..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बाप रे! हा धागा परत वाहायला लागला की. धन्स जिप्सी विपूत येऊन सांगितल्याबद्दल. चित्रांची कोडी हापिसात फार पहाता येत नाहीत. कारण आजूबाजूवाल्यांना लगेच दिसतात.

सर्व कोडी घालणार्‍या आणि ती सोडवणार्‍या सभासदांना _/\_

सध्या थोडा बीझी असल्याने चित्रकोडी बनवता येत नाही आहे, पण भरपूर गाणी डोक्यात आहेत अजुन चित्रकोडी घेऊन लवकरच येईन. तो पर्यंत शब्दकोडी येऊ द्यात. Happy

कोडं ०४/०४७:

खरं तर जाहिरात नेहमीचीच. पुरुषांच्या डिओची. तोच तो घिसापीटा फॉर्म्युला.एक कॉलेज. एक मुलगी गेटबाहेर पडते. एक मुलगा तिच्याशी बोलायला येतो. कॉफी घ्यायला जाऊ का म्हणून विचारतो. ती नाही म्हणते. त्याचा चेहेरा पडतो. मग एक मित्र त्याला त्या डिओबद्दल सांगतो. दुसर्‍या दिवशी ती मुलगी पुन्हा गेटबाहेर पडत असते. हा मुलगा त्या डिओचा फवारा अंगावर मारून घेतो. ती मुलगी धावत धावत त्याच्याकडे येते आणि जवळजवळ ओढत ओढत त्याला कॅफेमध्ये नेते.

हे सगळं बघणारे त्याचे मित्र गोल्डन एरामधलं एक गाणं म्हणतात. काय असतं ते गाणं?

कोडं ०४/०४८:

गणिताचा तास सुरु झाला मात्र. सगळ्यांनी जांभया द्यायला सुरुवात केली. मास्तरांची शिकवायची पध्दतच तशी होती. मागच्या बाकावर साने आणि मोनेच्या गप्पा रंगात आल्या होत्या. नुकत्याच दौर्‍यावर आलेल्या इंग्लीश टीमने भारतीय संघाला कसा धू धू धुतला ह्याबद्दलची चर्चा मागच्या बाकांची मर्यादा ओलांडून लवकरच मास्तरांपर्यंत पोचली. त्यांनी चष्म्याच्या काचेतून त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा मोने तावातावाने काहीतरी सांगत होता. 'मोने, काय चाललंय?' त्यांनी गर्जना केली. आणि मोनेचे पुढचे शब्द घशात अडकले.

"सर, मी...'
'काय मी? काय मी? मी इथे जीव तोडून भूमिती शिकवतोय आणि तू तिथे गप्पा मारतो आहेस? ये इथे'
'सर, सॉरी सर....पुन्हा नाही करणार'
'ते बघू, आधी इथे ये आणि हे फळ्यावर लिहिलेलं प्रमेय सोडवून दाखव वर्गाला.'

मोनेला घाम फुटला. त्याने सानेकडे पाहिलं तर तो आपण त्या गावचेच नाही अश्या थाटात बसला होता. त्याने सानेकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. चूक दोघांची पण सजा आपल्याला एकट्याला भोगावी लागते ह्याचा त्याला राग आला होता. सानेची मानगूट धरून त्याला खेचत न्यावं असा विचार त्याच्या मनात येत होता पण मास्तरांच्या हातातल्या छडीकडे पाहून त्याने तो बदलला. सानेला हिंदी गाण्यांचं वेड होतं. मोनेला आयडिया सुचली.

मोनेने कुठलं गाणं म्हणून सानेला आपल्यासोबत यायला सांगितलं असेल?

नाही माधव. आणखी एक क्लू देते - ज्या दोन गायिकांनी हे गाणं गायलं आहे त्यातली एक हिंदू आहे आणि एक मुसलमान.

कोडं ०४/०४७:

खरं तर जाहिरात नेहमीचीच. पुरुषांच्या डिओची. तोच तो घिसापीटा फॉर्म्युला.एक कॉलेज. एक मुलगी गेटबाहेर पडते. एक मुलगा तिच्याशी बोलायला येतो. कॉफी घ्यायला जाऊ का म्हणून विचारतो. ती नाही म्हणते. त्याचा चेहेरा पडतो. मग एक मित्र त्याला त्या डिओबद्दल सांगतो. दुसर्‍या दिवशी ती मुलगी पुन्हा गेटबाहेर पडत असते. हा मुलगा त्या डिओचा फवारा अंगावर मारून घेतो. ती मुलगी धावत धावत त्याच्याकडे येते आणि जवळजवळ ओढत ओढत त्याला कॅफेमध्ये नेते.

हे सगळं बघणारे त्याचे मित्र गोल्डन एरामधलं एक गाणं म्हणतात. काय असतं ते गाणं?

उत्तरः

चली चली कैसी हवा ये चली
के भवरेपे मरने लगी है कली

चित्रपट: ब्लफमास्टर
गायिका: शमशाद बेगम, उषा मंगेशकर

जिप्सी, अनू कपूरच्या मस्ती चॅनेलवरच्या गोल्डन एरावरच्या कार्यक्रमात मी हे गाणं पहिल्यांदा ऐकलं आणि पाहिलं.

४८ चं पण उत्तर सांगू का?

कोडं ०४/०४९:

सलीलचं लग्न झालं आणि हनिमूनचे बेत सुरु झाले. त्याचा एक मित्र नुकताच हिमालयात एके ठिकाणी जाऊन आला होता. त्याने त्या स्थळाचं एव्हढं वर्णन केलं की मागचापुढचा विचार न करता सलीलने बुकिंग करून टाकलं.

यथावकाश तो आणि त्याची बायको विद्युत तिथे जाऊन पोचले. हॉटेलची गाडी यायला थोडा अवधी होता म्हणून स्टेशनच्या बाहेर येऊन काहीतरी खावं म्हणून हॉटेलात गेले तर चारही टेबलं भरलेली. पाचव्या टेबलावर जेमतेम २ जण दाटीवाटीने बसतील अशी जागा. एकजात सगळी पृथुल गिर्‍हाईकं. कशीतरी न्याहारी उरकून दोघे बाहेर आली तरी गाडीचा पत्ता नाही. समोरच्या दुकानात कॉस्मेटिक ज्वेलरी दिसली म्हणून विद्युत तिथे वळली तरी तेच. सगळं दुकान खात्या-पित्या घरच्या लोकांनी भरलेलं. 'छ्या! काय इथली हवा भरली आहे की काय ह्या लोकांत' वैतागून ती म्हणाली.

शेवटी एकदाची त्यांची गाडी आली. ह्यांना पाहून ड्रायव्हर थोडा चमकला. लगेच सावरून त्याने गाडीचा दरवाजा उघडला. प्रवास सुरु झाला आणि ह्या दोघांचं आसपासच्या लोकांकडे पाहणं ड्रायव्हरच्या लक्षात आलं. तो रेअर व्ह्यू मिररमधून ह्यांच्याकडे हसत पहात म्हणाला 'क्या देख रहे हो साहब?' दोघं ओशाळली. 'कुछ नही, कुछ नही' असं म्हणत गप्प झाली. 'वो क्या है ना साहब, यहा एक स्पेशल - वो क्या कहते है, हा स्पा है. मोटापा कम करने के लिये. इस लिये पूरा साल यहा ऐसे लोगोंकी भीड रहती है. इसी लिये आपको देखा तो मै पहले हैरान हो गया'.

'अच्छा, अच्छा.' सलील म्हणाला.
'गाना लगाऊ तो चलेगा ना साहब? १ घंटेका सफर है'
'जी हा, हमे कोई ऐतराज नही' विद्युत म्हणाली.

जे गाणं लागलं ते मात्र असलं चपखल होतं की सलील आणि विद्युत दोघांचीही हसता हसता मुरकुंडी वळली. ओळखा ते गाणं.

क्लू: गाणं गोल्डन एरातलं नाही.

कारण त्यांना उत्तरं येत नाहीत, स्वप्ना. ए, कोण कोण पळाले रे? चुपचाप इथे कोपर्‍यात उभे रहा.

०४८ मध्ये अफसाने आहे का?

जिप्स्या, तुला आता अक्रोडाचे अर्धे टरफल मिळणार आहे Wink

Pages