मायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by केदार जाधव on 18 July, 2012 - 06:06

हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .

http://www.pottermore.com
या साईट बद्दल .

जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक Happy
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल Happy

आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला Happy

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पेल करताना फक्त किबोर्ड वापरायचा की माउस सुद्धा
उदा. U ........... D ................A .............Y हे शब्द आहेत तर U वर माउस ने एकदा क्लिक केल्यावर मग किबोर्ड चे U चे बटन दाबायचे का .....असे प्रत्येक् शब्दा वर करायचे का

उदयन ,
फक्त माऊसने करता येते .
U वर माउस ने एकदा क्लिक केल्यावर परत तिथेच माउस नेच क्लिक करायचे .असे प्रत्येक् शब्दा वर करायचे .

किबोर्ड पण वापरता येतो... पहिल्यांदा बटण दाबल्यावर एक गोल तयार होतो.. तो मोठ्ठा असतानाच दुसर्‍यांदा तेच बटण दाबायचे... मग लगेच पुढचे बटण असे करत एक एक करत सगळी बटण दाबायची..

रितेशद१३ ,
आपण स्टेप्स करू :
१ .पहिल्या word ला माऊसने क्लिक कर .
२ .त्यावर circles येऊ लागतील . ती MAX circle असताना परत माऊसने क्लिक कर (लहान असताना क्लिक झाले तरी चालेल फक्त स्पेलची पोटन्सी कमी होईल)
३ .मग एक रेष पुढच्या word ला जाईल .
४ , ती साधारण त्या word वर असताना click कर .
५. परत circle आले की MAX circle असताना click कर .
६. अस शेवटच्या word पर्यंत कर .

चॅप्टर १५ मधे
Harry Becomes an Outcast
लायब्ररी मधे
१) A Beginner's Guide to Transfiguration
२) One Thousand Magical Herbs and Fungi
३) The Dark Forces: A Guide to Self-Protection
हे तीन पुस्तके शोधायची असतात.................पहिली दोन मिळाली.......... ३ रे पुस्तक कुठे मिळेल ?

नंदिनी,
gnomes फेकण्यासाठी त्यावर click करून धरून ठेव , मग त्यान्चा गोल गोल फिरायचा वेग वाढला की उजव्या बाजूच्या झाडीवरून बाहेर पडतील अशा angle ने फेक (click सोड)

नाही...............मी प्रत्येक चॅप्टर मधे जाउन ते गोल्डन कॉइन्स शोधत बसलोय Happy प्रत्येक भागात एक दोन तरी मिळतातच..तसेच बीन्स चे पण पैसे मिळतात Happy

छान

Antidote for common poisons जमलं बरं का. आत्ता गडबडीत आहे. जरावेळाने पोकृ लिहिते.

रुणझुण, सही! त्या बाटलीतल्या नेमक्या दोन बेर्‍या पाडणं, जरा औघड आहे. एकणच बाटलीतल्या जिनसा लय सतावतात. द्रव असतील तर फजिती होते.

माझ्या कडचे पैसे वाढलेत ७५० गॅलन्स>>>>>>>>>> @ उदयन, गॅलन्स जास्त झाले असतील तर त्यापैकी काही गिफ्ट कर, त्याने तुझा टॅक्स वाचेल biggrin.gif

हे तीन पुस्तके शोधायची असतात..<< हे कसे कळले?

माझ्याकडे विस्मृतीकारक काढा (:फिदी:) सिद्ध आहे. (घसघशीत नऊ गुण मिळाले.)

मला मदत पाहीजे. कस सुरु करायच कळ्त नाहीये. आयपॅड वर वेगळ काही करायचय का? >>

धनश्री, आयपॅडवर वेगळं काही करावं लागेल असं वाटत नाही.
कुठल्या स्टेपला अडकला आहात ?

माझ्याकडनं काही दार उघडत नाहीये.>> Lol श्रद्धा, उघडलं की नाही दार अजून ?

इथली काही स्थळं पुस्तक वाचताना जशी मनात कल्पिली होती, अगदी तशीच बघून छान वाटतं..>> +१

पीसी हँग होत असल्याने अजून स्पेल्सचा सराव केला नाही.
पण पोकृ मात्र जोरात आहेत.
Antidote for common poisons दोनदा बनवलं. सध्या Sleeping Draught उकळंतय.
मगाशीच लेकासोबत एक कढई फोडून झाली आणि त्याचे ५ पॉइंटस पण कटले Lol

:हाफ ब्लड प्रिन्स मोड ऑनः

पोकृ क्र - २ : Antidote for common poisons :

१. खलबत्त्यात एक Bezoar (शेळीच्या स्टमकमधील दगड ) टाका.
(पहिला प्रयोग फसल्यावर परत हॉस्पिटल विंगमध्ये जावून शे स्ट द मिळवता येतो. मी उगीच अ‍ॅपोथेकरीमध्ये जाऊन १० गॅलियन्स खर्चून आले :()

२. वस्त्रगाळ चूर्ण होईपर्यंत बत्त्याने कुटा. हिरवा रंग (चूर्णाचा नव्हे) आल्यावर कुटाकुटी लगेच थांबवा.

३. चार चमचे चूर्ण कढईत टाका.

४. ह्यातच दोन चमचे प्रमाण-घटक (Standard ingredients) टाका.

५. पाच सेकंद मध्यम आचेवर उकळू द्या.
(सुरूवातीला लाल बटन दाबा. तापमापीवर हिरवा रंग आला की पटकन मधलं बटन दाबून धग कमी करा. टायमर गेल्यावर लग्गेच शेगडी बंद करा.)

६. जादुई छडी फिरवा.

७. मा बो ये च पि ( ह्याच्या अर्थासाठी ह्याच धाग्याचे पान - १, पोकृ क्र-१, मुद्दा - ६ पहा)

उत्तरार्ध :

८. युनिकॉर्नच्या शिंगाचा एक तुकडा कढईतईल मिश्रणात टाका.

९. घड्याळाच्या दिशेने दोन वेळा ढवळा (पळीने...छडीने नव्हे. चिमुरीसाठी वि सू)

१०. आता अगदी अलगद हाताने ह्या मिश्रणात दोनच मिसलटो बेरीज् टाका.
(दोनपेक्षा जास्त पडल्या तर थु फो उत्तरासाठी तयार रहा.)

११. आता घड्याळाच्या उलट दिशेने दोन वेळा ढवळा. (चिमुरीसाठीची वि सू इथेही लागू)

१२. आता जादुई छडी फिरवा.

ढॅणटॅडँग....१२ स्टेप्समध्ये सगळ्या विषांवरील उतारा तय्यार !

(रेस्पी चुकल्यास मिसलटो बेरीज् खरेदी करू नका. लई महाग आहेत. २० गॅलियन्स. ख्रिसमस पार्टीमध्ये जा तिथे चकटफू मिळतील.)

पहिला प्रयोग फसल्यावर परत हॉस्पिटल विंगमध्ये जावून शे स्ट द मिळवता येतो. मी उगीच अ‍ॅपोथेकरीमध्ये जाऊन १० गॅलियन्स खर्चून आले <<< म्या कितीदा तरी खर्चिल्या. अशा काही टिपा आणि हाफ ब्लड प्रिन्स झिंदाबाद!

Pages