सोप्पं कॅरेमल पुडिंग

Submitted by वर्षू. on 28 December, 2011 - 06:01
caramel pudding
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

-१ कप दूध
-१ ब्रेड ची स्लाईस
- १ अंड - अंडं नको असल्यास ब्रेड च्या दोन स्लाईसेस
- दीड कप साखर
- बदामाचे पातळ काप (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

ही माझ्या आई ची अतिशय सोपी पण सुपर टेस्टी कॅरेमल पुडिंग ची रेसिपी .

कुकर मधे बसेल इतक्या साईझ चं, जाड बुडाचं भांड घ्या. या भांड्यात पाऊण कप साखर घालून ,डायरेक्ट मंद गॅसवर वितळत ठेवा. (नंतर वाफवण्याकरता ते भांड कुकरमध्ये बसायला हवे) .मधून मधून सांडशी ने भांडं उचलून वितळलेली साखर नीट ,एकसारखी पसरवत राहा. साखर वितळवाताना आच मंदच पाहिजे. नाहीतर कॅरेमल पटकन ब्राऊन होऊन्,कडवट लागेल.
साखर वितळून सुरेखसा डार्क सोनेरी रंगाची झाली कि भांडं गॅसवरून उतरून थंड होऊ द्या.
बदामाचे काप घालायचे असल्यास लगेच या कॅरेमल वर नीट पसरा.

कॅरेमल थंड होऊन छान कडक होईस्तोवर दूध, उरलेली साखर (जास्त गोड पुडिंग हवे असल्यास चवीनुसार जास्त साखर घाला), ब्रेड ची स्लाईस (पाण्यात भिजवून मऊ झालेल्या ब्रेड च्या स्लाईस ला घट्ट पिळून ,कडा काढून टाकून घ्या),एक अंड ,एलेक्ट्रिक चर्नर किंवा मिक्सर वर एकजीव करून घ्या.
मिश्रण छान फेसाळ झाले पाहिजे,म्हणजे अंड्याचा वास येणार नाही.
हे मिश्रण ,कॅरेमल वर ओतावे.
आता हे भांडं, कुकरमधे उंच स्टँड ठेवून त्यावर ठेवावे. मग कुकर ला प्रेशर न लावता ,वाफ आली कि मिडियम गॅस वर १५ मिनिटे वाफवून घ्या.
कुकर नीट थंड होऊ द्या. मग पुडिंग चं भांड बाहेर काढून सुरीने चारीबाजूने मोकळं करून घ्या ,ज्या डिश मधे काढायचं असेल ती डिश त्यावर उपडी ठेवा.
आता डिश नीट धरून सुलटी करा.. कॅरेमल पुडिंग अलगद डिशवर येईल.. केक सारखे तुकडे कापून आस्वाद घ्या. थंडी च्या दिवसात मायक्रो मधे वॉर्म करून खाता येते. नाहीतर फ्रीज मधे ठेवून द्या.थंड ही खूप चांगलं लागतं.

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांकरता
अधिक टिपा: 

हे पुडिंग खरोखरच करायला अतिशय सोप्पं आहे. शुअरशॉट रेसिपीये !! मला सह्ही जमतेय म्हंजे कुण्णालाही सहज जमेल Lol
बदाम रात्रभर भिजत घातले होते. सकाळी सालं पटकन काढता आली. आणी मग लहानशा ड्राय फ्रूट स्लाईसरवर काप केले. सुरेख पातळ होतात,मेहनतीशिवाय!!!

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजिरी... थांकु गं.. फोटू टाकला असतास तर बरं झालं असतं

मामी... पुडिंग से फ्रेंच टोस्ट.... हीहीहीहीही

मी काय म्हणते, ती कॅरमलवाली बदामाची पातळ चिक्की अख्खी किंवा फोडून भांड्यात खाली ठेवा आणि वरुन ते दूध ब्रेडचं मिश्रण ओता. सगळा पदार्थ इन्टॅक्ट सुटून येईल बहुतेक.
:अजून त्या कॅरमल भांड्यापासून पुर्णपणे सोडवण्याच्या मागे हात धुवून लागलेली बाहुली:

किंवा कॅरॅमल संपूर्ण संपेपर्यंत त्याच त्याच भांड्यात पुन्हा पुन्हा दूध ओतून करत रहा.. Proud

किंवा कॅरॅमल संपूर्ण संपेपर्यंत त्याच त्याच भांड्यात पुन्हा पुन्हा दूध ओतून करत रहा.. >>
मस्त आयडीया Happy

वर्षू, एकदा हे पुडिंग ब्रेडच्या कडा तशाच ठेवून करून बघ, तसेही छान लागते. ब्रेड स्लाईस व्यवस्थित भिजलेला असला तर त्या कडाही मस्त ब्लेंड होतात.

जामोप्या.. Lol

अकु..अगं इथे ब्रेड च्या कडा फार जाड्या असतात.कितीही भिजल्या आणी ब्लेंड केल्या तरी रवाळच राहतात ..पुडिंग स्मूद होत नाही .शिवाय पुडिंगभर ब्राऊन ठिपके दिसतात.. Happy

वर्षू, एकदा हे पुडिंग ब्रेडच्या कडा तशाच ठेवून करून बघ, तसेही छान लागते. ब्रेड स्लाईस व्यवस्थित भिजलेला असला तर त्या कडाही मस्त ब्लेंड होतात.>>>> हो मी पण तसेच केले कारण अल्मोस्ट लगदा झाला इथल्या ब्रेडचा Happy

:अजून त्या कॅरमल भांड्यापासून पुर्णपणे सोडवण्याच्या मागे हात धुवून लागलेली बाहुली: Proud

मी पण करुन पाहीलं मावे मद्धे ..मस्त झालं...१-१ चमचा खात राहिलो मी आणी नवरा...आणि त्या भानगडीत आत्ता काढु मग काढु करत फोटो काढलाच नाही...

मी फोडणीच्या पळीत कॅरॅमल करुन घेतलं आणी मावे सेफ बाउलमद्धे ओतलं...
मग त्यावर १कप दुध + ३ ब्रेड स्लाईस + १ अंड + व्हॅनिला एसेंस + साखर असं ब्लेंड करुन घातलं...

२+१+१ मि. मावे केलं...हाय पॉवर्वरती...जरा लक्श ठेवावं लागतं फक्त नाहीतर मावे मधे उतु जाईल...

धन्यवाद या रेसिपीसाठे खुप...आता नेहेमी करणार...थंडीत गरम गरम खायला मज्जा आली...

वर्षु, तुझ्या रेसिपीचं टायमिंग कसलं भारी आहे, परवाच मी आणि लेकाने मॉल मधे कॅरेंमल पुडिंग खाल्ले आणि आता घरी करुन पहावे असे मनात आले ,आणि आज माबोवर तुझी रेसिपी वर.
सो , आता पुडिंग कुकरमधे ठेवलय , बघुया काय रिजल्ट येतो.

आता पुडिंग कुकरमधे ठेवलय , बघुया काय रिजल्ट येतो.>> यावर आता रिझल्ट येइस्तो काही न बोललेलच बर. Proud

ऑल द बेस्ट Happy

मामी पाव संपला असेल तर दुकानातून आणा. देवाला का त्रास देताय ? त्याच्याकडे पावासाठी मोठी लाईन दिसतेय Wink

बरेच दिवसापासून करायचं होतं , विकांताला मुहुर्त मिळाला .
पहिल्या फटक्यात झालं आणि बर्यपैकी बरं झालं ( इथले अनुभव वाचुन खरतर घाबरत सुरवात केली)

IMG495.jpg

पण.......

१. कॅरेमल फोड्णीच्या पळीत करून डब्यात ओतलं , गरम असतानाच मिश्रण ओतलं पण पुडिंगवर काही थर आला नाही .
२.पुडिंग काढल्यावर साखरेचा काचेसारखा थर तसाच डब्याला चिकटुन राहिला .
३.पुडिंगची कन्सिस्टन्सी नीट वाटली नाही . म्हणजे अजिबात थुलथुलीत नव्हतं , गुलाबजाम्सारखं दाट झालं. कदाचित देव जरा जास्तच 'पावला' .

स्वस्ति.. Happy ऑलमोस्ट नऊ महिन्यांनी तू हिम्मत दाखवलीस..थांकु थांकु... चांगलं झालंय ना चवीला?? नेक्स्ट टैम साखरेला अजून ब्राऊन कर म्हंजे छान चॉकलेटी रंग येईल कॅरेमल ला..
खरोखरीच सोप्पंय कि नै???
उगाचच लोक्स घाबरलेले इकडे Wink

मी टाकलेले फोटू कुठे गडपलेत कोण जाणे.. पुन्हा करीन म्हणते पुडिंग परत.. फोटू अ‍ॅडायला .. Proud

वर्षू, तुमचा सोनेरी कॅरेमलचा फोटो टाकाच. पर्फेक्ट कॅरेमेल होतं ते! Happy

आणि ही पाककृती सार्वजनिक करा, सापडायला सोपे जाईल.
फक्त ग्रूप सभासदांसाठी असूनही तिची लोकप्रियता पहा. सार्वजनिक केल्यानंतर ५०० ला मरण नाही Wink

दोन तीनदा प्रयत्न केल्यावर मला हे पुडिंग आता बर्‍यापैकी जमायला लागलय...

मी कॅरेमल वेगळं बनवून घेते आणि मग पुडिंगवर ओतून घेते

From Drop Box

पौर्णिमा Lol नक्की!!!
@स्वस्ति-

प्र १ - कॅरेमल फोड्णीच्या पळीत करून डब्यात ओतलं , गरम असतानाच मिश्रण ओतलं पण पुडिंगवर काही थर आला नाही .
उ.१ - ज्या भांड्यात पुडिंग करायचं असेल त्याच भांड्यात कॅरेमल कर. या करता जाड बुडाचं अ‍ॅल्युमिनियमचं भांडं सोयीचं असतं. पूर्ण थंड होऊन कडक होऊ दे. मगच वर पुडिंग चं मिश्रण ओतून कुकर मधे यऊन स्टीम करायला ठेव.

प्र २- पुडिंग काढल्यावर साखरेचा काचेसारखा थर तसाच डब्याला चिकटुन राहिला
उ २- पुडिंग वॉर्म असतानाच ,सर्विंग डिश मधे उलटून घे. थोडं बहुत कॅरेमल भांड्याच्या तळाशी राहतं. त्याच्याकडे कानाडोळा कर Wink

प्र ३- .पुडिंगची कन्सिस्टन्सी नीट वाटली नाही . म्हणजे अजिबात थुलथुलीत नव्हतं , गुलाबजाम्सारखं दाट झालं. कदाचित देव जरा जास्तच 'पावला' .

उ ३ - हायला.. छानच की म!!! इथे आधिकांश लोकांनी थुलथुलीत होऊन व्हाहून जायची कंप्लेंट केल्ती!! Happy

वर्षुताई , हे नंदिनीने बनवलेलं कॅरेमल बघ .कसं चॉकलेट सॉससारखं ओघळतय .
माझं मात्र अगदी कडक झालेलं .. गोळीबंद पाकासारखं .म्हणून ते काचेसारख चिकटलं अस म्हणाले .

आणि पुडिंग थोडं थुलथुलीत बरं लागत गं अगदी चीजकेक सारखं दाट कसं खायचं Sad

नंदिनी , तू प्लीजच या कॅरॅमलची फॉर डमिज कृती दे.
म्हणजे अगदी साखर किती कुठलं भांडं, किती वेळ गरम केलं.

नाहीतर मी म्हणेन फ्रॉड फ्रॉड हे हर्शले चं चॉकलेट सिरप आहे.
Wink

साती, घरी ये एकदा. तुझ्यासमोरच बनवते.

मी नॉन्स्टिक पॅनमधे कपभर साखर वितळवून घेत घेत कॅरमल बनवते. त्यात थोडंसं लिक्विड ग्लूकोज घालायचे (अगदी दोन तीन थेंब). साखर विरघळल्यावर सतत लक्ष ठेवून उभं रहायला लागतं. नाहीतर कोळसा झालाच म्हणून समजायचा. पुडिंग प्लेटमधे घातल्यावर मग त्यावर हे गरम गरम कॅरमल ओतायचे. मग थंड झाल्यावर फ्रीझमधे ठेवून द्यायचे.

Pages