ववि२०१२-वृत्तांत

Submitted by ववि_संयोजक on 23 July, 2012 - 02:48

मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.

विषय: 

अजून कुणी पाहिली नसल्यास...
आनंदसुजु तात्यांच्या पीटीच्या तासाची ही दृकश्राव्य झलक!
कृपया आधी आपल्या स्पीकरचा आवाज एकदम कमी ठेवावा...नाहीतर कान फाटतील.

http://www.youtube.com/watch?v=TfXvZ-jHe0E&feature=plcp

मनी.. हे काय.. नि तेकाय.. नीट लिही ना वृतांत..आळशी कुठची.. Happy
अगा मला माहीत अस्तं तर फोनलं असतं नं मी तुला..

कविन same here..:)
रविवारी सकाळी जाग आली ती ०६:३० वा. भरभर morning law आटोपुन ०७:०० ते ०७:१५ खिडकीत येऊन बसलो. आणि कुठलीही पिकनीकची बस दिसली की हि आपल्या माबोची तर नसेल असे वाटुन तिच्याकडे बघत असे..:)
मास्तरांनु एकदम झकास लिवल्यात..:)

सगळे वृत्तांत छान आहेत.
विवेक देसाई यांचा मालवणीतला वृत्तांत विशेष उल्लेखनीय.
देसाई मास्तर..... बाजी मारलीत !

संध्याकाळी भजी आणि चहाच्या टेबलावरच
केकचे तुकडे कापून ठेवलेला बॉक्स होता.
भज्यांच्या नादात बर्‍याच जणांचं केककडे लक्ष गेलं नसावं.
भजी, चहा घ्यायच्या लायनीत माझा नंबर खूप मागे असून देखील
मला केक मिळाला.
केककडे ज्यांचं लक्ष गेलं नाही त्यांना धन्यवाद...... Proud

ओ मनुताई, फोटो अजून कोणीच कोणाला पाठवले नाहियेत. एकदा सगळ्यांच फोटो जाहीर प्रकाशित करण्याबद्दलच मत आलं की इथेच बघायला मिळतील. तू दिलस का तुझं मत?

अरे जिप्स्या................................... अरे घात केलास ना ......... वविची तारीख माहिती असताना तु बाहेर भटकण्याचा प्लॅन केलासच कसा?..... अरे वाया घालवलास ना हा ववि.. Proud

अभीशेख मस्त रहस्यमय वृतांत ..इथेपण क्रमश: ? उत्सुकता वाढलीय ...बायको वाचतेय ना रे ?

देसायानू कसलो धमाल वृतांत लिहिलास. खयचे देसाई तुम्ही? तुमचो ववीचो गाऱ्हाणो ऐकून गावच्या उत्सवाची आठवण इली आमका.

काल ववि२०१२ वृत्तांताचा बाफ उघडलेला बघितला आणि लाईट गेले (जळ्ळं मेलं लक्षण!) Sad ते दिवसभर काही आलेच नाहीत.. आज सकाळी एक्दाची मायबोली उघडली आणि वविवृ चा बाफ पाहिला तर प्रतिसादाचा आकडा १५५??? म्हटलं, "एवढे पेटले वविकर काही तासात?" Proud असो.

पहिलटकरीण रीयाचा वृ छान...... आशूडीबद्दल काय बोलायचं, मस्तच लिहिते ती, आणि तेवढाच दंगा पण घालते. विवेक, मालवणी वृत्तांत लयच आवडला. अभिषेक, हे असं इथे क्रमशः लिहायचं नाही हा, वविदिवशी एक्दम गुपचुप बसला होतास ते तुझी 'ती' भेटली म्हणून की नाहीच दिसली शेवटपर्यंत म्हणून?

हा वृत्तांत नव्हे. कार्यक्रमावरचा अभिप्राय आहे.
(ववि नोंदणीच्या धाग्यावरचा पोस्ट इथे रिपीट करतो आहे.)

ववि खूपच मस्त झाला. सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे ठरल्यावेळी झाले.
नेटकं संयोजन......... संयोजकांचं अभिनंदन.

नाच, गाणी, मौज-मजा-मस्ती, पाण्यातले खेळ अगदी दणक्यात झाले.

Webmaster आणि Management-team सदस्य (साजिरा)
सर्वसामान्य सदस्यांप्रमाणे वावरत होते.
सर्व कार्यक्रमांत सहभागी झाले होते.

सगळ्यात आवडेली गोष्ट :
वविचं वातावरण अगदी स्वच्छ, निखळ, सुदृढ होतं.

थोडक्यात,
'मी', 'आम्ही' ला कुणाच्याही मनात थारा नव्हता.
'आपण' मायबोलीकर, 'आपली मायबोली',
ही भावना प्रत्येकाच्या कृतीतून व्यक्त होत होती.

मी मनापासून एन्जॉय केला ववि.

पण, पावसाने मात्र हा ववि मिस केला.
कदाचित हा कार्यक्रम वरून पाहताना तो इतका दंग झाला असावा
की त्या नादात पडायचंच विसरला........ Happy

पण, पावसाने मात्र हा ववि मिस केला.
कदाचित हा कार्यक्रम वरून पाहताना तो इतका दंग झाला असावा
की त्या नादात पडायचंच विसरला.......>>>>>क्या बात है भिडे काका Happy

एकदम धम्माल वृ लिहिलेत सगळ्यांनी! Happy मंजिरी, तुला आत्या का म्हणतात ते मलाही ऐकायचे आहे!
बाकी मुंबई बस मधला कल्ला निव्वळ 'शब्दातीत' होता!!!...... त्याचा वृ लिहिण्याचे काम एका तितक्याच अफलातून व्यक्तीने हाती घेतल्याचे कळलेय! वाट पहा लोक्स!!! Happy अजून थोडी कळ काढा!!

>>'ह्येंचां काय चाळावला-बिळावला की काय?>>> Lol मास्तर ए वन वृ. Happy

बाकी सगळ्यांचे ववि वृ पण आवडले. मस्तच लिहलय Happy

घारूण्णा घाईघाईत टाईपले म्हणून मिष्टेक. ऑफिस मध्ये खूप काम आहे पन राहवत नाही म्हणून मधून मधून येऊन बघतेय. वृतांत लिहायचा आहे...

मास्तरांनू... मालवणी वृत्तांत धम्माल लिहिलाय... मजा आली वाचताना.
अभीषेक... सुरवात छान झालीयं... मात्र आमचा अंत पाहू नकोस.

भिडे काका, सामी, ओवी, वर्षा, मुग्धानन्द, राखी... तुमच्या कडून ववि वृत्तांत यायलाच पाहिजेत.

@सामी,
अभिशेख... Angry .. नामांतर करताना धर्मांतर होणार नाही याची तरी काळजी घ्यायचीस.. Sad
आणि हो, बायको वाचतेय.. १-२ नावेही घेऊन झाली.. Proud

@कविन,
नाही ग्ग.. जगातील सगळ्यांनी ओळखले तरी माझी बायको काही ओळखत नाही बघ.. बायकांचा संशयी स्वभाव हा नेहमीच त्यांच्या सारासार विचारशक्तीवर मात करतो हा इतिहास आहे.. Happy

@मंजिरी,
गुपचूप बसायचे कारणही वृत्तांतातच देतो ग्ग बाई.. Happy

>>>>>>>>>>>>>

मालवणी वृत्तांत जबरदस्त... आता एखादा आगरी वृत्तांतही येऊ द्या.. Happy

Pages