..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव बरोबर. तुला साजूक तुपाची धार असलेल्या पुरणपोळ्या - डझनभर!

कोडं ०४/०५२:

हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र होताना काय गाणं म्हणतील?

क्लू - पाणी H2O ऐवजी HO असतं तर काय झालं असतं?

उत्तरः
एक मै और एक तू
दोनो मिले इस तरह
और जो तनमन मे हो रहा है
ये तो होना ही था

०४/०५५ >>

१. मेरे मन की गंगा और तेरे मन की जमनाका
२. टिप टिप टिप टिप बारीश शुरु हो गई

मामी, "फना" मधलं गाणं आहे का?
१. कोई साजिश है बूंदो कि ?????

२. काले काले बादल जब भी छायेंगे
ये दिन प्यारे प्यारे याद आयेंगे ???

माधव, बरोबर वाटतंय Happy

०४/०५३>>>क्लु:

१. या गाण्याच्या मुखड्याची थोडी चाल अन्नु मलिकने त्याच्या एका हिट चित्रपटात वापरलीय. Happy

०४/०५५ : हम इहा पे डिक्लेअर करत हूं की अबतक किसीका उत्तर चपखल नही है. मंडली लोगोंको और तनिक दिमाग पर जोर देना होगा.

जिप्सी, अजून एक क्ल्यु दे ना प्लीज.>>>>अजुन काहि क्लु Happy

१. या गाण्याच्या मुखड्याची थोडी चाल अन्नु मलिकने त्याच्या एका हिट चित्रपटात वापरलीय
२. मिस्टर इंडिया Happy (आता लगेच ओळखता आलं पाहिजे गाणं) Happy

बिंगो माधव Happy Happy

०४/५६:
कलकी हसीन मुलाकात के लिये
आज रात केलिये
हम तुम जुदा होते है
अच्छा चलो सो जाते है

आपले बक्षीस कृपया येथुन घेऊन जावे. Proud

०४/५५:
मै तेरे प्यार में पागल ऐसे घुमता हुं,
जैसे मै कोई प्यासा बादल बदरी को ढुंढता हुं ????

(वाटतं तर नाही Sad )

येस्स, आर्या. Happy

कोडं ०४/०५५:

पॅसिफिक सागरावर एकत्र आलेले काळेकुट्ट ढग. आपल्या दृष्टिनं ते केवळ ढगच असले तरी त्या ढगांत एक वेगळच जगही असतं बरं का! तर असे दोन वेगवेगळ्या देशातल्या पाण्यानं बनलेले दोन वेगवेगळे ढग जवळजवळ येतात आणि वीज चमकते. आकाशात नाही तर त्या दोन ढगातल्या दोन थेंबांच्या मनात. बघताक्षणी ते दोन तरूण पाणीदार थेंब एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण हाय रे दैवा! त्यांच्या बुजुर्ग थेंबांना हे मान्य नसतं. असे दोन वेगवेगळ्या ढगांतले थेंब एकत्र येऊ शकणार नाहीत अशी त्यांच्यात जातीव्यवस्था असते. यावर उपाय म्हणून 'तो' थेंब एक गाणं म्हणून 'ती' थेंबाला आपल्या मनातला विचार सांगतो. ते गाणं कोणतं???

उत्तर : दोनों किसीको नजर नही आये, चल दर्या में डूब जाये

आर्याला, ग्लुकॉन-डी घातलेलं अर्धा पेला पाणी. स्वप्नाला २५ तारखेच्या वर्तमानपत्राचं पहिलं पान.

०४/०५३: ओळखा.

१. या गाण्याच्या मुखड्याची थोडी चाल अन्नु मलिकने त्याच्या एका हिट चित्रपटात वापरलीय
२. मिस्टर इंडिया (आता लगेच ओळखता आलं पाहिजे गाणं)
३. या गीताचा "गायक" चित्रपटाचा "नायक" आहे. (आतातरी ओळखा Sad )

काय कंजुस आहेस गं मामी!!
सर्वांना चांग्लं चुंगलं खाऊ घालतेस आणि मला ग्लुकॉन डी, तेही अर्धा ग्लास????
बरं तर बरं चमचाभर चहा नाही म्हणालीस. Proud

Pages