२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायोने मसाले भात आणावा कृपया.

दही आणि दह्याचे पदार्थ बाद आहेत. आणल्यास परिणाम वाईट होतील.

मोलंबी भात चालणार नाही बहुतेक... अ‍ॅलर्जीवाल्यांकडून परवानगी घ्या.. मोरी-मटण चालेल पण Proud

मला दही मिसळ आवडते.. Sad

सिंडी रामपुरी घेऊन येणार आहे तेव्हा दही, दह्याचे पदार्थ आणणार्‍या मेंब्रांनी जिवाला जपूनच असावं Proud
मसालेभाताला प्लस वन मारा तर आणते.

माशांचे प्रकार करून 'म'पासून सुरू होणार्‍या आयड्ञांना उपाशी ठेवायचा प्लॅन असेल तर मी आणि मै मायक्रोगटग करू देसायांच्या घरासमोर. (मी मोरांबा आणीन :P)

सायो, प्लीज मसालेभात!!! मिसळ, मसालेभात आणि मायक्रोवेव्हेबल व्हेजिटेरियन इतकं असल्यास उपाशी र्‍हायची चिंता नाही.

बुवा, विडे! Proud

मसालेभात, सखुबत्ता, मिसळ आणि वृंदाताई आणतील ती भाजी असल्यावर काय प्रॉब्लेमच नाही. देसाईंच्या बॅकायार्डात एखादं झाड धोधून आपण आपली शिदोरी खाऊ. Wink

मॄ.. तू माश्यात नाही? हे काय नवीन ?

मतदान करा:
मासे असल्यास हो.
मासे असल्यास नाही.
इतर असल्यास हो..
इतर असल्यास नाही..

मासे नको असतील (बहुतेकांना) तर आधी सांगा.. मग मासे रद्द..

मोरावळा?? छे छे, मी अस्लं काही बरोबर आणणार नाही! Proud

बुवा, लई कन्फ्यूजन आहे तुम्हाला! विडा पैजेचा! सुपारी टपकवायची!! (तुम्ही आपला मीठापान आणा!) Proud

देसाई, मी मासे करण्यात. खाण्यात नाही.

सायो, तू रेकनेसन्स सर्व्हे करून ठेव! झाडाची स्ट्रॅटजिक पोजीशन ही एकाचवेळी सावलीत बसून खायला, एक कान बाकिच्यांच्या गप्पांकडे ठेवता येईल अशी आणि अयोग्य तिथे बचकन बोलता येईल अश्या ठिकाणी हवी!

त्याकरता मला गटगच्या आधी जाऊन हळूच बॅकयार्ड पहाणी करावी लागेल किंवा तिथेच रहाणार्‍यांना लाचलुचपत देऊन काम करुन घ्यावं लागेल.

मासे -१.

सायो, मी (श्रीरामपुरी) असल्यावर रामपुरीची गरजच काय Wink

बिल्वा, तुझ्यासाठी सायो कैर्‍या आणणार आहे ना ? अपना हाथ जगन्नाथ Happy

मासे (बुवा, लोला, स्वाती+२, मै )
न्-मासे (शिंडी, मॄ, सायो, बिल्वा)

बांधून न्यायला पण हवेत <<< आम्ही मासे बांधत नाही पण सोडवतो.. Proud

मी मासे -१
नितीने मासे ++++१
मी आणेन सखुबत्ता (कैर्‍या मिळणारच असे गृहीत धरलय नाहीच मिळाल्या तर गाजराचा सब चालेला का :फिदी:)
सायो तू मसालाभात आणच गडे.
मिसळ कोण आणतय, लोला का?

मुक्त करतो म्हणा.... <<< Proud मासे हे गणितासारखे सोडवायचे असतात. कर्ली खाऊन बघा..

मासे (बुवा, लोला, स्वाती+२, मै, नितीन )
न्-मासे (शिंडी, मॄ, सायो, बिल्वा , रुनि )

देसाई, आहो आता कुठे +- करत बसलात. न माशे वाल्यांची पण सोय होत आहे ना? कोणीतरी मिसळ आणतय वाटतं. तुम मासे पे रहो!

ओ बुवा तुमची सोय झाली माश्याची की लगेच हे असे पोस्ट का बाकीच्यांच्या जेवणाची काही काळजी आहे की नाही Proud

Pages