सोप्पं कॅरेमल पुडिंग

Submitted by वर्षू. on 28 December, 2011 - 06:01
caramel pudding
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

-१ कप दूध
-१ ब्रेड ची स्लाईस
- १ अंड - अंडं नको असल्यास ब्रेड च्या दोन स्लाईसेस
- दीड कप साखर
- बदामाचे पातळ काप (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

ही माझ्या आई ची अतिशय सोपी पण सुपर टेस्टी कॅरेमल पुडिंग ची रेसिपी .

कुकर मधे बसेल इतक्या साईझ चं, जाड बुडाचं भांड घ्या. या भांड्यात पाऊण कप साखर घालून ,डायरेक्ट मंद गॅसवर वितळत ठेवा. (नंतर वाफवण्याकरता ते भांड कुकरमध्ये बसायला हवे) .मधून मधून सांडशी ने भांडं उचलून वितळलेली साखर नीट ,एकसारखी पसरवत राहा. साखर वितळवाताना आच मंदच पाहिजे. नाहीतर कॅरेमल पटकन ब्राऊन होऊन्,कडवट लागेल.
साखर वितळून सुरेखसा डार्क सोनेरी रंगाची झाली कि भांडं गॅसवरून उतरून थंड होऊ द्या.
बदामाचे काप घालायचे असल्यास लगेच या कॅरेमल वर नीट पसरा.

कॅरेमल थंड होऊन छान कडक होईस्तोवर दूध, उरलेली साखर (जास्त गोड पुडिंग हवे असल्यास चवीनुसार जास्त साखर घाला), ब्रेड ची स्लाईस (पाण्यात भिजवून मऊ झालेल्या ब्रेड च्या स्लाईस ला घट्ट पिळून ,कडा काढून टाकून घ्या),एक अंड ,एलेक्ट्रिक चर्नर किंवा मिक्सर वर एकजीव करून घ्या.
मिश्रण छान फेसाळ झाले पाहिजे,म्हणजे अंड्याचा वास येणार नाही.
हे मिश्रण ,कॅरेमल वर ओतावे.
आता हे भांडं, कुकरमधे उंच स्टँड ठेवून त्यावर ठेवावे. मग कुकर ला प्रेशर न लावता ,वाफ आली कि मिडियम गॅस वर १५ मिनिटे वाफवून घ्या.
कुकर नीट थंड होऊ द्या. मग पुडिंग चं भांड बाहेर काढून सुरीने चारीबाजूने मोकळं करून घ्या ,ज्या डिश मधे काढायचं असेल ती डिश त्यावर उपडी ठेवा.
आता डिश नीट धरून सुलटी करा.. कॅरेमल पुडिंग अलगद डिशवर येईल.. केक सारखे तुकडे कापून आस्वाद घ्या. थंडी च्या दिवसात मायक्रो मधे वॉर्म करून खाता येते. नाहीतर फ्रीज मधे ठेवून द्या.थंड ही खूप चांगलं लागतं.

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांकरता
अधिक टिपा: 

हे पुडिंग खरोखरच करायला अतिशय सोप्पं आहे. शुअरशॉट रेसिपीये !! मला सह्ही जमतेय म्हंजे कुण्णालाही सहज जमेल Lol
बदाम रात्रभर भिजत घातले होते. सकाळी सालं पटकन काढता आली. आणी मग लहानशा ड्राय फ्रूट स्लाईसरवर काप केले. सुरेख पातळ होतात,मेहनतीशिवाय!!!

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी एक शंका...कॅरॅमल थंड न होउ देता लिक्विड असतानच वरून मिश्रण ओतले तर कदाचित तो कॅरॅमलचा लेअर जास्त कडक न झाल्यामुळे नंतर पटकन निघून येवू शकेल का? कालचे कॅरॅमल चमचा चमचा खात आज संपले..चव खरच खूप छान होती. पण चित्रातल्यासारखे करावेच लागणार. भरत मयेकर, आपण मायक्रोवेव मधे कसे केलेत सांगाल का? तुमचे कॅरॅमल पण मस्त झालेले दिसते आहे.

माझी ट्रायल अँड एरर पद्धत होती. मायक्रोवेव्हची रेसिपी काही कुठे मिळाली नाही.
मायक्रोवेव्ह प्रूफ बाउल्समध्ये एकेक चमचा साखर आणि अगदी काही थेंब पाणी
घेऊन मायक्रो करायला सुरुवात केली. आधी कॅरॅमल नको असतानाही कॅरॅमल झाल्याचा अनुभव आल्याने अगदी दहा दहा सेकंद तेही पॉवर कमी कमी करत पाहिले. ४० टक्के पॉवर वर अर्धा मिनिट ठेवूनही साखर वितळायचे नाव नाही, तेव्हा सरळ फुल पॉवर अर्धा मिनिट मावे केले. आणि एका बाउलमधल्या साखरेला पाझर फुटला, आणखी १० सेकंदांनी तिने रंगही बदलला. दुसर्‍या बाउलला आणखी १० सेकंद लागले. तिसर्‍या बाउलचे नशीब मात्र फुटके होते, त्यात पुन्हा काही थेंब पाणी टाकल्यावर साखर वितळली, पण रंग नाही बदलला. तेव्हा आपल्या नशिबी ६६ टक्के गुण अर्थात पास क्लास आहे अशी समजूत घालून घेतली.
मग कॅरॅमल कडेलाही येईल अशा प्रकारे बाउल्स हलवून ते रूम टेंपरेचरला आल्यावर त्यात तळाला काजू बदामाचे तुकडे, दूध+ब्रेड+साखरेचे मिश्रण घालून फुल पॉवरला मायक्रोवेव्ह केले. हा सगळा प्रकार उतू जाऊ नये यासाठी देवाचा धावा केला. पाच मिनिटांनी मिश्रण काहीसे ओलसर वाटत होते, त्यामुळे आणखी तीन मिनिटे मावे केले.
मग गार झाल्यावर रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून आज नववर्ष साजरे करण्यासाठी बाहेर काढले.
एका बाउलमधले काजू बदामाचे तुकडे आश्चर्यकारकरित्या अव्वल डायव्हर्ससारखे वर आले होते.

भरत!!!!!!!
'कॅरॅमल नको असतानाही कॅरॅमल झाल्याचा अनुभव''... Rofl Rofl
पण तुला १००%मार्क्स रे.. माझं पुडिंग तुझ्या पुडिंग सार्खच दिस्तंय की..
मायक्रोवेव मधे केल्याची कृती टाक आता..
@ सुमेधाव्ही.. कॅरेमल वॉर्म असाताना वरून मिश्रण ओतल्यास कॅरेमल चे ओघळ सर्व पुडिंगवर असमान रीतीने पसरतील..
सान२६ .. पाऊण वाटी साखर कॅरेमल करायला वापरली आहे. मिश्रणात तुम्ही तुमच्या चवीनुसार कमीजास्त साखर घेऊ शकता. कॅरेमल चा पातळसा थर प्रत्येक तुकड्याला असल्यामुळे मिश्रण फार गोड नसलं तरी चालतं..
झंपी..खरंच खूप सोपं आहे हे करायला.. मै कोई ग्रेट कुक नही..पण मलाबीजम्तय ना बर्‍यापैकी..म्हणून 'सोप्पं'हा शब्दप्रयोग.. Lol

रच्याकने..
ऐ बायांनो.. तुमचे परयोग बघून मला ना आता' अंधों मे काना राजा' झाल्यासार्खं वाट्तंय बघा!!! Wink

Light 1 Light 1 Light 1

मस्त रेसिपी व प्रतिक्रिया.

अंडे घालणार तर व्हॅनिला इसेन्स नक्की घाला. त्याने अंड्याचा फ्लेवर मास्क होतो. मग भरीस एखादा ड्रॉप बटरस्कॉच/ कॉफी/ बदाम फ्लेवर घालता येइल.

जर विदाउट अंडे करणार तर भारतीय फ्लेवर्स जसे जायफळ वेलदोडा, केशर घालता येइल म्हणजे चवीत काँप्रमाइज होणार नाही. ह्याच्या सोबतीला कट फ्रूटस व व्हाइट फेटलेल्या क्रीमचा एक स्टार मस्त दिसेल.

लगे रहो. Happy

परफेक्ट रेसिपी. आताच केलं न्यू इअर ब्रेकफास्ट्साठी. मला १५ मिनिटांऐवजी २५ मिनिटं ठेवावं लागलं. फोटो काढायच्याआधीच मुलांनी घेतल्यामुळे फोटो पुढच्या वेळेला.

वर्षू म्हणते तसं सगळं कॅरॅमल निघत नाही पण पूर्ण लेयर येतो पुडिंगवर. मी ब्लेंडर वापरला. अंड्याचा वास अजिबात येत नाही. मी अंड्याच्या वासाबद्दल खूप सेंसिटिव्ह आहे.

वर्षू, रेसिपिबद्दल thanks. मायक्रोवेव्हमध्ये करून पाहिलं पाहिजे.

आर्>>>>>>>>>>>>>>च!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
धन्स गं........... मला धडकीच भर्ली होती आता..कुणी पुडिंग करायला घेतलं कि मलाच परिक्षेला बसल्यासार्खं वाटत होतं.......... Proud

वर्षूताई,

मी ते गंमतीने लिहिलेले 'सोप्पं' शब्द काढ म्हणून. हि इतकी सोप्पी पाकृ कशी काय बिघडते हे वरच्या प्रतिक्रिया वाचून .. Happy

मला येणारी ही एकमेव पाकृ मी सुद्धा मस्त करते लहानपणापासून. कारण खरेतर काहीच कठीण नाहीये ह्यत. उलट आई बर्‍याच वेळा करायची सुरुवातीला, मग मीच करायची जरा अक्काल आल्यावर. Happy

माझी आई इडलीच्या भांड्यात करायची. इडलीचे जे जुन्या प्रकाराचे भांडे असते ज्यात वाट्या असतात. इडलीच्या ज्या वाट्या असतात ना त्यात जरा जरा कॅरामल ओतून वरती मिश्रण ओतायचे. मग वाफवायचे. नाहीतर ओवन मध्ये बेक करायचे. काहीच कठीण नसलेली ही पाकृ जेमतेम १५ मिनिटे करायला लागतात व २० मिनिटे वाफवायला म्हणूनच मीच करायची तेव्हा( तेव्हा म्हणजे बचपन मे). Happy

मी करुन बघितलं... पण बरंच काही चुकलं असावं... कॅरेमल तळाशीच चिटकुन राहिलं.. आणि २ वेळा कुकरला लावुनही घट्टपणा आलाच नाही... मी अंडं घालायचं नव्हतं म्हणुन २ ब्रेड स्लाईस घातले.. कदाचीत अजुन १ घालायला हवा होता.. पण चव चांगली असावी कारण माझ्या सव्वा वर्षाच्या भाच्याने, ज्याला गोड अजिबात आवडत नाही, चक्क २ चमचे खाल्लं पातळ पुडींग...

वर्षा मी पण बनवल पुडींग.
टेस्ट मस्तच आली, पण काहीतरी चुकलच. कुकर उघडला तेव्हा वाटल की खीरच झाली आहे. तरीपण तु सांगीतल्याप्रमाणे पुर्ण उचलल पण गेल, अप्रतीम रंग आलेला. पण हाय लगेचच मोडल. पण चव खासच.
चुक आली लक्षात माझ्या. अंड कमी झाल. आज जाउन परत बनवणार आहे.

फक्त कॅरॅमल (हमखास कृती, गॅस, मा.वे., प्रमाण, वेळ, भांडी यांच्या डिटेल सकट) बनवायचा एक बाफ काढा पाहू आम्हा पामरांसाठी .

आशू माझी समै Proud मी इडलीपात्रात वाफवायला ठेवलं, खाली ताटली ठेवली होती, त्यावरून भांडं कलंडलं आणि एका बाजूस सहा सेंमि, तर एका बाजूस दोन मिमि अशी जाडी (?) झाली Lol थोडं कॅरेमल चिकटलं, पण ते ओके आहे हे आत्ताच वाचलं. सहा सेंमि जाडीच्या बाजूने पुडींग मस्त झालं होतं. परत करणार आहे. त्यावेळी भांडं कलंडणार नाही ह्याची काळजी घेईन.
थंडीमुळे की काय, माहित नाही, पण कॅरेमल थंड होताना, त्याला क्रॅक गेले. क्रॅक होताना आवाज येतो एक भारी! नक्की कशाचा आवाज येत आहे हे समजायला मला एक मिनिट लागलं! Happy
दीड कप साखर मला जास्त वाटली. पाऊण कपाचं कॅरेमल केल्यानंतर पाव/अर्धी कप साखर पुरावी. बाकी चव मस्त. ती बदामाच्या कापांची आयडिया झकास आहे!
समपातळीचं पुडिंग झालं की फोटो टाकेनच.

आशूचं वर्णन सॉलिड आहे एकदम Lol

'पार्टी पार्टी' मध्ये लिहिलेल्या कृतीप्रमाणे कॅरेमल पुडिंग एकदम मस्त आणि हमखास होतं. तिथे लिहिलेलं प्रमाण वाचून मी इथे लिहीन. त्यात कॅरेमल करताना साखरेत पाणी घालून कॅरेमल करायचं असं लिहिलेलं आहे, कॅरेमल होतं छान पण त्याचा रंग फिकट सोनेरी येतो. तो टिपीकल सोनेरी-चॉकलेटी असा येत नाही. आता इथे लिहिल्याप्रमाणे पाणी न घालता कॅरेमल करून बघेन.

कशाला? प्रत्यक्ष कृती करणार्‍यांना नसते हौस उगाचच एकेक प्रश्न घेऊन नवनवे बाफ उघडायची!

करत गेलं की चुका समजतात आणि सुधारता येतात. काही गोष्टी आपल्याआपणच कशा सुधारायला हव्या होत्या हे समजलं, काही इथे येऊन काही गोष्टी समजल्या. एका जागी सगळं असलेलं बरं.

गेल्या आठवड्यात इटीव्हीवर मेजवानी परिपूर्ण किचनमध्ये कॅरॅमल पुडिंग दाखवलं होतं, त्यात हे अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात करावे असे सांगितले. का ते नाही सांगितले.
इथे दिलेल्या कृतीत कॅरॅमल एका भांड्यात करून मग पुडिंग करायच्या भांड्यात ओतावे आणि वाफवण्याआधी भांड्याला अ‍ॅल्युमिनियम फॉइल लावावी (वाफ जाण्यासाठी फॉइलला छिद्रे पाडून) असे सांगितले आहे.

एकदम सोपी रेसिपी. अचानक पॉट लक ठरलं. काय कराव कळत नव्हत. परवाच घरी ब्रेड केला होता.नवरोजीनच म्हणण दोन दिवस झाले, आता नको. त्याच काय करायचं हे पण कळत नव्हत. -घरी केलेला, त्यामुळे टाकण पण जीवावर आलेलं, आणि हि रेसिपी पहिली. दोन्ही प्रश्न एकदम सुटले. याआधी पुडिंग खाल्ला पण नव्हत, केल पण नव्हत. कस लागेल शंका वाटत होती, पण एकदम अफलातून. सगळ्यांना आवडलं.
मी एंक कप दुधाला ३ ब्रेड slice वापरले. माझ पुडिंग १५ मिनिटात शिजल नाही ( थुलथुलीत होत ) , म्हणून अजून १५ मिनिट ठेवलं. दुध आणि ब्रेड मिश्रणात थोडा मिठाचा दाणा टाकला होता. चव छान लागली. माझ्याकडे कुकर मध्ये राहील असं जाड बुडाच भांड नव्हत, म्हणून वेगळ्या पातेल्यात कॅरॅमल केल. ते कुकरच्या डब्यात ओतल आणि त्यावर मिश्रण घालून शिजवलं

मला धडकीच भर्ली होती आता..कुणी पुडिंग करायला घेतलं कि मलाच परिक्षेला बसल्यासार्खं वाटत होतं.......... >>> वर्षु, Lol बिच्चारी ती !

पण वर्षु, पाहिलंस का ? एवढ्या सोप्या रेसिपीमधेच आम्ही सगळे कसे गोंधळ घालतो आहे. आणि गंमत म्हणजे रेसिपीच्या धाग्याने शंभरी ओलांडण्याची ही पहिलीच वेळ असावी ( माझ्या माहितीत तरी). हिट्ट झाली गं तुझी रेसिपी.

जेणो काम तेणो थाय
बीजा करे सो कॅरेमल खाय
Lol
आशू- Lol क्रेक्ट येकदम. कुठलाही पदार्थ दिसतो तितका अज्याबात सोपा नसतो.

काय फोटो वर्षु ताई. वाह!

मनीमाऊ.. Rofl Rofl अगा माझीच शंभरी भरायला आलीये इथे!!!!
इस पुडिंग ने गालिब ,निकम्मा कर दिया
वरना हम भी कुक थे काम के
Wink

वर्षू Lol

आशूडी Rofl

ये नये सालकी हिट्ट रेसिपी है....

कॅरेमल पुडिंग, सोबत आवडत्या फळांचे काप, जेली / कस्टर्ड, केक, आईसक्रीम म्हणजे बच्चापार्टीची नुस्ती चंगळ! Happy

Pages