क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

RSA England दौर्‍यासाठी त्यांच्या मुख्य संघाबरोबरच A team Ireland च्या दौर्‍यावर पाठवतेय. अशासाठी कि Injury cover असावे नि reserved खेळाडूंना acclimate व्हायला वेळ मिळालेला असावा. England ने सुद्धा मागच्या RSA दौर्‍याच्या वेळी असे केले होते. BCCI ह्यातून काहि शिकेल का ? chances are high that if we have undertaking down under, india A team will be playing in England Wink

छे! असल्या चांगल्या योजना आखण्याऐवजी बीसीसीआय जेवढे पैसे कमावता येतील तेवढे कमावून घ्यायच्या मागे आहे. आता जुलै २०१२ मध्ये भारतीय संघ श्रीलंकेत जाऊन ५ एकदिवसीय व २ ट-२० सामने खेळणार आहे म्हणे. जुलै मध्ये श्रीलंकेत भारतासारखाच मुसळधार पाऊस असेल. तरीसुद्धा हा दौरा आखण्यामागे काय कारण आहे? २००८ पासून एकही वर्ष असे गेले नाही की ज्या वर्षात भारत-श्रीलंका यांच्यात एकही सामना झाला नाही. आता परत श्रीलंकेशीच खेळणार.

क्रिकइन्फो वर आकाश चोप्रा हे एक सदर लिहीत आहे, भारताच्या कसोटी संघाच्या पुढील काही वर्षांतील खेळाडूंबद्दल त्याचे अंदाज. तो खूप छान लिहीतो.

http://www.espncricinfo.com/magazine/content/story/568600.html

हे वाचा:
http://www.espncricinfo.com/mcc/content/current/story/570134.html

Angry
हरामखोर, ढोंगी, मत्सरी लोक. भारताचे जगातील क्रिकेटमधले पहिले स्थान बघवत नाही. कित्येक भारतीय त्यांच्याविरुद्ध शतके काढतात, त्यांना धावा करू देत नाहीत, आणि वर त्यांच्यापेक्षा श्रीमंत होतात, ते बघवत नाही!

इकडे पाश्चिमात्यांची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे, भारतात मात्र लोक छान श्रीमंत होताहेत, चैन करताहेत, म्हणून हे जळतात!

फुकटचा उपदेश! एखाद्या गोर्‍या लोकांच्या देशाने केले तर चालले असते, पण गोर्‍या नसलेल्या लोकांनी इतरांपेक्षा चांगले झाले तर यांच्या पोटात दुखते!

खड्ड्यात गेले!!

BCCI विरुद्ध केलेले त्याचे हे पहिलेच भाषण नाहिये. टोनी ग्रेग ने ICL मधे सामील होताना हे भाषण केले असते तर अधिक उचित ठरले असते. Spirit of cricket वगैरे टोनी ग्रेगने बोलणे म्हणजे Wink उद्या जर IPL bonanza मधे त्याला सामील केले गेले तर पुढचे भाषण ऐकायला मजा येईल.

सडेतोड भाषण केले आहे टोनी ग्रेग ने.
स्वतः पार चर्च, ख्रिसमस, राजकारण, समाजकारण, खाणे, पिणे सगळ्याचे commercialism करून श्रीमंत व्हायचे नि म्हणायचे पहा, आम्ही किती हुषार, आम्ही किती श्रीमंत. पण तेच दुसर्‍याने केले की यांच्या पोटात दुखते.

भारताला क्रिकेटचे प्रेम असण्याची काही आवश्यकता नाही. तो आपला खेळ नव्हेच - परक्यांचा. त्यांच्याच खेळात प्राविण्य मिळवून जास्तीत जास्त पैसे कमावले यात एक irony च आहे. मी तर भारतीयांची स्तुतीच करीन.
उद्या आपले मसाले शरीराला किती उपयुक्त आहेत, आपल्या जुन्या पद्धतीच कशा जास्त उपयोगी आहेत हे त्यांच्या लक्षात आले की तेपण त्याचे च commercialism करून पैसे मिळवतील नि म्हणतील, पहा आम्ही किती हुषार! उदा. 'योग'.

निजामाच्या हल्ल्यापासून पुण्याचे रक्षण करणे कठीण झाल्यावर बाजीरावाने निजामाच्याच प्रदेशात हल्ले करायला सुरुवात केली. तसेच काहीतरी.
भारतीय स्वतःचे जुने ज्ञान न वापरता, काँप्युटर, क्रिकेट असल्या इतर लोकांच्या शोधातून प्राविण्य मिळवून स्वत:ला सुखी करताहेत, तर यांच्या का पोटात दुखते?!

आजपासून इंग्लंड्-ऑस्ट्रेलिया अ‍ॅशेस मालिका सुरू होत आहे. आज पहिला एकदिवसीय सामना आहे. इंग्लंड ५० षटकात ५ बाद २७२. ऑस्ट्रेलिया आतापर्यंत २४ षटकात ३ बाद १२१.

टोनीच्या भाषणाला हर्शाचा जवाब
हर्शा सभ्य आहे. भारतीय आहे - सभ्यता, नितीमत्ता, अहिंसा या गोष्टी त्याला माहित आहेत, नि त्या तो मानतो.

मी मायबोलीवरील चर्चा करणारा मनुष्य!
माझी भाषा शिवराळ. शिव्यागाळी करणे म्हणजेच मुद्द्याला उत्तर देणे असे मी समजतो! मुद्दा खरा असण्याला मह्त्व नाही, मला आवडला नाही तर मी शिव्या देणार!
या गोर्‍या लोकांची सभ्यता फक्त त्यांच्या त्यांच्यात. बाहेरच्यांशी नाही!! त्यांना लाथा मारल्याखेरीज त्यांची गुर्मी उतरत नाही, स्वानुभव हो!

>>> मास्तुरे ही अ‍ॅशेस नव्हे. ती २०१३ ला आहे. ही फक्त वन डे सिरीज.

नक्की का? मला कल्पना नव्हती. मला वाटलं की एकदिवसीय मालिकेपाठोपाठ अ‍ॅशेसची कसोटी मालिका सुरू होणार. पाँटिंगला अ‍ॅशेसमध्ये खेळण्याची जबरदस्त इच्छा आहे. पण मला नाही वाटत तो २०१३ मध्ये खेळेल. त्याआधीच तो निवृत्त होईल किंवा त्याची हकालपट्टी होईल.

* श्रीलंका दौरा :

२१ जुलै - पहिला वन-डे सामना- हंबनटोटा ; २४ जुलै- दुसरा
वन-डे सामना हंबनटोटा ; २८ जुलै - तिसरा वन-डे सामना - कोलंबो ; ३१ जुलै - चौथा वन-डे सामना- कोलंबो ; ४ ऑगस्ट - पाचवा वन-डे सामना- पल्लेकेल ; ७ ऑगस्ट - एकमेव टी२० - पल्लेकेल.

* न्यूझीलंड भारत दौरा :

२३ ते २७ ऑगस्ट - पहिली कसोटी - हैदराबाद ; ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर - दुसरी कसोटी - बेंगळुरू ; ८ सप्टेंबर - पहिली टी२० - विशाखापट्टणम ; ११ सप्टेंबर - दुसरी टी२० - चेन्नई.

* आयसीसी टी-२० वर्ल्ड कप :
१८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर - श्रीलंकेत.

* चॅम्पियन्स लीग :

ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत.

* इंग्लंड भारत दौरा :
१५ ते १९ नोव्हेंबर - पहिली कसोटी - अहमदाबाद ; २३ ते २७ नोव्हेंबर - दुसरी कसोटी - मुंबई ; ५ ते ९ डिसेंबर - तिसरी कसोटी- कोलकाता ; १३ ते १७ डिसेंबर - चौथी कसोटी - नागपूर ; २० डिसेंबर - पहिली टी२० - पुणे ; २२ डिसेंबर - दुसरी टी२० - मुंबई ; ११ जानेवारी - पहिली वन-डे - राजकोट ; १९ जानेवारी- तिसरी वन-डे-रांची ; २३ जानेवारी - चौथी वन-डे- धर्मशाळा ; २७ जानेवारी - पाचवी वन-डे-चंडीगड.

* ऑस्ट्रेलिया संघ चार कसोटीसाठी भारतात
* यानंतर आयपीएल - ६.

न्यूझीलँड्-विंडीज मालिका चक्क अमेरिकेत फ्लोरिडात सुरू आहे. पूर्वी कॅनडात भारत्-पाक एकदिवसीय सामने झाले होते. पण अमेरिकेत बहुदा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामने होत असावेत. आतापर्यंत दोन ट-२० सामने झाले असून दोन्ही सामने विंडीजने जिंकले आहेत.

इंग्लंड भारत दौरा Nov-Dec मधे न ठेवता कडक उन्हाळ्यामधे ठेवायला हवा होता. मिडल ईस्टमधे स्पिनर्सनी poms ची कशी वाट लावलेली लक्षात आहे ना ..

>>> २१ जुलै - पहिला वन-डे सामना- हंबनटोटा ; २४ जुलै- दुसरा
वन-डे सामना हंबनटोटा ; २८ जुलै - तिसरा वन-डे सामना - कोलंबो ; ३१ जुलै - चौथा वन-डे सामना- कोलंबो ; ४ ऑगस्ट - पाचवा वन-डे सामना- पल्लेकेल ; ७ ऑगस्ट - एकमेव टी२० - पल्लेकेल.

बीसीसीआयचं डोकंबिकं फिरलं की काय! चक्क भर पावसाळ्यात श्रीलंकेचा दौरा!! दरवर्षी श्रीलंकेविरूद्ध खेळायचा यांना कंटाळा कसा येत नाही. २००८ पासून दरवर्षी भारत-श्रीलंका यांच्यात सामने होतातच. मला तर आता श्रीलंकेचे काड्यापेटीच्या रंगाची विजार व सदरा घातलेले खेळाडू बघूनच तिडीक येते.

श्रीलंका दौर्‍यासाठी संघ जाहीर झालाय. सचिन जात नाही आहे. कोहली उपकप्तान आहे. अजिंक्य राहणे बाक उबविण्यासाठी जाईल.

श्रीलंका दौर्‍यासाठी खालील संघ आहे.

- सेहवाग, कोहली (उ.क.), गंभीर, अश्विन, उमेश यादव, दिंडा, धोनी (क. व य.), रैना, विनय कुमार, रोहित शर्मा, ओझा, रहाणे, मनोज तिवारी, राहुल शर्मा, झहीर खान

अश्विन, विनय कुमार आणि राहुल शर्मा हे सुमार खेळाडू कोणाच्यातरी वशिल्याने आत आलेले दिसतात. पवण्या, मुनाफ, वरूण एरॉन हे गोलंदाज का बाहेर काढले खुदा जाने.

सचिनचा निर्णय अनाकलानीय पुन्हा. त्याचा वन डे चा प्लॅन नक्की काय आहे कोणास ठाऊक! निदान स्वतः एन्जॉय कर व तुझी बॅटिंग आम्हाला करू दे Happy

अश्विन, विनय कुमार आणि राहुल शर्मा हे सुमार खेळाडू कोणाच्यातरी वशिल्याने आत आलेले दिसतात>> अल्ला मेहरबान तो गधा पैलवान असे म्हणतात त्यातलीच गत आहे ही. ज्या कारणाने प्रविणकुमारला बसवला त्याच न्यायाने त्यांच्या आधी ह्या तिघांचा नंबर लागायला हवा होता. त्याच न्यायाने ओझा बाहेर राहायला हवा होता. खरं पाहता, ह्या नंतर लगेचच लंकेत T-20 World Cup आहे तेंव्हा त्याच्या द्रुष्टीने पूर्व तयारी म्हणून ह्या दौर्‍याकडे बघायला हवे होते नि selection करायला हवे होते. त्यात सचिन नाहि म्हणून आताही नाहि हे चांगली गोष्ट आहे. तेंव्हा जे बॉलर्स असणार त्या द्रुष्टिने बॉलर्स ठेवणे जरुरी होते. मला वाटते जडेजा तेंव्हा परत येईल.

इरफान पठाण आणि १९ वर्षाखालील संघातून चांगली कामगिरी करणारा डावखुरा ऑफस्पिनर अक्षय दरेकर याला घ्यायला हरकत नव्हती.

मार्क बाउचरच्या क्रिकेट करिअरचा दु:खद शेवट झाला. कालच्या सामन्यात यष्टीरक्षण करताना डोळ्याला अतिशय गंभीर दुखापत झाल्याने त्याने निवृत्ती जाहीर केली. नरी काँट्रॅक्टर, रमण लांबा इ. खेळाडूंना देखील यापूर्वी खेळताना मैदानावर गंभीर दुखापत झाली होती.

http://www.espncricinfo.com/england-v-south-africa-2012/content/story/57...

>>> त्याचा डोळ्याचा पांढरा भाग फाटला गेलेला होता.......त्यामुळे त्याला सोडावे लागले

असे झाल्यावर त्या डोळ्याची दृष्टी कायमची जाते का? कालांतराने उपचाराने त्याचा डोळा परत पूर्वीसारखा होईल का?

मास्तुरे.............. ते सांगता येत नाही कारण तब्बल ३ तास ऑपरेशन चालु होते..आणि डॉक्टरांनी त्या डोळ्याची व्यवस्तित बघण्याची शक्यता कमीच सांगितलेली होती...त्यामुळे बहुतेक त्याने हा कटु निर्णय घेतला ....
विकेटकिपर ने आता हेल्मेट अथवा..........तलवारबाजी करताना पुर्ण चेहरा झाकणारा हेल्मेटच वापरावे... खेळ खेळच राहील तरच आनंद येतो... Sad

किंवा सर्वांनीच आयर्न मॅनचा पोषाख घालून खेळावे, मग अगदी चेंडू ऐवजी ग्रेनेड्स घेऊन खेळले तरी कुणाला इजा होणार नाही. शंभर वर्षात जबरी दुखापत झालेल्यांची संख्या किती आहे?

Pages