..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला मी उत्तर सांगुनच टाकतो आणि पळतो Proud

०४/०४२
होली आई होली आई देखो होली आई रे
खेलो खेलो रंग है, भीगा भीगा अंग है, कोई अपने संग है
होली आई होली आई देखो होली आई रे Proud

माझ्या आजच्या पाचही कोड्यात एक समानता आहे>>>>>सर्व गाणी "लता मंगेशकर आणि किशोर कुमार" यांच्या आवाजातली होती. Happy

०४/०४४
मस्तान दाणावाला हा जुन्या वस्तूंचा (antique) तस्कर असतो. जगभर त्याच्या हस्तकांचे जाळे पसरलेले असते. इजिप्तच्या राजवाड्याचा शिसवी (??) लाकडापासून बनवलेला आणि सोन्याचे अप्रतिम कोरिवकाम केलेला दरवाजा चोरबाजारात दाखल झाला आहे अशी त्याला कुणकुण लागते. त्याची अफाट किंमत येऊ शकते हे पण त्याला माहित असते. तो दरवाजा मिळवण्याकरता तो जंगजंग पछाडत असतो. काबुलचा त्याचा हस्तक तो दरवाजा काबुलमध्ये पोहचल्याचे त्याला कळवतो. मस्तान त्याला तो कसा हस्तगत करायचा याची योजना समजावून देतो. शेवटी एकदाचा तो दरवाजा लंडनमधील त्याच्या घरी येऊन पोहचतो. त्या दरवाज्याबरोबर हस्तकाने मस्तानभाईकरता खास त्याच्या आवडीची शेपूची भाजी पाठवलेली असते. पार्सल बघितल्यावर मस्तानभाई गायलाच लागतो आनंदाने. कुठलं बरं ते गाणं?

होली आई होली आई? >>>> होय>>>>हे गाण प्रत्येक होळी पौर्णिमेला वाजतच असतं.
अनिल कपूर, रती अग्नीहोत्री, वहिदा रेहमान, दिलीप कुमार इ. इ. (चित्रपट: मशाल)
याची चाल आपल्या "जैत रे जैत" च्या "जांभूळ पिकल्या झाडाखाली....." सारखी आहे. अर्थात दोन्ही गाण्याचे संगीतकार एकच "ह्रदयनाथ मंगेशकर". Happy
इथे हापिसात युट्युब ब्लॉक आहे नाहीतर लिंक शेअर केली असती.

माधव, दोन खार्‍या दाण्यात चार विजेते बसवा प्लीज. खूप अपेक्षा वाढवून ठेऊ नका. आमच्या कोड्यांच्यावेळी बक्षिसं देताना आमची पंचाईत होते.

शेपूला विंग्रजीत Dill म्हन्त्यात>>>>>सह्हीच, हा एक मोठठा क्लु आहे. :-), धन्स भरत. Happy

हो जिप्सी.... आहे खरं असं गाणं.

काबुल से आया है मेरा दिलदार
दिलबर यार, दिलबर यार, दिलबर यार
कितने दिनों के बाद करूँगी
आज मैं उस से प्यार~, यार ... Proud

तोंड धुऊन ये बरं दोन खारे दाणे आणि फुटाणा खायला.>>>>भरत, पण माधव कुठे कन्फर्म करतायत? उगाच तोंड धुण्यात पाणी कशाला फुकट घालवू. Proud

०४/०४४
मस्तान दाणावाला हा जुन्या वस्तूंचा (antique) तस्कर असतो. जगभर त्याच्या हस्तकांचे जाळे पसरलेले असते. इजिप्तच्या राजवाड्याचा शिसवी (??) लाकडापासून बनवलेला आणि सोन्याचे अप्रतिम कोरिवकाम केलेला दरवाजा चोरबाजारात दाखल झाला आहे अशी त्याला कुणकुण लागते. त्याची अफाट किंमत येऊ शकते हे पण त्याला माहित असते. तो दरवाजा मिळवण्याकरता तो जंगजंग पछाडत असतो. काबुलचा त्याचा हस्तक तो दरवाजा काबुलमध्ये पोहचल्याचे त्याला कळवतो. मस्तान त्याला तो कसा हस्तगत करायचा याची योजना समजावून देतो. शेवटी एकदाचा तो दरवाजा लंडनमधील त्याच्या घरी येऊन पोहचतो. त्या दरवाज्याबरोबर हस्तकाने मस्तानभाईकरता खास त्याच्या आवडीची शेपूची भाजी पाठवलेली असते. पार्सल बघितल्यावर मस्तानभाई गायलाच लागतो आनंदाने. कुठलं बरं ते गाणं?

उत्तर:
काबूलसे आया है मेरा दिलदार
दिलबर यार, दिलबर यार, दिलबर यार

चित्रपटः पालेखाँ
गायिका: आशा
संगितः आर.डी.

ज्यांना गाणे ऐकले नसेल त्यांनी नक्की ऐका. (पहायचे असल्यास आपापल्या जबाबदारीवर पहा)

जिप्सी, तुला अर्धा खारा दाणा - मामीच्या हुक्मावरून. (उरलेले दीड खारे दाणे मी मस्तानभाईकडे सुपूर्त केलेत. ते तुझ्यापर्यंत यथावकाश पोहचतील. हा कंस मी सांकेतिक लिपीत लिहीला आहे, मामीला कळू नये म्हणून). भरत, तुला अर्धा फुटाणा - दिल तोडल्याबद्दल.

माधव, मी ऐकलंय ते गाणं खूप खूप वर्षापूर्वी Happy कंसातल्या वाक्याबद्दल धन्स Wink

भरत, तुला अर्धा फुटाणा - दिल तोडल्याबद्दल>>>>>:हहगलो:

भरत Proud चेंजेस डन बर्का Happy

(उरलेले दीड खारे दाणे मी मस्तानभाईकडे सुपूर्त केलेत. ते तुझ्यापर्यंत यथावकाश पोहचतील. हा कंस मी सांकेतिक लिपीत लिहीला आहे, मामीला कळू नये म्हणून) >>>> हे सांकेतिक भाषेत लिहिलेलं मला वाचता आलेलं नाही हे मी इथे नम्रतापूर्वक नमुद करू इच्छिते.

याची चाल आपल्या "जैत रे जैत" च्या "जांभूळ पिकल्या झाडाखाली....." सारखी आहे. अर्थात दोन्ही गाण्याचे संगीतकार एकच "ह्रदयनाथ मंगेशकर". >>>आता ओळखल गाणं Happy असे शब्द वाचून काही लक्षात आल नव्हतं Happy

Pages