाल केलीय ते वाचू मग चर्चेचं पाहता येईल .. Wink

मला तो दिवा द्यायचा फोटो जाम आवडलाय.... कुणाची सुपीक कल्प्ना आहे ही...नाहीतर सारखे चित्रातले दिवे पाहून कंटाळाच आला होता.... Uhoh

अरे मल्ल्या मायबोलिकरा, तो हलणारो अर्जुन होतो, शकुनी नाय....
ते नाय रे, शकुनी बनुन नंतर आलेला ना.... तेव्हा कसा गुडघ्यावरचा हात काधुन उभा होता.... लै भारी डान्स Proud

दत्त दर्शनीला जायाचं जायाचं जायाचं झी मराठीवर महराष्ट्राची लोकधारा बघत होतो आणि नील चा फोन आला... घारु देव काकांची जाहीरात टाकलीये.... तुझे ही ववि चे अनुभव टाकायचेत काहीतरी लिहुन दे.... आणि त्याच गाण्याचा नाद मनात गुंजत असताना मी ही लिहुन दिलं... जाहीरात आली वाचली आणि लक्षात आलं खरचं कि म्हणता-म्हणता दहाव्या ववि ची तयारी सुरु हे झालीये... १५ तारीख पट्कन आली आणी गेली... पार्कातलं गटग यथासांग पार पडलं आणि वेध लागले २२ तारखेचे.............
वारकरी जसे आषाढीची वाट पाहात तसंच माझंही दर वर्षी होतं..... जुन महीना, पहीला पाउस आणि सालांबाद्प्रमाणे येणारा माबोचा ववि !!!
शनिवारी रात्री घरी पोहोचायला ११.०० वाजले, अर्थात कारणंही तसचं होतं महतप्रयासानी तात्यांनी लिहेलेले स्क्रिप्ट आणी तालीम मास्तरांनी शेवट्च्या दिवशी लावलेला जोर यामुळे कसंबसं नीट लागलं होतं, मुंबैच्या या सर्प्राइझची कल्पना खरोखरी कोणालाच नव्ह्ती.
रविवार सकाळी गजर लावुन बायकोनी उठवलं आणि अंघोळीची करुन जाण्याची ताकीद दिली एकंदरीत वेळेचं गणित जमत होत त्यामुळे मीही उदार मनाने तीची सुचना मान्य केली. आनंदमैत्री रेल्वेनी,मी बाईकनी आणि नील सह परीवार रिक्षानी असे वेग वेगळ्या मार्गानी मुलूंडला पोहोचलो अगदी हुश: झालं सुरवातीची २-३ वर्ष उशिरा येण्याचा मान माझ्याच कडे होता....त्यानंतर क्रमाक्रमानी रीना,निंबुडा अशा माबो करांनी ती जबाबदारी उचलली.
प्रणव आणि सागर पोहोचलेच होते, त्या नंतर आनंद, नील ही पोहोचले. बाकीच्यांची वाट बघे पर्य़ंत आनंद शेअर बाइक प्रमाणे दोघातिघांबरोबर स्टेशन पर्यंत जाउन चहा वारी करुन आला... मला मात्र माझ्याच बाइक वर घेण्यात आलं नाहे.
अचानक दोन/तीन रिक्शा पटापट येउन थांबल्या संपुर्ण डोंबिवलीकर एकदम उतरले आणी दिनदयाळचा चौक एकदम गर्दीनी भरल्यासारखा वाटु लागला.विजय जोशीच्या कुटुंबातील त्यांच्या मातोश्रींना(वयं बहुदा ६५+ असावं) पाहीलं आणि क्षणभर वाटुन गेलं अरें बापरे आज्जींना या सगळ्या कल्ल्यात एडजेस्ट होता येइल का ? पण विजयजीं शी बोलताना सहज जाणवला तो संयोजकावर डोळे मिटुन टाकलेला हा विश्वास अनोळखी, न पाहीलेले, असुन सुद्धा....
देवकाका,आधी उल्हास त्यात भिडे म्हणजे तर अगदी पिकल्या पानांचा देठ की हो हिरवा
इन्द्रदेव, इंद्राणी आणी अम्याच्या गाड्या लगोलाग आल्या आणि आता मात्र कोरम फुल्ल होवु लागल्याची सुखद जाणीव झाली.
इतक्यात साक्षात मालक वविची बस आणी समस्त जनता घेउन हजर झाले (बस मध्ये जाउन पाहीलं आणि थोडासा खंतावलो अरेरे यात एकही पोल नव्ह्ता ..... असो)सामान बसमध्ये ठेवणे सुरु झाले, अम्याच्या गाडीतुन सामानासकट जेव्हा दंडाची मोळी (पाचच होत फक्त तरी पण)बाहेर आली, बापरे , सांसवाल्यानी एखादा शारीरीक हाणामारीचा गेम घेतला की काय अशी चर्चा माझ्या कानावर आली... नाही रे डोंबार्याचा खेळ आहे आणी विनय येताना बांधायला दोरंही घेउन आलाय अशी ही अफवा कोणीतरी पसरवली.

बस यु टर्न वगैरे घेउन आल्यावर बोर्ड लावण्याचा, त्या सोबत फोटो काढ्ण्याचा ही कार्यक्रम पार पडला.. मधल्या काळात बर्याच अग्नीहोत्र्यांची ही काम आट्पली होती....
"पुंडलीका वरदे " चा घोष झाला आणि साताच्या ठोक्याला बसने मुलुंड सोड्ले..
एक साध गाणं आणि एक देशभक्तीपर गीत अशा सिक्वेस्नी ठेका वाढत चालला... जुईनगरचा पिकअप अभिषेक .... बस पनवेल कडे धावु लागली....
वैभवच्या ढोलकीला मी चिपळ्या(अम्या त्या चिपळ्याचं होत्या ना रे!!!) अम्या डिम्डीवर साथीला होतो (बोटं अजुन दुखतायत वृ टायपला उशीर झाला त्याच हेही एक कारण)
दर वेळी सगळे संगीत मंडळी मागच्या बाजुस धुमाकुळ घालत असते यावेळी मात्र मधेच सगळी चेंज पोझीशन करत साधारण मध्ल्या भागात बस्तान बसवुन परत बजावण्यांना सुरवात झाली( नवीन माबोकर फारच एग्रेसीव हो!!!! सहज जागा बदलुनघेतली सगळ्यानी)
दत्तुच्या नाक्यावर बस पोहोचली आणि सगळे खाली उतरेल अमृततुल्ल्याची ऒर्डर गेली आणि सौ अम्यानी आणलेल्या सगळ्या फ्रसाण प्रकारांची देवघेव सुरु झाली.एकुण सगळेच प्रकार( कोण ते चाकणा म्हण्तयं???******कंसातली वाक्य****** ) हे केवळ फक्त चहा बरोबर किंवा सकाळच्या प्रहरी खाण्याचे नाहीत या वर गटागटानी परीसंवाद सुरु झाले.
इतक्या हुशार बाल माबोकरांनी एकदम मालकांकडुन लेझ वगैरेंचे हप्ते वसुल केले पण मालक ही हुशार हो बरीक!!! सगळ्या बच्च्यांना केवळ आपल्या आइने सांगितल्यावरच हे खायचे असं सांगुन पार शेळी करुन टाकलं
चहा आला... फार गोड आहे हे वाक्य मी स्वत: या कानांनी विविध स्वरात ऎकलं!!!(स्वर्गात आणि नरकात सुद्धा अमृत-सुरां मिळेल पण चहा मिळणार नाही हे माझे तत्वद्यान हीरीरीने पाजळुन घेतले)
चहा-पान उरकुन बस परत काकांच्या स्वयंपाकघराकडे धाउ लागली.पुणेकर लोणावळ्यात चहापानासाठी थांबल्याचं कळलचं होते...परत गाणी,विडंबन आला.... साडेनवाला बस युकेज ला पोहोचली....
प्रती वर्षी प्रमाणे भरत भेटीचा कार्यक्रम ...... मला तर खरच भरुन आलं होतं छे छे केवळ सगळ्यांना भेट्लो म्हणुन नाही तर प्रत्येकानी ओ आण्णा आज एकटेच??? दंड नाही आणला का??? असं आवर्जुन विचारलं(दंडाबद्दल ही इतकी आपुलकी... आण्णी असती तर नक्की जळफळाट झाला असता)
न्याहारी छान होती... बटाटवडे, इडली,पोहे, खात खात जमेल तितक्या आयडींशी ओळख करुन घेतली... प्रकर्षानी जाणवलेली गोष्ट माझा आयडी आणी मी यात बरच साम्य असावं(डु आयडी काय घ्यावा याचा विचार करावा लागणार बहुदा)
न्याहारी झाली आणी सांसच्या तीन बायकांनी सगळ्यांचा ताबा घेतला( तीन बायका इतरांची फजिती ऎका!!! हे उतार्याच्या खेळात फारच प्रकर्षानी जाणवलं ) ओळख परेड सुरु झाली वेब मास्तर , अजय , आणि एडमीन या तीन नसुन दोनच आहेत अजय आणी वेब मास्तर हे एकाच व्यक्तीचे डु आयडी आहेत अशी रोमहर्षक माहीती ही एकु येत होती... ते एडमीन काही दिसले नाहीत बुवा आख्या ववित.... की येणार!! येणार!! अशी नुसतीच लांडगा आलारे होती काय की बाई!!!)
मग केक कापण्याचा ही कार्यक्रम झाला... अजयनी प्रत्येक लहानग्यांबरोबर केक कापला हा माणुस खरच माबोचा प्रणेता सर्वेसर्वा कसा असु शकतो याचच आश्चर्य वाटुन राहिलयं. माईकचा गोंधळ सगळ्यांचे होणारे परीचय संपले आणी सर्वांना तरणतलावावर जायची परवानगी मिळाली...
मी पण तलावावर पोहोचलो आणि प्रकर्षानी लिंबुची आठ्वण झाली.... आज दंड ही हातात नाही, लिंबुही नाही, पण बाकीचा जामानीमा( क्यामेरा,मोबाईल, चैतन्यकांड्या) कोणाकडे द्यायचा.. आणि भिडेकाका समोर आले... कोणतीही भीड न बाळगता सर्व स्वाधीन केलं आणि पाण्यात उतरलो. तेवढ्यात वेब मास्तरांचा चश्मा पाण्यात पडल्यामुळे शोधाशोध सुरु होती आणि अखेर सापडला एका हुषार माबोकरांनी चटकन शोधुन दिला( सांसनी याची दखल घ्यावी आणि त्या माबोकराला योग्य इनामाचे व्यवस्था करावी)त्यामुळे मास्तरांना पुढचा सगळा ववि बीनघोर एन्ज्यॊय करता आला.मग सुरु झाला पाण्यतला बास्केट बॊल , आनंदसुजु कडे आपोआप पंचांची डुटी आली कारण शिट्टी त्याच्याकडेच होती.....बरेच पॊईंट इकडे तिकडे झाले. संपुर्ण खेळात मला पडलेले काही भा.प्र. हल्क्या चेंडुनी बरे चालले असताना तो जड चेंडु घ्यायचे न.द्र. कल्पना कोणाची??(त्यामुळे माझी अंगठी तुटली), नक्की कोण जिंकलं( सांसनी याकडे ही पाहाव इतकी मेहनत केल्यावर किमान एखादी गोळी ही देता आली तर पाहावी)भां.सं.ल.ठे., आणि या सगळ्या वेळी प्रत्येक चेंडु मारुन झाल्यावर वे.मा.लगेच पाण्यात का पडत होते (बहुदा तसा काही नियम आहे का परदेशात,आपल्याकडे पुर्वी तोफा डागल्यावर म्हणे तोफ्ची कान बंद करुन बाजुच्या पाण्याच्या कुंडात उडी मारायचे )आणी मग सगळे रेन डान्स कडे निघाले.
रेनडान्स मधले विवीध पाण्याचे फवारे(अरे षोवरला दुस्सरा काही चांगला शब्द कुणी सुचवेल का???) आणी गाणी..... आनंद मास्तरांचा पीटी चा तास आधी केले सांगितले यादर्तीवरचा तो अशक्य नाच पाहुन डीजे ही गहीवरला आणी मग त्याने अशी काही गाणी लावली की समस्त माबोकर अतिव आनंदाने हळहळत डान्सफोअर वरुन बाहेर पडले
बोल बजरंग बली की जय चा घोष घुमला आणि रंगला दहीहंडीचा कल्ल्ला सगळे प्रचिकर आपापले क्यामेरे घेउन सरसावले... एक थर दोन थर .... हांहा म्हण्ता सगळं पाण्यात पण हारतील ते माबो कर कसले... वरच्या थरावर नुसते उभे राहा, चालु नका अशा मौलिक सुचनांचा आधार घेत तिसरा थर लागला आम्ही आपले दर वर्षीप्रमाणे पायाचे दगड नक्की वर कोण पोहोचल्म हे आजतागायत कळलेलं नाही.
पाण्यातुन बाहेर पड्ण्याच्या सुचना येऊ लागल्या नीलनी हौसेनी माझ्या केशसंभाराचे एक फोटो सेशन उरकुन घेतले...
सगळ आवरुन भोजनासाठी रांगेत उभा राहीलो परत काही आय्ड्यांची ओळख झाली.. आज माझे खाण्याचे ग्रह बहुदा चुकीच्या घरात असावेत असा एक विचार माझ्या मनात चमकुन गेला पहा ना माझा नंबर लागला तोवर पापड अगदी संपत आले आणि नान भर्पुर गरम गर्म आले होते दोन तीन घेतले आणी पापड नंतर घेउ असा विचार केला तर नंतर नान घेउ म्हणुत परत गेलो तर पापड गरम आणी नान गायब ( सकाळी न्याहरीला ही बटाट वडा आणी पोह्यांची अशीच चुकामुक झाली होते)
पण एकुणात जेवण फारच छानच होते..
जेवण झाल्यावर थोडाही वेळ न देता सांसच्या टीमने जमलेल्या सगळ्यांचे बैजवार गुंठेवारी करुन दिली....आणि सुरु झाल्या माबोच्या पेटंट वाटाव्यात अशा टेली म्याचेस.
यावेळी सांस वाल्यांनी सगळ्या माबो करांच्या पंचेंद्रियानाच आव्हान दिलं होत
म्हणी,गाणी ओळखण्याचा हा तर आमचा नेहेमीचा अगदीच सोप्पा वाटणारा खेळ आमच्या सुदैवानी जिंकला...त्यात ही इतर टीम्सना दोन म्हणी एकत्र कर्णे वगैरे काही आक्षेप होतेच पण सांस वाल्या फारच खमक्या हो...
जाहीरात ओळखण्याच्या खेळात मात्र माझ्या लगेच लक्षात आलं हे काही आपलं काम नाही पण अभिषेक,मनि आशुडी आणि सगळ्याच मेंबरांनी चंग बांधुन हाही राउंड जिंकला..
आणि मग मात्र सांस नी उतार्याचा खेळ सांगितला... एकेका उतार्याचा शेवट होताना होणारी त्रेधातिरपीट पाहुन मला बिरबलाची शेळीच्या वजनाची गोष्ट आठवली समोर वाघाचं चित्र आणि छानसा हिरवागार पाला .. पहा काय जमत्यंय ते.....प्रत्येक टीमची वाताहत (जरी मार्क मिळाले त्यांना तरीही) पाहुनच मी अस्वथच झालो होते.
कारण बाकीच्या टीम प्रत्येक राउंडला आम्हाला गाठण्यासाठी आमच्याशी बरोबरी करत होत्या.... यावेळी मात्र आम्ही पट्कन मनी चा सल्ला घेतला. मनी आशुडी अभिषेक आणी चौथी कोण होती हो माफ करा पण मी खरच आयडी विसरलो( नाव सांगा मी पटकन संपादीत करीन) हीच टीम उतरवली....
मनी आणी आशुडी नी निम्मी बाजी मारली बाकीच अभेषेक आणि तीने शेवटच्या राऊंडपर्यंत आमचाच लीड कायम ठेवला
आता उरला सुईत मणि ओवायचे.. मला खुपच बर वाट्लं कारण आम्च्या सोसायटीत हा खेळ पुर्वी मी खेळ्लोय... पण छ्या इतकं सहज सोप्प आणी सासंवाल्या करणार.. मणि, दोरा, आणी सुइचा आकार पाहुनच मी दोन पावले पुढे सरकलेलो चार पावले मागे सरकलो... आहा पण विजय जोशी अगदी देवासारखे धावले म्हणाले माझी मुलगी यात एक्सपर्ट आहे चला म्ह्टल्म सुटला प्रश्न... पुढचं पुढे पाहु.. आणी खरोखरच पठ्ठीने सुइत दोरा आणी मणि ओवुन मगच जागा सोडली बाकीच्यांनी मग आपल माप व्य्वस्थीत भरत शेवटचा राउंडही आम्हाला आघाडीवर ठेवलं आणी वर्षा गट जिंकला.....
खेळ संपले बक्षीस मिळलेल क्यड्बरी घरी दिलं मुलीला तर म्हणाली बाबा तुम्ही काय काय खेळलात आता काय सांगु तिला हे खेळ कोणालाही समजावणं कठीण प्रत्यक्ष मेल्याशिवाय स्वर्ग दिसण्य़ाइतकच
खेळ संपले आणी सरप्राइज आयटमची घोषणा झाली... सगळ्या जास्त धावपळ माझीच... कारण माझंस्क्रिप्ट, टोपी, तात्याच ज्याकेट सगळं चेंजींग रूम मध्ये आणि खोलीची चावी नक्की कोणाकडे हे च कळत नव्हत.मिळाली एकदाची ....बाकीचे पार्टी तयार तरी आण्णा मास्तर जागेवर नाही.....
याचवेळी बाकीच्या माबोकरांनी फोटोसेशन उरकुन घेतले.
शनीवारी केलेल्या संवादाची उजळणी करतच आम्ही रंगमंचावर दाखल झालो. विवेक देसायानु घातलेल्या गार्हाण्यान खरोखरीच चेव आला... आता वस्त्रहरण झाला तरी चालेल पण हात घालायचाच.. हेच भावना बहुतेक प्रत्येक पार्ट्याची होती..आणी सुरु झाला पात्रे परीच्चयं... सगला जल्ला नीट होत असताना... मी चुकुन एक पान जास्त उलगडला आणी दुर्योधनाक गिळुन टाकला.. पन ता काय पचलो नाय .. लगेच नरडो खाकंरत त्यांका भायरं काढुक लागला.... बाकी सगळांका नीट सांभाळुन घेत तात्या नी मात्र कमाल केली हां ....
माबोच्या वविला एक वेगळीच झालंर लावुन हे वस्त्रहरण संपले....
प्रत्येकाने केलेल्या अभिनंदनाचा स्विकार करत मग कांदा भजी आणी चहा कडे मोर्चा वळवला...
संपुर्ण दिवसभर केलेल्या धमाल मस्तीचे उजळणी चालु असतानाच संयोजकांनी आभार प्रदर्शानाचा कार्यक्रम सुरु केला.
परत अजय , शामली,यांची दोन शब्दातील भाषणं झाली..... नाही हो मी नींबुडाला विसरलो नाही फक्त तीचे भाषण दोन शब्दाचे होते हे टायपाला थोडा त्रास होतोय इतकचं....( कोणेतरी म्हणालंतेयुकेच्या स्टाफ नी काढलेल्या खुर्च्या परत लावायला घेतल्या होत्या म्हणे) असो...
अजय ला दिवे देउन(संयोजकं बाकी वस्ताद हां ,दिवे देउन आपापले आयडी एकदम सिक्युकर करुन टाकले सगळ्यांनी) ववि संपल्याची घोषणा झाली.
आता सगळ्यांची पावले जड व्हायला लागली मन भरले होत आनंदाने....आहा एखाद्या सुखी कुटुंबासारखे सगळे विभक्त तरीही एकत्रीत कुटंबातले सगळे रिवाज नियम पाळणारे..
पुणेकरांची बस परत निघाली मागोमाग मुंबैची ही ...
दत्तुचा नाका कसा आला कळलंच नाही.परत चहाचा राऊंड आता मात्र चर्चा चहा चाकण्याची नाही तर या वविसाठी होणारी तयारी त्या मागचे आडाखे जुन्या नव्यामधला समन्वय...
खर सांगतो जर पाळत ठेवुन सकाळी आणी संध्याकाळी या सर्वांना जर कोणी एकलं असत तर नक्की गोंधळला असता... सकाळचे उधळ्लेले आणी संध्याकाळी सयंमीत चर्चा करणारे एकच होते का....
पण म्हणुन परतीच्या बसमध्ये कल्ला नाही असे नाही.....फक्त गाण्यांचा पोत थोडासा बदलेला... राजेश खन्ना,ऎस.डी, आर.डी, करत करत मग विडंबनांवर ..... अशक्य निंबोणीच्या झाडामागे.... हहपुवा...
मुलुंडला बस थांबली प्रत्येक जण आपापल्या वाटेने पुढे सरकला.... मी ही घरी यायला निघालो
कानात मात्र लांबवर वाजणारे मायबोलीच्याच गीताचे शब्द वाजत होते......भाषा मराठ्मोळी हर अंतरी फुलावी घेउन ध्यास आली उदयास मायबोली

बाबु अन घारुअण्णा .. मस्त वृत्तांत... Happy
या वेळी ववि मिसला पण तुम्हा लोकांचे वृत्तांत वाचुन मजा आली.

क्या बात है घारुअण्णा.. + १
माझा पण दोनदा उल्लेख केलात..त्यासाठी.. +२
बाकी आज मीच माझा कालचा वृत्तांत पुर्ण करणार होतो.. पण इतर सार्‍यांचे वाचण्यातच वेळ गेला.. लगे रहो माबोकर.. Happy

बा-बु... आणी ती. अण्णा...
अप्रतीम आणी झक्कास वृत्तांत...
Happy

घारूअण्णा , मस्त वृत्तांत Happy
पण जाहिरातींच्या खेळात सुद्धा माझा अनुल्लेख (तेवढाच आमचा खारीचा वाटा होता) , बरे नाही हे Wink

मंडळी, ४८ तास उलटुन गेले आहेत... हुश्श.... :).

तेव्हा इथे म्हणजे मायबोलीवर आणि फेसबुकवर फोटो टाकायला हरकत नाही. फक्त एकच सूचना मायबोलीवर आणि फेसबुकवर फक्त ग्रुप फोटोच टाकावेत.
बाकी जे फोटो तुम्ही अपलोड केले असतील त्याच्या लिंक्स जर मायबोली वविच्या मेल आयडीवर पाठवल्या तर संयोजक त्या वविला आलेल्या सर्वांना पाठवु शकतील.

पण जाहिरातींच्या खेळात सुद्धा माझा अनुल्लेख (तेवढाच आमचा खारीचा वाटा होता) , बरे नाही हे .
>>>>>>>>>>>>>>>

खारीचा कसला रे... सिंहाचा वाटा होता त्या खेळात तुझा.. Happy

अमित, घारूअण्णा... मस्त वृ. सर्व दृष्ये डोळ्यासमोर उभी केलीत..
वर्चुअल ववि घडवलीत आम्हाला.. थांकु.. Happy

Pages