मायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by केदार जाधव on 18 July, 2012 - 06:06

हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .

http://www.pottermore.com
या साईट बद्दल .

जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक Happy
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल Happy

आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला Happy

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युनोहू, लईच भारी. धन्यवाद.
पार्सलटंग Lol

पुढचा भाग सोप्पा वाटतोय पण मी पहिल्याच भागात हिरवा धूर काढला.
बाटल्यांमधले पदार्थ ओतताना फार तारांबळ उडते. टेबलावर अतोनात सांडलवंड होते....आणि रंगीबेरंगी धूर निघत राहतात Rofl

तुमची सहाच्या सहा पोशनं झाली सुद्धा. जादुई शिक्षणाचं फारच मनावर घेतलेलं दिसतंय !

चिमुरी, केदार, रुणुझुणू>>धन्स Happy मी काल हफलपफ मध्ये सोर्ट झाले..
मला दुसर्या पुस्तकामध्ये गेल्यावर विझली'स चं गार्डन डी-ग्नोम करताच येत नाहीये..कोणी केलय का?

प्रसिक मात्र पक्का स्लिदरीयन आहे..त्याला अजुन एकदाही हरवायला जमलं नाहिये>>> Proud 'काही जादुगार ईतरांपेक्षा श्रेष्ठ असतात, चिमुरी.'

सृजनला सुद्धा प्रसिकने ड्युएलिंगचे आव्हान दिले आहे. त्याला आउल आलेलं दिसलं की खुष होतो
प्रसिकला निरोप आहे " उनसे कहना, आपकी चुनौती मैं बादमें स्वीकार करूंगा, अभी नहीं "
>>>> Lol फिर मुकबला होगा, प्रसिक, नागेश नागशक्तीका ( Uhoh ) और सृजन

मदत करा, पहिल्या. पुस्तकतल्या पाचव्या चॅप्टर मध्ये अडकले आहे. मला छडी आणि हाऊस पण मिळाले नाहीये. न.न्तर मिळ्त का?

अरे व्वा मुग्धा, हफलपफमध्ये स्वागत Happy
विझ्लीजच्या बागेतले ग्नोम्स काढून टाकण्यासाठी ते झाडीतून वर आले की त्यांच्यावर क्लिक करून ठेवा. मग ते गोलगोल फिरायला लागतील. फिरण्याचा वेग वाढला की उजवीकडच्या भिंतीच्या बाहेर पडतील असा नेम धरून टाका (म्हणजे क्लिक सोडा)

धनश्री,
डायगन अ‍ॅलीमधली खरेदी झाली का ?
सगळ्या वस्तू घेऊन झाल्या की शेवटी जादुई छडी घ्यायला ऑलिव्हँडर्स कडे जायला मिळतं.
आणि हॉगवर्ट्समध्ये आल्यावर सॉर्टिंग होऊन हाउस मिळेल.

केदार,
मुग्धाचं नाव वरच्या हफलपफच्या यादीत घालणार का ?

रुणुझुणू>>धन्यवाद.. Happy पण तो नेमच काय तो धरता येत नाहिये.. एकतर पाण्याच्या डबक्यात नाहीतर डावीकडे पडतायत.. Sad ह्म्म.. प्रयत्न करत राहते..
आणि मला एकेरीतच हाक मारा प्लीज.. Happy

मी वरती केदारनी लिहिलेल्या सगळ्या नावांना फ्रेंड्स रिक्वेस्ट्स पाठवू शकते का?

ते ग्नोम खरंच फार वैतागवाडी होते. एकदा मशीन स्लो झालं तेव्हा मला ते नेम धरून फेकता आले. सहा फेकले एकूण बाहेर आणि हुश्श केलं.

सॉर्टींग हॅट ने मला स्लिदरीन मध्ये टाकलंय Sad Proud काय हे? मला वाटलं होतं मी बहुधा रेवनक्लॉ असणार्..श्या! आता काय करावे? Uhoh

सॉर्टींग हॅट ने मला स्लिदरीन मध्ये टाकलंय>>>claps.gif नताशा, स्लिदरीन मधे तुझ स्वागत आहे. टेन्शन नको घेऊस, स्लिदरीन तुला ग्रेट बनण्यासाठी मदत करेल
स्लिदरीन फाउन्डर- सॅलॅझर स्लिदरीन
cinderella-022007-38.gif
हॅन्डसम आहे ना?:फिदी:

SilverStorm17415 कोण आहे ?
नताशा, तुमच्या हाउसमध्ये माबोवरचे दोन सराईत विझार्ड्स आहेत Happy
मुग्धा, तुझा आयडी काय ?
गोगो, फ्रे रि पाठवली आहे.

धनश्री, ग्रिंगॉट्समधे जाऊन तुमचे खाते चेक केलेत का? ग्रिंगॉट्सच्या दारावरची चावी कुलुपाला लावायची, मग ग्रिंगॉट्स उघडेल.
आधीच्या एका पानावर शॉपिंग लिस्ट पडलेली उचलायची होती. तिच्याशिवाय शॉपिंग करता येत नसावे. मग डायगॉन अ‍ॅलीतल्या एकेका दुकानाच्या दारावर क्लिक केलं की आत जाता येतं. वेगवेगळ्या दुकानांतून पुस्तके, उपकरणे, पेट्स खरेदी केल्यावर मग वाँड खरेदी करता येईल.

सॉर्टींग हॅट ने मला स्लिदरीन मध्ये टाकलंय >> स्वागत आहे नताशा . तू गेट होण्याची पहिली पायरी चढली आहेस .
अरे बनना है तो गब्बर बनो , सुरमा भोपाली बनने मे क्या मजा है Wink

अरे बनना है तो गब्बर बनो , सुरमा भोपाली बनने मे क्या मजा है >> Angry Lol
श्रद्धा, खरंच की Biggrin
स्लिदरिनवाल्यांनो हॅप्पी नागपंचमी.

पोशन बनवण्याच्या भानगडीत पैसे पटापट संपतायत. काय करावे बरे!

दुसरे म्हणजे त्या त्रिमुखी कुत्र्याच्या दालनात जाऊन काय करायचे होते? नुसते बघून पळून यायचे का? काही सापडले नाही तिथे..

त्रिमुखी कुत्र्याच्या दालनात जाऊन काय करायचे होते?>>>>मृदुला, त्या फ्लपीला झोपवण्यासाठी एखादे वाद्य वाजवायचे ना
drumming.gif

मृदुला, पैसे का संपतायेत ? सगळे घटक विकत घेतेयस का ? (की कढई फुटल्याने पॉइंट्स वजा होतायेत :डोमा:)
प्रसिक, तुम्ही वाजवताय ते वाद्य वाजवलं तर फ्लफी गुंगायच्या ऐवजी लचका तोडेल की हो Biggrin

Pages