निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी, अरे काही काही वनस्पतींची नावं खूपच गमतीशीर आहेत... एका फुलाचे नाव आहे माकडलिंबू, एकाचे नाव आहे माकडशेंग, एकाचं बेडकी! आता काय म्हणायचं या नावांना!! (म्हणजे म्हणायच काय म्हणा आता!! अहे तेच म्हणणार!!) शिंदळ माकडी, घोडेगुई, शिमटी अशी पण काही विक्षिप्त नावं ठेवलीएत.... मला अगदी खात्री आहे काही विक्षिप्त लोकांनीच अशी नावं ठेवली असणार!! नाहीतर इतकी सुंदर सुंदर फुलं आणि अशी चमत्कारिक नावं...छे: अजिबात पटत नाही!!

जिप्सी, शांकली, दिनेशदा धंन्यवाद

दिनेशदा मस्त फोटो. गुंजांची शेंग पहिल्यांदीच पाहिली.

पामच तो, मागचे खोड दिसतेय ना !!

जिप्स्या, या वेलीला सुंदर गुलबट जांभळी फुले येतात. कधी दिसली तर त्यांचा काढ फोटो.

पण मग ही पोफळ नाही का? (ती पण अशीच दिसते ना?); अर्थात मी फोफळ अशी फळावर असताना एकदाच मधे कोकणात गेले होते तेव्हा लांबून बघितली होती. मी त्या पोफळीकडे टक लावून बघत होते; आणि नंतर लक्षात आले की त्या बागेच्या मालकीण बाई... ही बया एवढी काय झाडाकडे आयुष्यात पहिल्यांदाच बघितल्यासारखी बघत्येय? अशा विचाराने काय पण चक्रम अस्तात एकेक बाया अशा नजरेने बघत होती. मग मी माझं निरिक्षण आवरतं घेतलं!!

शांकली/दिनेशदा, मलाही नाव माहित नाही, म्हणुन कोड्यात विचारले. Proud

पण पामचाच प्रकार आहे. झाडाची उंची जास्त नव्हती. पवईला हिरानंदानी बागेत काढलाय हा फोटो. आधी खजुर वाटले होते. Proud

छान चालु आहे चर्चा...

काल गरवारे कॉलेजात फणसाचे झाड पाहिले, भरपुर फणस लागलेले होते..

परवा पुणे विद्यापीठाच्या MBA डिपार्टमेंटमधे ते मासे लागलेलं झाड (सीतेची वेणी??) पाहिलं.. प्रत्यक्षात अजुन छान दिसतात मासे... Happy

मामी, गेल्या महिन्यात असे अनेक माहितीपट रुजू झाले आहेत. मी रेकॉर्ड करुन ठेवतोय. तूम्ही सगळ्यांनी
एखादा चांगला एफ एल व्ही प्लेयर, नेटवरुन डाऊनलोड करुन घ्या. (जिप्स्या , माधव, सल्ला द्या ) मग मी
सगळ्यांना रेकॉर्ड करुन पाठवतो.

शांकली, पोफळीचे खोड हिरवे राहते आणि खांडे पिवळी असतात. खजूर आणि शिंदीची फुले पांढरी असतात आणि
फळे आधी हिरवी आणि मग जातीप्रमाणे पिवळी वा लाल होतात.

सुपारीच्या पानाचा देठ मोठा असतो पण पाने मऊ असतात तर खजूर आणि शिंदीची पाने दोन प्रतलात असून
ती चांगलीच टोकदार असतात.

शांकली, गोव्यातही मला असेच अनुभव यायचे. शेवटी ती माणसं टुरिस्ट असतील, म्हणुन दुर्लक्ष करायचे.

छान आलाय चंद्र. कॅमेरे असेच पॉवरफूल होत गेले तर मंगळ, शनि यांचे पण फोटो काढता येतील. तो दिवसही
दूर नसणार.

जिप्स्या, ते एफ एल व्ही प्लेयरचे जरा बघ ना ? आणि सगळ्यांना सांग.

जागू कुठे गायब झाली ?

छान आलाय चंद्र. कॅमेरे असेच पॉवरफूल होत गेले तर मंगळ, शनि यांचे पण फोटो काढता येतील. तो दिवसही
दूर नसणार.>>>>>>>>>>>>>......अगदी अगदी...

जिप्स्या, ते एफ एल व्ही प्लेयरचे जरा बघ ना ? >>>>>दिनेशदा, एफ एल व्ही फाईल फॉर्मेटसाठी व्हिएलसी प्लेयर आहे. एक फाईल मला पाठवा ना. मी चेक करून सांगतो.

हो ते काय डाऊनलोड करायचं वगैरे ते नीटपैकी सोप्पं करून सांगा. माझ्याकरता ''डमीज एफ एल व्ही प्लेयर डाऊनलोड'' असं व्हर्जन काढावं लागेल.

फ्रीकॉर्डर ४ असे एक सोफ्टवेअर आहे, पण जर विंडोज पायरेटेड असेल, तर ते चालत नाही.

मामी, अगं विंडोज मिडीया प्लेयर असते तसेच हे. फाईल फॉर्मॅट बघून आपोआप हा प्लेयर उघडतो.

ओरिजीन ऑफ अस, नावाची पण एक ताजी मालिका तीन भागात दाखल झालीय. तू बघ शोधून आणि
उघडायला किती वेळ लागतो ते सांग. एक तासाच्या तीन क्लीप्स आहेत.

हो ते काय डाऊनलोड करायचं वगैरे ते नीटपैकी सोप्पं करून सांगा. माझ्याकरता ''डमीज एफ एल व्ही प्लेयर डाऊनलोड'' असं व्हर्जन काढावं लागेल.>>>>आणि मला आधी त्या एफ एल व्ही चा लाँगफॉर्म सम्जावून सांगावा लागेल!!

नमस्कार,

१०० नवीन पोष्ट वाचल्यात भराभर. मी बुधवारी अकोल्याला गेलो होतो आणि शनिवारी परत येताना आई आणि पुतणीला इथे सिंगापुरात घेऊन आलो. बापरे काय कडक ऊन विदर्भात! बाहेर बघवेना इतके ऊन. पण गुलमोहर इतके फुललेले की एकत्रित चार पाच गुलमोहर सोबत उभे असताना पाहिले की निळे ढग लालबुंद दिसायला लागते. नेमके असे दृष्य गाडीतून गावाबाहेर पडलो की दिसतात मग कॅमेरा काढून क्लिक करेपर्यंत झाडे आणि गाडी एकमेकांपासून दुर पळून गेलेले असतात. वर माधव म्हणतात तसे अमलताश पण काय फुलले आहेत! करडे रान नि फक्त फुललेले ते बहवे नाहीतेर गुलमोहर. काही ठिकाणी पिंपळाला नवी पालवी पाहिली.

नाशिक पर्यंत नुसते करपलेला निसर्ग. नाशिकच्या पुढे मग थोडी हिरवळ दिसत होती. विदर्भ तर पार आणि फार सुकुन गेलेला दिसला. फक्त दोनच दिवस होतो. डोळे लालगुंजार झाले होते. उन्हामुळे आणि न-झोपेमुळे.

रिअल प्लेअरची फ्री वर्जन इस्टॉल करा. ते करताना तो डाऊनलोडची सुविधा हवी आहे का ते विचारतो. ती घेतली तर यु-ट्युबवरच्या क्लिपा FLV फॉर्म म्ध्ये डाऊनलोड करता येतात. अशा डाऊनलोड केलेल्या क्लिपा रिअल प्लेअरमधे बघता येतात किंवा योग्य त्या फॉरमॅटमधे बदलून डीव्हीडी प्लेअर मधून टीव्हीवर पण बघता येतात.

आभार माधव. पण भारतात मोठ्या क्लिप डाउनलोड व्हायला बराच वेळ लागतो हे खरे आहे ना ?
खास करुन घरगुती कनेक्शन असेल तर !

Pages