निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात.

दिनेशदा, शांकली मी मामेनणंदेच्या लग्न समारंभात बिझी होते. कालच होत लग्न. आज संध्याकाळी पुजा आहे.

भरपुर सुंदर पोस्ट आणि फोटो आहेत वरचे.

दिनेशदा गुंजेच्या वेलीचा-फुलांचा फोटो.

Gunj.JPGGunj1.JPGGunj3.JPG

सांग कि आमच्या वेबसाइटचे जगभर वाचक आहेत, नक्की करतील.

आणि प्लीज जागूला फोन कर. माझा लागत नाही.

----------

पृथ्वीच्या इतिहासात मोठी उल्का कोसळून सर्व डायनॉसोर्स नष्ट झाले हे आपण वाचलेले असते. पण त्याचबरोबर
सर्व वनस्पतिदेखील नष्ट झाल्या. त्यानंतरची सुरवात केली ती गवताने.
त्या काळात वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड पण कमी प्रमाणात होता. तो जास्तीत जास्त मिळण्यासाठी
गवताने काय प्रयत्न केले ते How to grow a Planet च्या तिसर्‍या भागात दाखवलेय.

त्या गवताचाच एक प्रकार असलेल्या गव्हाने आता जगभर राज्य करायला सुरवात केली आहे. त्यासाठी गवताने
एक सूक्ष्म बदल आपल्यात केला. पूर्वीच्या गव्हाचे दाणे, मुख्य दांड्यापासून सहज अलग होत. बीजप्रसारासाठी
ते आवश्यक होते (बीया वार्‍याने उडत) पण माणसाला अशा बिया गोळा करण्यात त्रास होत असे. शिवाय दाणा
अगदी हलका असल्याने फारसे काही हाती लागत नसे.

गव्हाने तो सांधा मजबूत केला. आताच्या गव्हाचा दाणा सहसा दांडीपासून अलग होत नाही. आणि त्याने
मानवाच्या उत्क्रांती मधे मोठा मान मिळवला.

याच भागात सेनेगल या आफ्रिकन देशातल्या चिंपांझीचे दर्शन होते. बाकिचे चिंपांझी जंगलात राहतात पण या
देशातले गवताळ प्रदेशात राहतात. गवतात खाद्य कमी आणि शत्रु भरपूर. त्यांची चार पायावर चालत
असतानाची उंची गवतापेक्षा जास्त नसते. मग आजूबाजूच्या परिसरावर नजर कशी ठेवायची...

तर तिथल्या चिंपांझींनी चक्क दोन पायावर उभे रहायची सुरवात केली आणि ते मानवाच्या उत्क्रांतीमधले
पहिले पाऊल होते आणि त्यासाठी अर्थातच गवत जबाबदार होते. हे सगळे आपल्याला या भागात प्रत्यक्ष
बघायला मिळते. यापेक्षाही बरेच काही !!

गोवा स्पेशल

मोगर्‍याचा प्रकारः

अबोली - ही मुंबईत दिसणार्‍या अबोलीपेक्षा बरीच गडद असते.

माधव मस्त प्रची.

दिनेशदा Happy पण माझा फोन का नाही लागत तुम्हाला ? आत्ता लावत होतात का ? ऑफिसमध्ये मला रेंज नसते.

नाही रे जिप्सी. रतन अबोली मी वाडीला बघितली होती खूपच मस्त - ऑलमोस्ट लाल रंगाकडे झुकणारी - छटा असते. ही अबोली-केशरी या मधली छ्टा होती.

जिप्स्या रतन अबोली म्हणजे नक्की कुठली ? लाल भडक असते ती की शेंदरी ?

हजाराव्या पोस्ट बद्दल सर्व नि.ग. प्रेमींच हार्दिक अभिनंदन.

हो योगेश ह्या गुंजेची पाने खातात. खोकला झाल्यावर पण म्हणे खातात. विकत रंगित बडीशेप मिळते त्यातही ही पाने असतात.

नमस्कार मंडळी !
२७ ला गावी गेलो होतो, काल आलो आणि २७ नंबरच्या पानांवर सहज क्लिक केलं तर २७ तारखेचेच कंमेटस समोर आल्या... Lol

जे जे आपल्या समोर, आसपास दिसेल ते ते झाड, पशूपक्षी, कीटक - पहात राहू - एकमेकांना सांगत राहू....... मुख्यतः त्याचा आनंद घेऊ....)
शशांकजी,
१००% अनुमोदन !
वरील अर्थाने शेतकरी असणं खरंच आनंदाची गोष्ट आहे, पण त्याच्या मुळावर घाव घातला जातोय ...
(पण त्यासाठी आता कैमेरा घ्यावाच लागेल. .... )

गुंजेची पानं गुळचट लागतात आणि पानमसाल्यात टाकतात.
जागुडे...परत तुझ्याकडे माहेरपणाला आलेय का बुलबुल कुटुंबिय. Happy

जागु,
त्या बुलबुलला उन्हाळ्यात तुमचं घरं, ती जागा म्हणजे एकदम सुरक्षित आणि वातानुकुलीत वाटतं असणार ...

पानवाल्याच्या टपरीवर मिळतात ती गुंजीचीच पानं ना?>>>>>

हो योगेश ह्या गुंजेची पाने खातात. खोकला झाल्यावर पण म्हणे खातात. विकत रंगित बडीशेप मिळते त्यातही ही पाने असतात.>>>>>>
पण गुंजेच्या बिया अतिशय विषारी असतात - Abrus precatorius हे गुंजेचे बोटॅनिकल नाव - हे गुगलून पहा म्हणजे लक्षात येईल.

शशांक हो मी पण ऐकलय असे पण ह्या गुंजेच्या बियाही डोळ्यात फिरवतात डोळे स्वच्छ होण्यासाठी. आमच्याकडे गडी आहे त्याने मला प्रात्यक्षिक दाखवले आहे. पान खाण्याचे आणि गुंज डोळ्यात फिरवण्याचे. पान मी पण खाऊन पाहीले आहे. थोड मिन्ट असत त्यात.

स्निग्धा, हिरवा चाफ़ा, आणि त्याचे फ़ुल व सुगंध, सगळच मला अपरिचीत आहे. तुझ्याकडे याव लागणार बघायला. Happy

दिनेशदा, तुम्ही ज्याला हिरवा चाफा म्हणत अहात तो मला पांढरा चाफा दिसतो आहे. हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांना खास असा आकार नसतो. पुर्ण फुल खुडणे जरा अवघडच आहे. कारन लगेच पाकळ्या गळतात. ह्या फुलांचा वास फारच मोहक असतो.

तो फोटो हा तर नाही ना!?
Indonetia27.jpg

फुलांचा वास फारच मोहक असतो

मोहक????????/ खुप गोडसर असा असतो पण इतका प्रचंड मोहक की मादक आहे ....दोन मिनिटातच त्याच्या वासाने डोके दुखायलाच हवे.

बी तुमच्या फोटोतल्या पाकळ्या बहुतेक हिरव्या चाफ्याच्याच आहेत. पण इथे कोकणात जो हिरवा चाफा फुलतो त्याच्या पाकळ्या अशा लांबट नसतात, जरा आखुड आणि पसरट, थोड्या मांसल अशा असतात. फुल खुडता येते, पाकळ्या गळत नाहीत लगेच. आणि खरेच त्याचा सुगंध लपवुनही लपत नाही.

जागू.. आले का बाळ.... बुलबुल??????/// Happy

मला कुठल्याही फुलांच्या परिमळाने तो नैसर्गिक असतो म्हणून माझे डोके दुखत नाही. उलत माझ्यातील उर्जा अजून सकारात्कम स्वरुपात बाहेर पडते. तोच जर वास सेंट अत्तराचा असेल तर तो घेववत नाही फार वेळ.

साधना Lol अग नाही आत्ता घरटे करत आहे बुलबुल जोडी मग अंडी घालेल बुलबुल त्यानंतर बाळ.

हे मी हिरव्या चाफ्याचे केलेले लेखन, फोटोसकट.
http://www.maayboli.com/node/26242

Pages