क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>योग तू दिलेले आकडे बरोबर आहेत पण अर्धवट आहेत. त्या प्रत्येक आकड्याबरोबर इतरांचे तेंव्हाचे आकडे लिहीले कि त्यांचा अर्थ बदलतो कि नाहि ह्याचा निर्णय तुझा तूच घे

अजीबातच बदलत नाही रे.. मुद्दा सचिन चा गेले २ वर्षाचा परफॉरमंस हा आहे.. ईतर कसे खेळले त्याच काळात याचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. आणि बाकी वाईट खेळले म्हणून सचिन ने खेळतच रहावे असे सुचवायचे असेल तर नेमकी हीच ती नकारात्मक मानसिकता आहे जिथे आपण व ईतर प्रो. बोर्ड्स यात फरक आहे. असो. मी तुझ्यापेक्षा कदाचित कणभर जास्तच सचिन प्रेमी असेन.. Happy पण मी "अंधभक्त" नाही रे!

ईतर कसे खेळले त्याच काळात याचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. आणि बाकी वाईट खेळले म्हणून सचिन ने खेळतच रहावे असे सुचवायचे असेल तर नेमकी हीच ती नकारात्मक मानसिकता आहे >> ह्याच्यात काय नकारात्मक आहे ? इतरांच्या तुलनेमधे बघितलेस तर सचिनचे respectable आहेत, तू दर वेळी त्याने सगळा गोवर्धन उचलून धरावा अशा अवाजवी अपेक्षा करतोयस. तो दर वेळी खेळताना शॉट्स खेळताना बाद होतो आहे. तो जेंव्हा असा खेळतो तेंव्हा तो out of form नसतो हे बावीस वर्षांमधे त्याला follow करणार्‍या शेंबड्या पोरालासुद्धा माहिती आहे. काहितरी technical fault तयार झालय जो वयानुरुप आला असू शकेल. गेल्या दोन वर्षांमधले सिरीज बघितलेस तर ते break मधे होते, अशा वेळी थोडा rustiness येत असतो. मागे जेंव्हा असे झाले तेंव्हा त्याने त्यावर उपाय शोधून भरपूर रन्स काढले आहेत. त्यामूळे ह्यावेळी तसे करु शकेल कि नाही ह्याबद्दल थोडी सबूर बाळगायला काय हरकत आहे ? दोघे जण आत्ताच निव्रुत्त झाले आहेत, सलामीची जोडी चाचपडतेय, lower batting order establish झालेली नाहिये अशा वेळी अजून भाराभर चेंजेस करायची गरज काय आहे ? त्यानेही निव्रुत्तीचे सूचोवात केले आहे. can we not be impetuous for God's sake ?

मी तुझ्यापेक्षा कदाचित कणभर जास्तच सचिन प्रेमी असेन >> तू जर तू धोनी किंवा गंभीर ह्यांचा द्वेष्टा आहेस असे म्हटालेस तर मी ते मान्य करेन पण ह्याबाबतीमधे dream on dude. Happy

योग, पण गेली दोन वर्षे म्हणताना क्रिकइन्फो मधे दिसणार्‍या ६१, ३६, १११ नाबाद वगैरे का सोडून दिल्या? द आफ्रिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया दौरे अत्यंत अवघड असताना तेथील त्याची कामगिरी पूर्वी इतकी चांगली नसली (खरे म्हणजे द आफ्रिकेतील स्कोर्स पूर्वीपेक्षा चांगले होते) तरी वाईट नव्हती. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात पहिल्या दोन टेस्ट झाल्यानंतर - त्याचे त्या दोन टेस्ट्स मधले रन्स होते ७३, ३२, ४१, ८० आणि मुख्य म्हणजे अगदी फॉर्म मधे होता तो- फक्त सचिनच उभा होता त्यांच्या बोलर्स पुढे. नंतरच्या दोन टेस्ट मधे अपयशी ठरला. त्या सिरीजला अजून एक वर्ष झाले नाही.

२०११ चा वर्ल्ड कप - फायनलमधे भारताला पोहोचवण्यात सचिनचाच प्रमुख हात होता.

२०११ नंतरच्या त्याच्या सर्व डावांवर १०० व्या शतकाचे प्रेशर होते. ते निव्वळ त्याने स्वतः निर्माण केलेले नव्हते. ज्या ज्या लोकांशी त्याचा संबंधा त्या काळात येत होता, त्या सर्वांनी ते उभे केलेले होते. ते प्रेशर त्याने योग्यरीत्या हॅण्डल केले नाही. ही त्याची चूकच होती.

सचिन गेले दोन वर्ष निव्वळ जागा अडवतोय.. स्वताचे हसे करून घेतो आहे आणि त्याचबरोबर भारतीय संघाच्या पुनर्बांधणीसाठी लागणारा वेळ वाया जात आहे हे कटू सत्य आहे!>>> माझा मुख्य विरोध याला आहे. एवढे म्हणण्याएवढी कामगिरी वाईट नाही. आणि जेव्हा "संघाची पुनर्बांधणी" वगैरे मुद्दे येतात तेव्हा फक्त सचिन अपयशी आहे की सगळा संघच बॅड पॅच मधून जात आहे हे बघणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे "इतर कसे खेळले त्या काळात" हा असाम्याचा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो.

बाकी संघाची पुनर्बांधणी वगैरे गोष्टी भारताने १९३२ पासून आजपर्यंत कधीचे केलेल्या नाहीत. करू नयेत असे नाही, पण असा काहीतरी प्रयत्न करायचा आहे पण सचिनमुळे होऊ शकत नाही असे म्हणायचे आहे काय? Happy

आता नंबर्स सोडून बोलायचे असेल तर मी तुझ्याशी टोटली असहमत नाही. असाम्यानेही म्हंटल्याप्रमाणे 'शेल' मधे खेळणारा सचिन बघणे फार बोअर होते. २०११ च्या कपनंतर त्याच्या डोक्यावर प्रत्येक डावात असलेले प्रेशर सहज दिसत होते पण तो डिनायल मधे होता. आश्चर्य हे आहे की बोर्डापासून ते गावसकर पर्यंत कोणीही त्यावर उपाय सुचवले नाहीत किंवा सचिनने ते ऐकले नाहीत. जवळजवळ एक वर्ष सचिनचा प्रत्येक डाव म्हणजे हुकलेले शतक होते.

आता यापुढे माझी फॅन म्हणून एकच अपेक्षा आहे: त्याला कल्पना आहे की तो अजून किती खेळू शकतो. जेवढा खेळणार आहे तेवढा त्याने सुरूवातीला खेळला तसा आक्रमक खेळावे. सचिन आक्रमक खेळणे हे भारतासाठी नेहमीच फायदेशीर ठरलेले आहे. सर्व विरोधी बोलर्सना हाणावे. ते करताना लौकर आउट झाला तरी शेल मधे न जाता तसेच खेळावे. एक दोन सिरीज मधे मोठा स्कोर होत नाही हे पाहिल्यावर लक्षात येइल की निवृत्तीची वेळ जवळ आलेली आहे. नाहीतर खेळूदेत अजून. तो आक्रमक खेळताना बघायला आम्हाला कधीच कंटाळा येणार नाही.

मात्र यात कमर्शियल इंटरेस्ट धरलेला नाही. क्रिकेट संपलेला सचिन अजून अ‍ॅडवाल्यांची कॉट्रॅक्ट्स आहेत म्हणून संघात असेल त्याला काही अर्थ नाही. माझ्या अंदाजाने इंग्लंड सिरीज मधे ते लक्षात येइलच.

ही सगळी चर्चा २००७ सालीही होत होती. तेव्हाही तो ३४ वर्षांचा होता १९ वर्षे क्रिकेट खेळून जुना झालेला होता व बर्‍याच लोकांच्या दृष्टीने "संपलेला" होता. आता ३९ चा आहे (गूच ने बहुधा ३९ व्या वर्षीच भारताविरूद्ध त्रिशतक मारले होते). पण अजून एक दोन वर्षेतरी चांगले खेळणे अशक्य नाही. मूळचे क्रिकेटचे वेड व प्रचंड प्रॅक्टिस करायची तयारी अजून शाबूत आहे.

इंग्लंड दुसर्‍याडावात चांगलीच खेळी करत्येय [ १५२ -१ ] ! तरी पण << ईं. कदाचित ५०० करून १५०+ ची आघाडी घेवून शेवटच्या दिवशी ऊपहारानंतर आपल्याला फलंदाजी करायला बोलावू शकते.. >> ही योगजीनी वर्तवलेली शक्यता अजूनही दूरचीच वाटते. ह्याच खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची संधी भारताला मिळाली नसती तर ...... !!!!!

>> ह्याच खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची संधी भारताला मिळाली नसती तर ...... !!!!!

भाऊ,
अगदी! मला तरी वाटते अशाच खेळपट्ट्या जर ऊर्वरीत सामन्यासाठी असतील तर नाणेफेकीचा कौल ५०% निकाल आधीच निश्चीत करू शकतो. खेळपट्टी अर्थातच स्पिनिंगच हवी (सामने भारतात आहेत!) पण ती sporting wicket हवी. त्यात खेळाचा विजय आहे!

>>आता यापुढे माझी फॅन म्हणून एकच अपेक्षा आह>>............>>माझ्या अंदाजाने इंग्लंड सिरीज मधे ते लक्षात येइलच
सहमत फारेंडा!

>>योग, पण गेली दोन वर्षे म्हणताना क्रिकइन्फो मधे दिसणार्‍या ६१, ३६, १११ नाबाद वगैरे का सोडून दिल्या?
अरे मी तर cricinfo वरचे सर्वच आकडे दिले होते.., गेल्या दोन वर्षातील सचिन चे आकडे असा फिल्टर वापरला होता. ते सर्व ईथे दिले होते.. २०११ जानेवारी ते २०१२ सद्य मालिका.

खरे तर आता कसलेही दडपण न घेताना खेळणारा सचिनच मैदानात ऊतरायला हवा.. पण बहुतेक या मालिकेत ऊत्तम कामगिरी करून निवृत्त व्हावे (या मालिके अखेर?) असा काहिसा मानसिक दबाव त्याने स्वतावर लादला असावा.. honestly I haven't quite understood his thinking process, watching his game n the field, over last 2 yrs.. he seems to "not enjoy" his batting but rather seems to be playing to "prove something"..?

>>ही योगजीनी वर्तवलेली शक्यता अजूनही दूरचीच वाटते.

हे अशक्य नक्कीच नाही.. कूक च्या प्रेशर कूकर मधिल वाफ शिल्लक आहे तोवर हे शक्य आहे असे मला अजूनही वाटते. मॅट प्रायर, ब्रॉड, ब्रेसनन हे देखिल बर्‍यापैकी फलंदाजी करू शकतात..

या दोन नजीकच्या काळातील टेस्ट व वन डे इनिंगच्या लिन्क्स, जेव्हा सचिन मस्त खेळला होता. आशिया कप नंतर बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट नव्हते.

कसोटी: मेलबर्न मधले ७३. मैदानावर एन्ट्री, पहिली चाचपडणे झाल्यावर मारलेले बहारदार स्ट्रोक्स आणि इयान चॅपेल ची कॉमेंट (something like "... this is when he is at his best, when he plays his shots. Saw him...before the tea when he was playing merely to survive, and you can see it doesn't suit him. He looks very awkward doing it. But as soon as he starts playing shots, that's when he looks tremendous...")
http://www.youtube.com/watch?v=dPd8M6PCgkI

वनडे: आशिया कप मधे आधीच्या मॅच मधे ते १०० वे शतक मारल्यानंतर पुढच्या मॅच मधे पाक विरूध्द. येथेही सुरूवातीला चाचपडून मग एकेक जबरी शॉट्स, विशेषतः तो ५० करताना मारलेला कट!
http://www.youtube.com/watch?v=THshLxTGNzk

honestly I haven't quite understood his thinking process, watching his game n the field, over last 2 yrs.. he seems to "not enjoy" his batting but rather seems to be playing to "prove something"..? >> I guess it will help if every tom, dick and harry starts commenting on when he should or should not retire Lol

हे अशक्य नक्कीच नाही.. कूक च्या प्रेशर कूकर मधिल वाफ शिल्लक आहे तोवर हे शक्य आहे असे मला अजूनही वाटते. मॅट प्रायर, ब्रॉड, ब्रेसनन हे देखिल बर्‍यापैकी फलंदाजी करू शकतात.. >> कूक पूर्ण सिरीजमधे नडणार असे दिसतेय. प्रायर मधे प्रचंड improvements आहेत. Can we break this partnership open ?

खेळपट्टी अर्थातच स्पिनिंगच हवी (सामने भारतात आहेत!) पण ती sporting wicket हवी. त्यात खेळाचा विजय आहे! >> Lets start this trend when India visits England next time Happy

कूकला मानला ! काय खेळतोय !!!
<< Lets start this trend when India visits England next time >> हे विधान << Let England start this trend when India visits England next time >> असं वास्तविक असायला हवं; करायचा म्हटलंच तर सध्यां हा ट्रेन्ड सुरूं करणं मात्र फक्त आपल्याच हातात आहे ! Wink
<< हे अशक्य नक्कीच नाही.. कूक च्या प्रेशर कूकर मधिल वाफ शिल्लक आहे तोवर हे शक्य आहे असे मला अजूनही वाटते. >> योगजी, मीही अशक्य नाहीच, ' शक्यता अजूनही दूरची' असं म्हटलं ; आतां तर ती शक्यता तेवढी दूरचीही नाही राहीली !! Wink

असं वास्तविक असायला हवं; करायचा म्हटलंच तर सध्यां हा ट्रेन्ड सुरूं करणं मात्र फक्त आपल्याच हातात आहे ! >> how about visiting team gets to call on who bats first and home team gets to decide what kind of pitch to laid out ?

<< how about visiting team gets to call on who bats first and home team gets to decide what kind of pitch to laid out ? >> या विधानाचा दुसरा भाग तर सध्या प्रचलीत आहेच ! पहिला भाग अंमलात आणणं हा उपाय होऊं शकतो.
मला वाटतं क्रिकेट हा एकच खेळ असा असावा कीं त्यांत नाणेफेकीला सामन्याच्या निर्णयावर इतका भरीव परिणाम करतां येतो . त्यामुळे नाणेफेकीचा फायदा कर्णधाराच्या नशीबावर न सोडता मालिकेच्या सुरवातीलाच गुप्तपणे 'ड्रॉ' काढून दोन्ही संघाना प्रथम कोणी फलंदाजी करायची हें सांगण्याची समान संधी द्यावी. कोणत्या सामन्यात कोणता संघ ही संधी घेऊं शकेल हें मात्र सामना सुरूं होण्याआधीच जाहीर करावं. पांच किंवा तीन सामन्यांची मालिका असेल तर मात्र एका सामन्यात नाणीफेक करावी पण ती कोणत्या सामन्यात होईल हेंही आयत्यावेळीच जाहीर करावें. [ अशा फालतू सूचना फेकायची मला जुनीच खोड आहे; फार गंभीरपणे घेऊं नये ! Wink ]

भाऊ ,
तुमची सूचना in Theory पटली . Practically ती अमलात आणण्यासाठी सर्वात सोपा उपाय (२ टीमच्या सीरीजमध्ये ) म्हणजे समजा ५ मॅचची सीरीज असेल तर जी टीम पहिला टॉस जिंकेल तिला १.३.५ मॅचमध्ये डिसिजन द्यायला द्यावा आणी दुसर्या टीमला २.४ मॅचमध्ये द्यायला द्यावा .

केदारजी, सामन्याच्या तारखेआधीच कोणाकडे हा अधिकार रहाणार आहे हें न कळणेंही महत्वाचे आहे, म्हणून माझी गुप्ततेची पाठराखण !! Wink

भारतीय संघाचं अभिनंदन.
अशा खेळपट्टीवर दुसर्‍या डावात ४००ची मजल ओलांडणार्‍या इंग्लंडच्या संघाला गृहीत धरतां येणार नाही, याची आपण खूणगांठ बांधणं आवश्यक . कूक व प्रायर बरोबरच पीटरसन व क्रॉम्पटनही भरीव कामगिरी करायला आतां उत्सुक असणारच ! गाजावाजा होतोय तशी ही मालिका एकतर्फी होईल असं मला तरी वाटत नाही.

इंग्लंड पुढच्या मॅचमधे ब्रॉड, पटेल, ब्रेस्नन ह्यांच्याऐवजी फिन, बेरस्ट्रो नि पनेसर ह्यांना आणेल का ? त्यामूळे त्यांच्याकडे दोन फिरकी गोलंदाज होतील, फिनमूळे अधिक भेदक गोलंदाजी होईल नि बेरस्ट्रो मूळे lower middle order extended होणार नाही. मुंबईच्या पिचवर बाऊन्स असेल तर फिनचा अधिक उपयोग होईल. मुंबईमधे खेळत असल्यामूळे राहाणेला आत आणायला हवे का ?

>>मुंबईमधे खेळत असल्यामूळे राहाणेला आत आणायला हवे का ?

हरकत नाही, सचिन च्या जागी.. Happy

(अन्यथा, सचिन मुंबईत शतक करेल आणि ते बाळासाहेबांना अर्पण वगैरे करेल.)

मुंबईच्या मॅच मधे सचिनला बसवणार? बाळ ठाकरे आता नाहीत म्हणून काहीही चालवून घेतील काय मुंबईकर! Happy

अन्यथा, सचिन मुंबईत शतक करेल आणि ते बाळासाहेबांना अर्पण वगैरे करेल.>>> हे मात्र शक्य आहे Happy पण त्यात काय चूक आहे? त्याचे २००८ मधले चेन्नईतील शतक असेच होते, त्यावरूनच म्हणतोयस ना?

मुंबईची खेळपट्टी ' बाऊन्स'च्या बाबतीत पहिल्या कसोटीपेक्षां उजवी असण्याचीच शक्यता दाट आहे. नोव्हेंबरच्या थंडीमुळे दंव सकाळच्या सत्रात तेज गोलंदाजाना साह्यभूत ठरावं. चेंडूची उंची असमान नसेल तर गोलंदाज , फलंदाज व प्रेक्षक सर्वानाच मुंबईची कसोटी आनंददायी ठरावी अशी अपेक्षा करायला हरकत नसावी.
कदाचित , मुंबईपुरतं तरी इंग्लंड स्वानवरच फिरकीची जाबाबदारी टाकून फलंदाजी व फास्ट गोलंदाजी अधिक मजबूत करण्याची शक्यताही नाकारतां येत नाही.
सचिनला संघातून वगळण्याची शक्यता सध्यातरी चर्चेपुरतीच ठीक असावी. वरतीच कुणीतरी म्हटल्याप्रमाणे , साहेब सध्या चांचपडत असताना बाद न होतां छान फटके मारताना बाद होताहेत, हेही आशादायक आहे. मुंबईत मला स्वतःला साहेबाना फिरकी गोलंदाजीसाठीही थोडं अधिक वापरलेलं पहायला आवडेल !
रहाणे..... वाट पहाणे, आणखी काय ! लेकीन, इस इंतजारका फलभी जरूर मिठा होगा !!

भाऊ, सहमत. पण रहाणे कसोटीतही सलामीचाच आहे ना? दोन दौरे घरीच असल्याने सेहवाग-गंभीर अपयशी ठरण्याची शक्यता कमीच आहे.

पण रहाणे कसोटीतही सलामीचाच आहे ना? >> नाहि रे बाबा. मुंबईसाठी सुद्धा तो तिसर्‍या नंबरवर येतो. त्याला मारून मुटूकून सलामीचा नका बनवू.

हरकत नाही, सचिन च्या जागी.. >> मुंबई सर्वांची बोलल्यापासून त्याचे मुंबई नागरिकत्व जप्त केले आहे का ? Happy

आज धोनीचं पितळ उघडं पडलंय ! ' सामना तीन-साडेतीन दिवसांत संपला तरी चालेल पण पहिल्या षटकापासून चेंडू वळेल अशीच खेळपट्टी हवीय इथं आम्हाला '! - जणूं, मरो तें कसोटी क्रिकेट आणि झक मारूं देत ते क्रिकेटप्रेमी प्रेक्षक !!! Sad

भाऊ,
मला वाटतय त्यामागे ईं. ला कुठल्याही परिस्थितीत सर्व सामन्यात हरवणे हे ऊद्दिष्ट असावे.
धोका एकच आहे.. अशा वेळी नाणेफेक कोण जिंकते हाच मुद्दा अधिक महत्वाचा ठरेल..

मला तरी मुंबई सामन्यासाठी हे बदल सुचवावे वाटतातः

१. सचिन च्या जागी रहाणे (सचिन च्या शतकापेक्षा रहाणे ची हुकलेली खेळी बघायलाही आवडेल..!) Happy
२. गंभीर ला बसवून भज्जी ला घेणे

सचिन ने या मालिके अखेर मी निवृत्त होत आहे असे जाहीर केले तर मात्र त्याला सर्व सामने खेळायला द्यावेत-- इतना तो हक बनता है बॉस!

<< मला वाटतय त्यामागे ईं. ला कुठल्याही परिस्थितीत सर्व सामन्यात हरवणे हे ऊद्दिष्ट असावे. >> हें उद्दीष्ट तर स्पष्ट आहेच; पण या टोंकाला जावून व या पद्धतिने ? नाही रुचत असं एका देशाच्या कर्णधाराच्या तोंडून ऐकायला मिळणं, व तेंही स्वतःच्या देशाच्या !!

आज धोनीचं पितळ उघडं पडलं >> :D.

पूर्ण स्निपेट इथे बघावे

Yet, considering what was an eventually comfortable win, Dhoni was asked at the press conference if he had found a perfect template for a pitch to beat England. It had after all neutered England's strength, their fast bowlers. However, Dhoni didn't let the eventual result sway his assessment of the pitch.

"I don't even want to see this wicket," he said. "There wasn't enough turn and bounce for the spinners… Hopefully in the coming matches we'll see the wicket turn, right from start, or as soon as possible so that the toss doesn't become vital."

Dhoni went on to add that groundsmen need not worry about the match referee's objection to such pitches. "I don't think the match referee can question a pitch just because it's turning," he said. "When the wicket seams right from the first delivery, nobody asks questions. What you don't want is ridges in the wicket and then one ball hits your head and next your toe. At times, in the subcontinent, on pitches like this, the toss becomes vital. The only way to take the toss out of the equation is to have pitches that turn right from the start. The game may end in three-and-a-half days, but both teams will have an equal opportunity to win the game."

टॉस मह्त्वाचा नसावा नि बाऊन्स योग्य असावा अस वर तुम्ही पण म्हटलेले ना Wink

वाचला पण नाही पटला ! फलंदाजीला कठीण असलेल्या खेळपट्टीवरच खरी कसोटी लागते व सामना तीन दिवसात संपला तरीही तो 'एक्सायटींग' होतो, हें एखाद दुसर्‍या कसोटीपुरतं ठीक असेलही; पण कसोटी सामन्यासाठी पांच दिवसांची जी सोय आहे, त्यामागे सर्व प्रकारच्या गोलंदाजीला, फलंदाजीला वाव मिळूनच संघांची तौलनिक गुणवत्ता अजमावता यावी हाच उद्देश असणार ना ! केवळ 'एक्सायटींग' करण्यामधलं कसब दाखवायला 'एक दिवसीय' व 'टी-२०' सामन्यांची सोय तर झालीच आहे !

भाऊ +१

पण कसोटी सामन्यासाठी पांच दिवसांची जी सोय आहे, त्यामागे सर्व प्रकारच्या गोलंदाजीला, फलंदाजीला वाव मिळूनच संघांची तौलनिक गुणवत्ता अजमावता यावी हाच उद्देश असणार ना >> दिवसांचा आणि गुणवत्तेचा काय संबंध ? आधी सामने कितीही दिवस खेळले जायचे ते नंतर सात नि उतरत्या क्रमाने पाच दिवस असू लागले. हा फक्त convenience चा भाग झाला . एक दिवस असो वा तीन दिवस किती चुरशीचा सामना होतोय हे मह्त्वाचे आहे. पाच दिवस खेळून पाट्या टाकलेल्या बघायला आवडत असत्या तर एक दिवसीय नि २० एव्हढे वाढले असते का ?

Pages