Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06
आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.
आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
०४/०५३: खूबसुरत हसीना जानेजा
०४/०५३:
खूबसुरत हसीना जानेजा जानेमन
रंग जिसके लबोंका ढुंढता है चमन
हुश्श आलं एकदाचं
माझ्या ४८ नंबरच्या कोड्याचा
माझ्या ४८ नंबरच्या कोड्याचा क्लू आहे फळा. आता आलंच पाहिजे. आणि इतके दिवस लावले म्हणून ओळखणार्याला काहीही बक्षिस मिळणार नाही.
है शाब्बास माधव ४/०५३:
है शाब्बास माधव
४/०५३:
खूबसुरत हसीना जानेजा जानेमन
रंग जिसके लबोंका ढुंढता है चमन
तू नही तू नही वो हसी तो सनम
कोई और हि है...
मामीकडुन उरलेले अर्धे ग्लुकॉन डि उरलेल्या अर्ध्या पाण्यात मिक्स करून घ्या..
स्वप्ना हे गाणे मला माहीत
स्वप्ना हे गाणे मला माहीत नाहीये पण तुझ्या क्लूवरून गुगलल्यावर मिळाले
०४८:
फलक तक चल साथ मेरे
जिप्सी, मामीने आधीच दोन थेंब समुद्रात बुडवलेत आता मला कोरडेच ग्लुकॉनडी खावे लागेल
माधव
माधव
हुश्श माधव! कोडं
हुश्श माधव!
कोडं ०४/०४८:
गणिताचा तास सुरु झाला मात्र. सगळ्यांनी जांभया द्यायला सुरुवात केली. मास्तरांची शिकवायची पध्दतच तशी होती. मागच्या बाकावर साने आणि मोनेच्या गप्पा रंगात आल्या होत्या. नुकत्याच दौर्यावर आलेल्या इंग्लीश टीमने भारतीय संघाला कसा धू धू धुतला ह्याबद्दलची चर्चा मागच्या बाकांची मर्यादा ओलांडून लवकरच मास्तरांपर्यंत पोचली. त्यांनी चष्म्याच्या काचेतून त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा मोने तावातावाने काहीतरी सांगत होता. 'मोने, काय चाललंय?' त्यांनी गर्जना केली. आणि मोनेचे पुढचे शब्द घशात अडकले.
"सर, मी...'
'काय मी? काय मी? मी इथे जीव तोडून भूमिती शिकवतोय आणि तू तिथे गप्पा मारतो आहेस? ये इथे'
'सर, सॉरी सर....पुन्हा नाही करणार'
'ते बघू, आधी इथे ये आणि हे फळ्यावर लिहिलेलं प्रमेय सोडवून दाखव वर्गाला.'
मोनेला घाम फुटला. त्याने सानेकडे पाहिलं तर तो आपण त्या गावचेच नाही अश्या थाटात बसला होता. त्याने सानेकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. चूक दोघांची पण सजा आपल्याला एकट्याला भोगावी लागते ह्याचा त्याला राग आला होता. सानेची मानगूट धरून त्याला खेचत न्यावं असा विचार त्याच्या मनात येत होता पण मास्तरांच्या हातातल्या छडीकडे पाहून त्याने तो बदलला. सानेला हिंदी गाण्यांचं वेड होतं. मोनेला आयडिया सुचली.
मोनेने कुठलं गाणं म्हणून सानेला आपल्यासोबत यायला सांगितलं असेल?
उत्तरः
फलक तक चल साथ मेरे
अरे, ह्या बीबीवर पण अर्धशतक
अरे, ह्या बीबीवर पण अर्धशतक झालं आपलं. सगळ्यांचं अभिनंदन!
स्वप्ना, जिप्सी ... ही गाणी
स्वप्ना, जिप्सी ... ही गाणी माहित नव्हती.
खूबसुरत हसीना जानेजा जानेमन
खूबसुरत हसीना जानेजा जानेमन मिस्टर एक्स इन बॉम्बे मधलं.
खूबसुरत हसीना जानेजा जानेमन
खूबसुरत हसीना जानेजा जानेमन मिस्टर एक्स इन बॉम्बे मधलं.>>>>बरोबर स्वप्ना
याच्याच मुखड्याची चाल अन्नु मलिकने "बाजीगर"मध्ये "ए मेरे हमसफर ए मेरी जाने जां" ला घेतलीय.
मामी, छान आहे ते
मामी, छान आहे ते गाणे.
स्वप्ना, फलक नावाचा सिनेमा आला होता, त्यावेळी फलक चा अर्थ आकाश, असे मुद्दाम जाहीरातीत सांगत असत !
०४/०५७: बंड्या एक गोड पण
०४/०५७:
बंड्या एक गोड पण व्रात्य मुलगा. एका निवांत दुपारी तो रामरावांकडे घाबराघुबरा होउन येतो. 'आजोबा, माझ्या हातून बाबांचे पुस्तक फाटले' 'हात्तीच्या! एवढेच ना? आपण चिकटवून टाकूया. बाबांना कळणार पण नाही'. असे म्हणून फडताळातला गोंद काढायला रामराव स्टूलावर चढतात. इतक्यात बेल वाजते. बंड्या दार उघडतो. रामरावांचे ब्रिज-पार्ट्नर शामराव आलेले असतात.
पुढच्या आठवड्यात, बंड्या ताईची माळ तोडतो. मग त्याला वाचवायला आजोबा फेविकॉल काढत असतात स्टुलावर चढून तेंव्हाच नेमके शामराव येतात. याला म्हणतात योगायोग. पण त्यावर रामरावांना हे गाणे म्हणण्याशिवाय गत्यंतर नसते.
माधव, फेव्हिकॉलसे?
माधव,
फेव्हिकॉलसे?
फलक नावाचा सिनेमा आला होता,
फलक नावाचा सिनेमा आला होता, त्यावेळी फलक चा अर्थ आकाश, असे मुद्दाम जाहीरातीत सांगत असत >>>दिनेशदा, अजुन एक गाण आहे ना "फलक से तोडके सितारे लोग लाये है....कोई नजराना लेके आया हु....."
स्वप्नाच्या कोड्यात मात्र हा "फलक" परफेक्ट बसलाय.
ब्रिजवासी शाम वरून काही आहे
ब्रिजवासी शाम वरून काही आहे का?
०४/०५७ फिर वही शाम वही गम वही
०४/०५७ फिर वही शाम वही गम वही तनहाई (?) है?
है शाब्बास, भम. ते 'निवांत
है शाब्बास, भम. ते 'निवांत दुपारी' तनहाईकरता आहे बहुतेक.
कोडं क्र. ०४/०५८ घराच्या
कोडं क्र. ०४/०५८
घराच्या खिडकीत उभं राहून बाहेर बघत असताना तात्यांना अचानक शेजारच्या घरातून रडण्याओरण्याचा आवाज आला. शेजारी नविनच रहायला आलेला मनिंदर सिंग आजही त्याच्या दोन लहान मुलींना मारत होता. तात्यांना रहावलंच नाही. त्यांनी सरळ पोलिस स्टेशनला फोन लावला आणि तक्रार नोंदवली. तक्रारीकरता कोणतं गाणं गायलं असेल? (मुलींची दोन नावं शोधा म्हणजे सापडेल. मी दिली असती तर फारच सोप्पं झालं असतं)
दिनेशदा, फलक पिक्चर म्हणजे
दिनेशदा, फलक पिक्चर म्हणजे जॅकी श्रॉफ आणि अमरिश पुरीचा ना? अमरिश पुरी कॉन्स्टेबल असतो. त्यात 'हम ना समझे थे बात इतनीसी' हे मस्त गाणं होतं.
०४/०५७: बंड्या एक गोड पण
०४/०५७:
बंड्या एक गोड पण व्रात्य मुलगा. एका निवांत दुपारी तो रामरावांकडे घाबराघुबरा होउन येतो. 'आजोबा, माझ्या हातून बाबांचे पुस्तक फाटले' 'हात्तीच्या! एवढेच ना? आपण चिकटवून टाकूया. बाबांना कळणार पण नाही'. असे म्हणून फडताळातला गोंद काढायला रामराव स्टूलावर चढतात. इतक्यात बेल वाजते. बंड्या दार उघडतो. रामरावांचे ब्रिज-पार्ट्नर शामराव आलेले असतात.
पुढच्या आठवड्यात, बंड्या ताईची माळ तोडतो. मग त्याला वाचवायला आजोबा फेविकॉल काढत असतात स्टुलावर चढून तेंव्हाच नेमके शामराव येतात. याला म्हणतात योगायोग. पण त्यावर रामरावांना हे गाणे म्हणण्याशिवाय गत्यंतर नसते.
उत्तरः
फिर वही शाम वही गम वही तनहाई है
रामराव स्टूलावर उभे असतात ना? मग त्यांचे तन हाई (high) झाले ना
भरतना त्या माळेतला एक मणी
हो तोच फलक.. आणि तेच
हो तोच फलक.. आणि तेच गाणे.
असे सहज न समजणार्या नावाचे फारच थोडे चित्रपट आले. नावच नाही समजलं, तर लोक काय बघणार, असे वाटत असेल.
नाखुदा या शब्दाचा अर्थ देवासमान, असे वाचून मला धक्काच बसला होत
दिनेशदा, फलक पिक्चर म्हणजे
दिनेशदा, फलक पिक्चर म्हणजे जॅकी श्रॉफ आणि अमरिश पुरीचा ना?>>>>तो "गर्दिश" ना?
माधव, .... तन हाईचा फंडा
माधव, ....
तन हाईचा फंडा जबरीच आहे.
अमरिश पुरी कॉन्स्टेबल असतो.
अमरिश पुरी कॉन्स्टेबल असतो. त्यात 'हम ना समझे थे बात इतनीसी' हे मस्त गाणं होतं.>>> नाही. तो गर्दिश.
जिप्सी, प्राची बरोबर. दिनेशदा
जिप्सी, प्राची बरोबर. दिनेशदा 'नाखुदा' चा अर्थ 'देवासमान'? बाप रे! 'नाखुदा का जीनको हमने नाम दिया है, उम्रभरका गम हमे इनाम दिया है' ह्या ओळीचा अर्थच बदलला की मग.
स्वप्ना ते "नाखुदा का हमने
स्वप्ना ते "नाखुदा का हमने जिन्हे नाम दिया है....उम्रभरका गम हमे इनाम दिया है" असं आहे.
म्हणजे "मी ज्याला देवासमान मानले त्यानेच आयुष्यभराचा मनस्ताप ( :फिदी:) दिलाय" असा अर्थ झाला ना?
कोडं क्र. ०४/०५९ एकदम सोप्पय
कोडं क्र. ०४/०५९
एकदम सोप्पय
नाखुदाचा अर्थ अगदी बरोब्बर
नाखुदाचा अर्थ अगदी बरोब्बर उलटा असेल असं वाटायचं. खुदासारखा नसलेला म्हणजे सैतान टाईप्स.
बरं त्या कोड्याचं बघा की काहीतरी .....
के हमतुम चोरी से, बंधे एक
के हमतुम चोरी से, बंधे एक डोरी से
जैय्यो कहा ऐ हुजुर!
के हम तुम चोरी से बंधे इक
के हम तुम चोरी से बंधे इक डोरी से जैयो कहां ऐ हुजूर
Pages