सोप्पं कॅरेमल पुडिंग

Submitted by वर्षू. on 28 December, 2011 - 06:01
caramel pudding
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

-१ कप दूध
-१ ब्रेड ची स्लाईस
- १ अंड - अंडं नको असल्यास ब्रेड च्या दोन स्लाईसेस
- दीड कप साखर
- बदामाचे पातळ काप (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

ही माझ्या आई ची अतिशय सोपी पण सुपर टेस्टी कॅरेमल पुडिंग ची रेसिपी .

कुकर मधे बसेल इतक्या साईझ चं, जाड बुडाचं भांड घ्या. या भांड्यात पाऊण कप साखर घालून ,डायरेक्ट मंद गॅसवर वितळत ठेवा. (नंतर वाफवण्याकरता ते भांड कुकरमध्ये बसायला हवे) .मधून मधून सांडशी ने भांडं उचलून वितळलेली साखर नीट ,एकसारखी पसरवत राहा. साखर वितळवाताना आच मंदच पाहिजे. नाहीतर कॅरेमल पटकन ब्राऊन होऊन्,कडवट लागेल.
साखर वितळून सुरेखसा डार्क सोनेरी रंगाची झाली कि भांडं गॅसवरून उतरून थंड होऊ द्या.
बदामाचे काप घालायचे असल्यास लगेच या कॅरेमल वर नीट पसरा.

कॅरेमल थंड होऊन छान कडक होईस्तोवर दूध, उरलेली साखर (जास्त गोड पुडिंग हवे असल्यास चवीनुसार जास्त साखर घाला), ब्रेड ची स्लाईस (पाण्यात भिजवून मऊ झालेल्या ब्रेड च्या स्लाईस ला घट्ट पिळून ,कडा काढून टाकून घ्या),एक अंड ,एलेक्ट्रिक चर्नर किंवा मिक्सर वर एकजीव करून घ्या.
मिश्रण छान फेसाळ झाले पाहिजे,म्हणजे अंड्याचा वास येणार नाही.
हे मिश्रण ,कॅरेमल वर ओतावे.
आता हे भांडं, कुकरमधे उंच स्टँड ठेवून त्यावर ठेवावे. मग कुकर ला प्रेशर न लावता ,वाफ आली कि मिडियम गॅस वर १५ मिनिटे वाफवून घ्या.
कुकर नीट थंड होऊ द्या. मग पुडिंग चं भांड बाहेर काढून सुरीने चारीबाजूने मोकळं करून घ्या ,ज्या डिश मधे काढायचं असेल ती डिश त्यावर उपडी ठेवा.
आता डिश नीट धरून सुलटी करा.. कॅरेमल पुडिंग अलगद डिशवर येईल.. केक सारखे तुकडे कापून आस्वाद घ्या. थंडी च्या दिवसात मायक्रो मधे वॉर्म करून खाता येते. नाहीतर फ्रीज मधे ठेवून द्या.थंड ही खूप चांगलं लागतं.

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांकरता
अधिक टिपा: 

हे पुडिंग खरोखरच करायला अतिशय सोप्पं आहे. शुअरशॉट रेसिपीये !! मला सह्ही जमतेय म्हंजे कुण्णालाही सहज जमेल Lol
बदाम रात्रभर भिजत घातले होते. सकाळी सालं पटकन काढता आली. आणी मग लहानशा ड्राय फ्रूट स्लाईसरवर काप केले. सुरेख पातळ होतात,मेहनतीशिवाय!!!

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिमुरे आठवण काढल्याबद्दल धन्स.. सगळे फोटू कुठे गेलेत कुणास ठाऊक.. पण एकेकाळी या रेसिपी ने ,' कोलावरी डी' च्या हिट्स च्या संख्येला मात दिली होती ( अ‍ॅवरेज वाईज हाँ.. ) Wink Proud

वर्षुतै सकाळी सकाळी आधी सगळ्या कमेंट्स वाचुन काढल्यात Wink एक्दम मस्त फ्रेश मुड झालाय.. म्हणुनच हिम्मत करतेय... यावेळी सासरी ट्राय करणार असल्याने टेंशन हैच..

पुडिंग संपलं म्हणुन फोटो गायब.. परत करा.. तसाही इयर एन्ड आहेच.. होउ दे .... पुडिंग आहे सोप्पं... सोप्पं ला यमक जुळवा Happy

माकाचु

काल ट्राय केलं परत करायचा.. पण ढोकळा फुगला नाही की कसा होतो ना तसं झालं पुडिंग. काय चुकलं असेल? ब्रेड जास्त झाला का? रबडी इतकी कन्सिस्टंसी ठेवलेली दुध ब्रेड अन साखरेच्या मिक्श्चर ची

बाई ग ! काय होत हे !
सोप्प वाचून आत डोकावले. फोटो नाहीत म्हणून प्रतिक्रिया वाचायला घेतल्या.
आठवड्याची सुंदर सुरवात, सकाळची मिटिंग सुद्धा ह्याच हसण्याच्या टोनिक वर पार पडली.
आज प्रयोग करावा का??

बिना कॅरमेल करुन बघते, मग जमल तर वरुन कॅरमेल सॉस ओतुन खाते.
(प्रतिक्रिया वाचून हे प्रकरण कॉम्प्लेक्स असावं वाटतय! Happy )

जमल तर सोप्प नाहीतर अवघड कॅरमेल पुडींग अस नाव पाहीजे. Happy नावातुन पुडींग पण काढायला हव का? उगीच प्रेशर येत. पुडींग /खीर्/रबडी अस काहीही नाव ठेवायच कृती कंप्लिट झाल्यावर ऑपशन पाहीजे. Happy
मी पुर्वी पाव न टाकताच थुलथुलीत पुडींग बनवल आहे. आता अस बनवुन बघेन. देवाने आधीच पाव आणुन ठेवले आहेत पण ते ब्राउ न आहेत. सगळ पुडींगच चॉकलेटी होणार पण नाईलाज आहे.

जमल जमल! चविला पण छान झालय.( फोटो फार खास नाही आलाय पण प्र्त्यक्षात कॅरेमलला चान्गला रन्ग आला होता)
image_24.jpg
अदिति मीही ब्राउन ब्रेड वापरलाय, रन्ग ब्राउन येत नाही (तयार )कॉफी कलर येतो साधारण.

कॅरामल मस्त जमलं, तेव्हा एकदम खुष झाले पण पुडिंग बिघडलं. वर्षू नील हा १ कप म्हणजे मेजरींग कपच ना? कि चहाचा कप? मला मेजरींग कपच्या मानाने एक अंड आणि १ ब्रेड कमी वाटतयं.

सहिच ! मलाही परत करावस वाटतय . मागे केल होत तेन्व्हा चन्गल जमल होत .
पण आपल म्हनजे "डिझायनर पीस आहे मॅडॅम , दूसरा कलर नाही मिळ्नार , सिंगल पीस ! " त्यातला प्रकार असतो .

अगदी तेच वाटी चमचे मापाला , घड्याळ लावून तितकाच वेळ , तोच उत्साह ... पण तोच पदार्थ बनेल याची ग्यारंटी नाय Sad

ऐ वॉव.. मस्त गा,, फोटोज छान आलेत,,
सुमेधाव्ही , खर्रच सोप्पंय करायला.. म्हणून तर सोप्पं असं नांव दिलंय.. Happy
सहेली आता फोटो करता तरी करेन लौकरच..

मी पण केले. सग्ग्ळे नीट झाले, पण कॅरामल भांड्याला आणि पुडिंग कॅरामलला चिकटून बसले ते निघायचे नावच घेईना. जरा जोरात ठोकले भांडे तर विवरासारखा खड्डा असणारे पुडिंग पडले ताटलीत. मग चमच्याने ते भांड्याला राहिलेले पुडिंग त्या विवरावर लिंपून टाकले. बारिकसा लेयर आला कॅरामलचा. रंग आणि चव मस्त जमली. भांड्यातले कॅरामल थोडे पातळ करून, खायला घेताना पुडिंगवर घातले.

नवर्‍याला या पुडिंगचा फार भीतिदायक अनुभव होता लहानपणचा. म्हणजे अंड्याचा वास, लूक वगैरेमुळे. पण हे खाऊन झाल्यावर त्या भीतीचा विसर पडून कॅरामल पुडिंग छान असते असे सर्टिफिकेट मिळाले आहे. तर ते सर्टिफिकेट वर्षू नील आणि या धाग्याला समर्पित.

वर्षू ताई, सोप्पं हा शब्द वाचून मी पण धाडस केलं, थोडं थुलथुलीत अस पुडींग झाल, रंगही छान आला पण.... पण थोड कॅरेमल भांड्याला चिकटून राहील आणि तरी सुध्दा 'अगं, किती गोSSSSSSड आहे हे' असा टोमणा बसलाच Sad

एकंदरीत , पुडिंग सोप्पच आहे , ते कॅरॅमल प्रकरण अवघड दिसतय
माझंही ,पुडिंग कॅरामलला आणि कॅरामल भांड्याला असा प्रकार झाला होता.
पुडिंग ने कॅरामलला सोडलं पण कॅरामल भांड्यालाच जखडून !

नाताळबाबांसाठी परत एकदा प्रयत्न करणार .

मी कॅरमल न टाकता केले हे पुडींग , पर्फेक्ट झाले. सगळ्यांना आवडले ही. सरळ एक चहाच्या कपाचे प्रमाण घेतले. थॅन्क्स वर्षू ताई.

काल हे पुडींग करून बघितलं. मस्त झालं.
थोडे बद्ल केले ते असे:
१ कप दूध
२ अंडी
४ ब्रेडचे स्लाईस
कॅरमल मायक्रोवेव्ह मधे केले. मायक्रोवेव्ह सेफ बाऊल मधे १ कप साखर + १/४ कप पाणी. फुल पॉवरवर साधारण तीन मिनिटे ठेवले. लगेच कुकरच्या भांड्यात ओतले. वर बदामाचे काप घातले. थंड होऊ दिले. त्या वेळात बाकीचे मिश्रण मिक्सर मधून काढून घेतले. मग ते भांड्यात ओतून कुकरमधे १५ मिनिटे ठेवले. मग थोडे थंड झाल्यावर प्लेटमधे काढले. कॅरमलचा छान लेयर आला आणि व्यवस्थित निघून आलं. चवही मस्त आली होती Happy

मस्त रेसिपी .इतक्या सह्ही प्रतीक्रीया म्हणजे छान होत असेल कॅरेमल पुडिंग.
फोटो परत टाकाल का ! प्लिज.

ऐ वॉव.. इतक्या मस्त मस्त प्रतिक्रिया वाचून मस्त वाटलं.. चीकू, फोटू काढलास का नै>>

मैत्रीणीनो सध्या हाऊस गेस्ट्स आणी भटकंतीज , लग्नी.. खूप बिझी ठेवताहेत..

केंव्हाही केलं की फोटो अपलोड करीनच
थांकु थांकु सर्वांना

बेष्ट !! जमल ग जमल !
पहिल्या फटक्यात जमलेलं आहे.
मस्त चव. सुंदर मधाचा रंग आला कॅरेमलला. खूप आवडल सगळ्यांना.
चांगल झाल तर पाहुण्यांना द्यावे अस ठरवल होत. त्यांनाही आवडलं. घरी केल का असे विचारले म्हणजे बघ.
फोटो अपलोड करता आले तर उद्या टाकते.

धागा जनहितार्थ वर काढला. ( कोणाच्या कुठल्या कुठल्या आठवणी जाग्या झाल्या असतील)

या रविवारी , बरेच महिन्यानी हुक्की आली . एम्बीचे प्रमाण एक्दम सही आहे .

IMG8.jpg

यात कॅरॅमल वरून ओतल्यासारखं का दिसतंय ? >>> कारण , ते वरूनच ओतल आहे Biggrin .
आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पाणी सुटून ओघळलं आहे .
ते ' कॅरेमल भांड्याला चिकटलं आणि पुडिंग अलिप्तपणे बाहेर आलं" वगैरे प्रकार नको होते .

Pages