सोप्पं कॅरेमल पुडिंग

Submitted by वर्षू. on 28 December, 2011 - 06:01
caramel pudding
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

-१ कप दूध
-१ ब्रेड ची स्लाईस
- १ अंड - अंडं नको असल्यास ब्रेड च्या दोन स्लाईसेस
- दीड कप साखर
- बदामाचे पातळ काप (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

ही माझ्या आई ची अतिशय सोपी पण सुपर टेस्टी कॅरेमल पुडिंग ची रेसिपी .

कुकर मधे बसेल इतक्या साईझ चं, जाड बुडाचं भांड घ्या. या भांड्यात पाऊण कप साखर घालून ,डायरेक्ट मंद गॅसवर वितळत ठेवा. (नंतर वाफवण्याकरता ते भांड कुकरमध्ये बसायला हवे) .मधून मधून सांडशी ने भांडं उचलून वितळलेली साखर नीट ,एकसारखी पसरवत राहा. साखर वितळवाताना आच मंदच पाहिजे. नाहीतर कॅरेमल पटकन ब्राऊन होऊन्,कडवट लागेल.
साखर वितळून सुरेखसा डार्क सोनेरी रंगाची झाली कि भांडं गॅसवरून उतरून थंड होऊ द्या.
बदामाचे काप घालायचे असल्यास लगेच या कॅरेमल वर नीट पसरा.

कॅरेमल थंड होऊन छान कडक होईस्तोवर दूध, उरलेली साखर (जास्त गोड पुडिंग हवे असल्यास चवीनुसार जास्त साखर घाला), ब्रेड ची स्लाईस (पाण्यात भिजवून मऊ झालेल्या ब्रेड च्या स्लाईस ला घट्ट पिळून ,कडा काढून टाकून घ्या),एक अंड ,एलेक्ट्रिक चर्नर किंवा मिक्सर वर एकजीव करून घ्या.
मिश्रण छान फेसाळ झाले पाहिजे,म्हणजे अंड्याचा वास येणार नाही.
हे मिश्रण ,कॅरेमल वर ओतावे.
आता हे भांडं, कुकरमधे उंच स्टँड ठेवून त्यावर ठेवावे. मग कुकर ला प्रेशर न लावता ,वाफ आली कि मिडियम गॅस वर १५ मिनिटे वाफवून घ्या.
कुकर नीट थंड होऊ द्या. मग पुडिंग चं भांड बाहेर काढून सुरीने चारीबाजूने मोकळं करून घ्या ,ज्या डिश मधे काढायचं असेल ती डिश त्यावर उपडी ठेवा.
आता डिश नीट धरून सुलटी करा.. कॅरेमल पुडिंग अलगद डिशवर येईल.. केक सारखे तुकडे कापून आस्वाद घ्या. थंडी च्या दिवसात मायक्रो मधे वॉर्म करून खाता येते. नाहीतर फ्रीज मधे ठेवून द्या.थंड ही खूप चांगलं लागतं.

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांकरता
अधिक टिपा: 

हे पुडिंग खरोखरच करायला अतिशय सोप्पं आहे. शुअरशॉट रेसिपीये !! मला सह्ही जमतेय म्हंजे कुण्णालाही सहज जमेल Lol
बदाम रात्रभर भिजत घातले होते. सकाळी सालं पटकन काढता आली. आणी मग लहानशा ड्राय फ्रूट स्लाईसरवर काप केले. सुरेख पातळ होतात,मेहनतीशिवाय!!!

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी.. बेट्टी क्रॉकर्स ची रेडी टू मेक पुडिंग्स,ब्राऊनीज मिक्स विकत मिळतात ,तीपण अल्युमिनियम फॉईल कंटेनर्स मधेच असतात्,सरळ मायक्रो करता येतात कि इन्स्टंट देझर्ट तयार..
तू दिलेली लिन्क इकडे ब्लॉक्ड आहे त्यामुळे बघता न्हाय येत Uhoh

अधिक टिपा:
हे पुडिंग खरोखरच करायला अतिशय सोप्पं आहे. शुअरशॉट रेसिपीये !! मला सह्ही जमतेय म्हंजे कुण्णालाही सहज जमेल Rofl Rofl

काय ग वर्षु हे.. Proud

माऊ आज होउनच जाउदे तुझ हातच पुडिंग. Happy

चिऊ, येतेस का खायला? करतेच्च आज. फोटो पण टाकेन ( प्रयत्न नाही फसला तर. ) मी तर दुपारपासुन उपास केला आहे आणि तपाला बसले आहे संध्याकाळी हाताला यश येण्यासाठी. Wink

वर्षु, चिल माडी. Wink

दोन अंडी, दोन मिडिअम स्लाइस ब्रेड कडा कापून. एक वाटी दूध, पाउण वाटी साखर. हे मी घेतलेले प्रमाण. फोडणी द्यायच्या पळीत चार चमचे साखर व दोन बारके चमचे पाणी घालून आटवत हळू क्यारेमल बनविले. मग ते पोळीच्या डब्यात ओतून मग त्यात कस्टर्ड मिक्स घातले. १५ मिनिटे हाय वर स्टीम मग १५ मिनिटे लो वर स्टीम. मग गार होउ दिले. मग बाहेर काढून जरा रूम टेंप. ला येउ दिले. मग ताटलीत काढले.

अश्विनीमामी.. फोटू टाक्नं...
मनीमाऊ मी चिल चिल करत आता कटरीनामधे परिवर्ति होणार बहुतेक Wink )))))))))))))))
वेल नॉट अ बॅड आयडिया Wink Wink

हा हा हा ..... इथे अनेक पुडिंगपीडीत आणि पुडिंगहर्षित लोकं भेटलेत.

वर्षुताई, पुडिंग एकदम हिट्ट झालंय ग.

चालू आहे... कसे होणार? Sad कॅरॅमल नॉन स्टिक मध्ये वितळवून घेतले.... गोल्डन झाले.. मग ते दुसर्या भाम्ड्यात घातले तर थोडे कडकडीत झाले.... आता ते दुसरे भाम्डे दुसर्‍या नॉन स्टिक भाम्ड्यात पाणी घालून त्यात सोडले आहे.. सगळा प्रयोग इंडक्शन प्लेट्वर सुरु आहे.. त्यामुळे कुकर वापरता येत नाही...

नुसते दूध पावाचेच पुडींग करुन घ्यावे.. मग त्यावर कॅरॅमल नॉन स्टिक भांड्यात वितळवून ओतावे व त्याचे टॉपिंग करावे.. हा ऑप्शन बरा वाटतो. Happy

एक निरीक्षण. आपण पुडिन्ग नीट सुटून येण्या साठी कमी उंचीचे भांडे वापरले पाहिजे. एक दीड इंच उंच असा फ्लॅट पॅन वापरावा. फ्लॅन नावाच्या डिश साठी येतो तो. उलटे करून सुटून येताना पुडिन्ग भांड्या च्या उंचीमुळे तुट्ते आहे. धप्प कन पडावे लागते त्यास. उकडल्यावर बाहेर काढल्यावर सुरीने अलगद साइड ने फिरवून सुटे करावे व मग अलगद उलटे करावे. बुटक्या पॅन मुळे त्याला फार जर्नी करावे लागणार नाही.

जामोप्या तुमच्या ट्रिकने तो कॅरेमलचा मऊ लेयर येणार नाही. साडीला काठ विणल्यासारखे कॅरेमेल दिसायला हवे. व बदामाच्या बुटट्या. हाय आज कॅरेमली स्वप्ने पडणार नक्की. Happy

कायतरी सोप्पं दिसतय म्हणून वाचायला आले तर हा भल्याभल्यांची दाणादाण उडवणारा प्रकार दिसला..मला वाटतं वर्षुनी आता कॅरेमल पुडींगसाठी एक २४*७ हेल्पलाईन सुरु करावी. म्हणजे देशोदेशीच्या लोकांना जरा खरंच "सोप्पं" पडेल Lol Light 1

कॅरेमली स्वप्न माझे, तू पुडिंगवर पांघरावे >> आशूडी, आय हाय....!! Proud

अमा, तुम्ही बरोबर म्हणत आहात. बुटक्या भांड्यातून पुडिंग सुट्टे करताना त्याला फार प्रवास करावा लागत नाही. मी एका छोटुकल्या स्टीलच्या जाड बुडाच्या पातेल्यात हे पुडिंग करायचे. त्यामुळे पुडिंगचा आकार फार काही देखणा नसायचा, पण उपडे पडताना त्याला कॅरेमल बरोबर चिकटून यायचे.

हे घ्या खास लोकाग्रहास्तव.. (असे म्हणायची पद्धत आहे हे मिल्यादांनी शिकवले आहे)

कॅरेमली कौशल्य माझे..

कॅरेमली कौशल्य माझे, तू बदामा सजवावे
मोकळ्या ताटात माझ्या, तू पुडिंगा सावरावे

लागूनी मिक्सी दुधारी, शिरशिरी यावी अशी की
साखरी दुधात अंडे अन अंडे दुधामाजी भिनावे

कोरड्या त्या साखरेची तार झंकारुन जावी
नाजूक मंद गॅसची, आच तू ती विझवावी

रे कुकरच्या बाहूत तुला, एक हलके वाफ द्यावी
मी तुला उपडे करावे, तू पुडिंगला बिलगून यावे!

(* मूळ कवी सुरेश भट यांची माफी मागून)

झाले. चवीला छान झाले. पण कॅरॅमल मात्र भांड्याला बरेचसे चिकटले. ( आई म्हणत होती, एवढी नासधूस करण्यापेक्षा तेवढ्या पैशात केक नस्ता का आला? तिला मी केक म्हनून बोललो होतो. पुडिंग कळनार नाहे म्हणून.. )

आशुडी... आत्तपर्यन्त गडाबडा लोळत होते..आता अक्षरशः कोलमडलेय हसून हसून!!!

नताशा,अश्विनीमामी Biggrin

जामोप्या.. अमाचं बारीक निरिकशण लकशात घ्या.. Happy

शूम्पी..तू माझ्या डोळ्यासमोर काचा बांधून तयार असलेली आलीयेस ..

र च्याकने..
लहानपणापासून 'राजेश खन्ना' ला रातोरात मिळालेल्या तूफान लोकप्रियतेचं कोडं सुटता सुटत नव्हतं..
ते आता सुटलंय.. पब्लिक रिस्पाँस असला तर ,राजेश खन्ना काय किंवा पुडिंग काय.. कोणाचीही सक्सेस स्टोरी हिट्टं व्हतीया!! .. Proud

Biggrin वर्षु, किती तो प्रामाणिकपणा!

सोप्पं दिसतय. करुन बघते.

पब्लिक रिस्पाँस असला तर ,राजेश खन्ना काय किंवा पुडिंग काय.. कोणाचीही सक्सेस स्टोरी हिट्टं व्हतीया!! .>>>>>> Lol

आशूडी ..... मस्तच जमलंय. काव्य. पुडिंग नाही.>>>>>>>> अगदी अगदी..

मला पण ह्या सोप्प्या पुडिंगमध्ये उडी घ्याविशी वाटायला लागली आहे..>>>>> वेलकम Happy

जामोप्या अभिनंदन

मामी, निरीक्षण भारीच

काल केले पण थुलथुलीत झाले. माझ्या मते ५ ब्रेड स्लाइस आणि कमित कमि २ अन्डे पाहिजे त्या रसिपीत. आणी हो भान्डयाचे बुड स्वछय करणे हे मोठे अवघड काम झाले होते. वाटते तेवढी सोपी नाही ही रेसिपी.

Pages