२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर तुम्ही कुठे असता? अमेरीकेच्या पूर्व किनार्‍यावर असाल तर नक्की या १२ मेला. आम्हाला भेटून जास्त मजा येईल. Happy

>>>अमेरीकेच्या पूर्व किनार्‍यावर असाल तर नक्की या १२ मेला. आम्हाला भेटून जास्त मजा येईल>>>
आणि त्या 'बरोबर' किनार्‍यावरच्या असतील तर? Wink

आणि त्या 'बरोबर' किनार्‍यावरच्या असतील तर?>> मग त्या नक्की येतील. Wink

मृ Lol

रुनी, मी हेद्राबादमध्ये असते.
तुम्ही नका तू बोला.
बरोबरच्या किनार्‍यावर नाही आहे. Happy
तुमच्या किनार्‍यावर नाही येऊ शकत.
तुम्हीच सगळेजण ईकडे या, पुढच गटग हेद्राबादमध्ये करा. तुम्हाला भेटून जास्त मजा येईलच. Happy
मला वाटत तुमच्या किनार्‍यावरील मा.बो. सर्वात जास्त Jolly आहेत. कोणाला दुखवत पण नाहीत. सही आहात सर्वजण.

मला वाटत तुमच्या किनार्‍यावरील मा.बो. सर्वात जास्त Jolly आहेत. कोणाला दुखवत पण नाहीत. सही आहात सर्वजण. >> Lol
सशल आली की तिला दाखवा हे Proud

हह,
तु पण ये आमच्या ए.वे.ए.ठि. ला. किती Jolly आहेत ते तुला पण कळेल. Happy
मेनु झाला का फायनल.
कोण काय काय आणतय?.

हसता काय? त्या माझ्याबद्दल बोलतायत>>>>> Rofl
आता कहर म्हणून इथे लोला, नीधप वगैरेंनी येऊन सुद्धा त्या माझ्या बद्दल बोलतायत असं म्हणा म्हणजे मग मी हर्षवायू होऊन सु डो मि! Lol

मी आर म्हणतायत त्याच किनार्‍यावर आहे. त्या माझ्याबद्दलच बोलतायत. मीच त्यांच्या पहिल्या पोस्ट्ला उत्तर दिलं. २० मिनिटे कोणी दिलं नव्हतं.
बुवा असं सुचवतायत की मी लोकांना दुखवते. मी हे चेष्टेतही सहन करु शकत नाही. मी काही येत नाही. गटगस शुभेच्छा!
धन्यवाद!

लोला, सकाळी सकाळी मस्करी?
आता टू दुखावणे की न दुखावणे हा पण समोरच्याचा प्रश्न नाही का, तुला काय झालय सेंटिमेंटल व्हायला, शो ना हो ? Proud

तुम्हाला काय माहीत? मी येणार होते. तुम्ही मानहानीकारक बोलून माझी कुरापत काढली. आता सारवासारव करु नका. तुम्ही आणाल ती रंपा पाजा सगळ्यांना म्हणजे काम फत्ते!

जाऊ दे. तू मनाला लावून घेऊ नकोस (आणि आमच्या मिसळीचे वांदे करु नकोस). ये, मी ह्या वेळी स्ट्राँग मोहितो बनवतो.

Pages