क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हातातली मॅच जाणार.

काहो असे निराशाजनक बोलता?
सारखे सारखे २० - २० चे सामने बघून, एका षटकात १५ धावा झाल्या नाहीत तर हरू अशी भावना झालेली आहे का?
पण हा कसोटी सामना आहे नि अजून एक पूर्ण दिवस बाकी आहे.
धोनी नि कोहली दोघेहि उत्तम खेळताहेत!
.
.
.
.
बघा, लिही लिही तो शेवटच्या दहा चेंडूंच्या आत २६ धावा काढून (मारून) एकदाचा जिंकला सामना!!

जरा आशावादी असावे, सकारात्मक असावे!

अर्र तिनदा त्रिफळा चूर्ण प्राशन केलं. पदलालित्य हरवलं म्हणे. अर्धचंद्र देण्याच्या गोष्टी सुरू झाल्यात. (अर्ध्यापेक्षा कमी वयाचा) उन्मुक्त चांद (की चंद?) उगवलाय आता तरी सूर्याने मावळावे म्हणे. Sad

पण तो अजूनहि पुनः भरात येईल, अशीच आशा त्याला नि त्याच्या कट्टर चहात्यांना वाटत असते.
असे जर लोक निवडसमितीत असतील तर खेळेल तो.

शेवटी काय निवडसमितीत कोणत्या निकषावर निर्णय घेतले जातात हा नेहेमीच वादाचा मुद्दा असतो.

पण नवीन खेळाडूंना संधि द्यावी या मताशी सहमत.

सचीन तब्बल ५१ वेळा त्रिफळाचित झालेला आहे....... आणि लागोपाठ ५ वेळा.......
२७ रन्स मधे कित्येकदा त्याने जबरदस्त फुटवर्क दाखवले आहे.... कधी कधी अंदाज चुकतो.. यातुन सुध्दा येईल तो बाहेर

पण आज काल सचिन अगदीच odd man out वाटतो. राहुल व लक्ष्मण गेल्यावर्. त्याने मानाने रिटायर व्हावे. कपिल होवु नये असे वाटते. असो.. पण आजकाल सचिन आउट झाल्याचे कोणी टेंशन घेत नाही.

ह्या सिरीजमधून तीन गोष्टींचा विचार नीट करायची वेळ आली आहे.
१. सहाव्या क्रमांकावर कोण ? रैनाला परत संधी देऊनही फारसे काही करता आलेले नाही. राहाणे ? तेवारी ?
२.. सलामीची जोडी. सेहवाग वरचेवर मधल्या फळीत येण्याबद्दल बोलत असतो. तसे झाले तर सलामीला कोण येणार ? राहाणेला वर ढकलू नये असे मला वाटते, त्याचा लक्ष्मण व्हायला नको असे वाटत राहते. उन्मुक्त चांद ? त्याला घेऊन तो जर फेल झाला तर त्याला परत वेळ देण्याएव्हढा संयम निवड समितीमधे आहे का ? ह्याचाच दुसरा अर्थ गंभीरला सध्या हात लावता येणार नाही असाही होतो.
३. झहीर मावळतीला लागलाय हे जाणवतेय. should he automatic choice anymore ? यादव एका जागेवर fix असेल तर दुसरी जागा कोण घेणार ?

पुजारा नि कोहली ह्यांनी मधल्या दोन जागा बूक करून टाकल्या आहेत असे धरायला हरकत नसावी.

असाम्या,

मालिका जिंकलो हे खरेच...

तरिही, ईं. आणि ऑसी ची पूर्ण दमातील टीम याच भारतीय गोलंदाजीची अगदी आपल्या घरच्या मैदानावर देखिल पिसे काढतील यात मला अजीबात शंका नाही.

झहीर नक्कीच संपलाय.. हे त्यालाही माहित आहे.
ऊमेश यादव बरोबर दुसरा मध्यम्/तेज गोलंदाज नाही हे सत्य आहे.
अश्विन आणि ओझा पाट्यांवर नाही चालणार..

फलंदाजीत तर वाईट अंधार आहे:
१. सेहवाग हा जुगारच आहे.. त्याला बसवा वा खेळवा तो त्याच त्याच पध्दतीने बाद होणार.. Happy
२. रैना हा कसोटी मटेरीयल नाही हे आता नरेंद्र हिरवाणी देखिल ठामपणे सांगू शकेल.
३. गंभीर पण सेहवाग च्या संगतीने बिघडल्या सारखा खेळतो..
४. सचिन- राहुल च्या नक्षेकदम वर चालू आहे.. फरक एव्हडाच आहे की त्याचे "मला क्रिकेट खेळायला (अजून) आवडतं म्हणून मी खेळतो" हे विधान जोपर्यंत निवड समितीला आवडतं तोपर्यंत तो खेळेल.. Happy
त्याच्या बाद होण्याचं आता फारसं वाईट वाटत नाही तसच त्याच्या शतकाचं देखिल आता अप्रूप राहिलेलं नाही.. यातच बरच काय ते आलं नाही का? दुर्दैव!- त्यामूळे अजून एखाद्या ऊमद्या तरूण खेळाडूची संधी मात्र हुकतच राहील.. आणि क्रिकेट मध्ये संधी न मिळाणं किंवा मिळाली तरी निव्वळ ड्रेसिंग रूम मध्ये खुर्ची ऊबवणे या दोन्ही गोष्टि फारच वाईट!

विराट, पुजारा नक्कीच पुढील ५-१० वर्षे तरी आता कायम रहातील व महत्वाची भूमिका निभावतील असे वाटते. पुजारा ला बॉलिंग चे तंत्र शिकावे लागेल.. तो अधिक ऊपयुक्त ठरेल.

थोडक्यात सलामीला जुगार, मधल्या फळीत फक्त एकच खंबा मॅचविनर (कोहली) आणि पाट्या वर ठोकणारा धोणी अशी आपली सध्याच्या फलंदाजीची आवस्था आहे.

तेव्हा २०१३ ऊजाडेपर्यंत वरीलपैकी कशातही विशेष बदल होणार नाही असे वाटते..

पुजाराला इतक्यात नेक्स्ट द्रवीड वगैरे म्हणण्यात काही अर्थ नाही..... आफ्रिका, ऑस्ट्रेलियात खेळेल तेन्व्हा खरे!

अश्विन आणि कोहली मात्र आता बरेच दिवस टिकतील असे वाटते

नको रे, द्रविड नि लक्ष्मण नाही करायचे गोलंदाजी, चाललेच ना Happy म्हणजे ज्यांनी करायला हवी त्यांनी नीट केली तर मिळवली. त्यापेक्षा पुजाराने बॅटींगकडे अधिक लक्ष दिलेले उत्तम ना ? He is already a good fielder.

रैना डावखुरा असल्यामूळे त्याला परत संधी दिली हे मला पटले पण त्याला फारसे काहि न करता आल्यामूळे इतरांनाही संधी द्यायला हरकत नसावी. To begin with, Rahane may be siutable candidate. I'm not firm believer that he can open. He seems to get across on front foot earlier in the innings and will run into issues on seaming tracks. Sehwag-gambhir can be sacrifical goats as openers Happy

संदिप शर्मा बघितलायस का ? दुसरा प्रविण कुमार.

गांगुलीला आता भारतीय संघाचा कोच व्हायचेय म्हणे.... तो कदाचित निवड समितीत श्रीकांतची जागा घेइल अशीही एक बातमी आहे!
एकंदरीत मजा आहे सगळी Wink

चांगला कोच होईल तो. त्याने नुकतीच दिलेली मुलाखत मस्त होती. एकदम रोकठोक. पण त्याहीपेक्षा निवड समितीत चांगला. त्याला बॅकिंग पाहिजे अध्यक्षाचे. तो कॅप्टन असतानाचे सिलेक्शन बर्‍यापैकी ठीक असायचे.

>>त्याला बॅकिंग पाहिजे अध्यक्षाचे
अरे श्रीकांतची जागा म्हणजे अध्यक्षाचीच की..... तो थोडाच कुणाच्या हाताखाली काम करणार्‍यातला आहे Wink

कोच म्हणून गांगुली चॅपेल गुरुजींचीच भारतीय आवृत्ति ठरेल अशी मला तरी भिती वाटते. He has also strong likes & dislikes !

>>कोच म्हणून गांगुली चॅपेल गुरुजींचीच भारतीय आवृत्ति ठरेल
अगदी अगदी भाऊ.... कसे अगदी मनातले बोललात!
आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर "लो प्रोफाइल" कोचच इथे यशस्वी झाले आहेत.... उद्या जर कोहली सारखा आक्रमक खेळाडू भारताचा कप्तान झाला तर एका म्यानात दोन तलवारी कश्या राहणार?.... खरे म्हणजे कोचने म्यानाची भुमिका निभावली पाहिजेल..... पण गांगुलीकडे बघता ती शक्यता कमीच आहे!

गेल्या आयपीएल मध्ये पुणे वॉरिअर्सच्या संघनिवडीत गांगुलीने जो हट्टीपणा दाखवला होता ते बघता तो निवड समितीत राहून फेअर सिलेक्शन करेल याची खात्री देता येत नाही!

लो प्रोफाईल बद्दल टोटली सहमत. त्या दृष्टीने दादा बरोबर नाही. पण त्याचे सिलेक्शन नेहमीच फेअर होते - भारताच्या संघाच्या बाबतीत. आयपीएल ची कथाच वेगळी आहे.

कशाला हवा तो..........चांगली कॉमेंट्रीचे काम चालु असताना उगाच वादात पडायची सवय लागली आहे

अमोलला गांगुलीबद्दल निवड समितीबद्दल अनुमोदन दिले असते कारण favorism सगळेच करतात - जाणता, अजाणता. फक्त तसे करताना संघहितावर कुरघोडी होता कामा नये. गांगुलीसाठी अधिक योग्य रोल म्हणजे देशातील talent शोधून त्यांना nurture करणे, अशा प्रकारची एक संस्था आहे जिचे काम आधी शास्त्री नि whatmore पाहात असत.

Test matches are prestigious, while T-20 is bread and butter for players. हे लक्षात घेऊन भारतीय संघासाठी एक दिवसीय संघामधे प्रयोग करायला सुरूवात करावी. सलामीची जोडी, कप्तान, स्पिन्नर्स ह्या बाबतीमधे योग्य ते replacements इथे try out करायला हरकत नाही. U-१९ मधले चांद, स्मित पटेल (keeper), बाबा अपराजिथ, हरमित, संदिप शर्मा ह्यांना घेऊन त्याबरोबर बालाजी, मन्दिप सिंघ, कोहली, रोहित शर्मा, मनोज तेवारी वगैरे घेउन बदलती टिम सहज बनवता येईल. ह्याच टिमचा उपयोग injury मधून बाहेर येणार्‍या खेळाडूंच्या rehab साठी पण होउ शकतो.

सुरवात चांगली होऊन व हातात विकेट असूनही भारत एका धांवेने हरला !!असं होणं फार कौतुकास्पद नाही..

सायमन टॉफेल निवृत्त होणार.

संदीप पाटील भारताच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष.

रणजी मॅच मधे तेंडुलकर ने शतक मारले आहे. आणि मुख्य म्हणजे एकदम फ्लुएंट बॅटिंग केलेली दिसते. दोन आठवड्यात सुरू होणार्‍या टेस्ट सिरीज साठी चांगली तयारी. साहेब अजून किती खेळणार कल्पना नाही पण जेवढे खेळणार तेव्हढी अशीच धमाल करावी हीच अपेक्षा Happy

Pages