Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06
आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.
आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
०४/०४५ दाजीबाच्या मळ्यातला
०४/०४५
दाजीबाच्या मळ्यातला मुळा पक्का सनातनी होता. दुसर्या जातीत आपल्या शेंगा देणे त्याला अजीबात मान्य नव्हते. मुळ्याच्या मळ्याशेजारी एक कडधान्याचा मळा होता. एका मुळ्याच्या शेंगेचे कडधान्यावर प्रेम बसते. नावात बरेच साम्य असते त्यामुळे तिला ते कडधान्य आपल्याच जातीतले वाटत असते. पण जोपर्यंत ते आपल्या जातीतले नाही हे तिला कळते तोपर्यंत ती 'त्या'च्या प्रेमात आकंठ बुडली असते. प्रेमात भिती कसली? पण ते जाहीर करायला त्याची परवानगी हवी. मुळ्याची शेंग गाण्यातूनच 'त्या'ची परवानगी विचारते. ओळखा ते गाणे.
सूचना / क्लू: नि.ग. वर जाऊन प्रश्न विचारू नयेत.
मुळ्याची शेंग ????
मुळ्याची शेंग ????
रस्ता अचूक पकडला आहेस.
रस्ता अचूक पकडला आहेस.
ऐका दाजिबा?
ऐका दाजिबा?
दक्षिणा, नाही. मळेमालक नको,
दक्षिणा, नाही. मळेमालक नको, भाज्यांकडे बघा.
गाणं हिंदीय की
गाणं हिंदीय की मराठी?
मुळ्याची शेंग>>> तिला शेंगरी का काय म्हणतात ना?
कडधान्य >>> मूग, मटकी, चवळी की नुसतंच बीन?
मुळ्याची शेंग>>> तिला शेंगरी
मुळ्याची शेंग>>> तिला शेंगरी का काय म्हणतात ना?>>>>मामी त्याला "डिंगरी" म्हणतात बहुदा.
गाणं हिंदी आहे. शेंगरी का
गाणं हिंदी आहे.
शेंगरी का काय म्हणतात ना? >> डिंगरी. पण ते नाही उपयोगाचं
मूग, मटकी, चवळी की नुसतंच बीन? >> ह्याचं उत्तर आलं की गाणं ओळखलच.
अजुन काही क्लु?
अजुन काही क्लु?

येस्स जिप्सी, डिंगरी. तिला
येस्स जिप्सी, डिंगरी.
तिला कळते तोपर्यंत ती 'त्या'च्या प्रेमात आकंठ बुडली असते. >>>> माधव या कोड्याचं उत्तर गाणं नसून एखादी रेसिपी असेल असं वाटतय. राजम्याच्या रश्श्यात मुळ्याच्या शेंगांचे तुकडे घालून तो खदखदा उकळवावा टाईप्स.
अजुन काही क्लु? >> डिंगरी हे
अजुन काही क्लु? >> डिंगरी हे एकच नाव नाहिये
मामी खदाखदा उकळा काय? LPG किती महाग झालाय?
मामी खदाखदा उकळा काय? LPG
मामी खदाखदा उकळा काय? LPG किती महाग झालाय? >>> हो की! मग उकळवण्याची स्टेप गाळून टाका.
मुळ्याची शेंग = डिंगरी = मोगरी (नि.ग. वर जाऊन आले पण काय हाती नाय लागलं)
कडधान्य = चौली --> चोली????
मूगवरून मुंगडा.. मुंगडाही आठवलं.
०४/०४५ हुजूर-ए-वाला जो हो
०४/०४५ हुजूर-ए-वाला जो हो इजाजत तो हम ये सारे जहां से कहा दे
तुम्हारी अदाओं पे मरते हैं हम
ये किसने कहा है के डरते है हम
यात मुळ्याची शेंग कुठे आहे?
०४/०४५ दाजीबाच्या मळ्यातला
०४/०४५
दाजीबाच्या मळ्यातला मुळा पक्का सनातनी होता. दुसर्या जातीत आपल्या शेंगा देणे त्याला अजीबात मान्य नव्हते. मुळ्याच्या मळ्याशेजारी एक कडधान्याचा मळा होता. एका मुळ्याच्या शेंगेचे कडधान्यावर प्रेम बसते. नावात बरेच साम्य असते त्यामुळे तिला ते कडधान्य आपल्याच जातीतले वाटत असते. पण जोपर्यंत ते आपल्या जातीतले नाही हे तिला कळते तोपर्यंत ती 'त्या'च्या प्रेमात आकंठ बुडली असते. प्रेमात भिती कसली? पण ते जाहीर करायला त्याची परवानगी हवी. मुळ्याची शेंग गाण्यातूनच 'त्या'ची परवानगी विचारते. ओळखा ते गाणे.
उत्तरः
हुजूर-ए-वाला जो हो इजाजत
तो हम ये सारे जहाँ से कह दे
तुम्हारी अदाओं पे मरते हैं हम
ये किसने कहा है के डरते है हम
मुळ्याची शेंग - वाली (कोकणातला शब्द आहे)
तिच्याशी नावात साधर्म्य असणारे कडधान्य - वाल
भरत, तुम्हाला एका वालाचे बिरडे. फुलका तुमचा तुम्ही आणा
गोंधळ! आमच्याकडच्या कोकणात
गोंधळ! आमच्याकडच्या कोकणात चवळीच्या शेंगेला वाली म्हणतात.
मुळ्याच्या बियांची शेंग शोधल्यावर ही
मिळाली. पण त्याची भाजी करतात आणि त्या खातात हे ऐकले नाही.
वाल लक्षातच नाहीत. लै गंडवलं
भरत, वालीच्या शेंगा दिसायला
भरत, वालीच्या शेंगा दिसायला बर्याचशा चवळीसारख्या असतात. पण त्याला वेगळा वास असतो. ह्या बघा:
हो माधव.तुमचे बरोबर आहे.
हो माधव.तुमचे बरोबर आहे. आत्ता आईला विचारले. तिने सांगितले की चवळीच्या शेंगा वेगळ्या आणि वाली वेगळ्या. या तुम्ही दाखवलेल्या चित्रातल्या वालींचीच आमच्याकडे भाजी करतात. गावाला सकाळी पेजेबरोबर तोंडी लावायला हीच भाजी.
अण त्याच मुळ्याच्या शेंगा हे मात्र तिला मान्य नाही.
मयेकरजी या मुळ्याच्याच शेंगा
मयेकरजी या मुळ्याच्याच शेंगा आहेत. उग्र असतात. पण भाजी मस्त लागते आणि मीठ तिखट लावून उन्हात वाळवल्यातर तोंडी लावायला मस्त लागतात.
धन्यवाद दक्षिणाजी
धन्यवाद दक्षिणाजी
माधव, भरत __/\__ तुम्ही सगळे
माधव, भरत __/\__
तुम्ही सगळे मुळ्याची शेंग करत आहात तो "खायचा मुळाच" ना?

रच्याकने, "वाली" आठवलेलं पण "वाला" नाही.
०४/०४६ जादू शिकावी म्हणून
०४/०४६
जादू शिकावी म्हणून अमरसिंग जगभर फिरत असतो. शेवटी त्याला गुरु भेटतो. गुरु त्याला एका प्राण्याचे दुसर्या प्राण्यात रुपांतर करण्याची अद्भूत जादू शिकवतो. अमरसिंग गावी परत आल्यावर त्याच्या मित्राकडे - अकबरकडे - जातो. समोर एक बकरा बांधलेला असतो. अमरसिंगला आपली विद्या अकबरला दाखवायची असते म्हणून तो त्या बकर्याचे एका उ मध्ये रुपांतर करतो. ते बघून अकबर जाम वैतागतो. वैतागणार नाहीतर काय? इद दुसर्या दिवसावर येऊन ठेपलेला असतो.
त्यावर अमर म्हणतो, 'वैतागतोस कशाला? बकर्याचे फक्त रुपांतर केलय. त्याचे सूप करून गट्टम नाही केलय. अरे हीच जादू शिकण्यासाठी तर इतका देशविदेश फिरलो मी.' पण हे तो एका गाण्यातून सांगतो.
उत्तर सांगणार्या व्यक्तीला एक थेंब लायसिल देण्यात येइल. तेंव्हा त्वरा करा. या अमूल्य संधीचा लाभ घ्या.
उनसे, उनके, अज, अजा >>>असं
उनसे, उनके, अज, अजा >>>असं काही आहे का?
असं काहीही नाहीये क्लू १:
असं काहीही नाहीये
क्लू १: गाणारी आणि ते गाणं पडद्यावर सादर करणारी यांचा समसमा संयोग क्वचित दिसतो.
माधव, काहिच टोटल लागत नाहिए
माधव, काहिच टोटल लागत नाहिए
क्लू १: गाणारी आणि ते गाणं
क्लू १: गाणारी आणि ते गाणं पडद्यावर सादर करणारी यांचा समसमा संयोग क्वचित दिसतो.
क्लू २: आशाला सिनेमाबद्दल राष्ट्रीय पारितोषीक मिळाले होते.
०४/०४६ जुस्तजू जिसकी थी उसको
०४/०४६
जुस्तजू जिसकी थी उसको तो न पाया हमने
इस बहानेसे मगर देख ली दुनिया हमने
पाया सूप???? >>>>:हहगलो:
जिप्सी ०४/०४६ जादू शिकावी
जिप्सी
०४/०४६
जादू शिकावी म्हणून अमरसिंग जगभर फिरत असतो. शेवटी त्याला गुरु भेटतो. गुरु त्याला एका प्राण्याचे दुसर्या प्राण्यात रुपांतर करण्याची अद्भूत जादू शिकवतो. अमरसिंग गावी परत आल्यावर त्याच्या मित्राकडे - अकबरकडे - जातो. समोर एक बकरा बांधलेला असतो. अमरसिंगला आपली विद्या अकबरला दाखवायची असते म्हणून तो त्या बकर्याचे एका उ मध्ये रुपांतर करतो. ते बघून अकबर जाम वैतागतो. वैतागणार नाहीतर काय? इद दुसर्या दिवसावर येऊन ठेपलेला असतो.
त्यावर अमर म्हणतो, 'वैतागतोस कशाला? बकर्याचे फक्त रुपांतर केलय. त्याचे सूप करून गट्टम नाही केलय. अरे हीच जादू शिकण्यासाठी तर इतका देशविदेश फिरलो मी.' पण हे तो एका गाण्यातून सांगतो.
उत्तरः
जुस्त (just) जू जिसकी थी उसको तो न पाया हमने
इस बहानेसे मगर देख ली दुनिया हमने
हे राम! आणि आम्ही 'बकरा'च
हे राम!
आणि आम्ही 'बकरा'च शोधतोय.
वॉव, सह्ही गाणं माधव आणि
वॉव, सह्ही गाणं माधव आणि जिप्सी. ___/\___
तुमच्या सुपिक डोक्यांवरच्या केसांचा भांग पाडायला आणि गाण्याचा विचार करता तुम्हाला एक फणी देण्यात येत आहे. दोघं मिळून एकच वापरा किंवा मध्ये मोडून अर्धी अर्धी वापरा.
Pages