मायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by केदार जाधव on 18 July, 2012 - 06:06

हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .

http://www.pottermore.com
या साईट बद्दल .

जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक Happy
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल Happy

आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला Happy

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे मी पहिल सुप बरोबर बनवलेलं, दुसर फेल गेलं तर परत सुरवाती पासुन करावे लागते का?male30-male-sad-lonely-smiley-emoticon-000072-large.gif

मला माहीत आहे की तुझा कपावर डोळा आहे. सध्या तूच लीडवर आहेस ना >>>>>> Lol एकही पोशन न बनवता अन ड्युएलमधे हरुनही Wink

बादवे, पाचवा धडा उघडत नाही ना अजून ?>>>>>>> नाही उघडत आहे.. धीर धर.. तोवर हाब्लप्रि चं पुस्तक लिहायला घे... ए ही पण आयडिआ भारीच.. "मराठीतुन सोप्प्या पोशन पाकॄ - रुणुझुणु" वाटल्यास सोप्प्या हा शब्द काढुन टाकुया.. सोप्पं काही करायला गेलं की जमतच नाही मला (आणि वर्षु नीलचं सोप्पं पुडिंग आठवतं मग)

मला माहीत आहे की तुझा कपावर डोळा आहे. सध्या तूच लीडवर आहेस ना >>>>>> + १००
आणी त्यात स्लिदरिन मधे आम्ही दोघेच अजूनतर . हमारे २ और तुम्हारे ५ , बहोत नाईन्साफी है Happy

अरे ,मी करायच्या आधीच कुणीतरी वर add करून टाकालय , धन्यवाद . Happy
पण एक शंका आहे , Write Permissions by defaulf सर्वानाच असतात का ? की मी धागा तयार करताना काही वेगळ केलय ?

Write Permissions by defaulf सर्वानाच असतात का ? >>>>> माहित नाही...

हमारे २ और तुम्हारे ५ , बहोत नाईन्साफी है >>>>>> Lol चला माबोवर स्लिदरीन वाले कमी आहेत म्हणायचं... Wink

पण एक शंका आहे , Write Permissions by defaulf सर्वानाच असतात का ? की मी धागा तयार करताना काही वेगळ केलय ?>>
केदार, मी तो बदल केला होता. इतरांना दुसर्‍यांचे धागे संपादीत करायची परवानगी नसते.

केदार, मी तो बदल केला होता. इतरांना दुसर्‍यांचे धागे संपादीत करायची परवानगी नसते. >> धन्यवाद अ‍ॅडमिन Happy

हाय.mi navin hae maaybolivar. 1 varshya pasun maayboli vachat ahe.mi pan HP chi Big fan.monstone quest1741 mi ahe. maf kara n vichartach tumhala friend request pathvali. asha ahe tumi mala apyat samavun ghyal. marathi font cha problem ahe ata tyamule english madhye lihit ahe. kahi chulkal tar samjun ghya.

केदार, मी तो बदल केला होता. इतरांना दुसर्‍यांचे धागे संपादीत करायची परवानगी नसते.>>>>> अ‍ॅडमिन पण हॅपॉ फॅन .. Happy

प्रसिक असं बरच काय काय शोधायचं आहे अजुन Happy

हैरी तो बस देखता हे रह गया>>>> ओय, तो अ‍ॅनिमेटेड हॅरी आहे... खरा हॅरी असता तर तुला गोल्डन स्निच नजरेसही पडला नसता Wink

खरा हॅरी असता तर तुला गोल्डन स्निच नजरेसही पडला नसता >> अगदी अगदी.
इथे सृजन रागाने खदखदतोय.....इस स्लिदरिन के बच्चे को अगली मॅच में देख लूंगा Lol

अनुसया,
तुम्हाला अजून बरंच पुढे जायला लागेल. खरेदी उरकली की हॉगवर्टसला जा, मग तिथे तुमचं सॉर्टिंग होईल.
झालं की इथे कळवा म्हणजे हेडरमध्ये संपादन करता येईल.

चिमुरी, पोशनकृतींचे पुस्तक विचाराधीन. डम्बलडोरमास्तरांची परवनगी लागेल बहुतेक Lol

अ‍ॅडमिन, धन्यवाद बरंका Happy

खरा हॅरी असता तर तुला गोल्डन स्निच नजरेसही पडला नसता >>>>> हे गरूडद्वार वाले असेच, कोल्ह्याला द्राक्ष आंबट

इथे सृजन रागाने खदखदतोय.....इस स्लिदरिन के बच्चे को अगली मॅच में देख लूंगा>>>>>> Lol रुणुझुणु आता तुमच्या घरात युद्धमय वातावरण नाहिये का की कोण कॉम्प वापरणार म्हणुन Wink

डम्बलडोरमास्तरांची परवनगी लागेल बहुतेक>>>>>> डम्बलडोर कोण आता इथे??? Uhoh

हे गरूडद्वार वाले असेच, कोल्ह्याला द्राक्ष आंबट>>>>>> मी रॅव्हेन्क्लॉ आहे.. Happy आणि केवळ हाउसच्या नावाला जागायचं म्हणुन हॅरीला नावं ठेवायची नाहीत, आधीच सांगुन ठेवतेय (हे सिरिअस मोड मधे)... नाहीतर अ‍ॅडमिनकडे तक्रार करेन (हे गमतीच्या मोडमधे) Wink

अरे काय चाल्लय काय?? नवा धागा तो पण धडाधड व्हायलेला... Happy

तुम्ही सगळे माझ्या कायच्याकाय पुढे निघुन गेलात कि राव. काल मी लेक नसताना सकाळी जरा खेळले तर तिने जमवलेले सगळे पॉईंट्स मी घालवले आणि नंतर बोल खाल्ले. Proud

ErisedPumpkin29455 (Slytherin House. )

दुपारनंतर लॉगिन होइन.

काल मी लेक नसताना सकाळी जरा खेळले तर तिने जमवलेले सगळे पॉईंट्स मी घालवले आणि नंतर बोल खाल्ले>>>>> पॉईंट्स कसे जातायेत? माझे तरी अजुन कुठे गेलेत असं आठवत नाहिये...

चिमुरी, मी बसले की तो उंदीरमामासारखा घुसून मांडीवर येऊन जागा पटकावतो Lol
सध्या बापसामागे तुणतुणं घेऊन फिरतोय "अरे पपा, तुम्ही ट्राय तर करून बघा. बहुतेक घेतील ते तुम्हाला हॉगवर्टसमध्ये " Lol
आमचा मगल बाटवणं अवघड आहे पण.

अमृता Lol

प्रसिक, हॅरीला नावं नाही ठेवायची अज्जिबात. आम्ही आपापल्या हाउसमधून सुद्धा हॅरीप्रती निष्ठावान आहोत.

अमृता, कठीण आहे मग.. त्यापेक्षा सरळ वेगळा आय्डी काढुन घे तुझ्याकरता... Wink

रुणुझुणु Lol

प्रसिक, हॅरीला नावं नाही ठेवायची अज्जिबात. आम्ही आपापल्या हाउसमधून सुद्धा हॅरीप्रती निष्ठावान आहोत.>>> +१००००००००००००००

दक्षिणा | 19 July, 2012 - 09:46
अरे हा धागा नक्की काय आहे?
(घोर अज्ञान)
>>
अनुमोदन, काय आहे हे सगळ? कुणी बालवाडीकरांना मुळाक्षरांपासुन शिकवेल का? आम्हालाही आपले म्हणा. तुमच्यात सामाऊन घ्या जरा Happy

अनुमोदन, काय आहे हे सगळ? कुणी बालवाडीकरांना मुळाक्षरांपासुन शिकवेल का? आम्हालाही आपले म्हणा. तुमच्यात सामाऊन घ्या जरा>>>>>> हे म्हणजे मुळाक्षरं माहित नसता डायरेक्टली पीएचडी अ‍ॅडमिशन द्या अन मुळापासुन शिकवा म्हणण्यासारखं झालं की Wink दिवा घे शुकु...

शुकु, तु भेटलीस की तुला सगळं समजावते.. असं ऑनलाईन मुळापासुन शिकवणं अवघड आहे गं मला तरी.. रुणुझुणुने शिकवलं तर बघ बाइ Happy

आमचा मगल बाटवणं अवघड आहे पण. >> आमची मगल बाट्वण्याचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत . Happy
नंदिनी , स्लिदरीन मधे स्वागत Happy

बापरे!! ते पोशन आणि ते स्पेल्स भारी अवघड काम आहे बुवा. जमत नाय. Sad

नको ग चिमुरी, मी स्लिदरिन मधे गेले तर!!! Proud

रुणु, आमचा पण मगल बाटत नाय. पक्का मगल आहे.

मी स्लिदरिन मधे गेले तर!!!>>>> सगळेच नागशक्तीमधे सामिल होण्यासाठी का घाबरतायेत, भित्र्यानां नागशक्तीमधे जागा नाही, त्यानीं मेहनती बच्च्याच्या सोबत जावे
cinderella-022007-38.gif

नको ग चिमुरी, मी स्लिदरिन मधे गेले तर!!!>>>>>>>> फिकर नॉट (मला काय जातय सांगायला, मी पण पडले ना त्यातुन बाहेर.. पण तरिही ज्यांना काळजी वाटते त्यांनी आठवा शेवटच्या चॅप्टरमधे हॅरी त्याच्या लेकाला काय म्हणाला होता ते.. अन बिनधास्त सॉर्टिंगला सामोरं जा).. मनातनं हॅपॉलाच प्रामाणिक रहा म्हणजे झालं.. प्रसिक सारखं नको Wink

Pages