ववि२०१२-वृत्तांत

Submitted by ववि_संयोजक on 23 July, 2012 - 02:48

मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.

विषय: 

ववि एकदम झक्कास झाला!! संयोजकांना स्पेशल धन्यवाद!! Happy
पहिलाच ववि - अगदी सगळ्याच मायबोलीकरांची पहिलीच 'थेट भेट' असून सुद्धा सगळ्यांनी मस्त सामावून घेतले! अजिबात परकेपणा - उपरेपणा जाणवू दिला नाही! निखळ मैत्री च्या गवसलेल्या अनेक उत्स्फुर्त झर्‍यांमुळे मनातली "मैत्र" ची संकल्पना अधिकच समृद्ध झालीय! 'आपली- मायबोली' ची प्रतिमा अजूनच उजळून निघालीय आता!! यापुढच्या वाटचालीत कधी निराशेचे मभळ दाटलेच तर 'पावलापुरता प्रकाश' नक्की मिळेल ही खात्री पण पटलीय..... Happy
श्री अजय गल्लेवालेंना भेटून खूप छान वाटले!!! ते अगदी प्रत्येकाशी बोलत होते. नविन चेहर्‍यांची आवर्जून दखल घेत होते!! सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज मधे मनापासून सहभागी होत होते! बच्चेकंपनीशी मस्ती करत होते! एखादी मुंगी जरी बसमधून चुकून ववि ला आली असती ना, तरी तिलाही त्यांनी छान सहभागी करून घेतले असते!! Happy
खरच, एकदम साधे, सुसंस्कृत आणि म्हणूनच आदरणीय व्यक्तिमत्व!!!

नमस्कार ,
हा माझा पहिलाच ववि . नाही म्हटल तरी थोड टेंशन होतच . त्यातच बायको ही बरोबर . चेहर्याने इथे मलाच कोणी ओळखत नसताना तिच्याशी कोणी बोलेल का हा प्रश्न होताच.
पण सुदैवाने अस काहीच झाल नाही . अगदी बसमधे बसल्यापासून कुणीच हे जाणवू दिल नाही की मी पहिलटकरीण आहे . सुरूवातीलाच मल्ली ,रीया आणी गणेशशी छान ओळख झाली . बसमधे अंताक्षरी खेळताना पहिल्यांदा भीड मोडली .
नंतर मुंबईहूनही आलेल्या लोकांशी ओळखी झाल्या. रेन डान्स , स्विमिन्ग , व्हॉलीबॉल (३ वेगवेगळ्या बॉलनी) सगळ्यातच मस्त मजा आली . त्यानंतरचे खेळ तर सहीच , आमची टीम एकदम ऑस्ट्रेलीयन स्टाईलने जिंकल्यामुळे जास्त मजा आली.
संगीत वस्त्रहरण तर बेष्ट्च .
नाष्टा , जेवण , भजी सगळेच मस्त (शेवटी आम्ही पोटोबाचे वारकरी)
येतानाही श्यामली ,देवदत्त, अजय, परेश यानी सही गाणी म्हटली .
एकूणच धमाल , बायकोनेही मस्त एंजॉय केल , जनरली कधी पर्सनल ईमेल ही चेक न करणारी तीही आजच सभासद होणार आहे यातच आल सगळ .

ओवी... वृत्तांत हवाय... 'उतारा' नको...>>> अनुमोदन. वविला जे नविन आले होते त्यांच्याकडुन वृत्तांत अपेक्षित आहे :).

केदार मी तुझा निशेध करतेय फिदीफिदी >> अग रीया , तुझ नाव चुकून राहिल , मुद्दाम वगैरे काही नाही ग . सकाळी उठल्या,उठल्या जे वाटल ते लिहिल एकदम . Happy
रिया.. नुसत्या एकोळी पोस्ट नकोत.. वृत्तांत हवा आहे.. पुण्याचा तर तुझाकडूनच.... >> +१

ओवी... वृत्तांत हवाय... 'उतारा' नको >>>> Biggrin
ए, मी काही सिद्धहस्त लेखक नाही हा... सध्या एवढेच सुचतेय..... Happy

आमची टीम एकदम ऑस्ट्रेलीयन स्टाईलने जिंकल्यामुळे जास्त मजा आली.
>>>>>>>>

केदार, हे ऑस्ट्रेलियन स्टाईलने जिंकणे काय असते........ चिटींग आणि शिवीगाळ करून का.. Proud

आमची टीम एकदम ऑस्ट्रेलीयन स्टाईलने जिंकल्यामुळे जास्त मजा आली.
>>>>>>>>म्हणजे आम्ही पहिल्या राऊम्डपासुन आघाडीवरच होतो. कोणीच् जवळही नव्हतं आमच्या.
अखेर स्पर्धा जिंकली.

कोणीच् जवळही नव्हतं आमच्या >>>> ए नाही, आमची टीम खूप वेळ बरोबरीत होती हा तुमच्या... त्या "उतारा" प्रकरणामुळे मागे पडलो मग आम्ही!!

हेकायनितेकाय > अग १४०-१४० होते आपले सेम. पण आम्ही जास्त टीव्ही बघत नाही म्हणून स्लोगन लिहायच्या फेरीत मागे पडलो. Happy हो की नाही ओवी?

प्रत्येक राऊम्ड आम्हीच जिंकला. >> ५६० गुणांची कमाई करुन जिंकलेल्या वर्षा टीमचे खूप खूप अभिनंदन Happy

पहिली फेरी वर्षा आणि वरुण बरोबरीत १४० गुण
दुसरी फेरी पर्जन्य आणि वर्षा बरोबरीत ३० गुण
तिसरी फेरी वर्षा आणि वरूण बरोबरीत १३० गुण
चौथी फेरी पर्जन्य, वृष्टी आणि वर्षा बरोबरीत १४० गुण
पाचवी फेरी वृष्टीने जिंकली १५० गुणांची कमाई करून

जल्ला कंदीपासुन वृत्तांताच्या नि फोटुच्या वाटेवर डोले लावुन बसला हाय मी........ काल वविला बागडुन झाला ना ? मंग आता परत कुटं उंडारायला गेलाव सगले ? चला सगल्यांनी बेगीन बेगीन वृत्तांत टाका बगु. Happy

वर्षाविहार...
आदल्या दिवशी मयुरेशचा मेसेज आला की उद्या ६.१० ला सावरकर भवनापाशी हजर रहा. मल्लीकडून कळालं की साडेपाचला निघायचय. वेळेचा हिशोब लावला तर त्यानुसार मला पहाटे चारला उठायचं होतं. जी माझी रोजची झोपण्याची वेळ आहे Uhoh
मग झोपायलाच नको असा विचार करता करता तीन वाजता झोप लागली आणि मग सकाळी सकाळी चारला उठले Happy
पहिलाच ववि.. उगाच भिती वाटत होती.एकतर लिस्टमधली फार कमी नावं ओळखीची होती आणि ती ही लिस्ट ओळखीची होती.त्यामुळे काय होणारेय कोणास ठाऊक हे टेन्शन. त्यातच पटकन पटकन आवरलं.
मी आणि प्रिती साडेपाचला घरातून निघालो. आणि आई बाबांना म्हणाली "मी पण येते यांना सोडायला" हे ऐकताच मला शाळेची ट्रिप आठवली. आणि उगाच वॉटरबॅग, युनिफॉर्म, शाळेचा नावाचा बॅच, उजव्या बाजुला लावलेला रूमाल वैगेरे चेक करावस वाटायला लागलं. पण कसबस आईच येणं कॅन्सल करवून आम्ही निघालो.
वाटेत मल्लीला पिक केल ( Proud ). आणि ६ वाजता सावरकरभवनाला पोहचलो तर तिथे आमच्या पाचजणांशिवाय (मी,प्रिती,बाबा,मल्ली आणि ड्रायव्हर) एकही जण हजर नव्हता. Angry
मग हळू हळू श्री व सौ केदार प्रकटले. आणि मग आम्ही गणेशची वाट पाहात बसलो. मग कळालं की तो डेक्कनला येणारेय म्हणुन बस निघाली डेक्कनकडे.
वाटेत मल्लीला एक अनोळखी चेहरा बस कोसो दुर असताना बसकडे हात दाखवत "हाय" करताना दिसला. तेंव्हा मल्लीने तेवढ्याच उस्फुर्तपणे त्या चेहर्‍याला हाय करत तिथे बस थांबवली. बस मधुन उतरून त्या व्यक्तीशी हस्तांदोलन केले. त्याव्यक्तीने आमच्याकडे पाहून "ही सगळी माणसं आपलीच का" अस मल्लीला विचारलं. मल्लीनेही उस्फुर्तपणे "हो आपलीच. चला निघुया" म्हणलं. तेवढ्यात मागून त्या व्यक्तीचं संपुर्ण कुटुंब बसकडे येताना दिसलं Uhoh तेंव्हा मल्ली त्या काकांना (व्यक्तीबद्दल गैरसमज होऊ नये म्हणुन शब्द बोल्ड केलाय) म्हणाला. "मायबोली ना?"
त्यावर त्या काकांनी "नाही हो मायबोली नाही" अस उत्तर दिलं आणि बसमध्ये आमची हाहापुवा.
तेवढ्यात मागून गणेश पळत पळत आला.तो पहाटे ६.१०ला झोपेतुन उठलेला आणि स्पष्टीकरण म्हणुन त्याने सांगितलं की माबोची बस कधीच वेळेवर येत नाही Uhoh (मी पुढच्या वविला हे लक्षात ठेवेन Proud ).
अशाप्रकारे गणपती बप्पा मोरयाचा गजर करत बसने कूच केलं.
कुठल्या रस्त्याने कुठे पोहचलो ते मला अजिबात सांगता येणार नाही पण एकेकाला घेत घेत निघालो.
आशूडीला पाहुन माझ्या बहिणीने ३-४ वेळा "हिचं लग्न झालय????" अस विचारलं.
पुढच्या स्टॉपला अजयला उचललं (पिक केलंच भाषांतर). तिथे बसला मायबोलीचा बोर्ड लागला.एक फोटो सेशन झालं. साधारण २० मिनिट तिथे घालवल्यानंतर निघायच्या वेळेला आशुडीला आठवलं की तिला भुक लागली आहे. म्हणुन मग ती क्रिमरोल आणायला गेली.
२ वेळा हजेरी झाली. ओळखी पाळखी झाल्या. तरी कोणी अंताक्षरी खेळायला सुरुवात करेना Sad
मग कळालं की अजुन एका मेंबरला घ्यायचं राहिलय. गाडी हायवेवर पोहचली. केदार आला आणि त्याने आल्या आल्या " तू रिया का? मला दादा म्हणायचं नाही" अस डिक्लेर करून टाकलं Proud
आणि गाडी वाटेला लागली. फक्त मराठी गाण्यांची म्हणुन सुरु झालेली अंताक्षरी 'मुन्नी बद्दनाम हुई'वर कशी पोहचली ते मला आठवत नाहीये.
मध्ये एकदा चहा प्यायला थांबलो तेंव्हा अजयने "मला कोंबडा म्हणुन नकोस हं" असं सांगितलं Uhoh
उदय नोट डाऊन रे :फिदी:. रच्याकने हळूच एकदा आयडी ब्लॉकचा विषय निघाला,त्यावर अजयने "ते काम समीरचं आहे. उलट आज मी जी मस्ती करेन तीही तुम्ही त्याला सांगू नका." अस सांगून टाकलं. विषयच बंद! Wink
पावसाने हजेरी लावलीच Happy साजिर्‍याची चहा अंघोळही उरकली. मंजिरी आत्या म्हणण्यासारखी दिसत नाही तेंव्हा ती आत्या का याचा खुलासा मला नंतर करण्यात यावा ही विनंती.प्रितीचं आशुडीकडे पाहत पुन्हा एकदा "खरच हीच लग्न झालयं?" अस विचारून झालं. आशू तुला आता संतूरची अ‍ॅड करायला हरकत नाही ;).
गाण्यांच्या तालात गाडी यु.केला पोहचली आणि नेहमी प्रमाणेच पुणेकर मुंबईकरांच्या पुढे होते.
रच्याकने नोंद घेण्याजोगी गोष्ट ही की संपुर्ण अंताक्षरी मध्ये मला "तुमही हो बंधू" हे गाणं कोणीच गाऊ दिलं नाही. त्याबद्दल मी सगळ्यांचा णिशेध करत आहे Proud
सामी कडून कळालं पुणेकरांकडून स्वागत व्हावं म्हणुन हे लोक्स उशीरा आले. पण हे आले तेंव्हा आम्ही नाष्टा करत होते. त्यामूळे त्यांचा पोपट झाला Proud
नाष्ट्याला पोहे, बटाटा वडा आणि इडली सांबार होतं. कुठेही जा इडली सांबार काही माझी पाठ सोडत नाही.
त्यानंतर एक ओळख परेड झाली. माझा आयडी सांगताच आखिल पुरुष मंडळाने स्वतःचे हात मागे बांधून टाकले त्यामुळे यावर्षीच्या सामुहिक रक्षाबंधनाचा कार्येक्रम होऊ शकला नाही.
देवकाकांनी माझी ओळख भिडेकाकांशी करून दिली कारण त्यांना मी डु आय वाटतं होते Uhoh . भिडेकाका का ओ अस?.
केकचा गोडवा विषेश होता.असणारचं १०व्या वविचा केक होता ना तो.
पाण्यात बर्‍याच वेळ खेळलो.बहुदा मी आणि प्रितीचं पाण्यात सगळ्यात आधी उतरून सगळ्यात शेवटी बाहेर पडलो. सामीने उगाच काहीही कारण सांगून पाण्यात यायचं टाळलं म्हणुन मी तिचा णिशेध करतेय :फिदी:.
आपला अभिषेक काही बायकोला सोडायला तयार नव्हता. त्याच्यापेक्षा त्याच्या बायकोनेच ववि जास्त एंजॉय केला अस वाटतय Wink
पेटपूजा बाकी मस्त झालतो.गुलाबजाम ऑसम होते. आणि त्यानंतर चॉकलेट्स. आहाहा!
मनोरंजनाचे कार्येक्रम अतिशय सुंदर होते.
पहिल्या राऊंडमध्ये म्हणी ओळखायच्या होत्या. याबाबत आमच्या गॄपवर अन्याय झाला आम्हाला दोन म्हणी एकत्र करून कसलीशी म्हण दिली गेली.संयोजकांनी फेरविचार करावा Proud
दुसर्‍या राऊंड मध्ये शब्द ओळखुन गाणी ओळखायची होती. आम्ही शब्द ओळखले. वाट, वारी आणि धुके...वाचकांनी ( वविला हजर नसाणार्‍या वाचकांनी ) गाणं गेस करा पाहू.
तिसरा राऊंड म्हणजे प्रचंड पोटदुखीला कारणीभुत ठरला.
यातच अप्पा भिंगार्डेचा आप्पा बेलवणकर होऊन, क्षेपाणास्त्राला शेपुट जोडून मुंबईच्या दमट आणि उष्ण हवेचे मिलन करून साडे अठ्यात्तर किलो जिलेबी खात चर्चेस उतरला. Rofl
चौथ्या राऊंडमध्ये जहिरातींनी आमचा किस काढला ( काढला हा शब्द नीट वाचा ).
पण इथे श्यामलीच्या मुलांच विषेश कौतुक कारण जहिरातींचा अनुल्लेख केल्याचा पश्चाताप व्हावा अश्या एकसे बढकर एक टॅग लाईन्स शोधुन काढल्या गेल्या होत्या.
पाचव्या आणि शेवटच्या राऊंडमध्ये माळा ओवायच्या होत्या आणि आम्ही जिंकलो.
साग्रसंगित जेवणानंतर गोड नाही मिळालं तर जेवण वाया गेल्या सारखं वाटत ना? स्वीट डिश हवीच.
येस! इथेही होतीच. मुंबई संयोजकांनी अतिशय सुंदर असं नाटुकलं सादर केलं. प्रिती तर बोलताना अग "तो अर्जुन नाही का, ते मास्तर नाहीत का" असाच उल्लेख करतेय Happy
आणि निघायची वेळ जवळ आली. माझा आणि ओवीचा गोंधळ आठवून पुण्यातल्या जवळपास सगळ्यांनी मला "तू ओवीला भेटलीस का? " हा प्रश्न विचारला. राखी आणि मी पुढचं गटग प्लॅन करून मोकळ्या झालो. सगळ्यांना त्रिवार बाय बाय करून पुण्या मुंबईच्या बस आपल्या आपल्या दिशेने निघाल्या.
परतीच्या वाटेवर श्यामली आणि देवा यांची सुरेल गाणी ऐकता ऐकता एकेकाला वाटेत सोडत, त्या आठवणी पुढे घेऊन बस मनपाला पोहचली.
तेवढ्यात आठवलं की अरे या सगळ्या लोकांना आपण सकाळपर्यंत ओळखतच नव्हतो की. पण अगदी स्वतःच्या नातेवाईकांमध्ये वाटतं तितकासाही परकेपणा जाणवला नाही. जणू काही अनेकवर्षांपासूनची भेट. अनेक वर्षांपासूनचे ऋणानूबंध. आयडी मागचे सगळेच चेहरे आपल्यासारखेच. अगदी अजयही अ‍ॅडमिन असल्याच्या तोर्‍यात वागत नव्हता. इतके दिवस "काय ग सारखी मायबोली, मायबोली" म्हणणारी प्रिती सकाळपासून "माझं अकाऊंट कधी उघडणार" अस विचारतेय. पुढच्या वविचं तिने सुरु केलेलं प्लॅनिंग..आणि उठल्या उठल्या आले का ग वृतांत हा तिने विचारलेला पहिला प्रश्न.
माझ्यासाठीतरी ववि इथेच हिट Happy
मायबोली रॉक्स Happy

त.टी : कोणालाही मी दादा-तै म्हणलेलं नाही याची नोंद घ्यावी Proud

अरे, गप्पा कसल्या मारताय? वृत्तांत टाका पटापट...

ओवी, वृत्तांत लिहिण्यासाठी सिध्दहस्त लेखक असावे लागत नाही. उद्या म्हणशील, गप्पा मारण्यासाठी माझ्याकडे फर्डे वक्तृत्त्व नाही Wink

पहिली फेरी वर्षा आणि वरुण बरोबरीत १४० गुण
दुसरी फेरी पर्जन्य आणि वर्षा बरोबरीत ३० गुण
तिसरी फेरी वर्षा आणि वरूण बरोबरीत १३० गुण
चौथी फेरी पर्जन्य, वृष्टी आणि वर्षा बरोबरीत १४० गुण
पाचवी फेरी वृष्टीने जिंकली १५० गुणांची कमाई करून
अंतिम विजेती - वर्षा

>>>>>>>>>>

सगळी कडे आपले वर्षा वर्षा आहेच..... ...... खर्‍या अर्थाने वर्षाविहार नाव सार्थक झाले... Happy

Pages