मायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by केदार जाधव on 18 July, 2012 - 06:06

हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .

http://www.pottermore.com
या साईट बद्दल .

जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक Happy
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल Happy

आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला Happy

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी इतकं काय काय कलेक्ट करतीय!! तरी माझे ७ च पॉईंट्स! Sad
कळतंय कळतंय म्हणेस्तोवर काही कळेना होतंय इथे!! Uhoh
जाऊदे कर्म(पोशन्,स्पेल्स) करत राहावेत. फळ काय येईल ते येईल!

PatronusSword30778
SparksDragon21329
MoonstoneQuest1741
हे तिघे कोण आहेत ?

PhoenixDragon16513 हा माझ्या लेकाचा आयडी आहे. फ्रे रि आली तर स्वीकारा रे . पिलू जामच एक्साइट झालंय Lol

युनोहू ह प मध्ये.....अरे देवा Proud

PhoenixDragon16513 हा माझ्या लेकाचा आयडी आहे<<<<<<<< विद्यार्थ्यांसोबत गार्डीयन्स अलावूड आहेत का?

माझं अँटिडॉट टू कॉमन शिजत आहे. ४० मिनिटं लागतील. तोवर जरा स्पेल्स बघावं म्हणत होतो. ते लईच अवघड काम.. २३-२४ च्या पुढे पाईंट्स जात नाहीत. हे कितीपैकी असतात?

रुणुझुणु तुस्सी ग्रेट हो... काय मस्त रेसिपी दिलीय.. Happy आज किंवा उद्या करुन बघते (वीकेन्डला नेट मिळत नाही, नाहीतर वीकेन्ड मेनुच ठेवला असता हा) Happy

हायला, इतक्या निगुतीने स्वयंपाक केला असता तर ओगलेआज्जींना कडवी फाइट दिली असती>>>> Lol

आता तुम्हाला (आख्खे) ३ पॉइंटस मिळतील >>>>>>> इतकं सगळं केल्यावर फक्त ३ पॉईंट्स Sad त्यापेक्षा लपवलेल्या वस्तु शोधल्या तरी पटापट जास्त पॉईंट्स गोळा करता येतील नाय.. Wink नशीब पण होमवर्क केला नाही म्हणुन पॉईंट्स वजा होत नाहियेत ते..

त्यातील थोडी मला गिफ्ट म्हणून पाठवा>>>>>> नक्की देइन मी गिफ्ट Happy

मी फक्त इथं येऊन तुमचं सिरियस डिस्कशन वाचणार.>>>>> संघमित्रा किती छान... आम्हाला प्रोत्साहन पण दे (तसं म्हणा द्यायची गरज नाहिये तितकीशी, त्यापेक्षा आता जरा कामाचं बघा अशी आठवण करुन दिलीस तरी चालेल, रुणुझुणुला मात्र स्वयंपाकाची आठवण कर)

तो दुकानदार म्हणतोय की आता परत नाही घेणार>>>>> प्रसिक Lol कसं विचारलंस त्याला की परत घे म्हणुन??

माझ्या लेकाने आनंदाने घर डोक्यावर घेतलंय...आत्ताच सॉर्टिंग हॅटने त्याला ग्रिफिंडॉरमध्ये टाकलंय. >>>>>>> अभिनंदन.. एकाच घरातले एकाच हाउसमधे जातीलच असे नाही Wink

माझ्या पाकृने फायदा झालेल्या सगळ्यांकडे पोशन पार्टी ड्यु आहे बरं का.>>>>> पार्टीमधे कोणतं पोशन हवय बोलुन ठेव म्हणजे त्याची प्रॅक्टिस करु Wink

जाऊदे कर्म(पोशन्,स्पेल्स) करत राहावेत. फळ काय येईल ते येईल!>>>>>> बस्के, २-३ लेअर्स मधे असतं काही काही.. गोळा करत रहा.. ड्युएलमधे जिंकला तर एकदम ५ पॉईंट्स मिळतात..

युनोहू ह प मध्ये.....अरे देवा >>>>>>> अगदी अगदी... पण हाउसपे मत जाव, आय्डी देखो.... Wink

ते लईच अवघड काम.. २३-२४ च्या पुढे पाईंट्स जात नाहीत. हे कितीपैकी असतात?>>>>>> केदारचा एक रिप्लाय वाचा.. त्यात त्याने नीट लिहिलय स्पेल कसे वर्कआउट करायचे ते...

९. पाचवेळा घड्याळाच्या दिशेने हलवा. (शेजारी आकडा येतो)>>>>>>>>> इथे थोडं करेक्शन हवय.. डावाने (त्यात असलेली पळी/चमचा) पाचवेळा घड्याळाच्या दिशेने हलवा. (शेजारी आकडा येतो).. मी ही स्टेप अन पुढची स्टेप एकत्र करुन छडीने हलवायला गेले.. Sad

अजुन एक सुचना, वर्गात असताना मोबाइल फोन्स वापरु नका... तिथे तसही मगल्स चे इन्स्ट्रुमेन्ट्स चालत नाहीत पण आपण ऑनलाइन हॉगवर्ट्स मधे शिक्षण घेत असल्याने जेव्हा केव्हा क्लासेस अटेंड करु तेव्हा आपल्या जगातही तिथले रुल्स फॉलो करायला विसरु नका.. Happy

माझ्या पाकृने फायदा झालेल्या सगळ्यांकडे पोशन पार्टी ड्यु आहे बरं का.>>>>> पार्टीमधे कोणतं पोशन हवय बोलुन ठेव म्हणजे त्याची प्रॅक्टिस करु<<<<
तिला 'लिक्विड लक' हवं असेल किंवा amortentia .. Proud

तिला 'लिक्विड लक' हवं असेल किंवा amortentia >>>>>> हे तर लै सोप्पं मग.. अ‍ॅमेझॉन वर मिळतं याचं पेंडंट.. पण मला तरी इतकं काही आवडलं नाही ते..

मगल्स यायला लागले >> भरतजी Lol हर्मायनी करते तसं तंबूभोवती कवच करावं काय ?
रच्याकने, तुमचं आउल पाहून सृजन जाम खूष झाला.
(काल त्याने टोड विकत घेतल्याने त्याला टेन्शन आलं होतं, "अरे, पण माझी लेटर्स कोण आणून देईल ?" :हाहा:)

विद्यार्थ्यांसोबत गार्डीयन्स अलावूड आहेत का? >>> ह्या अंडरएज विझार्डला गार्डियनची गरज पडणार नाही इतकं माहीत आहे त्याला Lol

युनोहू, माझी स्पेल पोटेन्सी ७९ पर्यंत गेली. जास्तीत जास्त किती असते ?

चिमुरी ___/\__ मी छडीने ५ वेळा हलवा असं लिहिलं होतं का ? हाफ ब्लड प्रिन्सने जस्सं आणि जेवढं सांगितलंय तेवढंच केलं तरच पोशन छान होणार....

श्रद्धा, चिमुरी,
पोशन पार्टीला मला पॉलीज्युस पोशन पायजे....आमच्याकडे ते सॉल्लिड हिट्ट आहे. अनेक फायदे इचारात घेऊन झाले आहेत Proud

दक्षिणा,
मागच्या पानावर संघमित्राला लिहिलंय बघ.

चिमुरे हॅ पॉ समजावण्याचे क्लास सुरु करशील का?>>>>>>> नक्कीच... Happy फी मधे डार्क चॉकलेट प्रत्येक क्लास मधे Wink

मगल्स यायला लागलेत>>> Repello muggletum वापरायला नको ना पण..>>>>>>> सध्या तरी नको Wink

ह्या अंडरएज विझार्डला गार्डियनची गरज पडणार नाही इतकं माहीत आहे त्याला>>>>>> हाच आपल्याला भारी पडेल Happy

जास्तीत जास्त किती असते ?>>>>>>> केदारच्या एका स्पेलची पोटंसी १०० च्या वर होती

मी छडीने ५ वेळा हलवा असं लिहिलं होतं का ? हाफ ब्लड प्रिन्सने जस्सं आणि जेवढं सांगितलंय तेवढंच केलं तरच पोशन छान होणार....>>>>>>> अगं तु नुस्तंच हलवा लिहिलं होतं, कश्याने ते लिहिलंच नाहीस.. मग वापरलं रॅव्हेन्क्लॉचं डोकं Wink

पोशन पार्टीला मला पॉलीज्युस पोशन पायजे....आमच्याकडे ते सॉल्लिड हिट्ट आहे. अनेक फायदे इचारात घेऊन झाले आहेत >>>>>> Lol रेसिपी तुलाच विचारावी लागेल Wink

मी अजुनही त्या साईट्वर गेले नाहिये.. आज इथेच टीपी करतीय... रच्याकने लोकहो पॉईंट्स पटापट भरपुर मिळतील म्हणुन मला ड्युएल रिक्वेस्ट एव्हड्यात पाठवु नका.. मी अ‍ॅक्सेप्ट करत नाहीये इतक्यातच (गिफिन्डॉर मधे नसल्याचा एक फायदा, त्याच्या क्वालिटीज ला जागावं लागत नाहिये) Wink

केदार जाधव,
एक विनंती आहे.
ही माहिती घरांप्रमाणे वरच्या हेडरमध्ये टाकाल का ? (तुमचं काम वाढू नये म्हणून आयती यादी बनवून दिली आहे.)
आपापल्या कळपातील प्राणी शोधायला सोप्पं जाईल.
(हे नाही केलं तरी काही बिघडत नाही....पण कसल्या कसल्या ओसीडी घेऊन कन्यारास मधेमधे कडमडते...:फिदी:)
शक्य झालं तर प्रत्येक घराचे एम्ब्लेम टाकता आले तर छानच.

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103

रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347

धनश्री, झरबेरा, नताशा आणि चिनूक्स ह्यांचे सॉर्टिंग अजून झालेले दिसत नाही.
त्यांची घरं कळली की हेडर पुन्हा संपादित करता येईल.
अनवधानाने एखादा विझार्ड किंवा विच राहिली असेल तर माझ्यावर स्पेल टाकू नका रे....

मी स्लीपिंग draught पोशन बनविण्याचा प्रयत्न करते आहे पण ते म्युकस सांडूनच जातयं . प्रॅक्टीस जमते पण जे बनवायला हवे ते जमेनाच.
रुणू , पुन्हा स्पेशल क्लास कुठेलेतरी पोशन बनविण्याचा. Happy प्लीज हाफ ब्लड प्रिंस मोड ऑन....
पाच पॉइंट वरच अडकले ना मी. Angry

कोणी 'you should know about Slytherin' वाचलय का?, interesting आहे, जोरदार इच्छाशक्ती, ताकतीची भुक असलेले, जिंकण्यासाठी जगणारे म्हणजे नागशक्ती, Be proud to be in Slytherin Happy

यावरून एक गंमत आठवली. Happy सिंगापुरात काही एचपी फॅन्स टीम पाडून क्विडिच खेळतात. ब्रूमस्टिक असतात पण जमिनीवरच पळतात. प्रॉपर नियम वगैरे पाळून हा खेळ होतो. (हे सगळीकडेच सुरु झालं आहे असं नेटवर दिसलं. भारतात नाहीये बहुधा अजून.) गोल्डन स्निचऐवजी मात्र व्यक्तीच असते. त्यांच्या या खेळाची दखल इथल्या वृत्तपत्राने घेतली होती.

सिंगापुरात काही एचपी फॅन्स टीम पाडून क्विडिच खेळतात. ब्रूमस्टिक असतात पण जमिनीवरच पळतात. प्रॉपर नियम वगैरे पाळून हा खेळ होतो. गोल्डन स्निचऐवजी मात्र व्यक्तीच असते. त्यांच्या या खेळाची दखल इथल्या वृत्तपत्राने घेतली होती.>>>>>>>>>> भारीच... कसलं भारी... मला पण खेळायचाय.. पण खुप मोठा झाडु लागेल Wink

श्रद्धा, कस्सलं भारी. मलापण खेळायचाय...
रितेश, जमल्यास आज लिहिते.त्या आधी कुणाला जमलं तर लिहून टाका.

रुणुझुणु ग्रेट वर्क Happy

पण इतके मोठे सिम्बॉल्स टाकले तर हेडर लैच मोठा होइल.. त्यापेक्षा छोटे टाकावेत असं वाटतं.. अन टेबल वगैरे बनवुन टाकता येतो का हेडर मधे? तसं केलं तर नंतर अ‍ॅडिशन्स करायला सोपं जाइल..

अजुन एकः इथल्या आय्डींचे पॉईंट्स घेउन माबो हाउसकप वगैरे द्यावा की काय Wink

हो हो, छोटेच बरे पडतील.
केदार, चित्रे टाकताना प्लीज जरा आणखी कम्प्रेस कराल का ?
बहुतेक टेबल टाकता येत नाही.

चिमुरी, हाउसकपची आयडिया भारीये...(मला माहीत आहे की तुझा कपावर डोळा आहे. सध्या तूच लीडवर आहेस ना :फिदी:)

बादवे, पाचवा धडा उघडत नाही ना अजून ?

मी आताच जाँईन झाले आहे......काय करायच असत नक्की ??? सांगा कोणीतरी मला

माझा आय डी - LeviosaErised9262 मी कुठल्या हाऊस मध्ये आहे मलाच माहित नाही Sad

Pages