मायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by केदार जाधव on 18 July, 2012 - 06:06

हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .

http://www.pottermore.com
या साईट बद्दल .

जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक Happy
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल Happy

आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला Happy

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> सगळे घटक विकत घेतेयस का ?
हो! फुकट कुठे मिळतात का?? एकदोनदा मिळाले काहीबाही (शिंगवाल्या गोगलगाई वगैरे) पण एकुणात विकतच घ्यायला लागतायत.
कढई फुटण्याचा अजून अनुभव नाही. पण वेळ संपतोय ..
बाटलीतले पदार्थ मोजून टाकताना फेफे उडते. आणि शेवटी जादूची कांडी उचलेपर्यंत वेळ संपून जातो.

अरे औषध बनवता येत नाही..................काहीच विकत घेता येत नाही..... BUY चा ऑप्शन येत नाही आहे काय करावे Sad

Snake Fangs

You need to buy everything on your shopping list before you can purchase this item.

Snake fangs can be used in a range of potions including the Draught of Living Death.
.
..
हे असे दिसते सगळी कडे

आधी फ्लरिश आणि बॉट्सच्या दुकानातून पुस्तके घ्या सगळी. नंतर ती उपकरणे (काचेच्या बाटल्या, वजने मापे) वगैरे.. मग जडीबूटीच्या दुकानात जा. मग घेता येतील ती. बहुतेक बाटल्या नसल्याने घेता येत नसावीत.

रुणू, तू नाणी कमी होतायत म्हणतेयस, तू प्रत्येक सीनमध्ये सापडणारी नाणी गोळा करतेयस ना? काल बोर्गिन अँड बर्कस्मध्ये जाऊन पोचल्यावर मला एकदम पाच नाणी मिळाली. बाकी प्रत्येक सीनमध्ये एखादं तरी मिळतंय. (इससे मै अपनी दूसरी कक्षा की किताबें खरीदूंगी... खूब पढूंगी, लिखूंगी.. अपने हाऊस का नाम रोशन करूंगी.. सुक् सुक्...)

झोप येण्याचे, विसरण्याचे आणि त्याच्या मधले यातले पदार्थ संपलेत. उजव्या पानावरचे पहिले तीन. फ्लॉबरवर्म म्यूकस, वेलेरियन स्प्रिग वगैरे.. (ऑफिसातून पॉटरमोर उघडायला नको म्हणून अंदाजपंचे सांगतेय.)

>>सुक् सुक्.
हा काय जादूकांडीचा आवाज का? Happy

मिळतील तशी नाणी गोळा करतेय मी. पण पो.कृ. सारखी बिघडत असल्याने भराभर पैसे संपतायत.

लॉखार्टची पुस्तके घ्यायची म्हणजे पैशे पाण्यात. अगदी मनावर दगड ठेवून घेतली ती रद्दी. Sad

हा काय जादूकांडीचा आवाज का? <<<< नॉय. भावनातिरेकी अश्रू आवरण्याचा.

'चेंबर ऑफ सीक्रेट्स'चा पाचवा धडा उघडतच नाहीये बा माझ्यासाठी. Sad 'थोड्याच वेळात..' असं कालपासून सांगतायत. बहुतही जालिम साईट हय...)

श्रद्धा Biggrin
(नाणी माझी नाही मृदुलाची कमी होतायेत. तरी एकदम पाच नाणी म्हटल्यावर हाव सुटली. जातेच आता तिथे.)

मृदुला,
झोप येण्याच्या पोकृ मधलं सगळं विकत घ्यायला लागतंय. पण स्वस्त आहे. प्रत्येकी एक गॅ.

विसरण्याच्या पोकृ मधल्या मिसलटो बेर्‍या तुला ख्रिसमस पार्टीत फुकट मिळतील. बाकीचं विकत घ्यायचं.

जागं राहायच्या पोकृ मधले वोल्फ्सबेन आणि सुक्या बिलीविग्ज - हॅग्रिडच्या पर्णकुटीत फुकट मिळतील.

सगळ्या विषांवरच्या उतार्‍यातील शे स्ट द (Bezoar) हॉस्पिटल विंगमध्ये मिळेल. मिसलटो बेर्‍या ख्रिसमस पार्टी. युनिकॉर्नचं शिंग विकत घ्यायचं.

अजून काय हवंय का ?
श्रद्धा, मी पण धडका मारून बघितल्या पाचव्या धड्यावर. नाही उघडत Sad

नाणी माझी नाही मृदुलाची कमी होतायेत>>>> कुणी काय गोंधळाचा स्पेल वापरला की काय माझ्यावर? Proud मला हॉस्पिटल विंगेतला शेपोद नाही मिळाला. जाते पुन्हा तिथे.

अरे कुठेय तो दगड हॉस्पिटल विंगमध्ये?

हो, शे स्ट द मिळाला होता.
एकदा मिळाला तरी परत मिळतो का? म्हणजे एकदा वापरून वाया घालवला तर..?
मिसलटो बेर्‍या पण मिळाल्या होत्या बहुतेक.
बाकी गोष्टी परत जाऊन बघते आज रात्री.

मला मॅकगोनागल बाईंची गोष्ट आवडली. कडक वाटत असल्या तरी त्यांची विनोदबुद्धी जोरदार असणार आणि तरुणपणी त्या एकदम डॅशिंग असणार असे वाटायचे. ते खरे निघाले. ते वाचून एकदम छान वाटले.

मिळाला मिळाला शेपोद. उजवीकडच्या कपाटात असतो.

आत्ताच ब्यांक ब्यालन्स पाहिला. ५९७ गॅ. आहेत. Happy

मीपण पाचवे चॅप्टर ऊघडण्याची वाट बघत आहे. खुल जा सिम सिम किंवा अलाहोमोरा चा काही अवतार वापरायचा आहे का?

अरे बाबा, बिझी होतो. मी पन फॅन आहे पण ते पॉटरमोर काय कळालं नाही. काये नक्की? काय करायचं तिथे? नीट धागा काढा कुणीतरी ब्वा

इब्लिस, http://www.maayboli.com/node/36484?page=1 हा धागा पण बघा.
रोलिंगबाईंनी उघडलेली साइट आहे. तिथे हॅपॉ वाचून भंजाळलेल्या फॅन्सना हॉगवर्ट्समध्ये शिक्षण घेत असल्याचा व्हर्च्युअल आनंद मिळेल अशी पुरेपुर व्यवस्था आहे.

केदार, प्रस्तावना छान जमलीये. रोलिंगबाईंकडनं कमिशन घ्यायला हरकत नाही.
ओके. कवठीचाफा, रिक्वेस्ट स्वीकारली आहे.
नानबा, अधनंमधनं जायचं तिकडे. २ दिवस मलाही नाही जमलं. पण धमाल येते. खेलायला चालू कर,काही अडलं तर सांगायला आम्ही आहोत.

मी सुद्धा पाठवल्या सगळ्यांना फ्रेंड रिक्वेस्टस. Happy
फ्लफी बद्दल इथे वाचून पुन्हा मागे गेले पहिल्या पुस्तकात, पण त्याच्या खोलीचं दार 'अलोहोमोरा'ने उघडल्यावर पुढे काय करायचं ते कळलं नाही. त्याच्या पायाखालचा दरवाजा उघडता येतो का?
पहिल्या पुस्तकातली सगळी पोशंस तयार केल्याशिवाय पुढचे धडे उघडत नाहीत बहुतेक.
बाकी ते ग्नोम काही माझा पीछा सोडत नाहियेत..अजूनही मी तिथेच अडकले आहे..
पुर्ण करायला पेशंस आणि वेळ दोन्ही कमी पडतंय.. स्वतःचाच Angry

Pages