निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे एक बरेच मोठे नारळाचे झाड आहे. घरात वापरायला पुरतील एवढे नारळ आणि खोबरे मिळते आम्हाला. पण गेल्या २ आठवड्यापासून त्याचे खूपच नारळ खाली पडतायत. दिवसाला ७-८.
एवढे पुर्वी कधीच पडत नसत. (आम्ही एकदा काढून घेतले होते, पण ते लोक कोवळे वगैरे सगळेच काढतात आणि मग खपवताना नाकी नऊ येतात. म्हणुन आपोआप पडलेलेच वापरतो आम्ही.)
एवढे नारळ पडण्याचे काय कारण असावे? उन्हामुळे होऊ शकते का? ९५% नारळात पाणी वाजते आहे.

हो जागू, नारळाला पाणी कमी मिळतय हे लक्षात आलय काल, आणि जास्ती द्यायला सुरुवात केलीय. बघुया.
दिनेशदा- आता पाणी वाढवूनही फरक नाही पडला तर बघू,

आकाशातलं नाट्य मस्त दिसलं दिनेशदा. Happy

शोभे...भुकंप. Lol

माझ्या उड्यांमुळे निगवर भुकंपाचे हादरे बसले असतील तर क्षमस्व!

या डेझर्ट रोझच्या प्रसाराचा मान साधनाला द्यायचा.
एरवी तसे ते दुर्लक्षितच होते.
या दुर्लक्ष करण्यावरुन आठवले.

पिरॅमिड्स हा शब्द उच्चारला कि आपल्याला इजिप्तच आठवते (तसे इंका संस्कृतीनेही
दक्षिण अमेरिकेत पिरॅमिडस उभारले आहेत. केवळ इजिप्तमधल्या पुरातन अवशेषांचा
अभ्यास करणारी, शास्त्राची एक शाखा आहे. अनेक वर्षांपासून पाश्चात्य देशांतील
लोकांनी त्यांचा अभ्यास चालवला आहे आणि त्याबाबत नवनवे उत्खनन होतच असते.
पिरॅमिडस नेमकी कुणी बांधली, कशी बांधली याचे अनेक कयास बांधले जातात.
अगदी अलिकडे मी एका क्लीपमधे बघितले कि ती थडगी नव्हती, तर पॉवर प्लांट्स होते ! त्यातून मायक्रोवेव्ह्ज तयार करुन, त्या आकाशात सोडल्या जात असत. शेजारचे स्तंभ म्हणजे, ट्रांसमिशन टॉवर्स होते !!

तर मी दुर्लक्ष झाल्याबद्दल जे म्हणत होतो, ते सुदानबद्दल. इजिप्तमधे जे प्रचंड प्रमाणात
सोने सापडले ते अर्थातच सुदान मधले होते. पण हा देश कायम यादवी युद्धात
होरपळला गेला. आफ्रिकेत जसे काळे आहेत तसेच गोरे अरब देखील आहेत. उत्तरेकडच्या देशांत (अल्जीरिया, मोरोक्को, इजिप्त, ट्यूनीशिया ) हे फार जाणवते,
आणि त्यांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही.
सब सहारान आफ्रिका हा शब्दच मुळी, अशी विभागणी सूचवण्यासाठी झाला आहे.
अशी या काळ्या लोकांची धारणा आहे.

त्यामूळे त्यांची संस्कृती, इतिहास नेहमीच दुर्लक्षिला गेला. इजिप्तचे पिरॅमिड्स नंतर
बांधले गेले पण त्याआधीच सुदानमधल्या कृष्णवर्णीय फारोहने, सुदानमधे पिरॅमिड्स
बांधले होते. आकाराने छोटे असले तरी ते अत्यंत सुबक आहेत. इतकेच नव्हे
तर आकारांची विविधताही आहे त्यात.

पण आज ते कुणाच्या खिजगणतीतही नाहीत. कुणी पर्यटक तिथे जातही नाहीत.
इतकेच नव्हे तर त्या भागातून खुडबूडत जाणारी रेल्वे तिथे थांबतही नाही.
पण या सुदानी पिरॅमिड्सचे सुंदर दर्शन, डेव्हिड अ‍ॅड्म्स या ऑस्ट्रेलियन पत्रकाराने,
जर्नीज टू द एन्ड्स ऑफ वर्ल्ड - सुदान, या मालिकेत घडवलेय.
यू ट्यूबवर उपलब्ध आहे.

दिनेशदा ही माहिती मस्तच आहे. युट्युबवर बघितलं पाहिजे. निसर्गनाट्यही अप्रतिम. जागू, रोज सकाळी मस्त टवटवीत फुलं टाकतेस ते खूप छान वाटतं. अशीच नेहमी प्रसन्न रहा.

निसर्गातल्या शाकाहारी प्राण्यांना बघा, माकडे, हरणेच नव्हे तर हत्ती देखील. त्यांच्या
जागेपणीचा बहुतेक वेळ अन्न शोधण्यात, ते चावण्यात जातो. शिवाय ते चावून देखील
त्याचे पचन होण्यासाठी त्यांना भरपूर विश्रांती घ्यावी लागते. त्यांच्या या निद्रेच्या
काळात, त्यांच्या पोटातील बॅक्टेरिया, अन्नाच्या विघटनाचे काम करत असतात.
एवढे करुनही त्यांना रोज अन्न शोधावेच लागते.

मांसाहारी प्राण्यांतील पाचक रस एवढे तीव्र असतात कि ते प्राण्यांच्या हाडाचे देखील
पचन करु शकतात. अर्थात हि पक्रिया बरेच दिवस चालते, आणि त्यांना रोज
थोडी थोडी शक्ती मिळत राहते. एकदा शिकार खाल्ल्यानंतर ते प्राणी, काही दिवस
अन्नाशिवाय राहतात.
मग मानव वेगळा कसा ? तर तो अन्न शिजवून खातो. आणि यासाठी अग्नीचा शोध
मह्त्वाचा आहे. खरे तर तो शोध नव्हे, निसर्गात वणवे लागतच गोते, पण त्या अग्निवर
ताबा मिळवण्याचा शोध आणि हवा तेव्हा तो निर्माण करायचा शोध महत्वाचा.
वणवा बघून बाकीचे सर्व प्राणी पळून जात होते त्यावेळी एका मानवाने, त्यातली
जळती फ़ांदी बाहेर ओढून काढली. त्यात काय टाकल्यावर ते जळते (लाकडे, पाने)
आणि काय काय टाकल्यावर तो विझतो (पाणी, दगड) असे प्रयोग त्याने केले असतील.

आपल्याकडे अंगीरस या ऋषींचे नाव या संदर्भात घेतले जाते. त्यांनी बहुदा हे प्रयोग
केले. हिंस्र प्राण्यांना पळवून लावण्यासाठी त्यांच्या दिशेने जळती लाकडे, निखारे फ़ेकणे
हे पण त्यांनी केले असणार.
मग पुढची पायरी होती ती अन्न शिजवायची. पहिल्यांदा अर्थातच नैसर्गिक वणव्यात
जळालेली कंदमूळे, प्राणी खाऊन बघितले असतील. मग स्वत: ते करुन बघितले असेल.

तर हा शोध मानवासाठी खुपच महत्वाचा ठरला.
निसर्गातील घटक वापरुन पदार्थ तयार केल्याने त्यातले पोषक घट्क पचवणे तर
सोपे झालेच पण कमी अन्नात जास्त शक्ती मिळवायची सोय झाली. आणि
असा निवांत वेळ मिळाल्यावर बाकीचे उद्योग करायला आणखी वाव मिळाला.

उत्क्रांतीच्या टप्प्यात देखील यामूळे बदल झाले. मेंदूचा आकार वाढला.
तूम्हीदेखील हे अनूभवू शकता. रताळे कच्चे आणि उकडलेले, यातला
फरक नक्कीच जाणवेल, तूमचा तूम्हाला.

हे सगळे सूचायचे कारण म्हणजे डिड कूकिंग मेक अस, नावाचा माहितीपट
(हो आजकाल हा खजिना हाती लागल्यापासून मी चित्रपट कमीच बघतोय.)

या एका शोधांमूळे आपण प्राण्यांपासून जरा वरच्या पातळीवर गेलो. समजा
प्राण्यांना असे शिजवलेले अन्न मिळते तर ? असे प्रयोगही या माहितीपटात आहेत.

फक्त एक सूचना, यातील काही दृष्ये शाकाहारी मंडळींना बघवणार नाहीत.

पण यापुढे काय ?
आपल्याला यापुढे शिजवलेले अन्नच खावे लागणार. कच्चे अन्न खाऊन आपले
दैनंदिन व्यवहार करणे अशक्य आहे. ती क्षमता आपण केव्हाच गमावलीय.

दिनेशदा, तुम्ही दिलेले फोटो मस्तच आहेत! (नाट्य छान 'रंगले' आहे!)

मी राधा, तुम्ही दिलेल्या लिंक मधली पानं आणि तुम्ही वर्णन करत असलेले झाड त्यावरून ते झाड बारतोंडीचं असावं असं वाटतंय. कारण बारतोंडी या दिवसात फुलते, शिवाय तिला सुवास असतो, आणि तिची पानांची रचना तुम्ही सांगितलेल्या लिंक मधल्या पानांशी मिळती जुळती नसली तरी बर्‍यापैकी लांब आणि समोरासमोर रचना असणारी असतात. खूप मुलायम स्पर्श असतो तिच्या पानांचा. जमल्यास फोटो टाका ना (पानांचा आणि फुलांचा असे दोन्ही ) म्हणजे नक्की ओळखता येऊ शकेल.
दिनेशदा, तुम्हाला एवढे माहितीपट कसे माहीत होतात हो? म्हणजे त्यांची माहिती कशी होते? आम्हाला नाही मिळत हं अशी माहिती (बहुधा देवाने तुम्हाला काहीतरी वेगळी देणगी नक्कीच दिली आहे आणि ती तुम्ही आमच्या पास्नं लपवून ठेवताय! )

>>>>>>>>>>>इथले पक्षीसुद्धा आपण टाकलेले पदार्थ खात नाहीत. अगदी कावळे, चिमण्याही
स्वतःचे अन्न, स्वतः शोधून खातात.>>>>>>>>>>>(आईने नक्की चांगले वळण लावलेन काय!) ते स्वावलंबी आहेत वाट्टं.. आणि शिवाय आळशीपण नहीयेत!

ईन मीन... फूल फार सुंदर आहे हं... विशेषत: हिरवी पानं आणि त्याचा तो निळा रंग...कॉम्बिनेशन खूप सुंदर!

काहि माहित असतात काही नव्याने सापडतात. आतापर्यंत १३० रेकॉर्ड करुन ठेवलेत. इथे नेट कनेक्शन चांगले आहे,
त्यामूळे शक्य होते.

तूम्ही लोकांनी निव्वळ तयार डॉगफूड वर वाढवलेली पाळीव कुत्रे बघितले आहेत का ? त्यांचे केस चमकदार
असतात. तेजस्वी दिसतात. अंगाने जरा भरलेले दिसतात... त्यांच्या रस्त्यावरच्या भाईबंदापेक्षा किती वेगळे
दिसतात ना ? आपल्याबाबतीत पण तेच झालेय.

वरच्या क्लीपमधे जास्तीत जास्त स्निग्धांश पित असताना मेंदूचा सिटी स्कॅन करताना दाखवलेय. आणि त्याने
आपला मेंदू कसा जास्तीतजास्त कार्यक्षम होत जातो, ते कळते.

आता हि उन्नती म्हणायची का आणखी काही ?

समजा उद्या आणखी कुठल्या प्राण्याचा अन्न शिजवून खायची अक्कल आली, तर आपली काही खैर नाही बुवा.

काही ठिकाणी कोल्हे असे धाडस करतात असे वाचले. आगीतले अन्न मिळवताना ते तोंडात करवंटी घेतात, म्हणजे तोंड भाजत नाही.

विश्वास पाटील यांनी ते नदीच्या पात्रातले खेकडे कसे खातात याचे वर्णन करुन ठेवले आहे. ते खोल खड्डे
खणतात आणि त्यात आपली केसाळ शेपटी घालून ठेवतात. खेकडा नैसर्गिक उर्मीने ती घट्ट पकडतो.
ती केसाळच असल्याने कोल्ह्याला काही ईजा होत नाही. आणि खेकडाही ती सोडत नाही.

मग कोल्हा शेपटी बाहेर काढून खडकावर आपटतो !!

दा मस्तच माहीती , अगदी डिस्कव्हरी सारखी Happy
<<अगदी अलिकडे मी एका क्लीपमधे बघितले कि ती थडगी नव्हती, तर पॉवर प्लांट्स होते ! त्यातून मायक्रोवेव्ह्ज तयार करुन, त्या आकाशात सोडल्या जात असत. शेजारचे स्तंभ म्हणजे, ट्रांसमिशन टॉवर्स होते !! >>> यावर बरेच मतभेद आहेत, आताशा हिस्ट्रीवर याचा एक माहीतीपट बघितला होता.
तसेच दुसर्या माहीतीपटात च्याच्यापोआ संस्क्रुतीत ई.स.पुर्व ५००० वर्ष मेडीकल सायन्स किती पुढारले होते याची माहीती होती, त्या काळचे एक थडगे उकरल्यावर त्या म्रुता व्यक्तीचे डोक्याचे (ब्रेन कॅन्सरचे)ऑपरेशन झाल्याचे समजले होते.

नितिन किती सुंदर फोटो. अगदी ३डी इफेक्ट आलाय. फोटो नसुन खरेच फुल समोर आहे असे वाटतेय.

या डेझर्ट रोझच्या प्रसाराचा मान साधनाला द्यायचा
Happy कसचे कसचे Happy

मी परवा म्हणालो होतो त्या अनोळखी झाडांचे फोटो

हा असा मोहोर.

आणि त्याला अशी फळं. पण ती खाण्याजोगी नाहीत. कुणीच खात नाही.

हा एक प्रकारचा शोभेचा माड, छोटी लाल फळे दिसताहेत. ती पण मातीत पडून जातात.

हे बहुतेक चिकूच्या वर्गातले झाड आहे. अशी फुले आणि मग अंजिराच्या आकाराची पिवळी
फळे लागतात. बाजारात नसतात विकायला पण (माझ्यासारख्या) लहान मुलांचा आवडता खाऊ.
मस्त आंबट गोड लागतात. आत चॉकलेटीरंगाची मोठी एक बी असते.

पण वरीलपैकी कुठल्याच फुलांना कसलाच गंध नसतो.

-----------------------------------

माझ्या खिडकीतून दिसणारा नैरोबीचा हिरवागार कोपरा..

गेल्या आठवड्यात सेनापतीने मला फोन केला होता त्यावेळी तो स्कॉटलंडच्या आसपास होता.
त्या स्कॉटलंड भूभागावर आधारीत, मेन ऑफ रॉक्स हि ३ भागातली अप्रतिम मालिका, यू ट्यूबवर
आलीय.

पृथ्वीवर हिमयूगे नेमकी का आली, पृथ्वीच्या पोटातील हालचालींनी नेमके काय झाले, रस्त्यावर मोठमोठ्या शिळा का दिसतात... अशा अनेक प्रश्नांची अगदी सोपी उकल हि मालिका करुन दाखवते.

यातले प्रश्न (जमिनीवर जूना दगड खाली आणि त्यावर नवा दगड असे नैसर्गिक रित्या असायला पाहिजे, मग काही ठिकाणी जूने दगड नव्या दगडावर कसे आले ?) जितके अनोखे आहेत तेवढीच
त्यांची उत्तरे देखील.

ही मालिका, गेल्याच आठवड्यात यू ट्यूबवर आलीय.

http://www.youtube.com/watch?v=cJUWnrjd2ys&feature=relmfu
इथे तिसरा भाग आहे बाकीचे दोन आजूबाजूलाच आहेत.

आणि हो, यातला निसर्ग ... श्वास रोखून धरायला लावणारा आहे.

जागू, कृष्णकमळांचा फोटो काय सुंदर आलाय गं! भारीच! त्यांचा वास मात्र खूप गोडसर असतो. आणि मुंगळे आणि जराशा वेगळ्या प्रकारच्या आळ्या (लाल रंगाच्या पैशांसारख्या) पण त्यावर असतात ना?

दिनेशदा, त्या मोहोरातली फुलं किती नाजुक आहेत!

तिथली बरीचशी फुलं गंधरहीत का बरं असतील? गंध गुण विशेष ज्या मातीचा आहे ती तर चांगली सुपीक आहे; मग....का बरं असं होत असावं?......

तुम्ही भारतात येताना हे सगळे माहितीपट आणणार आहात ना....(मग आम्हाला आयतीच मेजवानी मिळणार आहे म्हणा ना! Happy

हो आणतोच आहे.
इथल्या थंड हवेमूळे सुंगध नसावेत. झकरांदा सोडला तर कुठल्याच मोहोराचा / फुलाचा सुंगध आला नाही. याउलट गल्फ मधे तर रस्यावरुन जातानादेखील, बकुळ, बूच, गुलाब, निशिगंध, प्राजक्त्,शिरिष असे
सुंगंध येत राहतात. हो ही सगळी झाडे आहे तिथे !!

ही ओव्याची फुलं म्हणजे ओव्याच्या पानांच्या झाडाची
owa.jpgowa2.jpg

मुचकुंद माझ्या घरा जवळचा
muchkund.jpg

दिनेशदा हा मायाळूचा वेल का?
mayalu.jpg

दिनेशदा, जो_एस मस्त फोटो

ओव्याची फुले मस्तच!!!!! ओव्याचे झाड माझ्याकडे आहे पण त्याला अजुन फुले नाही.

दिनेशदा हा मायाळूचा वेल का?>>>>होय, मायाळुच वाटतोय. Happy

जो_एस, फोटो सुंदर आलेत हं! मुचकुंद घराजवळ आहे म्हणजे भाग्यवानच आहात म्हणायचं!

कसं असतं ना... काही झाडं असतात मायाळू तर काही लाजाळू!...काहींची नावं असतात दातपाडी,कपाळफोडी अन कानफुटी....:हाहा:

हं....... असंही असेल दिनेशदा...हवेचाही परिणाम नक्की होत असणार...

काही झाडं असतात मायाळू तर काही लाजाळू!...काहींची नावं असतात दातपाडी,कपाळफोडी अन कानफुटी.>>>>>शांकली Proud

तो मायाळूच, पण हा ओवा म्हणजे पानांचा ओवा. खरा ओवा, धणे जिरे कूळातला.

आता माझे प्रश्न.
हे फुल कसले ? खरे तर हे यापेक्षा जास्त उमलते पण आमच्याकडच्या पावसाच्या मार्‍यात एवढेच
उमलले होते. हे ज्या वनस्पतिचे आहे त्यापासून मिळणारे एक उत्पादन, प्रत्येक मराठी घरात, वर्षातून
निदान एकदा तरी आणले जातेच.

हि शेंग कसली ? या झाडाच एक नाव दूधाशी, दुसरे नाव देवळाशी आणि तिसरे नाव मृत व्यक्तीशी संबंधित आहे.

हा प्रश्न नाही.. या आहेत वेलीवरच्या गुंजा..

दिनेशदा, दुसरा फोटो चाफ्याच्या शेंगेचाय ना? आणि पहिला बहुधा रताळ्याच्या फुलाचा असावा (असा माझा दाट संशय आहे! :डोमा:)

Pages