Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<< दिवसांचा आणि गुणवत्तेचा
<< दिवसांचा आणि गुणवत्तेचा काय संबंध ? >> परिक्षेची प्रश्नपत्रिका शंभर गुणांची व तीन तासांची कां, १०च गुणांची व १५ मिनीटांचीच कां नाही ? गुणवत्ता जोखण्यासाठी विषयाच्या सर्वांगीण तयारीची तपासणी आवश्यक असावी व त्याकरतां वेळेची तरतूदही असावी लागते , हा संबंध असावा !!
परिक्षेची प्रश्नपत्रिका शंभर
परिक्षेची प्रश्नपत्रिका शंभर गुणांची व तीन तासांची कां, १०च गुणांची व १५ मिनीटांचीच कां नाही ? गुणवत्ता जोखण्यासाठी विषयाच्या सर्वांगीण तयारीची तपासणी आवश्यक असावी व त्याकरतां वेळेची तरतूदही असावी लागते , हा संबंध असावा !! >> तेच argument आहे. पाच दिवस हे फक्त convenience and practicality ह्यांना धरून establish झालेला norm आहे. पाच दिवसांमधे बरोबर गुणवत्ता जोखता येते असे कुठेही सिद्ध झालेले नाही. तसे असते तर प्रत्येक टेस्ट मॅच पाच दिवस खेळणे बंधनकारक ठरवावे लागेल. 2 innings, 10 wickets वगैरे additional बंधने कशाला असती ? जर पाच ऐवजी चार दिवस असते तर आज तुमचे वरचे पोस्ट चार दिवस धरून वाचले असते तरी काही फरक पडला नसता. रच्याकाने, सगळ्या परिक्षा शंभर गुणांच्या नि तीन तासांच्याच असतात का ?
मुद्दा हा कि मॅच जर चुरशीची होत असेल तर किती दिवस खेळली गेली ह्याला मह्त्व का द्यावे ? त्या लेखाचा मूळ मुद्दा अजूनच वेगळा होता असे नाही वाटले तुम्हाला ?
असामीजी, परिक्षेला बसताना '
असामीजी, परिक्षेला बसताना ' मला जें येतं फक्त त्याबद्दलच दोन प्रश्न विचारा व मला पहिला क्रमांक द्या ' असं म्हणणं व ' मला पहिल्या षटकापासून चेंडू वळेल, त्याचा बाऊन्स चांगला पण नियमित असेल इ.इ. असलेली खेळपट्टी दिलीत तरच मी जिंकून दाखवीन ' अशा अटी कसोटीसाठी घालणं, या दोन्हीत मला खूपच साम्य वाटलं व तें खूपच खटकलं, इतकंच. कसोटी सामना पांच दिवस चालला तर त्यात क्रिकेटचं खरं खुरं कसबही दिसतं व तो चुरशीचाही होऊं शकतो, हें झालं माझं मत. तो तीन- साडेतीन दिवसांत संपला तरच चुरशीचा ठरतो याला क्रिकेटची पुरेपूर लज्जत देत शेवटच्या सत्रापर्यंत उत्कंठा वाढवणारे अगणित पांच दिवसांचे कसोटी सामने अपवाद असावेत.
कदाचित, कसोटी युगातलं क्रिकेट पहाण्यात आयुष्याचा अधिक भाग गेला असल्याने माझं वरील मत कांहीसं पक्षपाती असेलही; पण तें मांडावसं वाटलं, हें मात्र खरं.
शेवटच्या षटकां पर्यंत खेळला
शेवटच्या षटकां पर्यंत खेळला गेलेला प्रत्येक सामना हा चुरशीचा होतो हे जरी निर्विवाद सत्य असले तरी त्याला कसोटीतील अनिर्णयीत सामने हे अपवाद आहेत.
तीन दिवसात आटोपलेल्या सगळ्याच लढती एकतर्फी होतात असे नाही. कधी कधी दोन्ही संघ एकाच वेळी ढेपाळतात तेव्हा तो सामनाही चुरशीचा होतो. पाच दिवसांची फुटपट्टी सगळ्याच खेळपट्ट्यांवर लागू होत नाही असे धोनीला सुचवायचे असेल
मला वाटते भाऊंचा आक्षेप किती
मला वाटते भाऊंचा आक्षेप किती दिवस असावेत यावर नाहीये (कसोटी आहे म्हणून ५ दिवस असा संदरभ ते वापरत आहेत!), तर सामना चुरशीचा व fair play होण्याकरीता त्या दृष्टीकोनातून विकेट न बनवता निव्वळ "काहीही झाले तरी चालेल पण आम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून वळाणारी स्पिन विकेटच हवी व तशीच आम्ही बनवणार" या धोणी च्या एकंदर विचारसरणीस आहे.
असो.
मुंबई मध्ये ईं नक्कीच माँटी व स्वान दोघांना खेळवेल यात शंका नाही..
भज्जी आत येतो का एव्हडेच कुतुहल आहे..
लोकहो क्रिकेटचा आनंद घ्या..
लोकहो क्रिकेटचा आनंद घ्या.. दोन जबरी मॅचेस सुरु आहेत त्याकडे लक्ष द्या...
विंडीज - बांग्ला... काल बांग्लाच्या १० नंबरच्या खेळाडूने शतक ठोकले आणि त्यांचा धावफलक ३८७ झाला... आणि आज विंडीजचा धावफलक २ बाद ६२ झालाय... एकूणच मजा येणार आहे..
आणि दुसरीकडे ऑस्ट्रेलियानी आफ्रिकेला धू धू धुतलाय... ५.५ च्या रेटने.... ताहिरची तर पिसंच काढली आहेत.. १४ षटकात ११० वगैरे...
लोकहो क्रिकेटचा आनंद घ्या..
लोकहो क्रिकेटचा आनंद घ्या.. दोन जबरी मॅचेस सुरु आहेत त्याकडे लक्ष द्या... >> +१
क्लार्क ड्रीम फॉर्म मधे आहे आणी He is making it count .
बाकी पाँटींग ची विकेट पाहिली का कोणी ? जर त्याने फॉर्म मधे असताना नसती मस्ती केली नसती तर त्याच्याविषयी खरोखर सहानुभूती वाटली असती
क्लार्क आणि वॉर्नर जबरी खेळत
क्लार्क आणि वॉर्नर जबरी खेळत होते... त्यात कॅलीस दुखापतग्रस्त
ऑसिज ४२०/४ आणि ११ षटकं बाकी... आज पैल्या दिवसाच्या सर्वोच्च धावसंखेचा विक्रम नक्कीच.
क्लार्क २०० .
क्लार्क २०० .
ह्सी १०० .
ह्सी १०० .
पैल्या दिवसाच्या सर्वोच्चा
पैल्या दिवसाच्या सर्वोच्चा धावसंख्येचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे.. बांग्लाच्या विरुद्ध.. मोडायला थोडा अवघड वाटतोय पण अशक्य नक्कीच नाहीये.. ज्या पद्धतीत बडवताहेत ते बघून... कॅलिस जखमी झाल्याने वाट लागलीये.. आणि स्टेन पण दुखावला गेलाय..
४९४ की ४९६ आहे म्हणे पहिल्या
४९४ की ४९६ आहे म्हणे पहिल्या दिवसाचे रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियाच्याच नावावर आणि सा. आफ्रिकेच्याच विरूद्ध. गूगल मधे दिसले.
हिम्याची पोस्ट आत्ता वाचली - हो लंकेचा असेल कदाचित. मी वरची माहिती पाहिली ती बहुधा ३-४ वर्षे आधीची होती.
सापडले. ऑस्ट्रेलियाचा आहे.
सापडले. ऑस्ट्रेलियाचा आहे. लंकेचा दुसर्या दिवशीचा स्कोर होता. येथे मिळेल.
http://stats.espncricinfo.com/ci/content/records/283082.html
दुसर्या दिवशीचा पण रेकॉर्ड
दुसर्या दिवशीचा पण रेकॉर्ड लंकेचा नाहीच्चे की.. तो इंग्लंडच्या नावावर आहे..
हिम्या तू तो ५८८ वाला म्हणत
हिम्या तू तो ५८८ वाला म्हणत असशील तर तो फक्त इंग्लंडच्या नावावर नाही. इंग्लंड व भारत दोन्ही संघांनी मिळून केलेल्या धावा आहेत त्या. त्या लिस्टमधली बरीच रेकॉर्ड दोन संघांची मिळून आहेत. म्हणूनच टीम-१ आणि टीम-२ अशी नावे आहेत.
त्या दिवशी इंग्लंड १७३/२ वरून ५७१ पर्यंत गेले व भारताने आणखी १९०/० केल्या! टोटल ५८८.
लंकेचे रेकॉर्ड फक्त लंकेच्याच स्कोरचे आहे.
पुण्यात एक टी २० आहे. कोणी
पुण्यात एक टी २० आहे. कोणी येणार आहे का बघायला? मी जाईनच. असाल तर लगेच सांगा, एक दोन दिवसात म्हणजे एकत्र तिकिट काढू.
आणि बहुदा रविवारी मी टेस्ट मॅच पाहायला पण असेन. कोणी असेल तर सांगा.
असामीजी, परिक्षेला बसताना '
असामीजी, परिक्षेला बसताना ' मला जें येतं फक्त त्याबद्दलच दोन प्रश्न विचारा व मला पहिला क्रमांक द्या ' असं म्हणणं व ' मला पहिल्या षटकापासून चेंडू वळेल, त्याचा बाऊन्स चांगला पण नियमित असेल इ.इ. असलेली खेळपट्टी दिलीत तरच मी जिंकून दाखवीन ' अशा अटी कसोटीसाठी घालणं, या दोन्हीत मला खूपच साम्य वाटलं व तें खूपच खटकलं, इतकं >> हे खालचे त्याचे (धोनी) मूळ वक्तव्य नि वरचे तुमचे त्याचे interpretation सारखेच असेल तर तुमचे नि माझे इंग्लिश वेगळे अर्थ सांगतात अस धरूया
"I don't even want to see this wicket," he said. "There wasn't enough turn and bounce for the spinners… Hopefully in the coming matches we'll see the wicket turn, right from start, or as soon as possible so that the toss doesn't become vital."
Dhoni went on to add that groundsmen need not worry about the match referee's objection to such pitches. "I don't think the match referee can question a pitch just because it's turning," he said. "When the wicket seams right from the first delivery, nobody asks questions. What you don't want is ridges in the wicket and then one ball hits your head and next your toe. At times, in the subcontinent, on pitches like this, the toss becomes vital. The only way to take the toss out of the equation is to have pitches that turn right from the start. The game may end in three-and-a-half days, but both teams will have an equal opportunity to win the game."
मला वाटते भाऊंचा आक्षेप किती दिवस असावेत यावर नाहीये (कसोटी आहे म्हणून ५ दिवस असा संदरभ ते वापरत आहेत!), तर सामना चुरशीचा व fair play होण्याकरीता त्या दृष्टीकोनातून विकेट न बनवता निव्वळ "काहीही झाले तरी चालेल पण आम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून वळाणारी स्पिन विकेटच हवी व तशीच आम्ही बनवणार" या धोणी च्या एकंदर विचारसरणीस आहे. > > योग मूळात त्याने तसे काहीच म्हटलेले नाहीये हे वरचे वाचल्यावर उघड आहे. we agree to disagree म्हणून सोडून देउ.
मुंबई मध्ये ईं नक्कीच माँटी व स्वान दोघांना खेळवेल यात शंका नाही.. >> broad injured आहे असेही वाचले.
<<मुंबई मध्ये ईं नक्कीच माँटी
<<मुंबई मध्ये ईं नक्कीच माँटी व स्वान दोघांना खेळवेल यात शंका नाही.. >> आत्ताच 'क्रिकइन्फो' वरच्या व्हिडीयो मुलाखतीत द्रविडनेही हेच म्हटलंय. पण मुंबई विकेट अहमदाबादपेक्षा तेज गोलंदाजानाही
साथ देणारी असेल हें त्यानेही स्पष्ट केलंय. अशा वेळीं अहमदाबादला उत्कृष्ट गोलंदाजी करणारा यादव मुंबई कसोटीसाठी 'अनफिट' असावा हे दुर्दैव !
चेतेश्वर पुजाराच्या अहमदाबाद खेळीची दोन वैशिष्ठ्यं द्रविडने अचूक अधोरेखित केली - १] 'ग्राऊंड स्ट्रोक' मारूनच धांवा काढण्याचं त्याचं कसब व त्याकडेच असलेला त्याचा कल व २] धांवाचा वेग कमी होऊं न देतां मोठ्या खेळी करण्याचं त्याचं कौशल्य !
3 Spinners ? Interesting
3 Spinners ? Interesting !!
Would have been more interesting had we bowled first . I think Kohli would have been the only option to share the new ball .
<< 3 Spinners ? Interesting
<< 3 Spinners ? Interesting !! >> आश्चर्य नाही ! शास्त्रीसर म्हणतात, इंग्लंडला उगीचच दिलासा देण्यापुरती किंचितशी हिरवळ दिसत्येय खेळपट्टीवर पण ही विकेट भेगाळणारीच आहे !!
पहिल्याच चेंडूवर चौकार
पहिल्याच चेंडूवर चौकार बसल्यावर पुढल्या चेंडूवर गंभीर चकला.
मला वाटते ऊपाहारापर्यंत ही
मला वाटते ऊपाहारापर्यंत ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पाटा होणार आहे... यावर सेट झालेला सेहवाग डोळे झाकून १००, २०० करू शकेल..
पहिल्या एका तासात थोडा बाऊंस होता... आता गायब झालाय... शिवाय दिवस तापेल तसे गोलंदाजी करणे अवघड असेल.. स्वान वर पुन्हा एकदा मदार असेल.
विंडीज परफेक्ट टेस्ट क्रिकेट
विंडीज परफेक्ट टेस्ट क्रिकेट खेळतय . सुरूवातीला ब्राव्हो आणी सॅम्युअल्स अगदी संथपणे खेळत होते . पण एकदा ३०० पार केल्यावर आणी बांग्ला ढेपाळल्यावर त्यानी फोडायला सुरूवात केली . आता रनरेट ३.४आहे ,
>>यावर सेट झालेला सेहवाग डोळे
>>यावर सेट झालेला सेहवाग डोळे झाकून १००, २०० करू शकेल..
डोळे झाकून बोल्ड पण झाला की...
६०/३
६०/३
आहा.. पाणेसारने सचिन ला
आहा.. पाणेसारने सचिन ला निव्वळ मामा बनवला.......
(मारायला जाऊन बाद झाला म्हणुयात!)
अरे वा विकेट चक्क मस्त स्पिन होते आहे... जबराच!
ओके मामा बनवला. असाच मामा
ओके मामा बनवला. असाच मामा बनला तर निवृत्त हो म्हणून आम्हीही म्हणूच.
(पण मागच्या वेळेस मारायला जाताना नव्हता बाद झाला का?)
अरे फारेंडा किती ते मागे वळून
अरे फारेंडा किती ते मागे वळून पहायच...? the game is over..!
(just watch that dismissal... u will know sachin just didnt know what to do.. didnt know how to approach that typical lefty spin... his body reaction was so stiff/static.. foot on the ground.. just goes to show that the mindset, reflex, technic its all down and gone........ and that too at home ground... )
I still believe pplaying both gambhir and sachin was mistake.
नाही तुझी कंसातील कॉमेंट
नाही तुझी कंसातील कॉमेंट त्याबद्दलच होती ना? म्हणून विचारले.
'स्पिनींग विकेट' हें दुधारी
'स्पिनींग विकेट' हें दुधारी शस्त्र आहे; सचिन पुढे पाय टाकून बचावात्मक खेळताना डाव्या यष्टीबाहेरचा पानेसारचा चेंडू वळून बॅटबाहेरून येऊन सचिनची उजवी यष्टी उडवतो !! ही विकेट सगळ्याना 'मामा' बनवण्यासाठीच तर केलीय !!
पुजाराने पानेसारला मारलेला अप्रतिम कव्हर ड्राईव्ह एवढाच फलंदाजीतला आजचा खराखुरा आनंद . आतां कोसळणार्या विकेटस हीच एक एक्साईटमेंट न राहो या सामन्यात म्हणजे झालं !
Pages