..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, गाडी रुळावर आहे पण मुक्कामाचं ठिकाण चाचपडतेय असं दिसतंय. Happy

कोडं ०४/००६:

'ह्या शनिवारी सकाळी आणखी कुठला प्रोग्रॅम नको ठेवूस रे." वर्षा मटार सोलता सोलता म्हणाली.
'का? नवा पिक्चर लागलाय. बघायला जायचं का विचारणारच होतो'.
'अरे सजल, असं काय करतोस? ते तिसर्‍या मजल्यावरचे मोने आहेत ना त्यांच्याकडे पार्टी आहे...त्यांच्या २५ व्या मॅरेज अ‍ॅनिव्हर्सरीची...तिथे जायचंय. काल मिसेस मोन्यांचा फोन आला होता'
'हायला, ते मोने लिफ्टमध्ये १ मिनिट भेटतात तेव्हाही बोअर करतात. तिथे पार्टिला कोण जाणार? त्या मिसेस मोन्यांना नोबेल दिलं पाहिजे. मी येणार नाही हा सांगून ठेवतो. '
'मग मी काय एकटी जाऊ? कारण काय सांगू पण आपण येत नाही त्याचं? मला खोटं बोलायला आवडत नाही हं'
'अग, सांग त्यांना की मी येऊ शकत नाही. आणि तुला एकटीला यायचं नाहिये'

वर्षा चतुर होती. मोन्यांची जुन्य हिंदी गाण्यांची आवड लक्षात घेऊन तिने आपण का येत नाहिये ते एका गाण्यातून असं काही सांगितलं की मोने नाराज व्हायच्या ऐवजी खुश झाले. ओळखा ते गाणं.

मार डालेगा दर्दे जिगर
कोई इसकी दवा किजीये
ये वफाई बहुत हो चुकी
आज कोई जफा किजीये..

चित्रपट : पति पत्नी.................. पण हे उत्तर असायची शक्यता कमीच आहे Sad

स्वप्ना,
००५:
जलता है जिया मोरा भीगी भीगी रातोंमे
आ जा गोरी चोरी चोरी अब तो रहा नही जाये रे
हाय रे हाय रे...

बरोबर श्रध्दा! Happy

कोडं ०४/००५:

' अग, ऐकलंस का? इथे ये लवकर' गोविंदराव घाबरेघुबरे होऊन बायकोला हाक मारू लागले.
'थांबा एक मिनिट, खिडकी बंद करून येते. जोराचा पाऊस आलाय.' रमाबाईंनी उत्तर दिलं.

'काही हवंय का?' थोड्या वेळाने आत येत त्यांनी विचारलं.
'अग, छातीत जळजळ होतेय मघापासून'
'तरी सांगत होते की मसाल्याचं वांगं एव्हढं खाऊ नका. तुम्हाला मसालेदार काही सहन होत नाही'
'हो ग बाई. सगळं खरं तुझं पण आता काय करू सांग. डॉक्टर गोर्‍यांना फोन करतेस का? नाहितर रात्रभर मला झोप येणार नाही"

'करते ना, मला मेलीला दुसरं काय काम आहे? सांगितलेलं ऐकायचं नाही आणि मग मला नाचवायचं. मी काय १५-१६ वर्षाची तरूणी आहे आता?' रमाबाईंनी पुटपुटत फोन लावला.

काही वेळाने पुन्हा खोलीत येत त्या गोविंदरावांना म्हणाल्या 'अहो, डॉक्टर गोरे नाहियेत घरी. बाहेरगावी गेलेत म्हणे'.
'त्यांची बायको पण डॉक्टर आहे ना? तिला बोलव'
'अहो, तुम्हाला माहित आहे ना? डॉक्टर गोर्‍यांना आवडत नाही तिने त्यांच्या पेशन्टना ट्रीट केलेलं. त्यांचा तो गडी लगेच चुगली करतो म्हणे"
"खड्ड्यात गेला डॉक्टर गोरे. तू तिला म्हणावं मागच्या दरवाज्याने ये आणि काहीतरी औषध देऊन जा."

गोविंदराव गायच्या परिस्थितीत नव्हते म्हणून पण हेच एका जुन्या हिंदी गाण्याचा वापर करून त्यांन कसं सांगता आलं असतं?

उत्तरः
जलता है जिया मोरा भीगी भीगी रातोंमे
आ जा गोरी चोरी चोरी अब तो रहा नही जाये रे
हाय रे हाय रे...

हायला, मला वाटले नुसता किश्शांचा धागा वाचूनच मला काही झाले की काय! म्हणून परत तपासले Happy

००६ नाही सुटले आजून.

अरे सॉरी रे.....मी पण सकाळपासून थोडी भंजाळलेय आज. क्लू - नवराबायकोंची नावं आणि त्यांच्या पार्टीला न जाण्याचं कारण

कोडं क्र. ०४/००७

श्रीमती हातारी यांना दोन मुलं असतात. करबुडवा आणि रडकुंडा. रडकुंडा बिचारा मुका असतो आणि करबुडवा आपल्या (भारतातील एका राज्यात बोलल्या जाणार्‍या भाषेतल्या अर्थानुसार) नावाला जागणारा असतो. तर असाच एकदा करबुडवा एका दुष्ट खाटकाकडून कर्ज काढतो आणि गहाण म्हणून त्यांच्याकडचे दोन बैल ठेवतो. पण करबुडवा आपल्या नावाला जागल्यामुळे, खाटीक त्याचे बैल जप्त करून आपल्या गोठ्यात बांधून ठेवतो. शेवटी श्रीमती हातारीच स्वतःकडचे पैसे खाटकाला देतात आणि बैल परत करण्याची विनंती करतात. खाटीक सांगतो की तुमच्या मुलांपैकी कोणाला तरी येऊन घेऊन जायला सांगा. पण दोघेही खाटकाला घाबरतात आणि जायलाच तयार होत नाहीत. तर श्रीमती हातारी कोणतं गाणं म्हणतील?

सध्या चिक्कार बिझी असल्याने जास्त वेळ या धाग्यावर येता येत नाही. Sad पण अधुन मधुन डोकावत राहतोय. Happy

चौथ्या भागातील माझे हे पहिले चित्रकोडे:

कोडं क्र. ०४/००८

तोडलंस श्रध्दा! तुला दिनेशदांतर्फे दोन आफ्रिकन गायी बक्षिस. Happy

कोडं क्र. ०४/००७

श्रीमती हातारी यांना दोन मुलं असतात. करबुडवा आणि रडकुंडा. रडकुंडा बिचारा मुका असतो आणि करबुडवा आपल्या (भारतातील एका राज्यात बोलल्या जाणार्‍या भाषेतल्या अर्थानुसार) नावाला जागणारा असतो. तर असाच एकदा करबुडवा एका दुष्ट खाटकाकडून कर्ज काढतो आणि गहाण म्हणून त्यांच्याकडचे दोन बैल ठेवतो. पण करबुडवा आपल्या नावाला जागल्यामुळे, खाटीक त्याचे बैल जप्त करून आपल्या गोठ्यात बांधून ठेवतो. शेवटी श्रीमती हातारीच स्वतःकडचे पैसे खाटकाला देतात आणि बैल परत करण्याची विनंती करतात. खाटीक सांगतो की तुमच्या मुलांपैकी कोणाला तरी येऊन घेऊन जायला सांगा. पण दोघेही खाटकाला घाबरतात आणि जायलाच तयार होत नाहीत. तर श्रीमती हातारी कोणतं गाणं म्हणतील?

उत्तर :
कैद मे है बुलबुल(दोन बैल) सैयाद मुस्कुराये
'कहा' भी न जाये 'चुप' 'रहा' भी न जाये

आहे मी, पण इतर कामं करता करता मधून मधून डोकावतेय.

जिप्सी ००८ मधलं दुसरं चित्रं काय आहे ते कळत नाहीये. त्या माणसाच्या हातात काय आहे? ओह ओके. आलं लक्षात. लाऊडस्पीकर आहे. Happy

जीप्सी

ची. को. ००४/००८

रात दिने, क्या कहू, प्यार, सावन , यु ??????????

ची.को. ००४/००९
पर? अंगुठी? तालाब, जल, तुफान, रात, अंधेरा

मला येवढच येतं ( नीराश बाहुली )

माधव बरोबर Happy
तुम्हाला एक प्लेट गरमागरम कांदाभजी आणि वाफाळलेला गवती चहा Happy
मला १००% खात्री होती कि हे गाणं तुम्ही किंवा स्वप्ना नक्की ओळखणार Happy

००४/००९
फिरसे आईयो बदरा बिदेसी तेरे पंखोंपे मोती जडुंगी
घिरके आईयो हमारी तलैया मै तलैया किनारे मिलुंगी
तुझे मेरी काली कंबलीवाले कि सौं

तुझे मेरी काली कमली वाली कि सौं >>> या गाण्याचे आधीचे शब्द माहितच नव्हते. मस्त.

ते काली कंबलीवाले असं आहे = कृष्ण.

००४/००८
जिप्स्या...मलाही नाही कळलं ते चित्र काय आहे ते.>>>>>त्या चित्रात माणसाच्या हातात भोंगा आहे Happy आणि त्यावर प्रश्नचिन्ह Wink आता ओळखा. Happy (हा एक "क्लु"च समजा)

Pages