सोप्पं कॅरेमल पुडिंग

Submitted by वर्षू. on 28 December, 2011 - 06:01
caramel pudding
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

-१ कप दूध
-१ ब्रेड ची स्लाईस
- १ अंड - अंडं नको असल्यास ब्रेड च्या दोन स्लाईसेस
- दीड कप साखर
- बदामाचे पातळ काप (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

ही माझ्या आई ची अतिशय सोपी पण सुपर टेस्टी कॅरेमल पुडिंग ची रेसिपी .

कुकर मधे बसेल इतक्या साईझ चं, जाड बुडाचं भांड घ्या. या भांड्यात पाऊण कप साखर घालून ,डायरेक्ट मंद गॅसवर वितळत ठेवा. (नंतर वाफवण्याकरता ते भांड कुकरमध्ये बसायला हवे) .मधून मधून सांडशी ने भांडं उचलून वितळलेली साखर नीट ,एकसारखी पसरवत राहा. साखर वितळवाताना आच मंदच पाहिजे. नाहीतर कॅरेमल पटकन ब्राऊन होऊन्,कडवट लागेल.
साखर वितळून सुरेखसा डार्क सोनेरी रंगाची झाली कि भांडं गॅसवरून उतरून थंड होऊ द्या.
बदामाचे काप घालायचे असल्यास लगेच या कॅरेमल वर नीट पसरा.

कॅरेमल थंड होऊन छान कडक होईस्तोवर दूध, उरलेली साखर (जास्त गोड पुडिंग हवे असल्यास चवीनुसार जास्त साखर घाला), ब्रेड ची स्लाईस (पाण्यात भिजवून मऊ झालेल्या ब्रेड च्या स्लाईस ला घट्ट पिळून ,कडा काढून टाकून घ्या),एक अंड ,एलेक्ट्रिक चर्नर किंवा मिक्सर वर एकजीव करून घ्या.
मिश्रण छान फेसाळ झाले पाहिजे,म्हणजे अंड्याचा वास येणार नाही.
हे मिश्रण ,कॅरेमल वर ओतावे.
आता हे भांडं, कुकरमधे उंच स्टँड ठेवून त्यावर ठेवावे. मग कुकर ला प्रेशर न लावता ,वाफ आली कि मिडियम गॅस वर १५ मिनिटे वाफवून घ्या.
कुकर नीट थंड होऊ द्या. मग पुडिंग चं भांड बाहेर काढून सुरीने चारीबाजूने मोकळं करून घ्या ,ज्या डिश मधे काढायचं असेल ती डिश त्यावर उपडी ठेवा.
आता डिश नीट धरून सुलटी करा.. कॅरेमल पुडिंग अलगद डिशवर येईल.. केक सारखे तुकडे कापून आस्वाद घ्या. थंडी च्या दिवसात मायक्रो मधे वॉर्म करून खाता येते. नाहीतर फ्रीज मधे ठेवून द्या.थंड ही खूप चांगलं लागतं.

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांकरता
अधिक टिपा: 

हे पुडिंग खरोखरच करायला अतिशय सोप्पं आहे. शुअरशॉट रेसिपीये !! मला सह्ही जमतेय म्हंजे कुण्णालाही सहज जमेल Lol
बदाम रात्रभर भिजत घातले होते. सकाळी सालं पटकन काढता आली. आणी मग लहानशा ड्राय फ्रूट स्लाईसरवर काप केले. सुरेख पातळ होतात,मेहनतीशिवाय!!!

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनीमाऊऊऊऊऊऊ....................... Uhoh
बिच्चारी आता तुला भांडंपण घासावं लागेल ते ही पुडिंग न मिळता... Sad

आशूडी Lol

एम्बी, मी चिऊ शाब्बास. Happy

मी आधीच लिहिलं होतं ब्रेड स्लाईस जास्त वापरा. वाफवायला ठेवण्याआधी मिश्रणाची कन्सिस्टन्सी (मराठीत काय म्हणतात हो?) घट्ट रबडी टाईप असायला हवी.

एम्बी, सहीच... लय भारी काम केलं.. ते प्रमाण वगैरे देवुन... पण असं प्रमाण बघितलं ना, की मी कधीच ती रेसिपी करुन बघत नाही.. Happy म्हणजे ते ५ ब्रेड-२ अंडी बरोबर होतं तर.. Happy
माऊ, भांड्यात पाणी घालुन गरम कर..

नंदिनी, बरोबर गं. रबडी ठेवली तर नंतर वडी मिळेल. मी दुध ठेवल्यामुळे मला रबडी मिळाली.

वर्षु, अगं पुडिंग मिळालं. फक्त रबडी फॉर्ममधे. फार यम्मी होतं. फक्त सगळं स्टिकी झालं आहे. तो मात्र ताप आहे. बरीच क्रोकरीपण भरवुन ठेवली आहे.

अरे देवा, हे सगळे प्रयोग वाचून वर्षुताई देखिल ओरीजिनल कृती नक्की विसरणार. Biggrin

नंदिनी, बरोबर गं. रबडी ठेवली तर नंतर वडी मिळेल. मी दुध ठेवल्यामुळे मला रबडी मिळाली. >>>> Rofl लै भारी!!! लगे रहो लोक्स. Happy

ओरिजिनलः १ ब्रेड, १ अंड
मॉडिफाईडः ५ ब्रेड, २ अंडी

अरे देवा किती हे मापात पाप

अरे ही पाकृ विरंगुळा सदरात टाका रे.
मी फक्त लोकांचे प्रयोग वाचून हसायला येतेय.

वनी इतक्या कठिण सामोश्याची इतकी सोपी पाकृ दिलीस आणि सोप्प्या नावाखाली इतकी कठिण पाकृ ?
बहोत नाईन्साफी है.

बादवे मी हा प्रकार पूर्वी बर्याचदा ट्राय करून फेकलाय Happy
कूकरमध्ये वाहवलाय.
तू पाकृ दिलीस म्हणजे हमखास यशस्वी होणार हे माहिती असल्याने इथे आले तर हा गोधळ Wink

सगळ्या सुगरणी दमल्या बहुतेक. किंवा घरच्यांन्नी त्यांच्या हातची पुडीगं खावुन त्यांन्ना गप्प बसवलं असेल्....खुप दुधाची नासाडी केल्या बद्दल वर्षुताइ वर गायी म्हशी नाराज होणार बहुतेक!!!!

अरे, हा धागा एकदम शांत कसा झाला? सगळ्यांना जमलं की काय ते पुडिंग अचानक?

NAHI JAMALE ....ME KELE SATURDAY LA PAN PATAL ZALE ....TEASTY HOTE...PARAT EKDA TRY KAREN.....

कालच ३ र्‍यांदा बनवल आणि फायनली जमल. अगदी वरच्या प्रमाणे बनवल. परपेक्ट झालेल. सुंदर रंग चव. १५ मिनीटात १/२ लिटर दुधाच पूडींग संपल.
शिजवताना १ कनफ्युजन होत की शिजवताना प्लेट ठेवायची की नाही. शेवटी ठेवली.

इथे लोकांनी प्रमाणं मॉडिफाय करून 'यशस्वी केलेल्या पुडिंग्ची' अपडेटेड प्रमाणं सुध्दा मुळ पोस्ट मधे प्लिज अ‍ॅड करशील का वर्षु ? ( म्हणजे शोधायला लागणार नाही, सापडायला सोप्पं. ) :).

ब्रेडच्या साईझ वर नक्कीच अवलंबून आहे. इकडचा(टोक्यो) चा ब्रेड स्लाईस मोठा आहे. भारताच्या कदाचित दुप्पट असेल. त्याचे २ स्लाईस लागले म्हणजे भारताचे कदाचित ४-५ लागतील नाहीतर १ अंडे तरी वाढवावे लागेल.
वजन च द्यायचे झाले तर
कडांसहित एका स्लाईसचे वजन ४८ ग्रॅम आहे!!

Are he visarali me ,.....ani bread 1 ghetala ..manun patal zale vatat....
next time 4/5 gheun bagen ..

ह्या विकांताला केलं. जमेश Happy एकदम टेस्टी टेस्टी Happy . मी दोन ब्रेड स्लाईस घेतल्या (पण अजुन एखादी चालली असती)

हा त्याचा फोटू

Photo-0732.jpg

कॅरेमलचा पातळ थर पुडींग वर आला पण बाकीचा थर भांड्यालाच चिकटलाय (गरम पाण्यात भांड ठेवून राहिलेला थर वापरता येतो का बघायचा विचार आहे Wink )

कवडे छान जमलय Happy
आता सांग तु खालील प्रमाणच घेतलेस ना?

-१ कप दूध
-२ ब्रेडच्या स्लाईस
- १ अंड
- दीड कप साखर

मला साखर जास्त वाटते म्हणुन विचारले Uhoh

मला वाटते कॅरॅमल अगदी कमीच ठेवायचे. फार फार तर ४ मिलिमिटर... दुधाच्या सान्निध्यात तेवढेच पुन्हा पातळ होते.. उरलेले वायाच जाते.... बदाम, ड्र्र्य फ्रुइत्स नंतर टाकायचे. लाल चौकोनी ठोकळे.. आम्ही त्याला चेरी म्हणतो.. ते छान वाटेल.. ( त्याला काय म्हणतात? )

अरे व्वा !!! कविता मस्त दिस्तंय पुडिंग !!!
रीमा.. जबरदस्त चिकाटीला सलाम.. एकाच दिवसात तीन वेळा ट्राय करणं म्हंजे...वॉव!!!
साती Lol Lol

मी दोन स्लाइस वापरल्या पाउण कप दुधाला. अंडे नाही. मला ४० मिनिटे शिजवावे लागले. ब्रेड आणखी टाकले असते तर लवकर घट्ट झाले असते. ढोकळ्याच्या पिठाएवढे घट्ट करुन बघायला पाहिजे.

पाऊण कप दुधाला दोन स्लाईस? आणि अजून घट्ट करण्याची इच्छा आहे? जामोप्या मग पुडिंगपेक्षा तुम्ही सरळ फ्रेंच टोस्ट का नाही करून खात? Proud

काल केलं हे पुडिंग. लैच भारी झालं Happy
(पण करायच्या आधी एम्बीनी टाकलेला फोटु बघितला असता तर करायच्या फंदात न पडता तिच्याकडेच गेले असते Wink )
थँक्स वर्षु इतक्या मस्त रेसिपी बद्दल.

Pages