..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या बरोबर Happy माधव, नाही Sad

कोडं ०४/०४९:

सलीलचं लग्न झालं आणि हनिमूनचे बेत सुरु झाले. त्याचा एक मित्र नुकताच हिमालयात एके ठिकाणी जाऊन आला होता. त्याने त्या स्थळाचं एव्हढं वर्णन केलं की मागचापुढचा विचार न करता सलीलने बुकिंग करून टाकलं.

यथावकाश तो आणि त्याची बायको विद्युत तिथे जाऊन पोचले. हॉटेलची गाडी यायला थोडा अवधी होता म्हणून स्टेशनच्या बाहेर येऊन काहीतरी खावं म्हणून हॉटेलात गेले तर चारही टेबलं भरलेली. पाचव्या टेबलावर जेमतेम २ जण दाटीवाटीने बसतील अशी जागा. एकजात सगळी पृथुल गिर्‍हाईकं. कशीतरी न्याहारी उरकून दोघे बाहेर आली तरी गाडीचा पत्ता नाही. समोरच्या दुकानात कॉस्मेटिक ज्वेलरी दिसली म्हणून विद्युत तिथे वळली तरी तेच. सगळं दुकान खात्या-पित्या घरच्या लोकांनी भरलेलं. 'छ्या! काय इथली हवा भरली आहे की काय ह्या लोकांत' वैतागून ती म्हणाली.

शेवटी एकदाची त्यांची गाडी आली. ह्यांना पाहून ड्रायव्हर थोडा चमकला. लगेच सावरून त्याने गाडीचा दरवाजा उघडला. प्रवास सुरु झाला आणि ह्या दोघांचं आसपासच्या लोकांकडे पाहणं ड्रायव्हरच्या लक्षात आलं. तो रेअर व्ह्यू मिररमधून ह्यांच्याकडे हसत पहात म्हणाला 'क्या देख रहे हो साहब?' दोघं ओशाळली. 'कुछ नही, कुछ नही' असं म्हणत गप्प झाली. 'वो क्या है ना साहब, यहा एक स्पेशल - वो क्या कहते है, हा स्पा है. मोटापा कम करने के लिये. इस लिये पूरा साल यहा ऐसे लोगोंकी भीड रहती है. इसी लिये आपको देखा तो मै पहले हैरान हो गया'.

'अच्छा, अच्छा.' सलील म्हणाला.
'गाना लगाऊ तो चलेगा ना साहब? १ घंटेका सफर है'
'जी हा, हमे कोई ऐतराज नही' विद्युत म्हणाली.

जे गाणं लागलं ते मात्र असलं चपखल होतं की सलील आणि विद्युत दोघांचीही हसता हसता मुरकुंडी वळली. ओळखा ते गाणं.

क्लू: गाणं गोल्डन एरातलं नाही.

उत्तरः

हुस्न पहाडोंका
क्या कहना के बारो महिने
यहां मौसम जाडो का

कोडं ०४/०५०:

Golden Oriole हे ब्रॅन्डचं बोधचिन्ह असलेल्या डाळ-तांदूळ विकणार्‍या कंपनीने १५ ऑगस्टला जाहिरातीत गोल्डन एरामधलं कोणतं गाणं वापरलं असेल?

कोडं ०४/०५१:

'अरे पक्या, लेका, किती वेळा सांगायचं तुला? भूत, आत्मे वगैरे सगळं झूट असतं.' अम्या वैतागून म्हणाला.
'अच्चं का? मग ये ना ह्या रविवारी आमच्याबरोबर. दूधका दूध पानीका पानी होऊन जाऊ देत एकदा' पक्या चेवाने म्हणाला.
'रविवारी? कुठे?'
'तो गावापलिकडे पडका वाडा आहे त्यात ते पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनवाले येणार आहेत. चल तू पण'
हो ना करता करता अम्या पक्यासोबत जायला तयार झाला.

पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनवाल्यांनी तयारी तर अगदी जय्यत केली होती. कॅमेरे, हिट सेन्सिंग मशिन्स वगैरे काय काय लावलं होतं. रात्री अपरात्री वाड्यात पांढरी साडी नेसून फिरणार्‍या हडळीचं आज काही खरं दिसत नव्हतं.

रात्र चढू लागली पण काहीच होईना. भूतच काय पण काळं मांजरही दिसत नव्हतं. अम्याची चुळबूळ चालू झाली. 'पक्या चल रे, काही होत नाहिये इथे'
'थांब रे, जाऊ यात अर्ध्या एक तासाने'

शेवटी कंटाळून अम्याने गोल्डन एरामधल्या एका गाण्याची सुरुवातीची ओळ परत परत गुणगुणायला सुरुवात केली. ओळखा ती ओळ.

श्रध्दा, मी_आर्या बरोबर Happy

कोडं ०४/०५०:

Golden Oriole हे ब्रॅन्डचं बोधचिन्ह असलेल्या डाळ-तांदूळ विकणार्‍या कंपनीने १५ ऑगस्टला जाहिरातीत गोल्डन एरामधलं कोणतं गाणं वापरलं असेल?

उत्तरः
जहाँ डाल-डाल पर
सोने की चिड़ियां करती है बसेरा
वो भारत देश है मेरा

मामी Happy

कोडं ०४/०५१:

'अरे पक्या, लेका, किती वेळा सांगायचं तुला? भूत, आत्मे वगैरे सगळं झूट असतं.' अम्या वैतागून म्हणाला.
'अच्चं का? मग ये ना ह्या रविवारी आमच्याबरोबर. दूधका दूध पानीका पानी होऊन जाऊ देत एकदा' पक्या चेवाने म्हणाला.
'रविवारी? कुठे?'
'तो गावापलिकडे पडका वाडा आहे त्यात ते पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनवाले येणार आहेत. चल तू पण'
हो ना करता करता अम्या पक्यासोबत जायला तयार झाला.

पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनवाल्यांनी तयारी तर अगदी जय्यत केली होती. कॅमेरे, हिट सेन्सिंग मशिन्स वगैरे काय काय लावलं होतं. रात्री अपरात्री वाड्यात पांढरी साडी नेसून फिरणार्‍या हडळीचं आज काही खरं दिसत नव्हतं.

रात्र चढू लागली पण काहीच होईना. भूतच काय पण काळं मांजरही दिसत नव्हतं. अम्याची चुळबूळ चालू झाली. 'पक्या चल रे, काही होत नाहिये इथे'
'थांब रे, जाऊ यात अर्ध्या एक तासाने'

शेवटी कंटाळून अम्याने गोल्डन एरामधल्या एका गाण्याची सुरुवातीची ओळ परत परत गुणगुणायला सुरुवात केली. ओळखा ती ओळ.

उत्तरः
कोई नही है, फिर भी है मुझको
ना जाने किसका इंतजार

आता फक्त हे राहिलं

कोडं ०४/०४८:

गणिताचा तास सुरु झाला मात्र. सगळ्यांनी जांभया द्यायला सुरुवात केली. मास्तरांची शिकवायची पध्दतच तशी होती. मागच्या बाकावर साने आणि मोनेच्या गप्पा रंगात आल्या होत्या. नुकत्याच दौर्‍यावर आलेल्या इंग्लीश टीमने भारतीय संघाला कसा धू धू धुतला ह्याबद्दलची चर्चा मागच्या बाकांची मर्यादा ओलांडून लवकरच मास्तरांपर्यंत पोचली. त्यांनी चष्म्याच्या काचेतून त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा मोने तावातावाने काहीतरी सांगत होता. 'मोने, काय चाललंय?' त्यांनी गर्जना केली. आणि मोनेचे पुढचे शब्द घशात अडकले.

"सर, मी...'
'काय मी? काय मी? मी इथे जीव तोडून भूमिती शिकवतोय आणि तू तिथे गप्पा मारतो आहेस? ये इथे'
'सर, सॉरी सर....पुन्हा नाही करणार'
'ते बघू, आधी इथे ये आणि हे फळ्यावर लिहिलेलं प्रमेय सोडवून दाखव वर्गाला.'

मोनेला घाम फुटला. त्याने सानेकडे पाहिलं तर तो आपण त्या गावचेच नाही अश्या थाटात बसला होता. त्याने सानेकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. चूक दोघांची पण सजा आपल्याला एकट्याला भोगावी लागते ह्याचा त्याला राग आला होता. सानेची मानगूट धरून त्याला खेचत न्यावं असा विचार त्याच्या मनात येत होता पण मास्तरांच्या हातातल्या छडीकडे पाहून त्याने तो बदलला. सानेला हिंदी गाण्यांचं वेड होतं. मोनेला आयडिया सुचली.

मोनेने कुठलं गाणं म्हणून सानेला आपल्यासोबत यायला सांगितलं असेल?

मौसम जाडों का भारी आहे. सरस्वतीवंदनेतले नि:शेष जाड्या पहा आणि पुन्हा चिमणाराव आठवले.

मामी, आपका आदेश सर-आंखोपर
बक्षीसाची सूची पुढीलप्रमाणे:

जिप्सी - प्लेटस भरभरुन खमंग कांदाभजी आणि रसगुल्ले
श्रध्दा, मी_आर्या - अनलिमिटेड गरमागरम पावभाजी आणि फालुदा
मामी - श्रीकृष्णकडचे बटाटेवडे (तळलेली मिरची मारके) आणि हिमालयमधली रबडी कुल्फी - ऑल यू कॅन इट (मामी शेजारी आहेत त्यामुळे थोडी पार्शेलिटी झालीय!)

बिंगो माधव Happy

कोडं ०४/०५४:

रंगीला रे तेरे रंग मे यू रंगा है मेरा मन
छलिया रे ना बुझे है किसी जल से ये जलन

स्वप्नाने दिलेल्य बक्षीसांपैकी कुठलही एक(च) उचला Proud

मामी, तू येऊन गेल्यावर जिप्सी बघ कसा उधळपट्टी करतोय ते! मला आख्खच्या आख्ख बक्षीस देतोय. कसं होणार अशाने? Wink Light 1 Light 1

एक दिवा मामीकरता आणि दुसरा जिप्सीकरता आहे. जास्त विज वापरल्याबद्दल एक डाव माफी Happy

मी_आर्या, मामी, माधव नाही. जिप्सी कंजूष, स्वतःचं बक्षीस दे की. Happy आणि क्लूचं म्हणशील तर पाणी H2O ऐवजी HO असतं तर काय झालं असतं?

कोडं ०४/०५५:

पॅसिफिक सागरावर एकत्र आलेले काळेकुट्ट ढग. आपल्या दृष्टिनं ते केवळ ढगच असले तरी त्या ढगांत एक वेगळच जगही असतं बरं का! तर असे दोन वेगवेगळ्या देशातल्या पाण्यानं बनलेले दोन वेगवेगळे ढग जवळजवळ येतात आणि वीज चमकते. आकाशात नाही तर त्या दोन ढगातल्या दोन थेंबांच्या मनात. बघताक्षणी ते दोन तरूण पाणीदार थेंब एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण हाय रे दैवा! त्यांच्या बुजुर्ग थेंबांना हे मान्य नसतं. असे दोन वेगवेगळ्या ढगांतले थेंब एकत्र येऊ शकणार नाहीत अशी त्यांच्यात जातीव्यवस्था असते. यावर उपाय म्हणून 'तो' थेंब एक गाणं म्हणून 'ती' थेंबाला आपल्या मनातला विचार सांगतो. ते गाणं कोणतं???

कृतज्ञतापत्र : या कोड्याची प्रेरणा स्वप्नाच्या कोडं क्रमांक ०५२ वरून घेतली आहे. स्वप्नाला कृतज्ञतापत्र म्हणून आजचं वर्तमानपत्रं उद्या देण्यात येईल.

Pages