Submitted by ववि_संयोजक on 23 July, 2012 - 02:48
मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.
विषय:
Groups audience:
शेअर करा
मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.
केक खाल्ला तेंव्हा त्यावर
केक खाल्ला तेंव्हा त्यावर आईसिंग नव्ह्तं..>> रिया ,ती संयोजकांनी केलेली जादू होती.:) फक्त केक कापताना आईसिंग खायला देताना गायब
बाकी रिया आणि आशु वृत्तांत जबरी...
रिया आणि आशु वृत्तांत छान
रिया आणि आशु वृत्तांत छान गं...
रिया, आशु दोघींचेही वृत्तांत
रिया, आशु दोघींचेही वृत्तांत मस्त!!!
सॉल्लिड धमाल केलेली दिसत्येय
संगित वस्त्रहरण युट्युब लिंक मला पण, मला पण
उपस्थित बाळ गोपाळांनी सगळे
उपस्थित बाळ गोपाळांनी सगळे आयसिंग खाल्ल्यामुळे उरलेल्यांना फक्त साधा केकच मिळाला...
यंदाच्या वविला बाळगोपाळांची प्रचंड उपस्थिती होती...
रिया , आशुडी मस्त वृत्तांत
रिया , आशुडी मस्त वृत्तांत !!!
ऋताला काल विचारले तर म्हणे आपण तिथे रोज जायचे का? आज म्हणाली,आज पण जाऊ . तु मला काल पाण्यात खेळुच नाही दिलेस.
आस
आस
हिम्सची मुलगी त्याला
हिम्सची मुलगी त्याला हिम्याकाका म्हणत होती
हो अजून जरा वेळानी ए हिम्या
हो अजून जरा वेळानी ए हिम्या म्हणून हाक मारली असती आरोहीनी
फारच गोड बाळ आहे, आईला सोडून आली होती घरीच, पण एकदाही सूर लावला नाही, मस्त कल्ला चालू होता तिचा.
रीया वृ फारच बेफिकिरीने
रीया
वृ फारच बेफिकिरीने लिहीला आहेस. थोडा वाढव अजून ..
(No subject)
अरे वा! बरीच धमाला केलेली
अरे वा!
बरीच धमाला केलेली दिसतेय!
पण केवळ दोनच 'ववि'स्तर वृतान्त? मुंबईकर तुमचे पण येऊ द्यात!
किरण काय वाढवणार अजुन त्यात
किरण

काय वाढवणार अजुन त्यात
दोन्ही वृत्तांत मस्त आहेत!
दोन्ही वृत्तांत मस्त आहेत!
मला फोटो टाकायचा मोह अजिबातच
मला फोटो टाकायचा मोह अजिबातच आवरत नाहीये...
हा आता माबोचा अधिकृत दिवा...
शाब्बास हिम्या, मागे वेमाच
शाब्बास हिम्या, मागे वेमाच आहेत की टाक, बिन्धास्त
शाब्बास हिम्या, मागे वेमाच
शाब्बास हिम्या, मागे वेमाच आहेत की टाक >>> श्यामली वेमांना अगदी किरकोळ समजते आहे..
धमाल केलेली दिसत्ये सगळ्यांनी..
श्यामली वेमांना अगदी किरकोळ
श्यामली वेमांना अगदी किरकोळ समजते आहे..>> पराग,ते वाक्य श्यामलीने वेमांना किरकोळ समजुन नव्हे तर वेमांनी त्यांचे फोटो बिनधास्त टाकायला परवानगी दिलेली असल्याने लिहिलेले आहे बरे
वृत्तांत इतके कमी? आधीच्या
वृत्तांत इतके कमी? आधीच्या वर्षींचे संदर्भ बघितले नाहीत का? विशेषतः म्हैस राइड वाल्या वविचे
रिया, चांगलं लिहिलंस पोरी. तुझ्या बहिणीला आशूच्या लग्न झालेलं असण्याबद्दल का शंका आहे? तिला बालविवाहाची प्रथा माहित नाही का?


आशू
मीनू नव्हती. हे एक बरं झालं. जे मिसलं त्याची जळजळ किंचित कमी
केक मिसल्याची जळजळ मात्र वाढलीये.
पहिल्या वविकरांची कणभर तरी आठवण काढलीत की नाही?
मया त्याही पलिकडे जाऊन,
मया त्याही पलिकडे जाऊन, वेमांबद्दलचा विश्वास आहे तो
रिया व आशुडी, दोघींचेही
रिया व आशुडी, दोघींचेही वृत्तांत मस्त आहेत
हंडाभर ववितला पळीभरतरी अनुभवता आला यात देखिल मी खुश आहे.
पहिल्या वविकरांची कणभर तरी
पहिल्या वविकरांची कणभर तरी आठवण काढलीत की नाही?...>> नी,वेमांनी विचारलं होतं पहिल्या वविला कोण होतं?तेव्हा फक्त मला हात वर करता आला बघ..:) आणि तुझी आठवण येऊन मला भरुन आलं बघ .
केक मिसल्याची जळजळ मात्र वाढलीये...>> फक्त केक नव्हे वेमांनी आणलेली मस्त मस्त चॉकलेट्स पण
आशुडीचा वृत्तांत आत्ता वाचला!
आशुडीचा वृत्तांत आत्ता वाचला! एकदम खुसखुशीत!
मस्त वृत्तांत दोन्ही पण
मस्त वृत्तांत दोन्ही पण
झकास आहेत दोन्ही ववि
झकास आहेत दोन्ही ववि वृत्तांत!
अरे वा, मजा केलीय की
अरे वा, मजा केलीय की सगळ्यांनी. रिया, आशुडी मस्त लिहिलय
पुढच्या ववि ला नक्की जमवणार.
अर्थात सगळ्याच वविंची वर्णनं वाचून जळायला होतच. मी दरवेळेस चुकतेय
अर्र्र चॉकलेट्स .................
तुझी आठवण येऊन मला भरुन आलं
तुझी आठवण येऊन मला भरुन आलं बघ<<< क्षणभर कल्पना करून मलाही गहिवरून वगैरे येईल यावर
रिया, आशुडी मस्त वृत्तांत.
रिया, आशुडी मस्त वृत्तांत.
(भा. सं. ल. ठे!) = भारतीय संस्कृतीचा लक्षणीय ठेवा म्हणूनही वापरता येईल - विशेषतः वविसंदर्भात.

रिया मस्त लिहलेयस गं..
रिया मस्त लिहलेयस गं..:)
रिया मस्त वृतांत आशुडीचा
रिया मस्त वृतांत
आशुडीचा अजून वाचला नाही
ववि वृत्तांत.. थेट दिल से..
ववि वृत्तांत.. थेट दिल से.. !!
मायबोलीवर येऊन तीन महिनेही झाले नव्हते जो हे वर्षाविहार प्रकरण उपटले.. शॉर्टफॉर्म करायचा झाला तर ववि... काय पण एकेक.. आधीच माबो, बाफ, असल्या कधीही न ऐकलेल्या शॉर्टफॉर्मचा एकेक करून अर्थ लागत होता त्यात आणखी एकाची भर, एवढेच काय ते पहिल्यांदा वाटले.. पण वर्षूदीने एकदा मेल वर याबाबत सविस्तर सांगितले आणि समजले, अरे ही तर पावसाळी सहल.. तसा मी मुळातच पावसाळी कबूतर असल्याने असा मौका सोडणार्यातील नव्हतो.. पण तिथे जाऊन करायचे काय.. ना कोण ओळखीचे ना पाळखीचे.. आता आता कुठे चार आयडींची नावे ओळखू लागलो होतो.. त्यातील काही जणांचे आयडीमागील चेहरे दिसू लागले होते.. त्या चेहर्यांमागील व्यक्ती समजू लागल्या होत्या.. पण त्यातही एखादा आयडी मात्र... असो..
.... जावे की न जावे हा निर्णय होत नव्हता.. आदल्या वर्षीची धमाल एकदा नजरेखालून घालावी म्हणून जुन्या वृत्तांताच्या लिंक मागवल्या.. वाचून, बघून बरे वाटले.. मनाने तेव्हाच मी त्या रीसॉर्टला पोहोचलो.. पण अजूनही ती येते की नाही.. आपल्याला तिथे ती भेटेल की नाही यावर माझे जाणे न जाणे अवलंबून होते..
कोण कोण येणार आहे याची लिस्ट लागली होती.. त्यातही तिचे नाव कुठे नव्हते.. असणे अपेक्षितही नव्हते.. पैसे भरायची मुदत संपायला काहीच दिवस शिल्लक होते... माझे जाणे कॅन्सलच झाल्यात जमा होते.. आणि अचानक.. एके दिवशी खबर लागली की ती येणार आहे.. मुंबईहूनच.. आमच्या बरोबरच.. जर ती पुण्याहून येणार असती तर मी पुण्यालाही गेलो असतो.. फक्त तिच्यासाठीच.. पण नशीब तर बघा.. ती मुंबईहूनच येणार होती.. एवढेच नाही तर आठवडाभर आधी शिवाजी पार्कातही भेटणार होती..
पण दुसर्याच क्षणी बायको आठवली.. ती बरोबर असताना आमची मनासारखी भेट होऊ शकली नसती.. तिने आम्हाला कधीही एकत्र येऊ दिले नसते.. दूरवरून तिला डोळे भरून पाहण्यात समाधान मानावे लागले असते.. आणि हेच बहुधा माझ्या नशीबात होते.. बायकोला वरवरच विचारले.. येतेस का ग..!!
का? कुठे? कधी? यावेळी मात्र एकही प्रश्न न विचारता तयार झाली.. एवढेच नाही तर पैसे भरायला म्हणून शिवाजीपार्कात जे गेट-टू-गेदर होणार होते त्यालाही यायचेय असा हट्ट धरून बसली.. निदान तिथे तरी तिला बायकोच्या गैरहजेरीत मनसोक्त भेटता यावे म्हणून मुद्दामच ऑनलाईन पैसे भरायचा साधासोपा मार्ग नेटबॅंकींगचा पासवर्ड विसरलो या बहाण्याने टाळला होता.. पण..... असो...
माझी ववि १५ तारखेपासूनच सुरू होणार होती.. पार्कातल्या आमच्या भेटीपासून..!!
पण बायकोने मात्र माझ्या मनातले ओळखून माझा एकूण एक डाव हाणून पाडायचा नुसता चंग बांधलेला दिसत होता.. उशीरा उठण्यापासून, नाश्ता, जेवण निघायची तयारी, सार्यात उशीरच केला.. परीणामी पार्कात पोहोचायलाही उशीरच झाला... इथे तिथे दूरवर नजर भिरभिरली.. ना ती होती ना तिच्यासारखे दुसरे कोणी... सहज म्हणून चौकशी केली असता समजले की ती येऊन गेली.. हाह..!! जिच्यासाठी आलो तीच मी येण्याआधीच निघून गेली.. तेव्हा मला पहिल्यांदा जाणवले की ही ववि मी इतर कोणासाठी नाही तर फक्त तिच्या भेटीच्या ओढीपायी जात होतो.. पार्कातना घरी कोरडे मन घेऊन परतताना एकच दिलासा होता, या रविवारी नाही तर पुढच्या रविवारी..... पुढच्या रविवारी तरी ती मला नक्की भेटणार होती..
आता मला खर्या अर्थाने वविचे वेध लागले होते...
क्रमश:
Pages