मायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by केदार जाधव on 18 July, 2012 - 06:06

हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .

http://www.pottermore.com
या साईट बद्दल .

जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक Happy
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल Happy

आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला Happy

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

monstone quest कोण आहे?
पॉटरमोरवाले त्याच त्याच शब्दांचे कॉम्बो करून आयडीज बनवताहेत.

पोशन काय जमत नाही ब्वा +१

मला अजुनही स्पेल्स जमत नाहियेत..स्पेल कास्ट पोटन्सी अजुनही १६ ते २० च्या मधेच आहे.. चुकुन रॅव्हेन्क्लॉ मधे आले वाटतं Sad

पहिल्या word ला २ दा केल्यानंतर (एकदा आधी आणी नंतर MAX circle असताना ) एक रेष दुसर्या word ला जाते . ती बरोबर त्या word वर असताना click कर . परत circle आले की MAX circle असताना click कर .
१००- १२० पर्यंत सहज जाता येतय . त्यापुढे मात्र जमत नाहीये . त्यासाठी . खरोखर Precision पाहिजे .

काय काय करावं लागतं हॅपॉ करता नाही >> ++१००० Lol

moonstone quest ची फ्रे रि मला पण आली आहे. कोण आहे ?

केदार, चिमुरी.....पोशन कुठल्या स्टेजला अडकतंय ? हीट जास्त होत असेल तर मधलं बटन दाबून कमी करायची.
पूर्ण पाककृती सविस्तर लिहू का ?
अलोहोमोरा सोडून बाकीचे स्पेल्स अजून वापरून पाहिले नाहीत. बघते आता.

केदार, चिमुरी.....पोशन कुठल्या स्टेजला अडकतंय ? हीट जास्त होत असेल तर मधलं बटन दाबून कमी करायची. > धन्यवाद रुणुझुणू . माझ पोशन blast च होतय . आणी wand कशी फिरवायची ?

रुणुझुणु, अगं ते नीट ग्राइंडच होत नाहिये.. अन हीट चं टेम्परेचर कुठे दाखवतं? कुठपर्यंत तापवत न्यायचं ते? प्लीज हाफ ब्लड प्रिन्स सारखं उत्तम रिझल्ट्स देणारी पाकृ लिही ना पोशनची.. Happy

केदार किती वेळा ड्युएलची रिक्वेस्ट रे.. थांब आता.. मला थोडी प्रॅक्टीस करु दे.. नंतर बघते तुझ्याकडे Wink

: हाफ ब्लड प्रिन्स मोड ऑन :

१. पलीकडच्या खलबत्त्यात (Mortar) ६ snake fangs टाका. म्हणजे दोन वेळा टाकावं लागेल (एका क्लिकमध्ये ३ सापाचे दात येतात)

२. खलबत्त्यातील बत्त्यावर हिरवा रंग येईपर्यंत टिचक्या मारत रहा.

३. हिरवा रंग आला की कुटायचं थांबवून त्यातील ४ चमचे चूर्ण कढईत टाका. शेजारी आकडा येतो.

४. कढईखालच्या शेगडीचं लाल बटन दाबून उअकळायला सुरू करा. शेजारी तापमापी येईल. तिथे हिरवा रंग दिसला की मधलं केशरी बटन दाबून धग कमी करा.
१० सेकंद उकळा.

५. सापाचे दात ठेवले आहेत त्याच्या शेजारच्या पोत्याच्या मागे जादुई छडी आहे. तिला ड्रॅग करा आणि कढईवर फिरवा.

६. इतकं सगळं व्यवस्थित जमलं की तुमचा पदार्थ शिजायला लागेल. तेवढ्या वेळात माबोवर येऊन चकाट्या पिटा.

इतकं करा. मग पुढचं सांगते.

(हायला, इतक्या निगुतीने स्वयंपाक केला असता तर ओगलेआज्जींना कडवी फाइट दिली असती :फिदी:)

अजून एक राहिलं......
१० सेकंदांची वेळ संपल्यावर शेगडी बंद करा (पहिलं बटन)
नाहीतर कढई फुटण्याची शक्यता आहे. (मी फोडल्या आहेत १-२ :डोमा:)

आता पुढचा भाग :

पदार्थ शिजल्यावर पुन्हा तिकडे फिरकायची तसदी जरूर घ्या. नाहीतर फक्त अर्ध्या मिनिटाच्या सूचनेनंतर (तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेलं) थु फो उत्तर मिळू शकेल Proud

७. आता त्या शिजलेल्या पदार्थात ४ Horned slugs टाका.

८. नंतर साळिंदराचे २ काटे टाका.

९. पाचवेळा घड्याळाच्या दिशेने हलवा. (शेजारी आकडा येतो)

१०. जादुई छडी उचलून फिरवा (कुठे असते ते लक्षात नसेल तर शिक्षा म्हणून आपापल्या हाउसमधून ५ पॉइंटस वजा करा :फिदी:)

११. आता तुम्हाला (आख्खे) ३ पॉइंटस मिळतील आणि तुमच्यावर स्तुतिसुमने उधळली जातील....त्यातील थोडी मला गिफ्ट म्हणून पाठवा Happy

धन्यवाद रुणुझुणु, जमलं पोशन .
(हायला, इतक्या निगुतीने स्वयंपाक केला असता तर ओगलेआज्जींना कडवी फाइट दिली असती फिदीफिदी) > +१

काय आहे हे सगळं? >> हॅरी पॉटरच्या फॅन्स साठी नवी साईट आहे pottermore.com .
त्यावरची चर्चा आहे ही Happy

संघमित्रा,
हॅपॉ वाचलं आहे का ?
नसेल तर ह्या धाग्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं....नाहीतर डोकं चक्रावायची शक्यता आहे.
आमच्याकडे एक मगल ऑलरेडी डोक्याला हात लावून बसलेला आहे Lol

वेल्डन केदार Happy

मी रेवनक्लॉ.
पोशन बनवण्याच्या पायरीला पोचलेय. रुणुझुणूची पाककृती आज रात्री करून बघण्यात येईल. त्यातले स्नेक फॅंग कोणते, स्नेल कोणत्या कसे काय कळतेय? सगळेच चित्रविचित्र दिसते आहे मला.

कढई फुटली तर नवी विकत घ्यायला लागते का?

मृदुला,
तिथे लिस्ट मधे नाव आणी चित्र येते .
कढई फुटली तर नवी विकत घ्यायला लागते का? >> बहुधा नाही . मी बर्याचदा blast केलेय पण परत कढई होतीच Happy

रुणूझुणूच्या व्यवस्थित पाकृमुळे मी एकदाही कढई न फोडता पोशन बनवून तीन हाऊस पॉइंट्स मिळवले एकदाचे. आधी प्र्याक्टीस पण केली. मला वाटले, तेव्हाच मिळणार पॉइंट्स. तेव्हा नुसतेच अभिनंदन झाले. मग घटक विकत आणून बनवले एकदाचे. भेट म्हणून हवेय का कुणाला? Proud

तुम्ही पोशन बनवायला पोहोचलात देखिल, मी अजुन शॉपिंगच करतोय, a beginner's guide to transfiguration आणि fantastic beasts and where to find them हि पुस्तके मि कधीच वाचलीत, ती खरेदी नाही केली तर चालतील का?scratch-head01-idea-animated-animation-smiley-emoticon-000414-large.gif

हाहाहा.. नाही रुणू हॅ पॉ नाही वाचलेलं.. तरीही साधारण टर्म्स माहीती होत्या.. पण हे फार्फारच डोक्यावरून गेलं.. पण सॉलिड करमणूक आहे ही.. मी फक्त इथं येऊन तुमचं सिरियस डिस्कशन वाचणार.. Proud

>> मी बर्याचदा blast केलेय पण परत कढई होतीच
>> तेव्हा नुसतेच अभिनंदन झाले.
हे आवडलेय Happy

घुबडे संपली का?
मी शॉपिंगला गेले तेव्हा तीनच घुबडे शिल्लक दाखवली होती. बाकी फळ्या रिकाम्या.

दुसरे म्हणजे ५०० गॅलियन्सवर आख्खी सात वर्षे काढायची आहेत की काय?

माझ्या लेकाने आनंदाने घर डोक्यावर घेतलंय...आत्ताच सॉर्टिंग हॅटने त्याला ग्रिफिंडॉरमध्ये टाकलंय.

रैना Lol
खर्‍या पाकृमध्ये नसेना का , पण पोशन्स बनवण्यात माझा झेंडा सॉल्लिड गाडला गेलाय...
(मी मुळात जादुई असल्यानेच ह्या मगल्सच्या पाकृ कधी जमत नसाव्यात :डोमा:)
रच्याकने रैना, विचलित झालेल्या चित्ताचे समाधान करून घेणे योग्य...:फिदी: ये तिकडे, भेटू या.

माझ्या पाकृने फायदा झालेल्या सगळ्यांकडे पोशन पार्टी ड्यु आहे बरं का.

प्रसिक Lol

संघमित्रा, स्वागत आहे. यन्जॉय.

मृदुला, घाबरू नको बायो. नंतर गोळा करता येतात गॅलियन्स.

Pages