
(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
माधव, फ्रीकॉर्डर ४ ला एक खास
माधव,
फ्रीकॉर्डर ४ ला एक खास यू ट्यूब बटण आहे, ते यू ट्यूबवरच्या क्लीप्स, रनिंग टाईमपेक्षा कमी वेळात क्लीप
रेकॉर्ड करते. शिवाय त्यात एम पी ४ असा पण ऑप्शन आहे. मी सध्या तेच वापरतोय.
जिप्सि ती फळ खाता का ? पावडर
जिप्सि ती फळ खाता का ?
पावडर पफ ( नि.ग मुळे रेन ट्री आणि पावडर पफ मधला फरक ओळखु येऊ लागलाय
)

रेन ट्रीला मराठीत काय
रेन ट्रीला मराठीत काय म्हणतात?
रेन ट्रीला मराठीत काय
रेन ट्रीला मराठीत काय म्हणतात?
>> शिरिष म्हणतात.
पर्जन्य वृक्ष, पांढरा शिरिष
पर्जन्य वृक्ष, पांढरा शिरिष अशी नावे आहेत. अर्थात भाषांतरे / रुपांतरे आहेत.
गुंजा काय गोड
गुंजा काय गोड दिसतायेत..
झाडावर लागलेले मासे
मस्त मस्त माहिती..
बरं आता त्या क्लिपांच्या
बरं आता त्या क्लिपांच्या लिंका द्या.
हे rain tree ना? हे शिरीष
हे rain tree ना? हे शिरीष कुळातले आहे?
ही काही गोव्यातली झाडे. ओळखा
ही काही गोव्यातली झाडे. ओळखा (म्हणजेच सांगा
)
१. हा चाफा वाटतोय पण गंध चाफा या कुळाला लाजवेल इतका मंद होता.

२.

३. खालचे दोन फोटो एकाच झाडाचे आहेत. याची पाने सप्तपर्णीसारखी होती.


माधव, २ आणि ३ हिरवा चाफा
माधव, २ आणि ३ हिरवा चाफा वाटतोय.
मामी, ओरिजीन ऑफ अस च्या लिंक्स
http://www.youtube.com/watch?v=RMzBmSVlLvs
http://www.youtube.com/watch?v=Geh1mdsFk2k&feature=relmfu
http://www.youtube.com/watch?v=ad0ELPLANWM&feature=relmfu
माधव, १ ला फोटो पांढर्या
माधव, १ ला फोटो पांढर्या चाफ्याचाच आहे. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे याला वास नसतो. इथे पुण्यात बर्याच ठिकाणी आहे हे झाड पण एकाही फुलाला वास नाही.
दुसरा फोटो (म्हणजे चाफ्या नंतरचा) लेंडी जांभळाचा आहे.
शोभा, मी तुला म्हणाले होते ना पाडळे पॅलेसमधे एक वेगळ्या पानांचे चाफ्याचे रोप आहे म्हणून ते हेच बरंका!
३ आणि ४ नं. च्या फोटो मधील
३ आणि ४ नं. च्या फोटो मधील झाड माझ्या सोसायटीत आहे. त्याचे नावं काय?
३ आणि ४ नं. च्या फोटो मधील
३ आणि ४ नं. च्या फोटो मधील झाड माझ्या सोसायटीत आहे. त्याचे नावं काय?>>>> हिरवा चाफा आहे.
चाफा हे कूळ नाही म्हणता
चाफा हे कूळ नाही म्हणता यायचे. खुरचाफ्याचे वेगवेगळे रंग एका कूळातले पण सोनचाफा, कवठीचाफा, नागचाफा, भूईचाफा, हिरवा चाफा.. सगळे वेगवेगळे !
इंग्लीश लोक कसे सगळ्याला अॅपल म्हणतात ( स्टार अॅपल, क्रॅब अॅपल, पाईन अॅपल, कष्टर्ड अॅपल, वूड अॅपल,
रोझ अॅपल.... ) तसे.
३ आणि ४ नं. च्या फोटो मधील
३ आणि ४ नं. च्या फोटो मधील झाड माझ्या सोसायटीत आहे. त्याचे नावं काय?>>>> हिरवा चाफा आहे. >>>>> याला सुवास नसतो का?
स्निग्धा, फुल हिरवे असताना
स्निग्धा, फुल हिरवे असताना फारसा नसतो पण ते पोपटी पिवळे झाले कि खुपच घमघमाट सूटतो.
पण तसे झाले कि त्याच्या पाकळ्या गळून जातात लगेच.
लपविलास ती हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का ?
प्रीत लपवूनी लपेल का ?
असे माणिक वर्मांचे भावगीत आहे.
३ आणि ४ नं. च्या फोटो मधील
३ आणि ४ नं. च्या फोटो मधील झाड माझ्या सोसायटीत आहे. त्याचे नावं काय?>>>> हिरवा चाफा आहे. >>>>> याला सुवास नसतो का?>>>> लपविलास तू हिरवा चाफा सुगंध याचा लपेल का.......... हे गाणं आठवतंय का ? प्रचंड सुगंध असतो या फुलाला (पण हिरव्याच रंगाचं असल्याने हिरव्या पानात लपून बसतं)...
दिनेशदा - ही पोस्ट टाकताना
दिनेशदा - ही पोस्ट टाकताना तुमचे स्मरण होतेच एकीकडे........
दिनेशदा, मधे मी शास्त्री
दिनेशदा,
मधे मी शास्त्री रोडवरून चालले होते. एका झाडाखाली ही छोटी छोटी फुलं पडलेली दिसली. बोराच्या फुलांइतकीच आकाराने होती. मी हे दोन्ही फोटो मोबाईल मधून काढलेत, त्यामुळे क्वालिटी चांगली नाहीये. पण ओळखा बरं ही फुलं कसली आहेत ती...
मस्त... प्रकाश नारायण
मस्त...
प्रकाश नारायण संतांच्या वनवास मधे (लंपनचा) कॅशिया ला लक्ष्मीची झाडं म्हटलेलं आहे... निग चा हा एक परिणाम, वाचताना आता असले डिटेल्स पण लक्षात रहायला लागले आहेत
शशांक :-० पानामागे दडणे हि
शशांक :-०
पानामागे दडणे हि हिरवा चाफा आणि सोनचाफा दोघांची खोड आहे.
याच वर्गातले दुसरे झाड असते. आपला हिरवा चाफा निदान आकाराने गोलसर असतो, पण या झाडाचे फूल
अस्ताव्यस्त असते. त्याला फुले भरपूर लागतात. मोठे झाड असते. सगळी फांदी फुलाने भरुन जाते.
परवा बी ने बाजाराचे फोटो टाकले होते त्यात गुलाबाच्या पाकळ्यांच्या बाजूला या फुलांची रास होती.
बी, तो फोटो टाकशील का परत इथे.
दिनेशदा, शशांक मी त्याच फक्त
दिनेशदा, शशांक
मी त्याच फक्त हिरव फुलच पाहिलं आहे, पुढची स्टेप चुकवली, त्यामुळे सुवासाबद्द्ल प्रश्न् पडला होता. आता पुन्हा नीट लक्ष ठेवेन. एक मात्र छान झाल त्यानिमित्ताने एका सुंदर गाण्याची आठवण तुम्ही दोघांनी करुन दिलीत. धन्यवाद.
दिनेशदा, धन्यवाद. शांकली
दिनेशदा, धन्यवाद.
शांकली फुलं किती गोड दिसतायेत.
ती फुलं महोगनीची आहेत. इतका
ती फुलं महोगनीची आहेत. इतका मोठा भव्य वृक्ष आणि ह्याची इतकी नाजुक, इवली इवली फुलं! ह्या फुलांचा सडा पडला होता खाली, म्हणून वर बघितलं तर असंख्य मंजिर्या लगडलेल्या आणि ही फुलं खाली ओघळत होती....पानं मात्र हिरवीगार,दाट असतात. पुण्यात खूप आहेत हे वृक्ष.
झाडांचा आकार आणि फुलांचा
झाडांचा आकार आणि फुलांचा आकार, यात काही परस्पर संबंध दिसत नाही.
बाय द वे, फुले आवडतात ना सर्वांना इथे, मग How to grow a Planet 2/3 Power of Flowers
हि बीबीसी ची अफलातून डॉक्यूमेंटरी इथे बघा
http://www.youtube.com/watch?v=mMq1kSzubWs
गेल्या शनिवारी डोमेस्टिक
गेल्या शनिवारी डोमेस्टिक एअरपोर्टवर गेलो असता तिथे गेट नंबर ३ च्या समोर गुलाबी कॅशियाचे झाड दिसले. फुल नव्हती झाडाला पण ओळखता आले. तिथुन पुढे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अजुन एक (पार्ल्याच्या दिशेने) गुलाबी कॅशियाचे झाड दिसले, या झाडावर थोडी (१-२ घोस) फुले होती. गुलाबी कॅशिया फुलण्याचा नक्की काळ कोणता.?
जिप्सी, खरे तर हेच दिवस.
जिप्सी, खरे तर हेच दिवस. पावसाळ्यात शेवटचे बहर येतात. आणि पार्ल्याचे झाड, मी गेली २५ वर्षे तरी बघतोय.
म्हणजे मग राणीबागेतील गुलाबी
म्हणजे मग राणीबागेतील गुलाबी कॅशिया फुलला असेल सध्या? आणि मणीमोहर कधी फुलणार. मला हि दोन्ही झाडे बहरलेली पहायची/टिपायची आहेत.
मणिमोहर जुलै मधे. कॅशिया आता
मणिमोहर जुलै मधे. कॅशिया आता असेल.
असं कर, तिथल्या माळीबुवांना एकदा भेट आणि त्यांना सांग झाडे फुलायला लागली कि तूला कॉल
करायला. त्यांचे नाव इथे अवश्य लिही.
करतील ते कॉल?
करतील ते कॉल?
Pages