२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यांची कपाची तयारी असेल त्यांना बसू देत की. Wink
मला ते वरचं 'त्वरा करा' ला एको इफेक्ट द्यायचा होता, पण तशी सोय दिसली नाही.

मासे-आमटी / सोलकढी / भात - माझ्याकडे. (मैत्रेयी सोडली तर सगळ्यांसाठी Proud )
कुणी भाज्या आणणार असल्यास पोळ्यांची जबाबदारी माझी..

किंवा

सगळेच चटपटे (वडे, भेळ, समोसे) खाणार असल्यास रगडा-पॅटीसची जबाबदारी माझी.. (मग मासे मेन्यू रद्द).

देसाई, फार जबाबदारी घेऊ नका. मासे मेनूचे बघा. तळणार नाही का? नुसतीच आमटी?

मासे आणि मिसळ एवढाच मेनू ठेवा.
धन्यवाद.

'म'ने सुरू होणारे पदार्थ ठेवा. Proud
मिसळ आणि मासे झालेच आहेत. आता मांडे, मूगडाळ हलवा, इ. इ. ठरवा.

सोलकढी !! वा वा!!

सखुबत्ता आणा बरं कोणीतरी.

मी कांदे आणते मिसळीला वरून लागतील त्यासाठी. तिथे चिरून सुद्धा देईन Proud

मलई बर्फी, मुगाचा शिरा, मस्तानी, मँगो पाय, मँगो रस (:फिदी:), मँगो शिरा (पुन्हा फिदी).

लोला << येणार का नुसतीच 'मज्जा' बघणार Proud
येण्याची खात्री असेल तर मंमं ची सोय करू(च).

आता बुवांच्या बशीत तिपाया (स्टूलं) वाढणार बहुतेक.. Proud

वृंदाताई आणि त्यांच्या घरच्यांना कळवले की नाही गटगचे.
मी सखूबत्ता आणू शकेन. इथे चायनीज स्टोअर मध्ये नेहमीच कैर्‍या मिळतात.

आरेच्या देसाई मला शिक्षा का बर करून राह्यले?!
मासे + इतर म वाला मेनू मस्त. मिसळ योग्य नावावर टाका -लोले आता कायबी सबब नाय पायजेल

भाई, नावनोंदणी केली आहे. वरचा मेनू बाद धरायचा का? म-मेनू येतोय म्हणून. मी मोलंबी भात आणू शकेन. नाहीतर इतर काही सुचवा.

चमनमास्तर सुद्धा असणार आहेत, हे निमित्त साधून सगळे बाया बापे देसायांच्या कम्युनिटी मध्ये एक दीड मैलाचा मायक्रो मॅरॅथॉन रन मारुन येऊ, कसं? Proud

Pages