ववि२०१२-वृत्तांत

Submitted by ववि_संयोजक on 23 July, 2012 - 02:48

मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.

विषय: 

व.वि.- २०१२ ... वृत्तांत (मालवणी भाषेतसून)....

बा द्येवा म्हाराजा...
बा द्येवा म्हाराजा...

अरे असां काय?... 'होय म्हाराजा' कोण म्हणतलो?, तुमचो .... Uhoh

माफ करा हां समस्त माबोकरांनू... चुकलंय... काय झाला सांगा?, सगळ्या माबोकरांसाठी व.वि.मधे द्येवाक गार्‍हाणां घातलेलंय ना, त्येचो होय परीणाम... काय आसा, कसलांय लेखन करताना सुरुवातीक आपण 'श्रीगणेशाय नमः' म्हणतंव आणी सुरुवात करतंव नां, तsssर म्हटलां या ख्येपेक गार्‍हाणां घालुया आणी सुरुवात करुया... तेच्या मुळे असां घडलां... नमनाकच 'पिशवी भर त्याल' (हो... हल्ली पिशवेतलाच त्येल घ्येवचां लागता नां...) वापरलंय... आता मात्र खरी सुरुवात करतंय हां... आयका सगळ्यांनी...

सालाबाद प्रमाणां 'व.वि. ची नोटीस' (कोण तो 'कोर्टाची नोटीस' म्हणताहा?... कोकणी माणूस आणी कोर्ट - ह्येंचां कितीही 'जवळचां नातां' असला म्हणान काय झालां?... वगी आयका, पुढे काय सांगतंय तां...) ... तर 'व.वि.ची नोटीस' फळ्यार लागली. काय करूं?... जांव?... की नको?... ह्येचो विचार करीत-करीत(च) नाव नोंदवलंय आणी बाकीचे सोपस्कार पूर्ण करुन घेतलंय. सोबत एक-दोन गजालिकार येणारे होतेच, त्यामुळे धाक-धूक थोडी कमी होती. आदल्या दिवशी सकाळी सव्वा-अकरा वाजता, बा-बु चो फोन -""मास्तर, 'वस्त्रहरण'चां गार्‍हांणां होयां... सोय करा..."... म्हटलां प्रकार काय?... कारण आधीच दोन दिवस 'मायबोली'वर प्रचंड उलथा-पालथ झाल्लंली... कोकणी परंपरे नुसार 'एकदाच काय तां गार्‍हाणां घालून' सोक्षमोक्ष लावतसत की काय???... पण तितक्यात पुढचां वाक्य कानार ईलां -'सरप्रायज आयटम करुचो आसा, तेच्या साठी गार्‍हाणां होयां, कोणाकडे बोलां नकात...' फोन बंद... आता येक सांगा, माका 'सरप्रायज आयटम कसलो?', तोच समाजलो नाय, तर बाकिच्यांक सांगतलंय काय?... शेवटी म्हट्लां 'आलीया भोगाशी, असावे सादर....' योग्य वेळेत 'गार्‍हाण्या'ची सोय करुन मोकळो झालंय... संध्याकाळी मयुर कडसून 'नियोजीत जाग्यार, वेळेत हजर र्‍हवा...' असो त्रो-सं ईलो... (नाय, नाय... मयुरान त्रो-सं ईंग्रजीतसूनच केलेल्यान... आता त्येच्या बायलेची ईच्छा असात, तर त्येका 'मालवणी-बालवाडी'त प्रवेश द्येवची सोय करीन....). म्हटलां चला, वातावरण तर बरां तयार झालां...

सवय प्रमाणां साडे-चार चो गजर लावन पाच वाजता ऊठलंय... न्हांव?... की नको?, ह्येचो थोडोवेळ विचार केलंय. नायतरी 'व.वि' च्या निमतान, जावन पाण्यात(च) कुदाचां होतां... पण रात्री ११ वाजता घरकारणीन भ्र.ध्व.वरसून दिलेली सुचना परत एकदा कानात घुमली 'नीट आंघोळ करुन जा, नाहीतर तसाच जाशील...'. मगे काय?, केलंय आंघोळ. न्हाण्येतसून भायर पडता-पडता फोन वाजाक लागलो. वेळेचा गणीत चुकलां की काय? गाडी ईतक्या लवकर ईली देखिल?... फोन उचललंय तर पलीकडसून खूपच दमलेल्या आवाजात 'कान्त' (लक्ष्मीकान्त धुळे) बोला व्हते. 'विवेक, काल संध्याकाळ पासून आजारी पडलोय... त्यामुळे व.वि.ला येऊ शकत नाहीय... सॉरी...' फोनवरच त्येंका 'हरकत नाय' असां सांगान टाकलंय. काय आसा, बरेच दिवस परदेशात र्‍हवान पाच-सहा दिवसां पूर्वीच कान्त 'म्हायेरा'क ईलेसत. तेच्या कारणान, हवेत झालेलो बदल त्येंका झ्येपलो नाय... आसो...

...तर, बरोब्बर साताक पाच मिनिटां कमी असताना घरातसून भायर पडलंय आणी सांगितलेल्या जागेर मस्त-पैकी रमत-गमत चलत-चलत जाय होतंय... थोडां अंतर चलान गेल्यावर पाठी मागसून कोणतरी 'शुक-शुक' करतहा असो भास झालो, (आता हंयसर तुम्ही Cadbury Dairy-Milk च्या Shotsची जाहीरात म्हणा... 'लाडू फुटला... मनात गुदगुल्या झाल्या'...)... पाठी वळान बघतंय तर काय?... आपली 'आत्या' - मंजिरी सोमण, माका हाक मारण्याच्या पवित्र्यात ऊभी व्हती, आणि सोबत लाल 'चहा-सदर्‍या'त, चष्मेवाले ओळखीचे गृहस्थ होते... ओळखिचे म्हणजे त्येंका मी आज-पर्यन्त 'मायबोली'वर झळाकणार्‍या/ झळाकलेल्या 'प्रकाश-चित्रा'त(च) बघीतलेलंय... ते होते आपले सगळ्यांचे 'वेब-मास्तर' - मान. श्री. अजय गल्लेवाले (माका एक सांगा - मराठीत रुपांतरीत झालेलां, ह्यां 'पारशी' आडनांव ह्येंका खंय गावला असात?... इतकी वर्सां अमेरीकेत र्‍हवान देखिल छान पैकी आणी अस्खलीत पणे, स्वच्छ मराठी बोलणार्‍या या व्यक्तीमत्वाचां आडनांव किमान 'जोशी' तरी व्हयां की नको?....)... वेब-मास्तरांची चौकशी करता लक्षात ईलां 'ह्यो माणूस सगळ्या 'मा.बो.करां सोबत बस मधे ' बसाच्या साठी घराकडसून चलत-चलत आमच्या 'ष्टॉप' पर्यन्त इलेलो, ह्येन्च्याच दारा भायरसून आमची बस जावची असताना देखिल... खरोखर 'ग्रेट' माणूस...

ठरलेल्या जागेवर, ठरलेल्या वेळेवर बस येवन ऊभी र्‍हवली... ह्येच्या साठी हिम्स, मयूर आणी मल्लीनाथ ह्येंचां 'जाहीर अभिनंदन आणी कौतूक'... (टाळ्ये कोण वाजवतलो?, तुमचो....). गाडी येवन पोचाच्या अगोदर 'वेब्-मास्तरां'नी 'कुठ पर्यन्त आलात?' अशी चौकशी केलेल्यांनी. त्या अंदाजा प्रमाणे गाडी खरोखरच एकदम 'सुपर-फाश्ट' ईल्लंली. माका तर ती (बस) 'आय.टी.' कंपनीची 'कर्मचारी' बसच वाटली; कारण मधल्याच 'खिडक्ये'कडे बसलेल्या 'चेहर्‍या'वर लक्ष गेल्या वर (कोण तो वगीच खाकारतहा?... आँ?...) 'आय.टी. कर्मचार्‍या'चो विशीष्ट चेहरो नजरेत भरलो, पण अजयनी माझी समजूत काढल्यांनी 'अरे, आपलीच बस ती...' आम्ही बस पर्यन्त पोचतंव म्हणा पर्यन्त बस मध्ले एक-एकजण भायर पडले तेव्हा खात्री पटली - आपलीच बस आसा. भायर पडलेल्या चेहर्‍यांत बरेचशे चेहरे अनोळखी होते. ओळखिचे म्हणजे मयूर, हिम्स, शामली, साजीरा आणी मल्लीनाथ... अनोळखी चेहर्‍यांत एक शांत, निरागस, चष्मो लावलेलो आणि गहन विचारात गढलेलो चेहरो होतो. माका १००% खात्री होती, मी ह्येका 'गेल्याच वर्षी बाल-गंधर्वकडे भेटलेलंय'... पण सवयी प्रमाणे मीच त्येचां नांव विसारलेलंय... कोण ही व्यक्ती?... कपाळ खाजव-खाजव-खाजवलय, पण श्या:... काय केल्या आठवयना. तेणां देखिल बापड्यान 'आपली ओळख' एक जनरल मा.बो.कर इतकीच ठेवलेल्यान. कदाचीत सोबत कुटूंब आणी परीवार असल्यामुळे तेचां असां झालेला असात. गाडी मोकळ्या जागेत थांबलेली बघून मल्लीनाथान गाडीक 'फलक' लावच्या साठी 'कंडक्टर्'ची भुमीका घेतल्यान. फलकाचे तीन कोपरे व्यवस्थीत बांधुन झाले, आणी ऐनवेळेक फलकाचो उरलेलो चौथो कोपरो फाटलो (म्येलो रे व्हरान... जमनां नाय तर धावता कशाक?... मनातल्या मनात मी...) पण हार मानीत तर तो मल्लीनाथ कसलो?... त्येणां आपलां कसब शेवटी दाखवल्यानच... (मयूर, फोटो दाखव मा रे)... तेच्या नंतर नटलेल्या 'नटी' सोबत बहुतेकांचां सामुहीक 'फोटो-सेशन' पार पडलां. (फोटोंचे मालक मयुर आणी हिम्या). एकूण सगळी तयारी झाल्यावर आता पुढे निघाच्या साठी आम्ही गाड्येत चढं होतंव, तर गाड्येतसून देवा आणी आशूडी भायर पडले. 'रे चललात खंय?', म्हणान विचारी पर्यन्त तरा-तरा वाटेकच लागले. 'ह्येंचां काय चाळावला-बिळावला की काय?', मनातल्या मनात मी... परत थोड्या वेळान दोघंय गाड्येत येवन बसली... दोघांच्या हाताकडे लक्ष गेल्यार मग लक्षात ईलां, 'देवा'चो प्रसाद आणूक दोघंय भायर पडलेली, आणि येताना 'क्रीम-रोल'चां 'ह्यांsss येदा थोरलां' पाकीट घ्येवन ईलंली. गाडी भरल्यावर हिम्यान डायवराक पुढचे ष्टॉप सांगान दाराक कडी लावन 'डबल' मारल्यान... गाडी सुरु झाल्यावर पयली बातमी कानार ईली ती म्हणजे, त्याच दिवशी (व.वि.च्या दिवशी) साजीर्‍याचो वाढ-दिवस होतो (मेलो खरो हुषार... शेवट पर्यन्त आपलो कितवो वाढ-दिवस ह्येचो थांगपत्तो कोणाकच लागाक द्येवक नाय...). मगे गाड्येत प्रत्येकान 'आपणाक झ्येपात' इतपत साजीराचा 'अभिष्टचिंतन' करुन घ्येतलां. कोथरूड डेपो कडे गाडीत 'काशी' (हंयसर पुढे 'बाई' लिवक बोटां शिव-शिवतहत... पण नको...) आणी एका नव्या मेंबरचां गाड्येत आगमन झालां. बस पुढे 'सराकली', आणी मल्लीनाथान 'हजेरी' घ्येवक सुरुवात केल्यान. हजेरीत बहुतेकांची नावां समाजली (... आणी ह्यां लिही पर्यन्त व्हावान देखिल गेली.). त्येतूर समाजलेली दोन महत्वाची नावां - 'खिडकितसून दिसलेलो आय्.टी. चेहरो' म्हणजे 'बहु-चर्चीत रिया' आणी 'एक शांत, निरागस, चष्मो लावलेलो आणि गहन विचारात गढलेलो चेहरो...' म्हणजे 'परेश मोकाशी'... (हंयसर देखिल नावांची गडबड होण्याची शक्यता आसा... तेव्हां चु.भु.दे.घे.). हजेरी आटापता म्हणा पर्यन्त 'गाडी' हिंजवडीत येवन पोचली देखिल. या ठिकाणी गाड्येत मायबोलीवरच्या 'आंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्वा'न प्रवेश केलो - नाव केदार जोशी... मघासपासून प्रत्येक जण 'वेब-मास्तरां'क 'मी खूपच शांत, नम्र आसंय...' ह्यां कृतीतसून दाखवचो प्रयत्न करी होतो, पण केदारान गाड्येत प्रवेश केलो, आणी प्रत्येकाक 'आपलो' चेहरो' बाजूक काढूक लावल्यान. केदारान ईल्या-ईल्याच 'पुंडलीक वरदाsss' क सुरुवात केल्यान, म्हटल्या बरोबर बाकीचे मग वगी कशे र्‍हवतीत?... विशेष म्हणजे 'वेब-मास्तरां'नीच आपली 'कवच-कुंडलां' बाजूक ठ्येवन 'अजय' ह्यां साधां नाव धारण करून सगळ्यांच्यात 'सहभागी' झाले.गाड्येत धमाल सुरु झाल्लंली होती. अधुन-मधून साजीरा आणी मल्लीनाथ 'आम्ही दादा नाही, आम्ही काका नाही' दाखवचो आटोकाट प्रयत्न करी होते.
हां, हां म्हणता म्हणता गाडी महामार्गावरच्या एका पेट्रोल-पंपावर येवन थांबली. गाड्येत 'डिझेल' भरूची गरज भासली बहुतेक. आता गाडी थांबली म्हटल्यार, सगळे खाली उतारले आणी थंयच्याच 'उपाहार-गृहा'त 'चाय-कापी' प्यीवक दाखल झाले. तितक्या वेळेत 'पावसा'न देखिल आपली उपस्थीती दाखवल्यान. मधल्या वेळेत गाड्येत 'डिझेल' भरलां कि नाय?, काय कळाक नाय; पण उतारलेल्या प्रत्येकान आपला 'ईंधन' भरून घेतलेलां होतां. परत गाडी भरुन पुढचो प्रवास सुरु झालो. गाड्येत मुखशुद्धी साठी काजूवडी, अंजीरवडी, बाकरवडी, वेफर्स ह्येंची एक फेरी पार पडली. गाड्येत दादा, काका, कोंबडो, ताई, बाई, काकू, आत्या... ह्येंचो यथेच्छ 'कलकलाट' सुरु होतो. नेहमी प्रमाणे गाण्यांचे 'भेंड्ये' सुरु होते, तेच्या नियमात सोयीप्रमाणे बदल घडत जाय व्हते... एकुणात काय?, तर सगळेच बर्‍यापैकी 'ववि-मूड' मधे शिरलेले होते...
योग्य वेळेत पुणेकर 'मा.बो.'कर ववि स्थळावर पोचले. आजून मुंबयकर मंडळी पोचाकच नाय ह्यां बघून प्रत्येकाक केदो आनंद झालो... मुंबयकर येवन पोचा पर्यन्त आम्ही आमचो मोर्चा 'नाष्त्या'कडे वळवलो (नाष्त्याचो मेन्यू - इडली-सांबर, वडा-चटणी आणी पोहे...). तो पर्यन्त मुंबयकर येवन हजर झाले. आणी मगे काय?.... दे धम्माल सुरु झाली. (या धमालीचो खरो वृत्तांत मुंबयकर लिवतीत(च), फक्त पुनरावृत्ती टाळण्यासाठी, मी हंयसर लिवचंय नाय...)
प्रथे प्रमाणे, सहभागी झालेल्या प्रत्येक मायबोलीकरान 'आपली ओळख' करून दिली. काही मायबोलीकरांनी आपल्या सोबत इलेल्या मेम्बरांची देखिल ओळख करून दिली. ओळख-देख सुरु असतानाच 'सां.स.'च्या लोकांनी उपस्थीत मेंबरांचे व्यवस्थीत 'वाटे' घातल्यांनी... आणी मोर्चा धम्माल-मस्ती करुक भायर पडलो (या धमालीचो वृत्तांत आता बाकीचे मेंबर लिवतीत... इतरांक देखिल चान्स मिळाक व्हयो ना...).पाण्यात यथेच्छ धमाल, मस्ती करुन, भरपूर कुदान सगळे जेवणाक हजर झाले. एक-मेकाची थट्टा, मस्करी, टिंगल-टवाळी करीत जेवण आटापला. जेवणां आटोपता-आटोपता सौ. मेधा आपल्या घरकारी आणी पिल्ला सोबत येवन पोचली. काही वेळान 'आमचे आदर्श विद्यार्थी' आशुतोष, मनीमाऊ (दूध-भात वाली) आणी (एक) कुलकर्णी (नाव विसारलंय...)हेंच्या सोबत येवन आमका सामील झाले. मधल्या वेळेत बर्‍याच 'अनोळखी' मायबोलीकरां सोबत ओळख, चौकशी, बोलणां सुरु होताच. बर्‍याच दिवसांनी 'बाबि' देखिल भेटली. आता अनोळखी चेहर्‍यापैकी कोणी माका आपलां नाव विचारू नकात... पण प्रत्येकाचो चेहरो मी नीट लक्षात ठेवलेलो आसंय.

पुढचो धम्माल कार्यक्रम म्हणजे 'सांस्कृतीक कार्यक्रम'... पूर्णपणे 'महीला-मंडळा'न नियंत्रीत केलेलो एक सुंदर कार्यक्रम होतो. लक्षात र्‍हवलेली दोन(च) नावां - शामली आणी निंबुडा (गे बाय, अशी डोळे वटारून बघु नको. माझी जित्याची खोड आसा. खरोखर सांगतंय तुझां नाव विसारलंय...). आमच्या वाट्यात मी, बाबु, ईन्द्रा सोबत (बहुतेक) सामी, ओवी, मेधा(जोशी), ऋतुजा, रियाची बहीण होती... बाकी कोण-कोण होते त्येणी आपली नावां सांगा... मस्त मजेत कार्यक्रम सुरु असताना बाबुन माझ्या हातात दुमडलेल्या कागदाची घडी आणून दिल्यान, आणी 'मास्तर, ही जबाबदारी तुमची...' सांगान गायब झालो. कागद उघडुन बघितलय तर, ती. अण्णांनी लिवलेलां विडंबन गीत (मुळ चाल - रात्रीस खेळ चाले, या धूंद चांदण्यांचा...)... माका समजयना, 'ह्यां गाणां मी गावचां आसा?'. तो कागद बाजूक सारुन पुढचो कागद उघडलंय तर 'गार्‍हाणां' - पण एकूणच स्वरूप पूर्ण-पणे निराळां होतां. श्या:,... कायतरी गोंधळ आसा?, असां म्हणत शेवटचो कागद उघ्डलंय आणी ट्यूब पेटली - आपण लिवन पाठवलेलां गार्‍हाणां, उपस्थीत सगळ्यां समोर सादर करुचां होतां... हुश्श, जीव भांड्यात पडलो. मीच लिवलेलां 'गार्‍हाणां' सावचीतपणे दोन-चारदा वाचून काढलंय, तेच्यात योग्य जागी सुटसुटीत होतीत अशे बदल केलय. तो पर्यन्त खेळांचो भाग संपान फायनल 'निकाल' जाहिर होय व्हते. सगळेजण मस्त-पैकी धम्माल करी व्हते. करता-करता शेवटच्या 'सरप्रायज आयटेम्'ची घोषणा झाली. सुरुवात(च) 'गार्‍हाण्या'न करुची व्हती. अस्मादिकांनी सगळ्या कलाकारांक एका रांगेत ऊभे करुन गार्‍हाण्याक सुरुवात केल्यांनी - 'बा देवा म्हाराजा...' माईक शिवायचो खणखणीत-दणदणीत आवाज आयकान बारकी 'चिली-पिली' लांब पळाली, आणी 'रीसॉर्ट्'चे कर्मचारी भायर धावत ईले - काय प्रकार चल्लोहा?, तां बघुच्या साठी (रिसॉर्ट्च्या मायकान मात्र सकाळ पासून सगळ्यांकच वैताग आणलेल्यान, म्हणान मुद्दामच मी मायक न घेता, माझो नाटकाचो 'राखीव आवाज' लावलेलंय..). गार्‍हाणां व्यवस्थीत पार पडल्यावर 'सरप्रायज आयटेमा'क खर्‍या अर्थान सुरुवात झाली, आणी प्रत्येक उपस्थीत मायबोलीकरान तेचो मनसोक्त आनंद घेतलो. ('गार्‍हाणां' आणी 'सरप्रायज आयटेम' ची झलक संबंधीत दुव्या वरसून लवकरच प्रसीद्ध होयत... दुव्या कडे लक्ष ठ्येवा)... अशा रीतीन सन २०१२ चो ववि निर्विघ्न-पणे पार पडलो...

आता दोन खरे गोष्टी सांगतंय; -
१> आजुबाजूक ७-८ माणसां जरी जमली तर, मी त्येंच्यात एकटो पडतंय... ह्यो माझ्या(च) स्वभावाचो मोठो दोष. अगदी हंय पुण्यात दरवर्षी होणार्‍या 'आम्ही मालवणी संमेलना'त देखिल मी ठरावीक वेळे नंतर एकटो पडतंय. पण... यंदा ववि साठी हजेरी लावलंय, आणी जाणावलां, माझी 'एकटे पडण्या'ची सवय काल नायशी झाली...
२> उपस्थीत असलेल्यांतले काही ठराविक माबोकर सोडले तर बहुतेक माबोकर माझ्याच वयोगटाचे - किंबहुना माझ्या पेक्षा वयान बरेच ल्हान असलेले माबोकर बरेच व्हते. तेच्यामुळेच 'वविसाठी नाव-नोंदणी करु? की नको?' ह्येचो निर्णय घ्येणां जमा व्हता नाय. पण आता या क्षणाक मात्र जाणावतहा, 'घेतलेलो निर्णय बरोबरच होतो'...
या दोनय गोष्टींसाठी मी मनापासून सगळ्याच मायाबोली करांचे आभार मानतय...

परतीच्या वाटेवर मात्र 'धम्माल' करण्याचो मूड बर्‍या-पैकी कमी व्हतो, कारण जाताना आणी प्रत्यक्षात 'रीसॉर्ट्'वर केलेल्या धमाली मुळे बहुतेकजण 'गळपाटलेले' होते. तरी देखिल आमच्या गाड्येतलां वातावरण मजेशीर ठेवण्याचा काम शामली, साजीरा, स्वतः अजय आणी थोर मायबोलीकर परेश लिमये (ह्यो सकाळी मुंबयकरां सोबत वविक ईलो, आणी पुढे आमच्या सोबत पुण्यात येवन पोचलो...) ह्येणी सांभाळल्यानी. काळोख पडाक सुरुवात झाल्यावर मात्र प्रत्येकाक(च) आपल्या घराची लागलेली ओढ हळू-हळू जाणवाक लागली. पण माका मात्र वेगळीच ओढ लागलंली. तुमच्या पैकी कोण सांगाक शकात काय?... कोण्येक नाय मा?... वाटलेलाच... सगळेजण वविमय होवन गेलेलात (वार्षीक उत्सवात सामील होताना, काही गोष्टी निसाटतत, ह्येची माका देखिल कल्पना आसा...). अरे, त्याच दिवशी आपल्यातल्याच कौतूक शिरोडकर, धूंद्-रवी आणी कवठीचाफा ह्येंचां 'झी-मराठी' वर जाहीर कौतूक होवचा होतां... खरां सांगा, लक्षात ठ्येवन कोणी-कोणी त्यादिवशीचो 'डब्बा-गूल' बघितलात ???....

लै भारी वृत्तांत अभिषेकदादा आणि विवेक Happy

अधुन-मधून साजीरा आणी मल्लीनाथ 'आम्ही दादा नाही, आम्ही काका नाही' दाखवचो आटोकाट प्रयत्न करी होते.
>>>>
Lol

रच्याकने मी पाहिलं डब्बागुल
त्यासाठी पळत पळत घरी आले
त्यामुळे मला तिन्ही माबोकरांना टीव्हीवर पहाता आलं Happy
आणि मी बसमध्ये सुद्धा आठवण काढलेली Happy

आणि मनीमाऊ कोण???
कुठली मनीमाऊ होती तिकडे??
मनी आलेली?? Uhoh

.

विवेक.. खास मालवणी भाषेत वृतांत वाचताना मजा आली.. Happy
अभिषेक.. सुरुवात तर एकदम मस्त ००७ च्या स्टाईल मधे झालीये.. पुढचा भाग टाक पटकन.. Happy

विवेक लै भारी लिवलांय वृ.... अरे त्या सरप्राईज चे फोटु तरी टाका.. कुणीतरी......
रीया मनी म्हंजे.. जीने आशुडी ला उतारा दिलता (म्हंजे वाचुन दावला ती)

वा वा मास्तरानु..
मालवणीत्सून वृत्तांत सगळ्या वृत्तांतात चढ...
परेश मोकाशी इल्लो.. खय आसां खय तो? हल्ली दिसांक नाय माबोवर..

आण्णा, मुंबई-पुणे काय घेऊन बसलात... पहिली जोडपी आंतरराष्ट्रीय स्तरावरची होती. Happy

आता तो इतिहास इथे नको पण. जोडपी मारतील मला.

ए मने ऐन वेळेला येवून यंव त्यंव नाही हा करायच, चहाच्या वेळी परत ठेवला होता केक तेव्हा घ्यायचास की, तू काय वरमाय आहेस का? आं? Proud

वा वा शामले असा अन्याय का करतेस गरम गरम कांदा भजी असताना तीने केक कडे का लक्ष द्यावें बरें

मांजरानी फार केक खाउ नयेत म्याँव करताना त्रास होतो<<<<< Uhoh मला नाय बा त्रास होतं

आणि आता हा कोण बरं बोका? Uhoh

शामले चहाच्या वेळी होता? Uhoh मला नाय तो दिसला. तुला दिसला का रे आशुतोष आपण परत निघेपर्यन्त केक. बहुदा आपण तिकडे असेपर्यन्त संयोजकानी दडवुन ठेवला असणार.

शामले वरमायच असणारे हो मी [ त्या एलदुगो सारखी नै काय ,खर्रोखर्रीची] Proud ह्म्म्म अजुन फारफार वर्ष आहेत पण त्यासाठी :स्वप्नाळु बाहुली:

भज्यांच्या बाजुला केकचा रिकामा खोका नाय दिसला तुला ? लोकांनी तो खोका पण खाल्ला की काय Uhoh Wink

भजी करुन करुन अंकलचा खानसामा वैतागला असणार नक्कीच, कितीवेळा करुन आणली तरी लोक आपले खातच होते Lol

बरोबर आहे मने तुझं ......... कांदा भजी आणि केके छ्या हे का चॉइस आहेत निवडायचे.... तु योग्य ठिकाणीच म्हंजे भजांवर लक्ष ठेवलसं ......

श्यामले, शांत रहा पाहू..
आम्हाला मनी वविला गेली होती या धक्क्यातून आधी सावरू दे. तिने तिथे जाऊन आपणहून शोधून केक घेतला बितला असता तर हार्टअ‍ॅटॅकच आला असता... Wink
मने Light 1

मने उगी उगी, पुढल्या वविला एक मोठ्ठा केक तुझ्यासाठी आणू हो आपण, उगाच त्या लेकराच्या मागे नको लागुस आत्तापासून Lol

अण्णा, नी Proud

अना तशी ममी पैल्यापासुन हुश्शारच हो.

नी अग जरा दिल थामके बैठो. ह्यो माजा दुसरा ववि असा हा. Proud
पैलाबी अंकलक्डच आन दुसरा बी अम्कलकडच. Proud

मालवणी वृत्तांत मस्त जमला आहे. बाकी पण छान. मस्त धमाल आलेली दिसत्येय. Happy बच्चे कंपनी गोड आहे सगळी.

अर्रे..मने तू पण गेल्तीस??
केक नाही तर नाही..पण बाकी मजा केलीस ना?..

२१ ची रात्र आली तशी आठवण झाली - हायला उद्या वविचा दिवस. अलार्म सेट झाले असतील. बॅगा तपासल्या गेल्या असतील. लिस्टी चेक झाल्या असतील. ह्याव नी त्याव

२२ ला सक्काळ सक्काळ जाग आली. घडी मे देखा तो ६ बजे थे. म्हंटलं निघाले वविकर्स ठरलेल्या ठिकाणी वेळेत पोहोचायला

सकाळचे ७.०० - बशी निघाल्या पण असतील

सकाळचे ८.०० - आता चहापानाला ब्रेक घेतला असेल

सकाळचे १० मस्त मस्त नाश्त्यावर ताव मारत कोण कोण आलय त्यांची भेटाभेटी चालू झाली असेल

आता पाण्यात डुंबणे चालले असेल

आता काय तर सुग्रास जेवणावर आडवा हात असेल

अरेच्चा स्पर्धा सुरु झाल्या असतील की आता

ह्म्म कोण जिंकलं असेल, काय काय मज्जा केली असेल. ह्यावेळी "उत्सवमुर्ती वेमा होते ना" कोड्यात फक्त मंजुडीने ओळखलं होतं - अशा सगळ्या विचारांत आमचा दिवस संपला.

दुसर्‍या दिवशी येऊन बघावं वृ साठी, विंडो शॉपिंग सारखं विंडो ववि अनुभवावा म्हणत तर काय? पोस्टी भारंभार पण वृ तीन का चारच? ये नॉ चॉलबे. चला लिवा पटापट Happy

अर्रे..मने तू पण गेल्तीस??<<<< जल्ला माझ्या जाण्याबद्दल पब्लिकला लैच आश चर्य एवंप्रश्नचिन्ह पडलेली दिसत्यात.
मी गेले जेवले विजेत्या टीमम्धे अ‍ॅक्टीव होते आशुडीला उतारा बी दिला आणि तो इतक्या मोठ्ठ्या आवाजात दिला की आशुडीने पास केलेल्या उतार्‍यात नसलेला श्ब्दहेरे आमच्या शेवटछ्या मेंबराने सांगितला कारण अस्मादिकांच्या भल्या मोठ्ठ्या आवाजामुळे त्याला तो तिथपर्यन्त ऐकु गेला होता. मग काय जिंकलो की आम्ही Happy मग एक डेअरीमिल्क मिळालं चहा प्यायला किंचित भजी खाल्ली आणि जड अंतःकरणाने परत निघालो.

जल्ला मी पण किंचित वृत्तात लिवलाच की. Wink

कवडे तुझ्यासाठी लिवला बघ किंचित वॄत्तांत.

छान छान ...आवडले सगळ्य़ांचे ववि वर्णन .....झक्कास लिहिलेय....
मी आले असते तर बरे झाले असते...ह्म्म..पुढच्या वेळी....

Pages