ववि२०१२-वृत्तांत

Submitted by ववि_संयोजक on 23 July, 2012 - 02:48

मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.

विषय: 

@ श्या ... अग ४८ तास झाल्याशिवाय ते पण तर बघता येत नाहीयेत मला... Lol

हो आणि माझे फोटो इतरांनी बघताना सुद्धा माझी हरकत असेल तर ...? भले त्यांच्या कॅमेर्‍यात का असेनात ते फोटो ...
Proud

विनय... फोटोगिरी निर्णयाची सुनावणी उद्या सकाळीच होईल असे कार्याध्यक्षांनी सुचित केले आहे.

ए, मी मनाने वविलाच होते. श्यामलीला फोन पण केला होता. मलापण फोटो पाठवा. Happy
श्यामले, तुझे तरी पाठव गं. Happy

मनाने वविला आलेल्यांना माझे फोटो पाठवायला माझा आक्षेप आहे ... Proud
मी वावरत असलेल्या परिसराचे सुद्धा फोटो कोणालाही धाडू नयेत ...:फिदी:

ऑन सिरियस नोट

वविची नोंदणी करताना
कॅमेरा आणणार का? असा प्रश्न विचारावा, उत्तर हो असेल तर. इथे असलेल्या संकेतांची जाणिव करुन द्यावी.
फोटो काढू देण्याबद्दल, प्रकाशित करण्याबद्दल पण वविची नोंदणी करताना. हा प्रश्न आणि ऑप्शन्स मागवावेत.

हे फक्त ववि साठी नाही तर मायबोलीच्या होणा-या सगळ्याच उपक्रमांसाठी लागू केले जावे.

ह्या विनयचा चेहरा आणि तो उभा आहे तो आणि आजूबाजूचा परिसर ब्लर करुन पाठव. हा का ना का Proud

विनय, श्यामली - तुमच्या नियमांत बसेल तसं करा. मी मजेत लिहीलं. Happy आता श्यामलीला भेटेन तेह्वा साग्रसंगीत वर्णन ऐकून समाधान मानेनच. Happy सिरीयस नोटबद्दल +१

तुझी पोस्ट यायचय आधीच टायपत होते ग, तुझी पोस्ट आणि माझी पोस्ट एकत्रच वाचली मी. Happy
काळजी नसावी. योग्य ते घेतले आहे Proud

वविची नोंदणी करताना
कॅमेरा आणणार का? असा प्रश्न विचारावा, उत्तर हो असेल तर. इथे असलेल्या संकेतांची जाणिव करुन द्यावी.
फोटो काढू देण्याबद्दल, प्रकाशित करण्याबद्दल पण वविची नोंदणी करताना. हा प्रश्न आणि ऑप्शन्स मागवावेत.

हे फक्त ववि साठी नाही तर मायबोलीच्या होणा-या सगळ्याच उपक्रमांसाठी लागू केले जावे. >>>>>

मग लोक फोटो काढूनच का घेतात ???? आणि काढून घेतात तेव्हाच का सांगत नाहीत ...की हा पब्लिश करु नका म्हणून...

शै आणि श्या ... मी जस्ट चर्चा म्हणून विचारतोय ..

श्यामली, पण हे सगळं केल्याने सध्या वविला निर्धास्तपणे येणारे नविन मायबोलिकर यानंतर तसे येतील का ही मला शंका आहे.
आधीच्या वविला काही गैरप्रकार घडून गेला आहे अशी शंका त्याच्या मनात नक्कीच येऊ शकते.

श्यामली, पण हे सगळं केल्याने सध्या वविला निर्धास्तपणे येणारे नविन मायबोलिकर यानंतर तसे येतील का ही मला शंका आहे.
आधीच्या वविला काही गैरप्रकार घडून गेला आहे अशी शंका त्याच्या मनात नक्कीच येऊ शकते. >>>>>

करेक्ट ....

या आंतरजालावर मायबोली ची ख्याती ... "तुम्ही इथे निर्धास्त वावरु शकता " अशी व्हायला हवीये ...

तेव्हढा विष्वास आपण एकमेकांवर ठेवायला हवा.. वाईट प्रवृतींकडे दुर्लक्ष करायला हव.

विनय, प्रत्येकाला हा चॉईस आहेच की फोटोसाठी उभं रहाव की नाही. त्याबद्दल दुमत नाहीच. कधीकधी न कळतही फोटो निघतात ना? Happy त्यामुळे, जर कोणाची इच्छा नसेल आपले फोटो इतरांनी पहावं अशी, तर ती ठीकच आहे.

वाईट प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करायचं हे ठीक पण दर वेळी ते तसं करता येईलच असं नाही. त्यामुळे प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय, हे माझं मत.

वविची नोंदणी करताना
कॅमेरा आणणार का? असा प्रश्न विचारावा, उत्तर हो असेल तर. इथे असलेल्या संकेतांची जाणिव करुन द्यावी.
फोटो काढू देण्याबद्दल, प्रकाशित करण्याबद्दल पण वविची नोंदणी करताना. हा प्रश्न आणि ऑप्शन्स मागवावेत>>>

ह्याच्या पेक्षा वविला कोणीच कॅमेरा आणू नये... हे जास्त योग्य राहिल... ना रहेगा बास ना बजेगी बासुरी... फोटो काढलेच नाहीत तर पाठवायचा प्रश्नच येणार नाही..

शैलजा, आपले फोटो हे एका ओपन फोरमवर प्रकाशित व्हावेत की नाही हा निर्णय हा त्याचा त्याने घ्यावा याबाबत माझे तुला अनुमोदन.

माझे फक्त एवढेच म्हणणे आहे की असे काही नियम केल्याने त्याचा परिणाम वविला किंवा गटगला जमणार्‍या लोकांच्या संख्येवर होउ नये.

त्यामुळे, जर कोणाची इच्छा नसेल आपले फोटो इतरांनी पहावं अशी, तर ती ठीकच आहे. >>> पूर्ण मान्य ..

परेश लिमये नी सान्गितल होत , माझा फोटो काढू नका आणि त्यामुळे माबोवर टाकूही नका ...

पण अशीही लोक आहेत ज्यांनी फोटो काढताना समोरुन स्माईल दिल्या आहेत , फोटो ग्राफर ला काहिही सांगितलेले नाही

साधारण तीन वर्षा पूर्वीपर्यंत वविचे फोटो एक वेगळा ग्रूप करून फक्त त्या ग्रुप पुरतेच पाठवले जात असत.. तेव्हा कुठल्याही बाफवर फोटो टाकले जात नसत... तो प्रकार अचानक बंद झाला.. तो परत चालू केल्यास जास्तच उत्तम...

मी तर फोटो प्रोसेसिंग करताना चेहरे ब्लर करुनच इथे टाकणार आहे... बसा स्वतःला ओळखत..... Happy

विनय, फोटोची हौस असतेच की प्रत्येकालाच Happy

नील येणा-याच्या संख्येवर परिणाम कदाचित नाही होणार, हिम्या म्हणतो तशी कॅमेरा बंदी करावी. किंवा निसर्गचीत्र घ्या मॉबची नाही असा काही ऑप्शन देऊ शकतो.

असो अ‍ॅडमिन काय तो निर्णय घेतील.

फोटो टाकणे जर बंद करायचे असेल तर काही हरकत नाही... पण कॅमेरा आणायला मनाई करणं मला जरा अतिच वाटतं.
असो अ‍ॅडमिन काय तो निर्णय घेतील. +१०००००००००००००००

वविचा वृत्तांत ? काय काय म्हणून लिहायचं ? नक्की कशापासून सुरुवात करायची ? म्हणजे वविसंयोजनाची नोटीस लागली तेव्हापासून की काही माबोकर भेटलो असता 'वस्त्रहरणाची' इच्छा व्यक्त झाली तेव्हापासून ?

खर सांगायचं तर पावसाची वाट पहात होतो ते वविसाठी. बाफ निघाले, मिटींगा झाल्या आणि संयोजकात नसूनही "गावात लग्न आणि कुत्र्याला बोवाळ" या उक्तीला जागत माझी लगबग सुरु झाली. माझ्या कामाचं स्वरुप 'कमी तिथे आम्ही' टाईपचं होतं. त्यामुळे कशालाही जबाबदार नव्हतो. नोंदणी सुरु झाली आणि संयोजनाला वेग आला. प्रॉब्लेम्स येणारच आपण तयार असायला हवं म्हणत टीम झटत होती आणि एका दिवशी आनंदसुजूचा तालमीसाठी जमायचा फोन आला. आश्वासनं ही न पाळण्यासाठीच असतात हे माहिती असल्याने तालमीच्या नावाखाली जे काही उरकलं गेलं ते फारसं उत्साहवर्धक नव्हतं. पण काही रासायनिक क्रियांना कॅटॅलिस्ट लागतातच. नाट्यविषार(क)द परेश लिमये आमची लाज राखायला धावून आले. तालीममास्तर हा रींगमास्तर असला तरच नाटक यशस्वी होतं हे सूत्र पाठ करुन आलेल्या लिमये मास्तरांनी आधी आम्हाला खाली बसवलं आणि मग नाटक बसवलं. हुश्शः ;नाटक बसलं, उठून उभं राहिलं आणि रांगता रांगता चालायलाही लागलं. लाडाकोडाच्या पोराचं सगळ्यांनाच कौतुक. पण आमच्यावरच्या प्रेमामुळे माबोकरांनीही ते स्वीकारलं.

पार्कातल्या मिटींगला निघेपर्यंत सौ.च यायचं नक्की नव्हतं, शेवटी 'अरे अरे म्हश्या' करत ती आली. आणि 'बायको नी पोरगं घेउद्याकी अन् मलाबी वविला येउद्या की' म्हणत मी वविच्या गर्दीत जमा झालो. सकाळी गजर वाजताच शाळेसाठी हज्जार वेळा उठवायला लावणारा मुलगा टुण्णकन उठून बसला. रात्री मायबोलीगीताची सीडी बनवायचा प्रयत्न करत बसल्याने उशीरच झाला होता. आन्हिकं उरकताना फोन वाजला. मी बाहेर पडेपर्यंत मुलाने 'नीलकाकाचा' फोन घेउन त्याला बॅनर बांधायला लागणार असलेली दोरी शोधून ठेवली होती. कार्यकर्त्यात भर पडण्याची लक्षणं दिसताहेत. वैभवच्या दुसर्‍या बायकोसकट सगळ्यांना गाडीत कोंबलं आणि लिमयेमास्तरांना पिक अप करायला निघालो. त्याला गाडीत घेतला की मला बायकोशी वाद घालायला धीर येतो. Proud

आम्ही पोहोचेपर्यंत मुलुंड श्टापला बस आलेली होतीच. आम्हीही निंबुडाची वाट बघत थांबलेल्यात जमाझालो. शेवटी साधारण मध्य रेल्वेच्या गाड्या जेव्हढा वेळ वाट पहायला लावतात त्याच्या दुप्पट वेळात निंबूडा आली.

आम्ही स्थानापन्न झालो आणि बस निघाली. बसमध्ये पाउल ठेवल्यापासून ते खाली उतरेपर्यंत कशाकशाला न जुमानता कल्ला चालू होता. नाट्यकलावंत एकमेकांना आवाज सांभाळायचे सल्ले देत होते आणि स्वतः मात्र चढ्या आवाजात गाणी गात होते. एकंदरीत शिंग मोडून वासरात जमा व्हायचं काम चालू होतं. प्रशांत नवीन होता हे मला तो खूप जूना झाल्यावरच कळलं. तो थोर, कर्तृत्ववान वगैरे असल्याच तर फार्फारच नंतर कळ्ळ. माणूस मोठा झकास आहे. वैभ्याच्या हाताला विश्रांती द्यायचं काम त्याने चोख पार पाडलं. घारुअण्णांनी आणलेली दिमडी मी आज फुटलीच पाहिजे या इर्ष्येने वाजवली. तालाचं काही माहिती नाही पण उजव्या हाताची तीन बोटं मात्र सुजली होती. शिग्रेट पकडायची पंचाईत होण्याची शक्यताच नव्हती कारण त्याबाबतीत आम्ही अर्जूनाला लाज वाटेल इतके सव्यसाची होतो. खंत मात्र इतकीच होती की दिमडी फुटलीच नाही Proud बहुधा घारुच्या कातडीची बनवलेली असावी Wink Light 1

नाश्ता, जलविहार, जेवण आणि सांका आटोपले आणि तिसरी घंटा द्यायची वेळ आली. नाटकाची एकंदरीत झालेली तयारी बघून पोटात बाक् बूक् होत होतं. आमचे संवाद छोटे होते पण अण्णा आणि आनंद्ज यांच काम कठीण होतं. खास करुन आनंदसुजूचं. त्या व्यक्तिरेखेला सगळं नाटक एकखांबी तंबूसारखं तोलायचं होतं. शेवटी नक्की काय झालं कळलं नाही पण मला वाटतं बहुधा मच्छिंद्र कांबळींचा आत्मा खाली उतरला होता. आन्द्याने काम तर चोख बजावलच पण आयत्या वेळच्या अ‍ॅडिशन्स आणि झालेल्या गडबडीही सांभाळलन. माबोकरांनी आम्हाला सांभाळून घेतलं.

जोशी आजींच कौतुक, आधी मला वाटलं त्यांना झेपेल की नाही, आवडेल की नाही. पण आजींनी गाडीत गाणी म्हंटली. आणि उतरल्यावर समस्त जोशींनी पुढच्या वविचंही बुकिंग करुन टाकलं यात सगळ आलं.

एकंदरीतच ववि कसा वाजत गाजत पार पडला. थोरलं मालक आलं त्यात सगळं भरुन पावलं. अर्थात संयोजकांनी त्यांनाही दिवा दिलाच.

शेवटी माणूस आयुष्यभर विद्यार्थीच राहतो हे मात्र शिकवलं या वविनं. नाहितर "कुंभाराचा दांडा गोतास काळ' ही म्हण मला आयुष्यात ऐकू आली नसती...

सगळ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आयुष्य खूप धावपळीचं झालय मित्रांनो. त्यात असे निर्मळ सुखाचे क्षण दरवळले की मन सुखावून जातं. पाऊस पडल्यावर मृद्-गंध यावा तसं

Pages