मायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by केदार जाधव on 18 July, 2012 - 06:06

हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .

http://www.pottermore.com
या साईट बद्दल .

जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक Happy
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल Happy

आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला Happy

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी J.K. Rowling's thoughts वाचलेत का? Nicolas Flamel बद्दल माहीती interesting आहे

असं पण लेकीबरोबर करण्यात जास्त मजा येते त्यामुळे आम्हाला एकच आयडी पुरे>>> ओक्के.. एन्जॉय देन.. मी पण सगळं गमतीतच लिहिलेलं बर का.. Happy

कोणी J.K. Rowling's thoughts वाचलेत का?>>>> अजुनतरी नाही.. नंतर सावकाश वाचेन..

आज कालपासुनच्या पेंडिंग ड्युएल्स पुर्ण केल्या.. एक जिंकले, एक हरले.. नशीब हरल्यावर पॉईंट्स कट होत नाहियेत ते...

काल सृजनचं सॉर्टिंग चालू असताना तो अक्षरशः हॅरीसारखं " नॉट स्लिदरिन, नॉट स्लिदरिन " पुटपुटत होता Lol
स्लिदरिनमध्ये पडला असता तर रडून थैमान घालेल ह्याचं मलाच टेन्शन आलेलं.

मी स्लिदरिन मधे गेले तर!!!>>>>>>>> चांगलच आहे ना .
मी तरी बाबा हॅपॉ पेक्षा स्नेप चा जास्त फॅन आहे . आपण तरी खुश आहोत स्लिदरिन मधे येऊन .

पण तरिही ज्यांना काळजी वाटते त्यांनी आठवा शेवटच्या चॅप्टरमधे हॅरी त्याच्या लेकाला काय म्हणाला होता ते.. अन बिनधास्त सॉर्टिंगला सामोरं जा >> +१

बाईंच्या Welcome Messege मधून :

Firstly, let’s dispel a few myths. You might have heard rumours about Slytherin house – that we’re all into the Dark Arts, and will only talk to you if your great-grandfather was a famous wizard, and rubbish like that. Well, you don’t want to believe everything you hear from competing houses. I’m not denying that we’ve produced our share of Dark wizards, but so have the other three houses – they just don’t like admitting it.
Merlin was a Slytherin. Yes, Merlin himself, the most famous wizard in history! He learned all he knew in this very house!

मला ग्रिफिंडॉर नायतर स्लिदरिनच हवं होतं. खरे हीरो हेच दोन हाऊस आहेत. बाकीचे दोन हाऊसेस म्हणजे सपोर्टिंग अ‍ॅक्टर्स Proud

आय नो नंदिनी Sad
रॅवेनक्लॉ तरी जिनियस लोकांसाठी प्रसिद्ध, आम्ही हफलपफवाले तर उरलासुरला गाळ आहोत.
हेल्गाबाईंनी पदरात घेतलं म्हणून आम्हाला हॉगवर्टसमध्ये राहता आलं...नाहीतर पुन्हा मगल्समध्ये जावं लागलं असतं. Proud

माझ्याइथे सगळे स्पेल्स प्रॅक्टिसकरता अव्हेलेबल नाहियेत Sad डार्क फोर्सेस अन स्टॅन्डर्ड बुक ओफ स्पेल्स मधले...

ते स्पेल्स मला तर जमतच नाहियेत.

पहिलं पुस्तक वाचताना ज्या काही गोष्टी कलेक्ट केलेल्या तेव्हा पॉइंटस मिळालेले ते कसे काय गेलेल कुणास ठाउक. Sad

हे कायतरी मुघल सारखं किंवा खरंतर काफिर किंवा मोहाजिर सारखं वाटतंय.. अ ओ, आता काय करायचं >> नाही ग संघमित्रा . चांगला शब्द आहे तो . Non Magical लोकांसाठी .
त्याला समानार्थी वाईट शब्द ही आहे , पण आम्ही स्लिदरिन तो वापरत नाही Wink

हे कायतरी मुघल सारखं किंवा खरंतर काफिर किंवा मोहाजिर सारखं वाटतंय.>>> Lol

त्याला समानार्थी वाईट शब्द ही आहे , पण आम्ही स्लिदरिन तो वापरत नाही>>>>>> Happy

प्रसिक सारखा सारखा मला हरवतोय... Sad

मी एकदा केदार सोबत ड्युएल केलं त्यात मी सपशेल हरले. Sad

त्याला समानार्थी वाईट शब्द ही आहे , पण आम्ही स्लिदरिन तो वापरत नाही >> Biggrin

धन्यवाद केदार Happy

अजुनही खुप वेळा हरत आहे पण, आणि ड्युएल रिक्वेस्ट आली की खेळायची खुमखुमी येतेच.. मधेच एकदा सिस्टीम ने २ शब्द पण टाइप करायला लावले मी मनुष्य आहे अन रोबोट नाही हे सिद्ध करायला.. तिथे ह्युमन ऐवजी विच/विझार्ड असं तरी लिहायचं ना Wink

मला फ्रेंड्स मधे अ‍ॅड करा की लोकहो. मे मधे रजिस्टर केलं तेव्हापासून एकपण फ्रेंड नाही

ड्युएल खेळायलाकोणी आहे का आता?

नंदिनी तुला पाठवली आहे कदाचीत रिक्वेस्ट.. नसेल तर वरच्या लिस्ट मधुन घेउन तुच पाठव ना..

केदार, प्रसिक दोघही जबरदस्त आहेत ड्युएल्स मधे.. स्लिदरीनचं पारडं खुपच जड झालय Happy

नंदिनी , मी Friend Reequest टाकलीये .
accept केलीस की डुएल खेळू .
असही दोघे एकाच हाऊसचे असले की Practice Match च असते Happy

असही दोघे एकाच हाऊसचे असले की Practice Match च असते>>>>>> प्रॅक्टिस मॅच नसते.. पॉईंट्स हाउसला जातात, कोणा एकाच्या खात्यात न जाता..

उयद, आम्ही अजुन बुक २ वरच आहोत..

प्रसिक Sad

स्लिदरिन वाले हुषार आहेत.. मी पटकन हरते म्हणुन मला सारखी ड्युएल रिक्वेस्ट पाठवतायेत Sad

Pages