Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता:
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात
तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.
मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे
९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि
माहितीचा स्रोत:
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो लोला ताईनी पहिल उत्तर दिल
हो लोला ताईनी पहिल उत्तर दिल होत, नंतर रुनी ताईनी गटगच आमंत्रण दिल.
लोलाताई, तुम्ही लालु मिसळवाल्या का?? असाल तर तुम्ही दिलेल्या कृतीने एकदा मिसळ बनवली होती. खुप छान झाली होती. धन्यवाद.
तुमच्या गटगसाठि खूप सार्या शुभेछा. गटगच आमंत्रण केल्याबद्द्ल धन्यवाद.
गटगच चलचित्र संर्पकातून नक्की पाठवा.
अंजली , पार्ल्याचा आणि पेडगावचा रस्ता रोमातून माहित आहे.
>>लालु मिसळवाल्या त्या
>>लालु मिसळवाल्या
त्या वेगळ्या.
बुवा, बर मी येते. माझ्यावर स्ट्राँग मोहितो वगैरेचा परिणाम होत नाही. धन्यवाद.
दिव्ति येणार नाहीत का?
दिव्ति येणार नाहीत का?
मेधा नाहीये का इथे? इमेलला
मेधा नाहीये का इथे? इमेलला उत्तर दिले नाही तिने.
यादीत आत्ता नावं घालून नंतर
यादीत आत्ता नावं घालून नंतर हळूच काढून टाकणार्या, येण्यात कंची मारणार्या जनतेला योग्य ती शिक्षा केली जाईल.
दिव्ति उर्फ स्वराली ह्यांचं
दिव्ति उर्फ स्वराली ह्यांचं नाव आहे की यादीत.
असंय होय.. मेनू, मनोरंजनाचं
असंय होय..
मेनू, मनोरंजनाचं काय ठरलं मग?
कोणाचे किती मेंब्रं आणि काय
कोणाचे किती मेंब्रं आणि काय आणणार ते लिहायचं का?
१) वैद्यबुवा - रंपा?
२) सायो
३) maitreyee
४) स्वाती_आंबोळे
५) अभिप्रा
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात. (वडे, भेळ, समोसे) खाणार असल्यास रगडा-पॅटीसची जबाबदारी माझी.. (मग मासे मेन्यू रद्द).
७) बिल्वा
८) नात्या
९) सिंडरेला
१०) सप्रि
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन
१३) रूनी पॉटर
१४) लोला
१५) नाईक
१६) bedekar
१७) स्वराली
नावनोंदणी करताना 'फोन' ऐवजी
नावनोंदणी करताना 'फोन' ऐवजी 'आयटम' असं लिहिलं तर बरं होईल.
आणि ते नावापुढे दाखवायचं.
'बदल करा' म्हणून लिंक आहे पण मला आता काहीच बदल करता येत नाही. कॅन्सल तेवढे करता येते.
कोण म्हणे आयटम? भ मे ही त्याच
कोण म्हणे आयटम? भ मे ही त्याच असतील अशी शंका आहे.
इथे कुणीतरी लवकरच व्याजासह
इथे कुणीतरी लवकरच व्याजासह मार खाणार आहे..
देसाई, मी मेनू आयट्म, मनोरंजन
देसाई, मी मेनू आयट्म, मनोरंजन आयटम लिहिता येतोय का बघत होते हो.
मी तर काहीच बोललो नाही, फक्त
मी तर काहीच बोललो नाही, फक्त प्रश्न विचारला आणि वस्तुस्थिती सांगितली.
मनो अगर रंजनाचे कार्यक्रम..
मनो अगर रंजनाचे कार्यक्रम.. कुणाला करायचे असतील तर भाईंकडे नांव देऊन परवानगी घ्यावी..
भाईंकडे नाव कशाला? त्यांचम तर
भाईंकडे नाव कशाला? त्यांचम तर नाव नाही येणार्यांच्या यादीत!
मनोरंजनास्तव मी तोंडाची वाफ दवडून दाखवीन.
भाई पडद्यामागे (Background)
भाई पडद्यामागे (Background) मधे तयारी करत असतील...
थोडी चाळवा चाळव.. बाफ मागच्या
थोडी चाळवा चाळव.. बाफ मागच्या पानांवर शोधावा लागतो?
मेन्यूची थीम ठरली का? मी काय
मेन्यूची थीम ठरली का? मी काय आणायचं आहे?
देसाई भेळ वगैरे मी आणतो पण मासे असूद्यात
मिसळ ठरली ना? ंमग मला वाटते
मिसळ ठरली ना? ंमग मला वाटते भेळ नको पुन्हा.
मैत्रेयी असू देत की भेळ पण
मैत्रेयी असू देत की भेळ पण
ठीक आहे मैत्रेयी. कोणीतरी
ठीक आहे मैत्रेयी.
कोणीतरी पुढाकार घेऊन एकेकाला पदार्थाची जबाबदारी दिलीत तर गाडी पुढे सरकेल असं वाटतंय. आता जेमेतेम ८-१० दिवसच राहिलेत ना, मेन्यू फायनल होईस्तोवर ५-६ निघून जातील.
माझ्यासाठी आणावयाचा पदार्थ न ऊरल्यास फचिनच्या अनुपस्थितीत मी पानांची जबाबदारी घेईन.
ती कांचमगुंडा का काय कॉफी आहे ती करायचीये का? त्यासाठी कुठली पेसल कॉफी असेल तर ती पण घेऊन येतो मी. पण प्रत्येकाने आपापला कप घोटावा. फार भारी दृष्य असेल सगळे एकदमच कॉफी घोटतांना.
मेनू विषय सुरु झाला की मै
मेनू विषय सुरु झाला की मै येते..
भेळ असेल तर त्याच्या चटण्या
भेळ असेल तर त्याच्या चटण्या मी आणेन.
खरच जरा मेन्यू ठरवा.
गुंडा कॉफीची आयडिया भारी
गुंडा
कॉफीची आयडिया भारी आहे. कृपया !!! आणावी.
हो आणि ते कॉफी घोटतांना एकाच
हो आणि ते कॉफी घोटतांना एकाच वेळी एवढ्या कप आणि चमच्यांच्या खडखडाटी रेझोनन्सने देसाईंच्या खिडक्यांच्या काचांना तडे गेले तर तेही भरून द्यावे लागतील.
देसाई तुम्ही एक डिस्ल्केमरच लिहून घ्या खरं प्रत्येकाकडून.
कांचमगुंडा>>> कांचमुकुंद ऐवजी
कांचमगुंडा>>> कांचमुकुंद ऐवजी "कांचमगुंडा" हे नाव मस्त वाट्टय
ते कप आणि चमचे देसाई देणार
ते कप आणि चमचे देसाई देणार का? कपाला ओरखडे पडतात.
चमचे प्लास्टिकचे वापरावे.
सर्व कांच आणि मुकुंदाना
सर्व कांच आणि मुकुंदाना विनंती: स्वतःच्या घरून स्वतःचे अगर शेजार्यांचे कप, चमचे वगैरे लागणारे साहित्य आणावे आणि जाताना परत घेऊन जावे. कॉफी करताना आवाज कमी ठेवावा (स्वतःचा, आणि कप-चमच्यांचा)... अन्यथा तयार झाल्यावर कॉफी जप्त करून पिण्यात येईल..
हुकूमावरून....
चमन, गुलाबजाम, आइस्क्रीम
चमन, गुलाबजाम, आइस्क्रीम किंवा तत्सम घेऊन ये काही सुचले नाही तर. आपल्या देसीकॉर्नर मधे पण मिळतील .कामावरून येता जाता जमेल तुला

बाकी मेनू?
विनय- मासे, सोलकढी
मी अन लोला मिसळ आणि अजून काहीतरी
मसालेभात किंवा पुलाव सूट होईल या सगळ्या बरोबर. कोण आणतंय? हराभरा कबाब / टिक्की / पकोडे पण छान सूट होतील
जिलेबी
अळूची भाजी
डुबुकवड्याची आमटी की काय ते, खस्ता कचोरी? व्वा !
मी मनाला येइल ते लिहितेय. तुम्ही लोक सुचवा की तुम्हाला काय आणायचेय ?
के एम कॉफी करताना कपाच्या
के एम कॉफी करताना कपाच्या ओरखड्यांचं मरू दे, ओरखड्यांत कपाचं खरवडल्या गेलेलं आपल्या पोटात जातं त्याचं काय?!
स्टेनलेस स्टीलचे कप आणि लाकडी चमचे घ्या! तालात फेटा/घोटा! म्हणजे करमणुकीचा आयटम होईल.
सोलकढी, मिसळ आणि मसालेभात असलं की मला पुरे!
Pages