मायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by केदार जाधव on 18 July, 2012 - 06:06

हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .

http://www.pottermore.com
या साईट बद्दल .

जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक Happy
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल Happy

आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला Happy

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुणू, तू हॉगवर्ट्सची कमलाबाई ओगले आहेस. Proud

मी अजून स्पेल प्र्याक्टीस पुढे केली नाही. त्यामुळे दरवाजा नाही उघडला. आज रात्री वगैरे करेन.

मी अजून स्पेल प्र्याक्टीस पुढे केली नाही. त्यामुळे दरवाजा नाही उघडला.>>>> हे कुठे आहे? मला कसं नाही कुठे दिसलं हे?? Sad

रुणू, तू हॉगवर्ट्सची कमलाबाई ओगले आहेस.>>>>> कमलाबाई ओगले कोण आहेत?? रुणुझुणु हाफ ब्लड प्रिन्सेस आहे Wink

<< अगं त्या 'रुचिरा' लिहिणार्‍या.>>> हां आठवल्या Happy

तांब्याचं कोल्ड्रन असेल तर (जरा महाग आहे, पण) वेळ कमी लागतो.>>>>>> कशाला वेळ कमी लाग्तो?? मधला तो शिजायचा वेळ का?

श्रद्धा Proud
चिमुरी Blush
मी झोपेचं औषध तांब्याच्या कढईतच टाकलंय उकळायला. पुढचा भाग नीट जमला तर पोकृ क्र -३ टाकेन.

पोकृ क्र -३ >>>> अ‍ॅडमिन यांना हॅपॉ गॄप बनवायला सांगा रे.. या प्रतिसादांतुन पाकॄ शोधताना नंतर त्रास होणार.. वेगळा गॄप काढला की प्रत्येक पाकॄ चे वेगळे धागे काढता येतील..

पुढचे भाग कधी ओपन होणार??? Sad

माझं जागं रहायचं औषध (Wideye or Awakening Potion) शिजायला लागलंय, रुणझुण. Proud
झोपेच्या औषधासाठी लागणारे लव्हंडर कुठून आणले? मी शोधून थकलो. अ‍ॅलीतही मिळाले नाही. मग त्याचा नाद सोडला.

चिमुरी, होय शिजायला कमी वेळ लागेल.

रुणू, अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर हॉगवार्ट्सच्याच हॉस्पिटल विंगमध्ये जॉइन होणार का? Proud

चिमुरी, होय शिजायला कमी वेळ लागेल.>>>>>> ओक्के..

रुणू, अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर हॉगवार्ट्सच्याच हॉस्पिटल विंगमध्ये जॉइन होणार का?>>>>> नको गं.. ती पोशन्स शिकवायला लागेल हॉगवर्ट्स मधे.. हॉस्पिटल मधे नको.. Wink

बर आता बाकीच्या पोशन्स ची प्रॅक्टिस कुठे करायची?? माझ्या इथे जर बाकीच्या पोशन्स च्या इथे गेलं की प्रॅक्टिस करता काही ऑप्शन दिसतच नाहिये..

हॅपॉ ग्रुप व्हायलाच पायजे....अ‍ॅडमिनकडे जाऊन असे नारे देऊया का ? Proud

श्रद्धा......नहीं (दोन्ही हात कानावर ठेवलेत अशी कल्पना कर)
मी पोशनमास्टर होणार ब्वॉ.

युनोहू, सगळं नाही मिळत व्हॅलीमध्ये. जरा खर्चा की गॅलियन्स.
चिमुरीबै, सगळ्याची नाही प्रॅक्टिस. डायरेक्ट उकळायला घ्यायचं.

अ‍ॅडमिनकडे जाऊन असे नारे देऊया का ?>>>>>> मी सांगितलय काल.. बघु काय होतं ते.. Happy

सगळं नाही मिळत व्हॅलीमध्ये.>>>>>> वॅली कुठय आता? पत्ता द्या..

चिमुरीबै, सगळ्याची नाही प्रॅक्टिस. डायरेक्ट उकळायला घ्यायचं.>>>>>> ओक्के.. मग आता तुझी उकळुन झालेलीच घेइन करायला Happy

रुणुझुणु थॅन्क्स फॉर पोशन्स Happy

जरा खर्चा की गॅलियन्स <<< दुकानातही दिसत नव्हते. पुन्हा चेक करतो. सकाळी सापाच्या नांग्या दिसत होत्या पण 'Buy' करता येत नव्हत्या. नंतर करता आल्या. मग जास्तीच्या घेऊन ठेवल्या!

युssहुsss .....झोपेचं औषध झालं उकळून.११ हाउस पॉइंटस पटकावले.
आता जरा मगल्सच्या जगातील जेवण उरकून घेते आणि मग पोकृ लिहिते Proud
चिमुरी, तुला एक पोशन पाठवलंय बघ गिफ्ट म्हणून.

चिमुरी, तुला एक पोशन पाठवलंय बघ गिफ्ट म्हणून.>>>> तु एकच पोशन दोनदा पाठवलं आहेस गिफ्ट Happy त्याकरताच वर थॅन्क्स म्हणाले Happy

मी अजून स्पेल प्र्याक्टीस पुढे केली नाही. त्यामुळे दरवाजा नाही उघडला.>>>> हे कुठे आहे? मला कसं नाही कुठे दिसलं हे?? <<< नववा धडा. The forbidden corridor.

माझंही निद्रानाशाचं औषध जमलं यशस्वीरित्या.

युssहुsss .....झोपेचं औषध झालं उकळून.११ हाउस पॉइंटस पटकावले. <<< उत्तरार्धात शेवटची छडी फिरवून झाल्यावर हिरवा धूर निघाला नाही म्हणजे जीव कोल्ड्रन मध्ये... आपलं... भांड्यात पडतो नै.

लव्हंडर मिळालं. धन्यवाद. झोपेचं औषध करायला घेतलं. पहिल्या प्रयत्नात कढई फुटली. (तांब्याची होती हो. सुबक ठोक्यांची...) आता साध्यातच उकळवतोय. ७० मिनिटं!

चिमुरी, हो, ते पण कळतं. आपण पोशन निवडलं आणि कोल्डन निवडल्यावर (पोशनच्या बाटलीच्या चित्राशेजारी ) त्याचा लागणारा वेळ येतो. तिथे आपण पुढे जायचे का ते ठरवू शकतो.

ओक्के.. धन्स युनोहु.. Happy तुमची मदत करायची तत्परता बघुन खर्‍या युनोहु बद्दल वाटणारी चीड कमी होतेय की काय अशी भिती वाटायला लागली आहे Wink

मी अजून स्पेल प्र्याक्टीस पुढे केली नाही. त्यामुळे दरवाजा नाही उघडला. आज रात्री वगैरे करेन.
>> श्रद्धा , दरवाजा उघडण्यासाठी स्पेल फार चांगला असण्याची गरज नाही . त्या प्रत्येक अक्षरावर २दा ओळिने क्लिक केलस तर उघडेल दरवाजा . म्हणजे तुला पुढे जाता येइल . स्पेल पोटन्सी नंतर सराव करून वाढवता येइल .

केदार, हो. उघडला मघाशीच दरवाजा. कुत्रा पाहून आले.

हर्मायनीने सोडवलेलं पोशनचं कोडं मीपण आज सोडवलं. वा वा! मला पॉइंट्सही मिळाले. (पण तिच्याइतके दहा नाही. Sad ह्यो अन्याव हाय.)

उत्तरार्धात शेवटची छडी फिरवून झाल्यावर हिरवा धूर निघाला नाही म्हणजे जीव कोल्ड्रन मध्ये... आपलं... भांड्यात पडतो नै. >> हो हो अगदी Lol

माझं झोपेचं औषध झकास जमलं, पण जागं राह्यचं पोशन काही जमेना. वो कलमुहां हरा धुआं निकल आया Angry
डार्क लॉर्ड, जरा रेस्पी टाका की.

परत बघतेच आता.
श्रद्धा, कुत्र्याची लाळ पण पाहिलीस ना Lol

रुणुझुणू, जागं राह्यचं पोशन -

पूर्वार्ध :

१. सापाच्या ६ नांग्या (दोन मात्रा) खलबत्त्यात घ्या
२. त्यात प्रमाणित जिन्नसांच्या ४ मात्रा टाका (खलबत्त्यात)
३. कढईत ६ सुक्या billywig stings घ्या
४. ३० सेकंद मध्यम आचेवर गरम करा
५. खलबत्त्यात घेतलेल्या जिनसा वस्त्रगाळ बारीक करा
६. या वस्त्रगाळ पुडीच्या ४ मात्रा कढईत टाका
७. घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने काढा तीनदा ढवळा
८. जादुई मंत्र पुटपुटत काढ्यावरून छडी फिरवा
९. जरा स्पेलींगची लढाई करून या. ( किंवा काय हवं ते करा)

उत्तरार्ध :

( हिस्स फिस्स फुस्स्स फुस! ( ...उफ्फ... पार्सल्टंग... सॉरी....) म्हणजे - हे लई सोप्पं हाय. Proud )
१. sprigs of wolfsbane च्या दोन मात्रा कढईत टाका
२. प्रतिघटीवत (घ. का. च्या उ. ) दिशेने ३ दा ढवळा
३. जादुई मंत्र पुटपुटत काढ्यावरून छडी फिरवा

बेस्ट लक!

श्रद्धा, ग्रेट. इथं बाटल्यांचे आकार समोर दिसत असल्यामुळे ते कोडं (फक्त पुस्तक वाचून समजून घेण्याच्या तुलनेत) त्यातल्या त्यात सोपं पडतं ना?

माझं हर्बीसाईड पोशन झालं. यात तीन तीन बाटल्या उचलून नेमक्या मात्रा घालायच्या होत्या.. लई तंगवलं. पोशनपुस्तकातली त्या दोन पानांवरची सगळी करून झाली. या वर्षी सहाच पोशनं आहेत का?

Pages